Shuru
Apke Nagar Ki App…
ज्ञानेशप्रसाद, ब्युरो चिफ न्यूज मराठी वाशिम* संवाद:- 9923230821 रिसोड: न. प. चे कर्मचारी विनोद बांगर यांच्यामुळे, गावात पुन्: पक्षांचा चिव चिवाट ऐकायला मिळतोय!
Dnyaneshprasad
ज्ञानेशप्रसाद, ब्युरो चिफ न्यूज मराठी वाशिम* संवाद:- 9923230821 रिसोड: न. प. चे कर्मचारी विनोद बांगर यांच्यामुळे, गावात पुन्: पक्षांचा चिव चिवाट ऐकायला मिळतोय!
More news from महाराष्ट्र and nearby areas
- ज्ञानेशप्रसाद, ब्युरो चिफ न्यूज मराठी वाशिम* संवाद:- 9923230821 रिसोड: न. प. चे कर्मचारी विनोद बांगर यांच्यामुळे, गावात पुन्: पक्षांचा चिव चिवाट ऐकायला मिळतोय!1
- दारव्हा शहरातील कावेरी नगर परिसरात सोमवार दि. १६ फेब्रुवारीला उशिरा रात्री झालेल्या मारहाणीच्या घटनेने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शाम श्रावण टारपे (वय ५७, रा. कावेरी नगर, दारव्हा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. सै. आवेज सै. जमिल (वय २०, रा. रेल्वे स्टेशन परिसर, दारव्हा) व इनायत अली इरफान अली (वय २५, रा. अशोक नगर पाटीपुरा, यवतमाळ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. घटना १६ फेब्रुवारी रोजी रात्री ११.१० ते ११.२० दरम्यान घडली. तक्रारदार यांचा पुतण्या गौरव प्रकाश टारपे (वय २६, रा. कावेरी नगर) हा घराजवळ असताना आरोपींनी त्याच्याशी वाद घालत अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर जीवे मारण्याच्या उद्देशाने लाकडी राफ्टरने त्याच्या डोक्यावर व शरीरावर प्रहार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात गौरव गंभीर जखमी झाला. प्राथमिक उपचारानंतर त्याला अधिक उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, ही संपूर्ण घटना घराजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून मारहाणीचा व्हिडिओ दिवसभर समाजमाध्यमांवर व्हायरल होत होता. पोलिसांनी दोन्ही आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास दारव्हा पोलीस करीत आहेत. सदर घटनेचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येत असून दारव्हा ठाणेदार यांना शहरातील काही सामाजिक संघटनाणी रात्री ७. ३० वाजता निवेदन देऊन कठोर कारवाईची मागणी केली.2
- *“धानोरा विकासकामांचा भांडाफोड; जलसंधारण घोटाळ्यावर जि.प. प्रशासन कोंडीत!”* - जि.प. यवतमाळसमोर आमरण उपोषणाला सुरवात! उमरखेड : धानोरा (सा), ता. उमरखेड येथील कथित विकासकामांतील गैरव्यवहार आणि जलसंधारण विभागातील अनियमिततेच्या गंभीर आरोपांमुळे जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात संतापाचा ज्वालामुखी उसळला आहे. सोमवारी (दि. १६ फेब्रुवारी २०२६) पासून जिल्हा परिषद यवतमाळ कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात झाली असून प्रशासनावर थेट कारवाईचा दबाव वाढला आहे. पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा या आमरण उपोषणात रामदास अंबादास कांबळे (अध्यक्ष, संयुक्त पत्रकार संघ), शेख इरफान शेख इसा (कार्याध्यक्ष) आणि सुरेंद्रनाथ पंजाबराव दळवी (उपाध्यक्ष) सहभागी झाले आहेत त्यांनी जि.प. कार्यालयासमोर “दोषींवर कारवाई झाल्याशिवाय माघार नाही” असा स्पष्ट इशारा दिला. *धानोरा प्रकरणातील आरोप गंभीर* उपोषणकर्त्यांनी केलेले आरोप थेट जनहिताशी निगडित असून त्यात प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल गैरव्यवहार, स्मशानभूमीकडे जाणाऱ्या सीसी रस्त्याचे काम न करता बिले काढल्याचा आरोप, सार्वजनिक शौचालयाच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाबाबत तक्रारींकडे दुर्लक्ष यांचा समावेश आहे. संबंधित प्रकरणांत चौकशी व कार्यवाही न झाल्याने आमरण उपोषण करत असल्याचे त्यांनी सांगितले. *जलसंधारण विभागावर लाखोंच्या भ्रष्टाचाराचा ठपका* जि.