logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

भरधाव कार दुभाजकावर आदळली दोघांचा मृत्यू, चालक गंभीर जखमी लोणावळा : जुना पुणे-मुंबई महामार्गावर वाकसई गावच्या हद्दीत भरधाव कार दुभाजकाला धडकून खड्यात कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर चालक गंभीर जखमी झाला. हा अपघात गुरुवारी (27 ऑगस्ट) पहाटे 4.12 वाजण्यापूर्वी सूरज ढाब्यासमोर घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत गौतम बरवा (रा. मोशी, ता. हवेली) हा मारुती सुसुकी कार (एमएच 12 एमबी 6541) घेऊन भरधाव वेगाने जात होता. वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून हयगयीने व अविचाराने वाहन चालवल्याने कार रस्त्यालगतच्या दुभाजकावर आदळली. त्यानंतर कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्यात जाऊन कोसळली. या अपघातात कारमधील हुसैन शेख आणि आर्सार इनामदार यांचा गंभीर दुखापतींमुळे मृत्यू झाला. चालक अनिकेत बरवा यालाही दुखापत झाली असून वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात पोलिस कॉन्स्टेबल गोकुळ भास्कर खेडकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक 198/2026 नोंदविण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेतील कलमांसह मोटार वाहन कायद्यान्वये चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.

1 hr ago
user_Prasanna Shashikant Patne
Prasanna Shashikant Patne
मावळ, पुणे, महाराष्ट्र•
1 hr ago
5a2d02ed-56a7-4306-9d78-59fdb3219590

भरधाव कार दुभाजकावर आदळली दोघांचा मृत्यू, चालक गंभीर जखमी लोणावळा : जुना पुणे-मुंबई महामार्गावर वाकसई गावच्या हद्दीत भरधाव कार दुभाजकाला धडकून खड्यात कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर चालक गंभीर जखमी झाला. हा अपघात गुरुवारी (27 ऑगस्ट) पहाटे 4.12 वाजण्यापूर्वी सूरज ढाब्यासमोर घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत गौतम बरवा (रा. मोशी, ता. हवेली) हा मारुती सुसुकी कार (एमएच 12 एमबी 6541) घेऊन भरधाव वेगाने जात होता. वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून हयगयीने व अविचाराने वाहन चालवल्याने कार रस्त्यालगतच्या दुभाजकावर आदळली. त्यानंतर कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्यात जाऊन कोसळली. या अपघातात कारमधील हुसैन शेख आणि आर्सार इनामदार यांचा गंभीर दुखापतींमुळे मृत्यू झाला. चालक अनिकेत बरवा यालाही दुखापत झाली असून वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात पोलिस कॉन्स्टेबल गोकुळ भास्कर खेडकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक 198/2026 नोंदविण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेतील कलमांसह मोटार वाहन कायद्यान्वये चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मेफेड्रॉन (एम.डी.) विक्रेत्यावर मार्केटयार्ड पोलिसांची धडक कारवाई; २५ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त, एक जण अटक
    1
    मेफेड्रॉन (एम.डी.) विक्रेत्यावर मार्केटयार्ड पोलिसांची धडक कारवाई; २५ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त, एक जण अटक
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    37 min ago
  • जिजाऊ लेकी आक्रमक मराठा छत्रपती महाराष्ट्र विरोधी टकले सेनेचे पदाधिकारी यांना रक्षाबंधनावर एक डजन बांगड्या लिपस्टिक भेट महाराष्ट्र : मराठा समाजातील काही कार्यकर्त्यांनी ‘आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ’च्या काही पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. या पदाधिकाऱ्यांकडून मराठा समाजाची दिशाभूल केली जात असून, छत्रपती जिजाऊसाहेबांच्या लेकींच्या विरोधात तसेच महाराष्ट्राच्या हिताविरोधात काम केले जात असल्याचा दावा ‘मराठ्यांच्या लेक शिवशंभू कन्या’च्या वतीने करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मराठा साम्राज्याचा ऐतिहासिक नकाशा हटविण्याच्या कथित प्रयत्नांसंदर्भात संबंधितांनी राजस्थानमध्ये जाऊन बैठक घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या बैठकीमागे महाराष्ट्रविरोधी कटकारस्थान असल्याचा दावा आरोपकर्त्यांनी केला आहे. याशिवाय, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपतींच्या वंशजांची बदनामी करण्याचे काम संबंधितांकडून होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या गटाला ‘टकले सेना’ असे संबोधून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. दरम्यान, या कथित बैठकांसाठी किंवा अन्य कारणांसाठी ५० कोटी रुपये मिळाल्याची शंकाही आरोपकर्त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, या आर्थिक व्यवहाराबाबत कोणतेही अधिकृत पुरावे किंवा स्वतंत्र पुष्टी सध्या समोर आलेली नाही. या सर्व आरोपांबाबत संबंधित संघटनेची अधिकृत भूमिका अथवा स्पष्टीकरण उपलब्ध झाल्यास तेही प्रसिद्ध केले जाणे आवश्यक आहे. आरोपांची स्वतंत्रपणे पडताळणी होणे गरजेचे असून, ऐतिहासिक वारसा आणि मराठा समाजाशी संबंधित संवेदनशील विषय असल्याने वस्तुनिष्ठ तथ्यांच्या आधारेच पुढील भूमिका निश्चित करण्याची गरज व्यक्त होत आहे.
