logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

गुरुपौर्णिमेनिमित्त दत्तशिखरावर भक्तीचा महासागर; रिमझिम पावसातही हजारो भाविकांची उपस्थिती गुरुपौर्णिमेनिमित्त दत्तशिखरावर भक्तीचा महासागर; रिमझिम पावसातही हजारो भाविकांची उपस्थिती माहूरगड प्रतिनिधी: धनंजय आराध्ये श्रीक्षेत्र माहूरगड येथील पवित्र श्री दत्तात्रेय शिखर संस्थानात गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित गुरुपूजन सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पडला. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असतानाही महाराष्ट्रासह विविध राज्यांतून आलेल्या हजारो भाविकांनी दत्तशिखरावर दर्शनासाठी अलोट गर्दी केली. पावसाकडे दुर्लक्ष करून भाविकांनी गुरुदर्शन व गुरुपूजनाचा लाभ घेतल्याने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. गुरुपौर्णिमेनिमित्त श्री दत्तात्रेय शिखर संस्थानाचे श्री श्री १००८ महंत धनेश्वर भारती महाराज (गुरु मधुसूदन भारती) यांच्या शुभहस्ते पहाटे श्री दत्तात्रेय महाराजांचा वैदिक मंत्रोच्चारात अभिषेक करण्यात आला. त्यानंतर परिसरातील सर्व देवतांचे पूजन, समाधीपूजन तसेच विविध धार्मिक विधी पार पडले. या धार्मिक विधींचे पुरोहित्य विलासराव जोशी, रवींद्र जोशी, ऋषिकेश जोशी व विकास जोशी यांनी केले. यानंतर श्री १००८ महंत धनेश्वर भारती महाराज गादीवर विराजमान झाले. पोथीवाचन, गुरुपूजन, आशीर्वचन आणि विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. उपस्थित संत-महंत, महापुरुष तसेच हजारो भाविकांनी गुरुपूजन करून आशीर्वाद घेतले. पावसाच्या सरींनीही या पवित्र सोहळ्याची शोभा अधिक खुलविली. या सोहळ्यास वासुदेव भारती महाराज, परमेश्वर भारती, धनराज भारती महाराज, चिंतामण भारती महाराज, चिरंजीव भारती, हरिहर भारती, वामन भारती, सुभाष भारती, शिलानंद भारती, सुजान भारती, माधवगिरी महाराज, गजराज भारती, नितेश भारती, अक्षयगिरी यांच्यासह अनेक संत-महंत उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थानचे व्यवस्थापक जी. एन. नाईक, अश्विन माने, विश्वस्त मंडळ तसेच सेवेकरी यांनी विशेष परिश्रम घेतले. गुरुपूजनानंतर उपस्थित हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सोहळ्याच्या अखेरीस "अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त", "देवदत्त श्री दत्तात्रय महाराज की जय" या जयघोषांनी संपूर्ण दत्तशिखर परिसर दुमदुमून गेला. भक्तिभाव, श्रद्धा आणि उत्साहाने भरलेला हा गुरुपौर्णिमा महोत्सव अत्यंत मंगलमय वातावरणात संपन्न झाला.