प. उपविभाग पुसद येथे कार्यरत उपविभागीय जलसंधारण अधिकारी सीमा तायडे यांच्या कार्यकाळात पुसद, दिग्रस, उमरखेड व महागाव तालुक्यांतील विकासकामांत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. धरण–तलाव गाळ उपसा योजनेत अनियमितता,वीटभट्टी धारकांना नियमबाह्य माती परवाने, संबंधित अधिकाऱ्यांच्या संपत्तीची सखोल चौकशी अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत. तसेच संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ निलंबन आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे. *तक्रारींनंतरही कारवाई नाही* १७ डिसेंबर २०२५ रोजी लेखी निवेदन, ९ जानेवारी २०२६ रोजी स्मरणपत्र आणि ३० जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व ग्रामविकास मंत्र्यांना ई-मेलद्वारे तसेच प्रत्यक्ष तक्रार करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. “दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही. उपोषणादरम्यान काही अनुचित घडल्यास प्रशासन जबाबदार राहील,” असा थेट इशारा देत उपोषणकर्त्यांनी उपोषण तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान जि.प. कार्यालया समोर सुरू असलेल्या आमरण उपोषणातील गंभीर आरोपांवर प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.1
- ‘झिरो मिस्टेक’चा इशारा; राष्ट्रपती दौऱ्यासाठी पोलिसांची कडेकोट मोर्चेबांधणी.. राष्ट्रपतींच्या दौऱ्याची ‘हायअलर्ट’ तयारी; सुरक्षा आराखड्याची विशेष पाहणी शेगांव / बुलढाणा, दि. १७ (जिमाका) – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या प्रस्तावित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा पूर्णपणे ‘अॅक्शन मोड’मध्ये आली आहे. दौरा निर्विघ्न आणि दिमाखात पार पडावा यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी आज प्रत्यक्ष स्थळ पाहणी करत सुरक्षा व्यवस्थेचा सखोल आढावा घेत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. सभास्थळ, हेलिपॅड, विश्रांतीगृह तसेच मार्गावरील संवेदनशील ठिकाणांची बारकाईने तपासणी करण्यात आली. बहुस्तरीय सुरक्षा कवच उभारण्याच्या दृष्टीने बॉम्ब शोधक पथक, श्वान पथक आणि दंगल नियंत्रण पथक तैनात करण्याचे आदेश देण्यात आले असून प्रत्येक हालचालीवर ‘गरुडदृष्टी’ ठेवली जाणार आहे. यावेळी पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा, आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. आशितोष गुप्ता यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, आरोग्य आणि इतर विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वाहतूक नियंत्रण, आपत्कालीन आराखडा, वैद्यकीय सुविधा, स्वच्छता आणि प्रोटोकॉल याबाबत सविस्तर नियोजन करण्यात आले. “दौऱ्यात कोणतीही त्रुटी चालणार नाही,” असा स्पष्ट इशारा देत विशेष पोलीस महानिरीक्षकांनी सर्व यंत्रणांना समन्वयाने आणि सतर्कतेने काम करण्याचे निर्देश दिले. राष्ट्रपतींचा दौरा यशस्वी करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा ठाम विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. हायसिक्युरिटी, कडक नियोजन आणि प्रशासनाचा ‘फुल गियर’ — राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी बुलढाणा तयार!1
- खामगाव : तालुक्यातील जयपूर लांडे येथे शासकीय कामगार किट वाटपाच्या प्रक्रियेत मोठा गोंधळ उडाला असून, भाजप पदाधिकाऱ्यांकडून केवळ आपल्या जवळच्या व्यक्तींचेच फॉर्म स्वीकारले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या कारणावरून झालेल्या शाब्दिक चकमकीची ऑडिओ रेकॉर्डिंग आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शासनाच्या वतीने नोंदणीकृत बांधकाम कामगारांना घरगुती उपयोगाच्या भांड्यांच्या संचाचे वाटप केले जात आहे.जयपूर लांडे येथे हे फॉर्म स्वीकारत असताना, तिथे उपस्थित असलेल्या भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी ठराविक लोकांचेच फॉर्म स्वीकारण्यास सुरुवात केली.