    1
    जिजाऊ लेकी आक्रमक मराठा छत्रपती महाराष्ट्र विरोधी टकले सेनेचे पदाधिकारी यांना रक्षाबंधनावर एक डजन बांगड्या लिपस्टिक भेट
महाराष्ट्र : मराठा समाजातील काही कार्यकर्त्यांनी ‘आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ’च्या काही पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. या पदाधिकाऱ्यांकडून मराठा समाजाची दिशाभूल केली जात असून, छत्रपती जिजाऊसाहेबांच्या लेकींच्या विरोधात तसेच महाराष्ट्राच्या हिताविरोधात काम केले जात असल्याचा दावा ‘मराठ्यांच्या लेक शिवशंभू कन्या’च्या वतीने करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
मराठा साम्राज्याचा ऐतिहासिक नकाशा हटविण्याच्या कथित प्रयत्नांसंदर्भात संबंधितांनी राजस्थानमध्ये जाऊन बैठक घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या बैठकीमागे महाराष्ट्रविरोधी कटकारस्थान असल्याचा दावा आरोपकर्त्यांनी केला आहे.
याशिवाय, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपतींच्या वंशजांची बदनामी करण्याचे काम संबंधितांकडून होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या गटाला ‘टकले सेना’ असे संबोधून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे.
दरम्यान, या कथित बैठकांसाठी किंवा अन्य कारणांसाठी ५० कोटी रुपये मिळाल्याची शंकाही आरोपकर्त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, या आर्थिक व्यवहाराबाबत कोणतेही अधिकृत पुरावे किंवा स्वतंत्र पुष्टी सध्या समोर आलेली नाही.
या सर्व आरोपांबाबत संबंधित संघटनेची अधिकृत भूमिका अथवा स्पष्टीकरण उपलब्ध झाल्यास तेही प्रसिद्ध केले जाणे आवश्यक आहे. आरोपांची स्वतंत्रपणे पडताळणी होणे गरजेचे असून, ऐतिहासिक वारसा आणि मराठा समाजाशी संबंधित संवेदनशील विषय असल्याने वस्तुनिष्ठ तथ्यांच्या आधारेच पुढील भूमिका निश्चित करण्याची गरज व्यक्त होत आहे.
    user_Anilraav patil अनिलराव पाटील
    Anilraav patil अनिलराव पाटील
    Building society Haveli, Pune•
    7 hrs ago
  • Nepal Flash Floods ।नदीचा रौद्रावतार! 105 भारतीयांसह 384 पर्यटक संपर्काबाहेर; नेमकं काय घडलं? Nepal Flash Floods ।नदीचा रौद्रावतार! 105 भारतीयांसह 384 पर्यटक संपर्काबाहेर; नेमकं काय घडलं? watch full video
    1
    Nepal Flash Floods ।नदीचा रौद्रावतार! 105 भारतीयांसह 384 पर्यटक संपर्काबाहेर; नेमकं काय घडलं?