9 hrs ago
user_सक्षम महाराष्ट्र न्यूज
सक्षम महाराष्ट्र न्यूज
Advertising Photographer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
9 hrs ago

गुरुपौर्णिमेनिमित्त दत्तशिखरावर भक्तीचा महासागर; रिमझिम पावसातही हजारो भाविकांची उपस्थिती गुरुपौर्णिमेनिमित्त दत्तशिखरावर भक्तीचा महासागर; रिमझिम पावसातही हजारो भाविकांची उपस्थिती माहूरगड प्रतिनिधी: धनंजय आराध्ये श्रीक्षेत्र माहूरगड येथील पवित्र श्री दत्तात्रेय शिखर संस्थानात गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित गुरुपूजन सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पडला. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असतानाही महाराष्ट्रासह विविध राज्यांतून आलेल्या हजारो भाविकांनी दत्तशिखरावर दर्शनासाठी अलोट गर्दी केली. पावसाकडे दुर्लक्ष करून भाविकांनी गुरुदर्शन व गुरुपूजनाचा लाभ घेतल्याने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. गुरुपौर्णिमेनिमित्त श्री दत्तात्रेय शिखर संस्थानाचे श्री श्री १००८ महंत धनेश्वर भारती महाराज (गुरु मधुसूदन भारती) यांच्या शुभहस्ते पहाटे श्री दत्तात्रेय महाराजांचा वैदिक मंत्रोच्चारात अभिषेक करण्यात आला. त्यानंतर परिसरातील सर्व देवतांचे पूजन, समाधीपूजन तसेच विविध धार्मिक विधी पार पडले. या धार्मिक विधींचे पुरोहित्य विलासराव जोशी, रवींद्र जोशी, ऋषिकेश जोशी व विकास जोशी यांनी केले. यानंतर श्री १००८ महंत धनेश्वर भारती महाराज गादीवर विराजमान झाले. पोथीवाचन, गुरुपूजन, आशीर्वचन आणि विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. उपस्थित संत-महंत, महापुरुष तसेच हजारो भाविकांनी गुरुपूजन करून आशीर्वाद घेतले. पावसाच्या सरींनीही या पवित्र सोहळ्याची शोभा अधिक खुलविली. या सोहळ्यास वासुदेव भारती महाराज, परमेश्वर भारती, धनराज भारती महाराज, चिंतामण भारती महाराज, चिरंजीव भारती, हरिहर भारती, वामन भारती, सुभाष भारती, शिलानंद भारती, सुजान भारती, माधवगिरी महाराज, गजराज भारती, नितेश भारती, अक्षयगिरी यांच्यासह अनेक संत-महंत उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थानचे व्यवस्थापक जी. एन. नाईक, अश्विन माने, विश्वस्त मंडळ तसेच सेवेकरी यांनी विशेष परिश्रम घेतले. गुरुपूजनानंतर उपस्थित हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सोहळ्याच्या अखेरीस "अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त", "देवदत्त श्री दत्तात्रय महाराज की जय" या जयघोषांनी संपूर्ण दत्तशिखर परिसर दुमदुमून गेला. भक्तिभाव, श्रद्धा आणि उत्साहाने भरलेला हा गुरुपौर्णिमा महोत्सव अत्यंत मंगलमय वातावरणात संपन्न झाला.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • गुरुपौर्णिमेनिमित्त दत्तशिखरावर भक्तीचा महासागर; रिमझिम पावसातही हजारो भाविकांची उपस्थिती गुरुपौर्णिमेनिमित्त दत्तशिखरावर भक्तीचा महासागर; रिमझिम पावसातही हजारो भाविकांची उपस्थिती माहूरगड प्रतिनिधी: धनंजय आराध्ये श्रीक्षेत्र माहूरगड येथील पवित्र श्री दत्तात्रेय शिखर संस्थानात गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित गुरुपूजन सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पडला. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असतानाही महाराष्ट्रासह विविध राज्यांतून आलेल्या हजारो भाविकांनी दत्तशिखरावर दर्शनासाठी अलोट गर्दी केली. पावसाकडे दुर्लक्ष करून भाविकांनी गुरुदर्शन व गुरुपूजनाचा लाभ घेतल्याने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. गुरुपौर्णिमेनिमित्त श्री दत्तात्रेय शिखर संस्थानाचे श्री श्री १००८ महंत धनेश्वर भारती महाराज (गुरु मधुसूदन भारती) यांच्या शुभहस्ते पहाटे श्री दत्तात्रेय महाराजांचा वैदिक मंत्रोच्चारात अभिषेक करण्यात आला. त्यानंतर परिसरातील सर्व देवतांचे पूजन, समाधीपूजन तसेच विविध धार्मिक विधी पार पडले. या धार्मिक विधींचे पुरोहित्य विलासराव जोशी, रवींद्र जोशी, ऋषिकेश जोशी व विकास जोशी यांनी केले. यानंतर श्री १००८ महंत धनेश्वर भारती महाराज गादीवर विराजमान झाले. पोथीवाचन, गुरुपूजन, आशीर्वचन आणि विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. उपस्थित संत-महंत, महापुरुष तसेच हजारो भाविकांनी गुरुपूजन करून आशीर्वाद घेतले. पावसाच्या सरींनीही या पवित्र सोहळ्याची शोभा अधिक खुलविली. या सोहळ्यास वासुदेव भारती महाराज, परमेश्वर भारती, धनराज भारती महाराज, चिंतामण भारती महाराज, चिरंजीव भारती, हरिहर भारती, वामन भारती, सुभाष भारती, शिलानंद भारती, सुजान भारती, माधवगिरी महाराज, गजराज भारती, नितेश भारती, अक्षयगिरी यांच्यासह अनेक संत-महंत उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थानचे व्यवस्थापक जी. एन. नाईक, अश्विन माने, विश्वस्त मंडळ तसेच सेवेकरी यांनी विशेष परिश्रम घेतले. गुरुपूजनानंतर उपस्थित हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सोहळ्याच्या अखेरीस "अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त", "देवदत्त श्री दत्तात्रय महाराज की जय" या जयघोषांनी संपूर्ण दत्तशिखर परिसर दुमदुमून गेला. भक्तिभाव, श्रद्धा आणि उत्साहाने भरलेला हा गुरुपौर्णिमा महोत्सव अत्यंत मंगलमय वातावरणात संपन्न झाला.
    1
    गुरुपौर्णिमेनिमित्त दत्तशिखरावर भक्तीचा महासागर; रिमझिम पावसातही हजारो भाविकांची उपस्थिती
गुरुपौर्णिमेनिमित्त दत्तशिखरावर भक्तीचा महासागर; रिमझिम पावसातही हजारो भाविकांची उपस्थिती
माहूरगड प्रतिनिधी: धनंजय आराध्ये 
श्रीक्षेत्र माहूरगड येथील पवित्र श्री दत्तात्रेय शिखर संस्थानात गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित गुरुपूजन सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पडला. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असतानाही महाराष्ट्रासह विविध राज्यांतून आलेल्या हजारो भाविकांनी दत्तशिखरावर दर्शनासाठी अलोट गर्दी केली. पावसाकडे दुर्लक्ष करून भाविकांनी गुरुदर्शन व गुरुपूजनाचा लाभ घेतल्याने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
गुरुपौर्णिमेनिमित्त श्री दत्तात्रेय शिखर संस्थानाचे श्री श्री १००८ महंत धनेश्वर भारती महाराज (गुरु मधुसूदन भारती) यांच्या शुभहस्ते पहाटे श्री दत्तात्रेय महाराजांचा वैदिक मंत्रोच्चारात अभिषेक करण्यात आला. त्यानंतर परिसरातील सर्व देवतांचे पूजन, समाधीपूजन तसेच विविध धार्मिक विधी पार पडले. या धार्मिक विधींचे पुरोहित्य विलासराव जोशी, रवींद्र जोशी, ऋषिकेश जोशी व विकास जोशी यांनी केले.
यानंतर श्री १००८ महंत धनेश्वर भारती महाराज गादीवर विराजमान झाले. पोथीवाचन, गुरुपूजन, आशीर्वचन आणि विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. उपस्थित संत-महंत, महापुरुष तसेच हजारो भाविकांनी गुरुपूजन करून आशीर्वाद घेतले. पावसाच्या सरींनीही या पवित्र सोहळ्याची शोभा अधिक खुलविली.
