दरवर्षीचा तोच खेळ... पूर आला की रस्ता बंद! वडकी–पिंपळापूर पुलासाठी नागरिकांचा संताप अनावर दरवर्षीचा तोच खेळ... पूर आला की रस्ता बंद! वडकी–पिंपळापूर पुलासाठी नागरिकांचा संताप अनावर पुलाची उंची वाढवा, नागरिकांचे जीव वाचवा; सरपंच रवींद्र चौधरींचा लोकप्रतिनिधींवर घणाघात राळेगाव (प्रतिनिधी): तालुक्यातील वडकी गावाला लागून असलेल्या पिंपळापूर मार्गावरील नाल्याला आज आलेल्या पुरामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. थोड्याशा पावसातही पूल पाण्याखाली जात असल्याने शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर तसेच नागरिकांना दोन्ही बाजूंना तासन्तास अडकून पडावे लागले. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून प्रशासन व लोकप्रतिनिधीं विरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वडकी, पिंपळापूर व वडगाव येथील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून या पुलाची उंची वाढविण्याची मागणी सातत्याने करीत आहेत. मात्र प्रत्येक पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होत असून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. तरीही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या गंभीर प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. आज नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे खोळंबली. शाळेतून परतणारे विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर आणि इतर नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागली. पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने अनेकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. या पार्श्वभूमीवर पिंपळापूरचे सरपंच रवींद्र चौधरी यांनी लोकप्रतिनिधींवर जोरदार घणाघात केला. "दरवर्षी हाच प्रकार घडतो. नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असतानाही लोकप्रतिनिधींना या प्रश्नाचे काहीच सोयरसुतक नाही. केवळ आश्वासनांची खैरात केली जाते; मात्र पुलाची उंची वाढविण्यासाठी कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही," असा संताप त्यांनी व्यक्त केला. नागरिकांचे म्हणणे आहे की, पुलाची उंची वाढविल्यास दरवर्षी उद्भवणारी ही गंभीर समस्या कायमची निकाली निघू शकते. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे. आता तरी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने या पुलाच्या उंचीवाढीचा निर्णय घ्यावा. अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.

- देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार रंजीत कांबळे यांचा वृक्षारोपण करून करण्यात आला वाढदिवस साजरा देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्राची माजी आमदार रंजीत कांबळे यांचा वृक्षारोपण करून वाढदिवस करण्यात आला साजरा वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथील काँग्रेस पक्षाद्वारे देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार रंजीत कांबळे यांचा वाढदिवस अल्लीपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वृक्षारोपण करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरामध्ये उपयोगी अनेक झाडे लावण्यात आली वृक्षारोपण कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष हिंगणघाट श्रीराम साखरकर बालू महाजन प्रशासकीय ग्रामपंचायत सदस्य सचिन पारसडे गोपाल मेघरे संदीप नरड प्रशासकीय ग्रामपंचायत सदस्य हरून अली माजी उपसरपंच खलील शेख प्रशासकीय ग्रामपंचायत सदस्य राहुल वाटखेडे माझी तंटामुक्ती अध्यक्ष धनराज सुपारे नितीन शेलकर सतीश देठे वैद्यकीय अधिकारी गुजरकर मॅडम व प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी व गावातील काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.2
- ऑरेंज अलर्टमध्येही प्रशिक्षणाची सक्ती? हिंगणघाट हायवेवरील भीषण अपघातात शिक्षिकेचा जागीच मृत्यू वर्धा. हिंगणघाट : वर्धा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट असतानाही प्रशिक्षणासाठी प्रवास करावा लागल्याने एका शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना हिंगणघाट येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील पुलाजवळ घडली. या घटनेनंतर शिक्षण विभागाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून शिक्षकांमध्ये व नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सातेफळ येथील प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षिका सौ. जोशना खेमनाद रामटेके (नारायणजे), रा. हिंगणघाट या शाळेचे काम पूर्ण करून चिंचोली येथे आयोजित प्रशिक्षणासाठी आपल्या मोपेडने निघाल्या होत्या. हिंगणघाट–चिंचोली मार्गावर राष्ट्रीय महामार्गावर त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, हवामान खात्याने वर्धा जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला होता. तरीही शिक्षकांना नियमित शाळा पूर्ण करून दुपारी आयोजित शिक्षण परिषद/प्रशिक्षणासाठी उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हे प्रशिक्षण शहराऐवजी चिंचोलीसारख्या ग्रामीण भागात आयोजित करण्यात आल्याने शिक्षकांना प्रतिकूल हवामानात प्रवास