Nepal Flash Floods ।नदीचा रौद्रावतार! 105 भारतीयांसह 384 पर्यटक संपर्काबाहेर; नेमकं काय घडलं?
watch full video
    user_Suvarna Jitendra Jadhav
    Suvarna Jitendra Jadhav
    Lawyer Pune City, Maharashtra•
    7 hrs ago
  • बाढ़ का ऐसा कहर… देखते ही देखते तबाही में बदल गया मंजर! आंखों के सामने बहता सैलाब, चारों तरफ चीख-पुकार… प्रकृति के इस कहर ने लोगों को हिलाकर रख दिया नेपाल में तेज बारिश के बाद पानी ने ऐसा विकराल रूप धारण किया कि देखते ही देखते पूरा इलाका सैलाब की चपेट में आता नजर आया। वीडियो में उफनते पानी की तेज धार, जलमग्न रास्ते और भयावह हालात साफ दिखाई दे रहे हैं। कहीं लोग जान बचाने की कोशिश करते नजर आए तो कहीं पानी की रफ्तार के सामने सब कुछ बेबस दिखाई दिया। पुल और सड़क के आसपास पानी का तेज बहाव देखकर लोगों के चेहरे पर साफ डर नजर आया। पहाड़ी इलाकों से बहकर आया मलबा और पानी तबाही का मंजर और भी भयावह बना रहा था। सबसे दर्दनाक तस्वीरें उस वक्त सामने आईं, जब लोग इस प्राकृतिक आपदा के बीच अपनों की सलामती को लेकर चिंतित दिखाई दिए। कुछ लोग राहत और बचाव की उम्मीद में मदद का इंतजार करते नजर आए। यह वीडियो सिर्फ पानी की रफ्तार नहीं दिखाता, बल्कि उस खौफ को दिखाता है जिसे वहां मौजूद लोगों ने अपनी आंखों से महसूस किया। एक पल में सामान्य जिंदगी डर और अफरा-तफरी में बदल गई। प्रशासन और राहत-बचाव टीमों से अपील है कि प्रभावित इलाकों में तत्काल सुरक्षा व्यवस्था मजबूत की जाए और लोगों को सुरक्षित स्थानों पर पहुंचाया जाए। अपील: ऐसे खतरनाक जलभराव और तेज बहाव वाले स्थानों पर जाने की कोशिश न करें। एक छोटी-सी लापरवाही जिंदगी पर भारी पड़ सकती है।
    1
    बाढ़ का ऐसा कहर… देखते ही देखते तबाही में बदल गया मंजर!
आंखों के सामने बहता सैलाब, चारों तरफ चीख-पुकार… प्रकृति के इस कहर ने लोगों को हिलाकर रख दिया
नेपाल में तेज बारिश के बाद पानी ने ऐसा विकराल रूप धारण किया कि देखते ही देखते पूरा इलाका सैलाब की चपेट में आता नजर आया। वीडियो में उफनते पानी की तेज धार, जलमग्न रास्ते और भयावह हालात साफ दिखाई दे रहे हैं।
कहीं लोग जान बचाने की कोशिश करते नजर आए तो कहीं पानी की रफ्तार के सामने सब कुछ बेबस दिखाई दिया। पुल और सड़क के आसपास पानी का तेज बहाव देखकर लोगों के चेहरे पर साफ डर नजर आया। पहाड़ी इलाकों से बहकर आया मलबा और पानी तबाही का मंजर और भी भयावह बना रहा था।
सबसे दर्दनाक तस्वीरें उस वक्त सामने आईं, जब लोग इस प्राकृतिक आपदा के बीच अपनों की सलामती को लेकर चिंतित दिखाई दिए। कुछ लोग राहत और बचाव की उम्मीद में मदद का इंतजार करते नजर आए।
यह वीडियो सिर्फ पानी की रफ्तार नहीं दिखाता, बल्कि उस खौफ को दिखाता है जिसे वहां मौजूद लोगों ने अपनी आंखों से महसूस किया। एक पल में सामान्य जिंदगी डर और अफरा-तफरी में बदल गई।
प्रशासन और राहत-बचाव टीमों से अपील है कि प्रभावित इलाकों में तत्काल सुरक्षा व्यवस्था मजबूत की जाए और लोगों को सुरक्षित स्थानों पर पहुंचाया जाए।
अपील: ऐसे खतरनाक जलभराव और तेज बहाव वाले स्थानों पर जाने की कोशिश न करें। एक छोटी-सी लापरवाही जिंदगी पर भारी पड़ सकती है।
    user_AAPKi JUNG
    AAPKi JUNG