या सोहळ्यास वासुदेव भारती महाराज, परमेश्वर भारती, धनराज भारती महाराज, चिंतामण भारती महाराज, चिरंजीव भारती, हरिहर भारती, वामन भारती, सुभाष भारती, शिलानंद भारती, सुजान भारती, माधवगिरी महाराज, गजराज भारती, नितेश भारती, अक्षयगिरी यांच्यासह अनेक संत-महंत उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थानचे व्यवस्थापक जी. एन. नाईक, अश्विन माने, विश्वस्त मंडळ तसेच सेवेकरी यांनी विशेष परिश्रम घेतले. गुरुपूजनानंतर उपस्थित हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
सोहळ्याच्या अखेरीस "अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त", "देवदत्त श्री दत्तात्रय महाराज की जय" या जयघोषांनी संपूर्ण दत्तशिखर परिसर दुमदुमून गेला. भक्तिभाव, श्रद्धा आणि उत्साहाने भरलेला हा गुरुपौर्णिमा महोत्सव अत्यंत मंगलमय वातावरणात संपन्न झाला.
    user_सक्षम महाराष्ट्र न्यूज
    सक्षम महाराष्ट्र न्यूज
    Advertising Photographer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • उमरखेड़ s.t. महामंडल आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आमदार किसनराव वानखेड़े साहब के हाथों उदघाटन उमरखेड़ st महामंडल आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आमदार किसनराव वानखेड़े साहब और पालक मंत्री संजय राठोड़ कि कोशिशों से नितिन भाऊ भूतड़ा के सहकार्य से उमरखेड़ आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आगार प्रमुख प्रमोदिनी किनाके मैडम कि कार्य कुशलता से आज उमरखेड़ आगार बना महाराष्ट्र में 1 नंबर
    1
    उमरखेड़ s.t. महामंडल आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आमदार किसनराव वानखेड़े साहब के हाथों उदघाटन 
उमरखेड़ st महामंडल आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आमदार किसनराव वानखेड़े साहब और पालक मंत्री संजय राठोड़ कि कोशिशों से नितिन भाऊ भूतड़ा के सहकार्य से उमरखेड़ आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आगार प्रमुख प्रमोदिनी किनाके मैडम कि कार्य कुशलता से आज उमरखेड़ आगार बना महाराष्ट्र में 1 नंबर
    user_Firoz Ahemad Noor khan
    Firoz Ahemad Noor khan
    Beverage Store उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • उमरखेड आगाराला मोठी भेट! पालकमंत्री व आमदारांच्या प्रयत्नांतून ५ नवीन 'जिजाऊ' बसांचे दमदार आगमन महायुतीच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पूजन व लोकार्पण; प्रवाशांना अधिक सुरक्षित, दर्जेदार व सुलभ वाहतुकीची अपेक्षा उमरखेड आगाराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना देणाऱ्या ५ नवीन 'जिजाऊ' बसांचे आज उत्साहात पूजन व लोकार्पण करण्यात आले. पालकमंत्री व स्थानिक आमदार यांच्या पाठपुराव्यामुळे या बस उमरखेड आगाराला प्राप्त झाल्याचे कार्यक्रमात नमूद करण्यात आले. या प्रसंगी शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बसांचे विधिवत पूजन करून त्या प्रवासी सेवेसाठी समर्पित करण्यात आल्या. नवीन बसांमुळे ग्रामीण व शहरी भागातील प्रवाशांना अधिक चांगली, सुरक्षित आणि नियमित एसटी सेवा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता अशा बसांची आवश्यकता असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. प्रवाशांच्या अपेक्षा काय? दुर्गम भागात नियमित बसफेऱ्या सुरू कराव्यात. वेळापत्रकाचे काटेकोर पालन व्हावे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. बसची देखभाल व स्वच्छता नियमित ठेवावी. सार्वजनिक सेवेत पारदर्शकता व उत्तरदायित्व राखावे.कायदेशीर अपेक्षा सार्वजनिक निधीतून उपलब्ध झालेल्या या बससेवेचे संचालन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लागू नियमांनुसार, शासनाच्या धोरणांनुसार आणि सर्व प्रवाशांना समान व पारदर्शक सेवा मिळेल, या तत्त्वावर होणे आवश्यक आहे. बस मार्गांचे नियोजन, फेऱ्यांचे वेळापत्रक आणि सेवा वितरणात प्रशासनाने नियमानुसार कार्यवाही करणे अपेक्षित आहे. "नवीन बसांचे आगमन ही केवळ वाहनांची भर नसून, ग्रामीण जनतेच्या प्रवासाला नवी गती देणारी आणि सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करणारी महत्त्वाची पायरी आहे," अशी भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.