जेव्हा इतर सामान्य कामगार आणि ग्रामस्थ आपले फॉर्म घेऊन पोहोचले, तेव्हा त्यांचे फॉर्म स्वीकारण्यास टाळाटाळ करण्यात आली. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी जाब विचारला असता, पदाधिकारी आणि ग्रामस्थांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. केवळ भाजप पदाधिकाऱ्यांच्या पसंतीचे आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींचेच फॉर्म घेतले जात आहेत,सामान्य आणि गरजू कामगारांना डावलले जात आहे,शासकीय योजनेचे रूपांतर राजकीय कार्यक्रमात केल्याचा संताप व्यक्त होत आहे.या वादादरम्यान झालेला संवाद काही व्यक्तींनी रेकॉर्ड केला असून, ती क्लिप आता तालुक्यात व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये पदाधिकाऱ्यांचा अरेरावीचा सूर आणि ग्रामस्थांचा संताप स्पष्टपणे ऐकू येत आहे. या प्रकारामुळे जयपूर लांडे परिसरात तणावाचे वातावरण असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात हस्तक्षेप करण्याची मागणी होत आहे.1
- शांतता आणि उत्साह! खामगावात शिवजयंतीसाठी चोख बंदोबस्त.1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- राष्ट्रपतींच्या दौऱ्यानेच जाग आली का? संत नगरी शेगावात प्रशासनाच्या ‘तत्परते’वर नागरिकांचा सवाल शेगाव : देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या २५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या प्रस्तावित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संत नगरी शेगावात प्रशासन अक्षरशः धावपळ करताना दिसत आहे. छत्रपती संभाजी महाराज चौक ते आनंद सागर बाळापूर रोडवरील खड्डे बुजविण्याची कामे युद्धपातळीवर सुरू झाली असून खामगाव रोडवरील दुभाजकांची साफसफाई, झाडांची मशागत, गवत काढणे, रस्त्यांची स्वच्छता अशा सर्व कामांना अचानक वेग आला आहे. मात्र या ‘तत्परते’मुळे शहरातील नागरिकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे — ही कामे फक्त व्हीआयपी दौऱ्यापुरतीच का? काही दिवसांपूर्वीच शेगावातील प्रकट दिन सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला. हजारो दिंड्या, वारकरी आणि भाविक संत नगरीत दाखल झाले होते. त्या वेळी रस्त्यांवरील खड्डे जैसे थे होते, अनेक ठिकाणी स्ट्रीट लाईट बंद होत्या, स्वच्छतेचा प्रश्न कायम होता. नगरपालिकेकडून कोणतीही ठोस हालचाल दिसून आली नाही. भक्तांच्या सोयी-सुविधांपेक्षा प्रशासनाची उदासीनता अधिक ठळकपणे जाणवत होती. आता मात्र राष्ट्रपतींचा दौरा जाहीर होताच काही दिवसांतच चित्र पालटले आहे. वर्षानुवर्षे नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणारे प्रशासन अचानक सक्रिय झाले आहे. जे काम नियमित देखभाल म्हणून व्हायला हवे होते, ते आज ‘ततडीच्या कामां’च्या नावाखाली सुरू आहे. त्यामुळे नागरिक संतप्त होत विचारत आहेत — शेगावातील समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रपतींच्या दौऱ्याचीच गरज होती का? संत नगरीचा दर्जा, येथील लाखो भाविकांची वर्दळ, शहराची वाढती लोकसंख्या या सगळ्यांचा विचार करता रस्ते, प्रकाश व्यवस्था आणि स्वच्छता ही मूलभूत कामे कायमस्वरूपी दर्जेदार असणे अपेक्षित आहे. परंतु येथे परिस्थिती उलटी दिसते. सामान्य नागरिकांच्या दैनंदिन अडचणींकडे दुर्लक्ष आणि व्हीआयपींसाठी तातडीची ‘मेकओव्हर’ मोहीम — हीच प्रशासनाची कार्यपद्धती बनली आहे का, असा रोखठोक सवाल आता केला जात आहे. राष्ट्रपतींचा दौरा हा निश्चितच शहरासाठी अभिमानाचा क्षण आहे. मात्र त्या निमित्ताने सुरू झालेली ही धावपळ प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर बोट ठेवणारी ठरत आहे. संत नगरी शेगावात विकास हा कायमस्वरूपी आणि नागरिककेंद्री होणार की तो फक्त मोठ्या पाहुण्यांच्या स्वागतापुरताच मर्यादित राहणार? हा प्रश्न आज प्रत्येक शेगावकराच्या मनात घुमत आहे.1