    Newspaper publisher उल्हासनगर, ठाणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • जगाला टेक्नॉलॉजी देणारी हिंजवडी मूलभूत सुविधांसाठी त्रस्त; IT अभियंते उतरणार रस्त्यावर..! हिंजवडी पुणे : चाकण MIDCतील लघुउद्योजकांच्या आंदोलनानंतर आता हिंजवडीतील आयटी अभियंत्यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. जगाच्या नकाशावर आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीत मूलभूत सुविधांचा अभाव, वाहतूक कोंडी, खड्डे आणि रस्त्यांची दुरवस्था यामुळे आयटी कर्मचाऱ्यांचा संताप वाढला आहे. याच प्रश्नांवर येत्या 6 सप्टेंबरला आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. हिंजवडी... देशाच्या आयटी क्षेत्राची ओळख बनलेलं पुण्याचं महत्त्वाचं केंद्र... हजारो कोटींचा महसूल देणाऱ्या या आयटी हबमध्ये दररोज लाखो कर्मचारी कामासाठी येतात... मात्र कार्यालयात पोहोचण्याआधीच त्यांना रस्त्यावर संघर्ष करावा लागतोय. कुठे तासन्‌तास वाहतूक कोंडी... कुठे रस्त्यांवर जीवघेणे खड्डे... तर कुठे अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे अपघातांचा धोका... याच समस्यांमुळे आता हिंजवडीतील आयटी अभियंत्यांचा संयम सुटला आहें. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा दावा आहे की, वारंवार प्रशासनाकडे तक्रारी आणि पाठपुरावा करूनही समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही. गेल्या दीड वर्षात रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेच्या प्रश्नांमुळे 37 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा आंदोलकांकडून केला जातोय. एकीकडे हिंजवडीत सुमारे 800 कंपन्या आणि लाखो आयटी अभियंते मोठ्या प्रमाणावर कर भरतात... मात्र त्या तुलनेत मूलभूत सुविधा मिळत नसल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये आहे. विशेष म्हणजे, चाकण MIDCतील 20 लघुउद्योजकांनी कंपन्या बंद करण्याचा इशारा दिल्यानंतर सरकार आणि प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या. मग हिंजवडीतील प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आम्हालाही रस्त्यावर उतरावं लागणार का? हा सवाल आता आयटी अभियंते उपस्थित करत आहेत. हिंजवडी सोडून कंपन्या आणि कर्मचारी जाण्याची वेळ आल्यानंतर सरकार जागं होणार का..? की त्याआधीच या समस्यांवर तोडगा काढला जाणार? याच मागण्यांसाठी येत्या 6 सप्टेंबरला आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. जगाला टेक्नॉलॉजी देणाऱ्या हिंजवडीला मात्र आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागतोय... त्यामुळे प्रश्न फक्त वाहतूक कोंडीचा नाही... प्रश्न आहे—हिंजवडीसारख्या जागतिक दर्जाच्या आयटी हबच्या पायाभूत सुविधांचा! आता आयटी अभियंत्यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर तरी प्रशासन जागं होणार का..? #Hinjewadi #HinjewadiITPark #Pune #PuneNews #ITEngineers #ITEmployees #HinjewadiNews #PuneTraffic #HinjewadiTraffic #RoadProblems #Potholes #Infrastructure #ITPark #Protest #Andolan #6September #MaharashtraNews #PuneUpdates #TheNayakNews #न्यूज #हिंजवडी #पुणे #आंदोलन
    1
    जगाला टेक्नॉलॉजी देणारी हिंजवडी मूलभूत सुविधांसाठी त्रस्त; IT अभियंते उतरणार रस्त्यावर..!