    3
    उमरखेड आगाराला मोठी भेट!

पालकमंत्री व आमदारांच्या प्रयत्नांतून ५ नवीन 'जिजाऊ' बसांचे दमदार आगमन

महायुतीच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पूजन व लोकार्पण; प्रवाशांना अधिक सुरक्षित, दर्जेदार व सुलभ वाहतुकीची अपेक्षा
उमरखेड आगाराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना देणाऱ्या ५ नवीन 'जिजाऊ' बसांचे आज उत्साहात पूजन व लोकार्पण करण्यात आले. पालकमंत्री व स्थानिक आमदार यांच्या पाठपुराव्यामुळे या बस उमरखेड आगाराला प्राप्त झाल्याचे कार्यक्रमात नमूद करण्यात आले.
या प्रसंगी शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बसांचे विधिवत पूजन करून त्या प्रवासी सेवेसाठी समर्पित करण्यात आल्या.
नवीन बसांमुळे ग्रामीण व शहरी भागातील प्रवाशांना अधिक चांगली, सुरक्षित आणि नियमित एसटी सेवा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता अशा बसांची आवश्यकता असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
प्रवाशांच्या अपेक्षा काय?
दुर्गम भागात नियमित बसफेऱ्या सुरू कराव्यात.
वेळापत्रकाचे काटेकोर पालन व्हावे.
प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे.
बसची देखभाल व स्वच्छता नियमित ठेवावी.
सार्वजनिक सेवेत पारदर्शकता व उत्तरदायित्व राखावे.कायदेशीर अपेक्षा
सार्वजनिक निधीतून उपलब्ध झालेल्या या बससेवेचे संचालन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लागू नियमांनुसार, शासनाच्या धोरणांनुसार आणि सर्व प्रवाशांना समान व पारदर्शक सेवा मिळेल, या तत्त्वावर होणे आवश्यक आहे. बस मार्गांचे नियोजन, फेऱ्यांचे वेळापत्रक आणि सेवा वितरणात प्रशासनाने नियमानुसार कार्यवाही करणे अपेक्षित आहे.
"नवीन बसांचे आगमन ही केवळ वाहनांची भर नसून, ग्रामीण जनतेच्या प्रवासाला नवी गती देणारी आणि सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करणारी महत्त्वाची पायरी आहे," अशी भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.
    user_Shaikh irfan Shaikh isa
    Shaikh irfan Shaikh isa
    उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 103.9 मिमी पाऊस, जिल्ह्यात 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी  103.9  मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हिंगोली तालुक्यात सर्वात जास्त 145 मि.मी. पाऊस झाला आहे. तर वसमत तालुक्यात सर्वात कमी ७०.४ मि.मी. पाऊस पडला आहे.  जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 145 (508.2), कळमनुरी 104.3 (451.2),  वसमत 70.4 (338.4), औंढा नागनाथ 110.8 (401.7) आणि सेनगाव तालुक्यात 89.8 (335.6) मि. मी. पाऊस  पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे. हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2026 ते 31 जुलै, 2026  पर्यंत सरासरी  408.3 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 51.3 अशी आहे.  हिंगोली जिल्ह्यातील 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हिंगोली तालुक्यातील सर्व 7 मंडळे, कळमनुरी तालुक्यातील सर्व 6 मंडळे, वसमत तालुक्यातील 4 मंडळे, औंढा नागनाथ तालुक्यातील सर्व 4 मंडळे आणि सेनगाव तालुक्यातील सर्व 6 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील विविध भागांत झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, तसेच नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
    1
    हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 103.9 मिमी पाऊस, जिल्ह्यात 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद

जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी  103.9  मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हिंगोली तालुक्यात सर्वात जास्त 145 मि.मी. पाऊस झाला आहे. तर वसमत तालुक्यात सर्वात कमी ७०.४ मि.मी. पाऊस पडला आहे. 
जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 145 (508.2), कळमनुरी 104.3 (451.2),  वसमत 70.4 (338.4), औंढा नागनाथ 110.8 (401.7) आणि सेनगाव तालुक्यात 89.8 (335.6) मि. मी. पाऊस  पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे.
हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2026 ते 31 जुलै, 2026  पर्यंत सरासरी  408.3 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 51.3 अशी आहे. 
हिंगोली जिल्ह्यातील 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हिंगोली तालुक्यातील सर्व 7 मंडळे, कळमनुरी तालुक्यातील सर्व 6 मंडळे, वसमत तालुक्यातील 4 मंडळे, औंढा नागनाथ तालुक्यातील सर्व 4 मंडळे आणि सेनगाव तालुक्यातील सर्व 6 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील विविध भागांत झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, तसेच नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
    user_Shankar mulgir
    Shankar mulgir
    Reporter कळमनुरी, हिंगोली, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • उमरखेड तालुक्यात चिल्ली: मंजूर परवान्यापेक्षा अनेकपटीने गौण खनिज उत्खननाचा संशय; उच्चस्तरीय चौकशीची मागणी, ATS मोजणीसह फौजदारी कारवाईची मागणी मौजे चिल्ली, ता. उमरखेड येथील सर्वे क्र. 340/2 (क्षेत्र 0.81 हे.आर.) व लगतच्या सर्वे क्र. 340/2/1 (क्षेत्र 0.40 हे.आर.) मध्ये मंजूर परवानगीपेक्षा अनेकपटीने गौण खनिज (मुरूम/डबर) उत्खनन झाल्याचा गंभीर संशय व्यक्त करत सामाजिक कार्यकर्ते तथा 'पा. उमरखेड वार्ता'चे मुख्य संपादक शेख इरफान यांनी आज 31 जुलै 2026 रोजी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्यासह विविध विभागांना सविस्तर कायदेशीर तक्रार सादर केली. ही तक्रार लेखी तसेच ई-मेलद्वारे संबंधित सर्व कार्यालयांना पाठविण्यात आली आहे. तक्रारीत संबंधित जमिनीसाठी मर्यादित प्रमाणात उत्खननाची परवानगी असताना प्रत्यक्षात मंजूर मर्यादेपेक्षा अधिक उत्खनन झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे शासनाची दिशाभूल, महसुली नुकसान, पर्यावरणीय नियमांचे संभाव्य उल्लंघन आणि संगनमताने बेकायदेशीर लाभ मिळाल्याची शक्यता असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीत विशेषतः लगतच्या सर्वे क्र. 340/2/1 मधील नकाशे, सीमांकन अभिलेख आणि प्रत्यक्ष उत्खननाची तुलना करून ATS (Advanced Total Station) द्वारे वैज्ञानिक मोजणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच महसूल, खनिकर्म, वन, भूमापन आणि आवश्यक असल्यास पर्यावरण विभागाच्या संयुक्त समितीमार्फत पंचनामा करून वस्तुस्थिती निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे. तक्रारीत वनपरिक्षेत्रालगत असल्याने वन