Shuru
Apke Nagar Ki App…
घाटंजी तालुक्यात संततधार पावसामुळे नदी नाल्यांना पुर,यवतमाळ जिल्ह्याला रेड अलर्ट जारी यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यामध्ये सर्वञ संततधार पावुस कोसळत असल्यामुळे तालुक्यातील बहुतांश नदी नाले ओसंडून वाहत आहे. अनेक गावात पुराचं पाणी शेतात शिरल्याने शेतीचं मोठ नुकसान झालं आहे. त्यातच यवतमाळ जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला असल्याने नागरीकांनी घराबाहेर जाणे टाळावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
विलास महल्ले
घाटंजी तालुक्यात संततधार पावसामुळे नदी नाल्यांना पुर,यवतमाळ जिल्ह्याला रेड अलर्ट जारी यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यामध्ये सर्वञ संततधार पावुस कोसळत असल्यामुळे तालुक्यातील बहुतांश नदी नाले ओसंडून वाहत आहे. अनेक गावात पुराचं पाणी शेतात शिरल्याने शेतीचं मोठ नुकसान झालं आहे. त्यातच यवतमाळ जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला असल्याने नागरीकांनी घराबाहेर जाणे टाळावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- गुरुपौर्णिमेनिमित्त दत्तशिखरावर भक्तीचा महासागर; रिमझिम पावसातही हजारो भाविकांची उपस्थिती गुरुपौर्णिमेनिमित्त दत्तशिखरावर भक्तीचा महासागर; रिमझिम पावसातही हजारो भाविकांची उपस्थिती माहूरगड प्रतिनिधी: धनंजय आराध्ये श्रीक्षेत्र माहूरगड येथील पवित्र श्री दत्तात्रेय शिखर संस्थानात गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित गुरुपूजन सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पडला. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असतानाही महाराष्ट्रासह विविध राज्यांतून आलेल्या हजारो भाविकांनी दत्तशिखरावर दर्शनासाठी अलोट गर्दी केली. पावसाकडे दुर्लक्ष करून भाविकांनी गुरुदर्शन व गुरुपूजनाचा लाभ घेतल्याने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. गुरुपौर्णिमेनिमित्त श्री दत्तात्रेय शिखर संस्थानाचे श्री श्री १००८ महंत धनेश्वर भारती महाराज (गुरु मधुसूदन भारती) यांच्या शुभहस्ते पहाटे श्री दत्तात्रेय महाराजांचा वैदिक मंत्रोच्चारात अभिषेक करण्यात आला. त्यानंतर परिसरातील सर्व देवतांचे पूजन, समाधीपूजन तसेच विविध धार्मिक विधी पार पडले. या धार्मिक विधींचे पुरोहित्य विलासराव जोशी, रवींद्र जोशी, ऋषिकेश जोशी व विकास जोशी यांनी केले. यानंतर श्री १००८ महंत धनेश्वर भारती महाराज गादीवर विराजमान झाले. पोथीवाचन, गुरुपूजन, आशीर्वचन आणि विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. उपस्थित संत-महंत, महापुरुष तसेच हजारो भाविकांनी गुरुपूजन करून आशीर्वाद घेतले. पावसाच्या सरींनीही या पवित्र सोहळ्याची शोभा अधिक खुलविली. या सोहळ्यास वासुदेव भारती महाराज, परमेश्वर भारती, धनराज भारती महाराज, चिंतामण भारती महाराज, चिरंजीव भारती, हरिहर भारती, वामन भारती, सुभाष भारती, शिलानंद भारती, सुजान भारती, माधवगिरी महाराज, गजराज भारती, नितेश भारती, अक्षयगिरी यांच्यासह अनेक संत-महंत उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थानचे व्यवस्थापक जी. एन. नाईक, अश्विन माने, विश्वस्त मंडळ तसेच सेवेकरी यांनी विशेष परिश्रम घेतले. गुरुपूजनानंतर उपस्थित हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सोहळ्याच्या अखेरीस "अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त", "देवदत्त श्री दत्तात्रय महाराज की जय" या जयघोषांनी संपूर्ण दत्तशिखर परिसर दुमदुमून गेला. भक्तिभाव, श्रद्धा आणि उत्साहाने भरलेला हा गुरुपौर्णिमा महोत्सव अत्यंत मंगलमय वातावरणात संपन्न झाला.1
- देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार रंजीत कांबळे यांचा वृक्षारोपण करून करण्यात आला वाढदिवस साजरा देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्राची माजी आमदार रंजीत कांबळे यांचा वृक्षारोपण करून वाढदिवस करण्यात आला साजरा वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथील काँग्रेस पक्षाद्वारे देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार रंजीत कांबळे यांचा वाढदिवस अल्लीपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वृक्षारोपण करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरामध्ये उपयोगी अनेक झाडे लावण्यात आली वृक्षारोपण कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष हिंगणघाट श्रीराम साखरकर बालू महाजन प्रशासकीय ग्रामपंचायत सदस्य सचिन पारसडे गोपाल मेघरे संदीप नरड प्रशासकीय ग्रामपंचायत सदस्य हरून अली माजी उपसरपंच खलील शेख प्रशासकीय ग्रामपंचायत सदस्य राहुल वाटखेडे माझी तंटामुक्ती अध्यक्ष धनराज सुपारे नितीन शेलकर सतीश देठे वैद्यकीय अधिकारी गुजरकर मॅडम व प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी व गावातील काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.2