हिंजवडी पुणे :
चाकण MIDCतील लघुउद्योजकांच्या आंदोलनानंतर आता हिंजवडीतील आयटी अभियंत्यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. जगाच्या नकाशावर आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीत मूलभूत सुविधांचा अभाव, वाहतूक कोंडी, खड्डे आणि रस्त्यांची दुरवस्था यामुळे आयटी कर्मचाऱ्यांचा संताप वाढला आहे. याच प्रश्नांवर येत्या 6 सप्टेंबरला आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
हिंजवडी... देशाच्या आयटी क्षेत्राची ओळख बनलेलं पुण्याचं महत्त्वाचं केंद्र...
हजारो कोटींचा महसूल देणाऱ्या या आयटी हबमध्ये दररोज लाखो कर्मचारी कामासाठी येतात... मात्र कार्यालयात पोहोचण्याआधीच त्यांना रस्त्यावर संघर्ष करावा लागतोय.
कुठे तासन्‌तास वाहतूक कोंडी...
कुठे रस्त्यांवर जीवघेणे खड्डे...
तर कुठे अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे अपघातांचा धोका...
याच समस्यांमुळे आता हिंजवडीतील आयटी अभियंत्यांचा संयम सुटला आहें.
आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा दावा आहे की, वारंवार प्रशासनाकडे तक्रारी आणि पाठपुरावा करूनही समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही.
गेल्या दीड वर्षात रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेच्या प्रश्नांमुळे 37 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा आंदोलकांकडून केला जातोय.
एकीकडे हिंजवडीत सुमारे 800 कंपन्या आणि लाखो आयटी अभियंते मोठ्या प्रमाणावर कर भरतात... मात्र त्या तुलनेत मूलभूत सुविधा मिळत नसल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये आहे.
विशेष म्हणजे, चाकण MIDCतील 20 लघुउद्योजकांनी कंपन्या बंद करण्याचा इशारा दिल्यानंतर सरकार आणि प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या.
मग हिंजवडीतील प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आम्हालाही रस्त्यावर उतरावं लागणार का?
हा सवाल आता आयटी अभियंते उपस्थित करत आहेत.
हिंजवडी सोडून कंपन्या आणि कर्मचारी जाण्याची वेळ आल्यानंतर सरकार जागं होणार का..?
की त्याआधीच या समस्यांवर तोडगा काढला जाणार?
याच मागण्यांसाठी येत्या 6 सप्टेंबरला आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
जगाला टेक्नॉलॉजी देणाऱ्या हिंजवडीला मात्र आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागतोय...
त्यामुळे प्रश्न फक्त वाहतूक कोंडीचा नाही...
प्रश्न आहे—हिंजवडीसारख्या जागतिक दर्जाच्या आयटी हबच्या पायाभूत सुविधांचा!
आता आयटी अभियंत्यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर तरी प्रशासन जागं होणार का..?
#Hinjewadi #HinjewadiITPark #Pune #PuneNews #ITEngineers #ITEmployees #HinjewadiNews #PuneTraffic #HinjewadiTraffic #RoadProblems #Potholes #Infrastructure #ITPark #Protest #Andolan #6September #MaharashtraNews #PuneUpdates #TheNayakNews #न्यूज #हिंजवडी #पुणे #आंदोलन
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • "त्या देशातून आपल्याला पैसाही परत आणता येत नाही...; लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेतला जातो..!"
    1
    "त्या देशातून आपल्याला पैसाही परत आणता येत नाही...; लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेतला जातो..!"
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house Pune City, Maharashtra•
    12 hrs ago
  • हिप्परगा रवा येथे वीज बिलांचा भोंगळ कारभार! वेळेवर बिल नाही, थेट वीज खंडित; नागरिकांचा संताप
    1
    हिप्परगा रवा येथे वीज बिलांचा भोंगळ कारभार! वेळेवर बिल नाही, थेट वीज खंडित; नागरिकांचा संताप
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • पिंपरी-चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ! आईवर हल्ला, कुशीतलं एक वर्षाचं बाळ रस्त्यावर कोसळलं; थरारक घटना CCTV मध्ये कैद
    1
    पिंपरी-चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ! आईवर हल्ला, कुशीतलं एक वर्षाचं बाळ रस्त्यावर कोसळलं; थरारक घटना CCTV मध्ये कैद
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    33 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.