विभागाची पूर्वपरवानगी, पर्यावरणीय मंजुरी आणि इतर सर्व वैधानिक परवानग्यांची स्वतंत्र पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. मंजूर ब्रास आणि प्रत्यक्ष उत्खनन यांची वैज्ञानिक तुलना करून शासनाचे झालेले महसुली नुकसान निश्चित करावे तसेच रॉयल्टी, दंड आणि पर्यावरणीय नुकसानभरपाईची वसुली करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. याशिवाय चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित जमिनीवरील लेआउट, एन.ए., बांधकाम अथवा इतर कोणत्याही विकासकामास परवानगी देऊ नये, तसेच तपासात बेकायदेशीर उत्खनन, शासनाची दिशाभूल, खोटी माहिती, महसुली फसवणूक किंवा बनावट अभिलेखांचा वापर आढळल्यास भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच इतर लागू कायद्यांनुसार फौजदारी गुन्हा दाखल करून संबंधित यंत्रसामग्री, वाहने आणि गौण खनिज जप्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. तक्रारीमध्ये आणखी एक महत्त्वाची मागणी करण्यात आली असून, या प्रकरणावर प्रत्येक विभागाने केलेली सर्व कार्यवाही, नोटिसा, पंचनामे, ATS मोजणी अहवाल, संयुक्त तपासणी अहवाल, वन विभाग, खनिकर्म विभाग, महसूल विभाग, भूमापन विभाग यांचे अहवाल, अंतिम आदेश तसेच विभागांदरम्यान झालेला संपूर्ण पत्रव्यवहार अर्जदारास लेखी स्वरूपात उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या तक्रारीच्या प्रती प्रधान मुख्य वनसंरक्षक, नगर रचना विभाग यवतमाळ, जिल्हा भूमी अभिलेख अधिकारी, उपभूमी अभिलेख कार्यालय उमरखेड, पोलीस अधीक्षक यवतमाळ, जिल्हा सर्वेक्षक, मंडळ अधिकारी, तलाठी आणि गटविकास अधिकारी यांनाही पाठविण्यात आल्या असून, त्यांच्या स्तरावर करण्यात येणाऱ्या प्रत्येक कार्यवाहीच्या प्रमाणित प्रती अर्जदारास देण्याची विनंती करण्यात आली आहे. या प्रकरणात संबंधित विभाग आता कोणती भूमिका घेतात आणि उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले जातात का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
    4
    उमरखेड तालुक्यात चिल्ली: मंजूर परवान्यापेक्षा अनेकपटीने गौण खनिज उत्खननाचा संशय; उच्चस्तरीय चौकशीची मागणी, ATS मोजणीसह फौजदारी कारवाईची मागणी

मौजे चिल्ली, ता. उमरखेड येथील सर्वे क्र. 340/2 (क्षेत्र 0.81 हे.आर.) व लगतच्या सर्वे क्र. 340/2/1 (क्षेत्र 0.40 हे.आर.) मध्ये मंजूर परवानगीपेक्षा अनेकपटीने गौण खनिज (मुरूम/डबर) उत्खनन झाल्याचा गंभीर संशय व्यक्त करत सामाजिक कार्यकर्ते तथा 'पा. उमरखेड वार्ता'चे मुख्य संपादक शेख इरफान  यांनी आज 31 जुलै 2026 रोजी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्यासह विविध विभागांना सविस्तर कायदेशीर तक्रार सादर केली. ही तक्रार लेखी तसेच ई-मेलद्वारे संबंधित सर्व कार्यालयांना पाठविण्यात आली आहे.