- ऑरेंज अलर्टमध्येही प्रशिक्षणाची सक्ती? हिंगणघाट हायवेवरील भीषण अपघातात शिक्षिकेचा जागीच मृत्यू वर्धा. हिंगणघाट : वर्धा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट असतानाही प्रशिक्षणासाठी प्रवास करावा लागल्याने एका शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना हिंगणघाट येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील पुलाजवळ घडली. या घटनेनंतर शिक्षण विभागाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून शिक्षकांमध्ये व नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सातेफळ येथील प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षिका सौ. जोशना खेमनाद रामटेके (नारायणजे), रा. हिंगणघाट या शाळेचे काम पूर्ण करून चिंचोली येथे आयोजित प्रशिक्षणासाठी आपल्या मोपेडने निघाल्या होत्या. हिंगणघाट–चिंचोली मार्गावर राष्ट्रीय महामार्गावर त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, हवामान खात्याने वर्धा जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला होता. तरीही शिक्षकांना नियमित शाळा पूर्ण करून दुपारी आयोजित शिक्षण परिषद/प्रशिक्षणासाठी उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हे प्रशिक्षण शहराऐवजी चिंचोलीसारख्या ग्रामीण भागात आयोजित करण्यात आल्याने शिक्षकांना प्रतिकूल हवामानात प्रवास करावा लागल्याचे सांगितले जात आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत सौ. रामटेके (नारायणजे) यांचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, शिक्षकांवरील वाढत्या अशैक्षणिक कामांच्या ताणाबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. मृत शिक्षिकेच्या नातेवाईकांनी तसेच काही शिक्षकांनी प्रतिकूल हवामानात प्रशिक्षणासाठी सक्तीने प्रवास करण्याच्या निर्णयावर आक्षेप घेत प्रशासनाच्या नियोजनावर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रीय महामार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील पुलाजवळ यापूर्वीही अनेक अपघात घडले असून या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी वारंवार करण्यात आली आहे. या दुर्घटनेनंतर त्या ठिकाणी तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना राबविण्याची तसेच संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून आवश्यक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.1
- उमरखेड़ s.t. महामंडल आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आमदार किसनराव वानखेड़े साहब के हाथों उदघाटन उमरखेड़ st महामंडल आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आमदार किसनराव वानखेड़े साहब और पालक मंत्री संजय राठोड़ कि कोशिशों से नितिन भाऊ भूतड़ा के सहकार्य से उमरखेड़ आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आगार प्रमुख प्रमोदिनी किनाके मैडम कि कार्य कुशलता से आज उमरखेड़ आगार बना महाराष्ट्र में 1 नंबर1
- दरवर्षीचा तोच खेळ... पूर आला की रस्ता बंद! वडकी–पिंपळापूर पुलासाठी नागरिकांचा संताप अनावर दरवर्षीचा तोच खेळ... पूर आला की रस्ता बंद! वडकी–पिंपळापूर पुलासाठी नागरिकांचा संताप अनावर पुलाची उंची वाढवा, नागरिकांचे जीव वाचवा; सरपंच रवींद्र चौधरींचा लोकप्रतिनिधींवर घणाघात राळेगाव (प्रतिनिधी): तालुक्यातील वडकी गावाला लागून असलेल्या पिंपळापूर मार्गावरील नाल्याला आज आलेल्या पुरामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. थोड्याशा पावसातही पूल पाण्याखाली जात असल्याने शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर तसेच नागरिकांना दोन्ही बाजूंना तासन्तास अडकून पडावे लागले. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून प्रशासन व लोकप्रतिनिधीं विरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वडकी, पिंपळापूर व वडगाव येथील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून या पुलाची उंची वाढविण्याची मागणी सातत्याने करीत आहेत. मात्र प्रत्येक पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होत असून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. तरीही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या गंभीर प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. आज नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे खोळंबली. शाळेतून परतणारे विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर आणि इतर नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागली. पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने अनेकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. या पार्श्वभूमीवर पिंपळापूरचे सरपंच रवींद्र चौधरी यांनी लोकप्रतिनिधींवर जोरदार घणाघात केला. "दरवर्षी हाच प्रकार घडतो. नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असतानाही लोकप्रतिनिधींना या प्रश्नाचे काहीच सोयरसुतक नाही. केवळ आश्वासनांची खैरात केली जाते; मात्र पुलाची उंची वाढविण्यासाठी कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही," असा संताप त्यांनी व्यक्त केला. नागरिकांचे म्हणणे आहे की, पुलाची उंची वाढविल्यास दरवर्षी उद्भवणारी ही गंभीर समस्या कायमची निकाली निघू शकते. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे. आता तरी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने या पुलाच्या उंचीवाढीचा निर्णय घ्यावा. अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.1
- घाटंजी तालुक्यात संततधार पावसामुळे नदी नाल्यांना पुर,यवतमाळ जिल्ह्याला रेड अलर्ट जारी यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यामध्ये सर्वञ संततधार पावुस कोसळत असल्यामुळे तालुक्यातील बहुतांश नदी नाले ओसंडून वाहत आहे. अनेक गावात पुराचं पाणी शेतात शिरल्याने शेतीचं मोठ नुकसान झालं आहे. त्यातच यवतमाळ जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला असल्याने नागरीकांनी घराबाहेर जाणे टाळावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.1