करावा लागल्याचे सांगितले जात आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत सौ. रामटेके (नारायणजे) यांचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, शिक्षकांवरील वाढत्या अशैक्षणिक कामांच्या ताणाबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. मृत शिक्षिकेच्या नातेवाईकांनी तसेच काही शिक्षकांनी प्रतिकूल हवामानात प्रशिक्षणासाठी सक्तीने प्रवास करण्याच्या निर्णयावर आक्षेप घेत प्रशासनाच्या नियोजनावर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रीय महामार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील पुलाजवळ यापूर्वीही अनेक अपघात घडले असून या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी वारंवार करण्यात आली आहे. या दुर्घटनेनंतर त्या ठिकाणी तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना राबविण्याची तसेच संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून आवश्यक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.1
- क्या आपका Liver अंदर से स्वस्थ है? 20 सेकंड में करें ये 4 Home Tests ! | 💡 🌸 आज ही अपनी सेहत का ध्यान रखें 🌸हर स्वास्थ्य समस्या का सही और सुरक्षित समाधान ✨ Heart Diseases ✨ Diabetes ✨ Kidney Diseases ✨ Liver Diseases ✨ Lung(Asthma & TB) 📍 स्वस्थ जीवन की शुरुआत सही सलाह से 📞 Appointment Book करें: +91 9125734374 #DrMeherAbbas #LiverFunctionTest #LiverHealth #FattyLiver&NAFLD #Fibrousscan @TopFan2
- दहेगाव (मुस्तफा)सह सात* *गावांतील ९ हजार नागरिकांचा* *आक्रोश; "प्राथमिक आरोग्य केंद्र* *मंजूर करा, अन्यथा* *संविधानिक मार्गाने तीव्र जनआंदोलन*!"1
- दरवर्षीचा तोच खेळ... पूर आला की रस्ता बंद! वडकी–पिंपळापूर पुलासाठी नागरिकांचा संताप अनावर दरवर्षीचा तोच खेळ... पूर आला की रस्ता बंद! वडकी–पिंपळापूर पुलासाठी नागरिकांचा संताप अनावर पुलाची उंची वाढवा, नागरिकांचे जीव वाचवा; सरपंच रवींद्र चौधरींचा लोकप्रतिनिधींवर घणाघात राळेगाव (प्रतिनिधी): तालुक्यातील वडकी गावाला लागून असलेल्या पिंपळापूर मार्गावरील नाल्याला आज आलेल्या पुरामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. थोड्याशा पावसातही पूल पाण्याखाली जात असल्याने शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर तसेच नागरिकांना दोन्ही बाजूंना तासन्तास अडकून पडावे लागले. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून प्रशासन व लोकप्रतिनिधीं विरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वडकी, पिंपळापूर व वडगाव येथील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून या पुलाची उंची वाढविण्याची मागणी सातत्याने करीत आहेत. मात्र प्रत्येक पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होत असून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. तरीही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या गंभीर प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. आज नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे खोळंबली. शाळेतून परतणारे विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर आणि इतर नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागली. पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने अनेकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. या पार्श्वभूमीवर पिंपळापूरचे सरपंच रवींद्र चौधरी यांनी लोकप्रतिनिधींवर जोरदार घणाघात केला. "दरवर्षी हाच प्रकार घडतो. नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असतानाही लोकप्रतिनिधींना या प्रश्नाचे काहीच सोयरसुतक नाही. केवळ आश्वासनांची खैरात केली जाते; मात्र पुलाची उंची वाढविण्यासाठी कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही," असा संताप त्यांनी व्यक्त केला. नागरिकांचे म्हणणे आहे की, पुलाची उंची वाढविल्यास दरवर्षी उद्भवणारी ही गंभीर समस्या कायमची निकाली निघू शकते. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे. आता तरी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने या पुलाच्या उंचीवाढीचा निर्णय घ्यावा. अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.1
- हैदराबादहून नागपूरकडे टमाटे घेऊन जाणारा ट्रक पलटी;महामार्गावर टमाट्यांचा सडा चिनी जवादे येथील घटना हैदराबादहून नागपूरकडे टमाटे घेऊन जाणारा ट्रक पलटी; महामार्गावर टमाट्यांचा सडा चिनी जवादे येथील घटना राळेगाव प्रतिनिधी : हैदराबाद येथून नागपूरच्या दिशेने टमाट्यांची वाहतूक करणारा एक ट्रक आज (दि. 31 जुलै) पहाटे अंदाजे 4 वाजण्याच्या सुमारास किन्ही जवादे गावाजजवळील महामार्गावर पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ट्रकमधील टमाटे रस्त्यावर विखुरल्याने महामार्गावर टमाट्यांचा मोठा सडा पडला आणि काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. घटनेची माहिती मिळताच महामार्ग प्रशासनाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पलटी झालेला ट्रक बाजूला करण्यासह रस्त्यावर पडलेले टमाटे हटवून वाहतूक सुरळीत केली. या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे.1