तक्रारीत संबंधित जमिनीसाठी मर्यादित प्रमाणात उत्खननाची परवानगी असताना प्रत्यक्षात मंजूर मर्यादेपेक्षा अधिक उत्खनन झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे शासनाची दिशाभूल, महसुली नुकसान, पर्यावरणीय नियमांचे संभाव्य उल्लंघन आणि संगनमताने बेकायदेशीर लाभ मिळाल्याची शक्यता असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीत विशेषतः लगतच्या सर्वे क्र. 340/2/1 मधील नकाशे, सीमांकन अभिलेख आणि प्रत्यक्ष उत्खननाची तुलना करून ATS (Advanced Total Station) द्वारे वैज्ञानिक मोजणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच महसूल, खनिकर्म, वन, भूमापन आणि आवश्यक असल्यास पर्यावरण विभागाच्या संयुक्त समितीमार्फत पंचनामा करून वस्तुस्थिती निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तक्रारीत वनपरिक्षेत्रालगत असल्याने वन विभागाची पूर्वपरवानगी, पर्यावरणीय मंजुरी आणि इतर सर्व वैधानिक परवानग्यांची स्वतंत्र पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. मंजूर ब्रास आणि प्रत्यक्ष उत्खनन यांची वैज्ञानिक तुलना करून शासनाचे झालेले महसुली नुकसान निश्चित करावे तसेच रॉयल्टी, दंड आणि पर्यावरणीय नुकसानभरपाईची वसुली करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
याशिवाय चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित जमिनीवरील लेआउट, एन.ए., बांधकाम अथवा इतर कोणत्याही विकासकामास परवानगी देऊ नये, तसेच तपासात बेकायदेशीर उत्खनन, शासनाची दिशाभूल, खोटी माहिती, महसुली फसवणूक किंवा बनावट अभिलेखांचा वापर आढळल्यास भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच इतर लागू कायद्यांनुसार फौजदारी गुन्हा दाखल करून संबंधित यंत्रसामग्री, वाहने आणि गौण खनिज जप्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तक्रारीमध्ये आणखी एक महत्त्वाची मागणी करण्यात आली असून, या प्रकरणावर प्रत्येक विभागाने केलेली सर्व कार्यवाही, नोटिसा, पंचनामे, ATS मोजणी अहवाल, संयुक्त तपासणी अहवाल, वन विभाग, खनिकर्म विभाग, महसूल विभाग, भूमापन विभाग यांचे अहवाल, अंतिम आदेश तसेच विभागांदरम्यान झालेला संपूर्ण पत्रव्यवहार अर्जदारास लेखी स्वरूपात उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या तक्रारीच्या प्रती प्रधान मुख्य वनसंरक्षक, नगर रचना विभाग यवतमाळ, जिल्हा भूमी अभिलेख अधिकारी, उपभूमी अभिलेख कार्यालय उमरखेड, पोलीस अधीक्षक यवतमाळ, जिल्हा सर्वेक्षक, मंडळ अधिकारी, तलाठी आणि गटविकास अधिकारी यांनाही पाठविण्यात आल्या असून, त्यांच्या स्तरावर करण्यात येणाऱ्या प्रत्येक कार्यवाहीच्या प्रमाणित प्रती अर्जदारास देण्याची विनंती करण्यात आली आहे.
या प्रकरणात संबंधित विभाग आता कोणती भूमिका घेतात आणि उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले जातात का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
    user_Shaikh irfan Shaikh isa
    Shaikh irfan Shaikh isa
    उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • घाटंजी तालुक्यात संततधार पावसामुळे नदी नाल्यांना पुर,यवतमाळ जिल्ह्याला रेड अलर्ट जारी यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यामध्ये सर्वञ संततधार पावुस कोसळत असल्यामुळे तालुक्यातील बहुतांश नदी नाले ओसंडून वाहत आहे. अनेक गावात पुराचं पाणी शेतात शिरल्याने शेतीचं मोठ नुकसान झालं आहे. त्यातच यवतमाळ जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला असल्याने नागरीकांनी घराबाहेर जाणे टाळावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
    1
    घाटंजी तालुक्यात संततधार पावसामुळे नदी नाल्यांना पुर,यवतमाळ जिल्ह्याला रेड अलर्ट जारी 
यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यामध्ये सर्वञ संततधार पावुस कोसळत असल्यामुळे तालुक्यातील बहुतांश नदी नाले ओसंडून वाहत आहे. अनेक गावात पुराचं पाणी शेतात शिरल्याने शेतीचं मोठ नुकसान झालं आहे. त्यातच यवतमाळ जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला असल्याने नागरीकांनी घराबाहेर जाणे टाळावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Ghatanji, Yavatmal•
    15 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.