Shuru
Apke Nagar Ki App…
कोल्हापुर जिल्ह्यातील आजरा येथे भीषण दुर्घटना! भिंत कोसळून प्राध्यापिका व विद्यार्थिनीचा मृत्यू कोल्हापुरात भीषण दुर्घटना! भिंत कोसळून प्राध्यापिका व विद्यार्थिनीचा मृत्यू कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. जुने घर जेसीबीने पाडत असताना भिंत अचानक कोसळली आणि त्या ठिकाणाहून जात असलेल्या प्राध्यापिका ज्योती नितीन कुंभार आणि विद्यार्थिनी वैष्णवी भोसले यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत ललीता भोसले गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.ही घटना परिसरात शोककळा पसरवणारी ठरली आहे.
Raviraj kamble
कोल्हापुर जिल्ह्यातील आजरा येथे भीषण दुर्घटना! भिंत कोसळून प्राध्यापिका व विद्यार्थिनीचा मृत्यू कोल्हापुरात भीषण दुर्घटना! भिंत कोसळून प्राध्यापिका व विद्यार्थिनीचा मृत्यू कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. जुने घर जेसीबीने पाडत असताना भिंत अचानक कोसळली आणि त्या ठिकाणाहून जात असलेल्या प्राध्यापिका ज्योती नितीन कुंभार आणि विद्यार्थिनी वैष्णवी भोसले यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत ललीता भोसले गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.ही घटना परिसरात शोककळा पसरवणारी ठरली आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- कोल्हापुरात भीषण दुर्घटना! भिंत कोसळून प्राध्यापिका व विद्यार्थिनीचा मृत्यू कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. जुने घर जेसीबीने पाडत असताना भिंत अचानक कोसळली आणि त्या ठिकाणाहून जात असलेल्या प्राध्यापिका ज्योती नितीन कुंभार आणि विद्यार्थिनी वैष्णवी भोसले यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत ललीता भोसले गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.ही घटना परिसरात शोककळा पसरवणारी ठरली आहे.1
- Shiv Jayanti 2026 Kolhapur Shiv Jayanti Shivaji Maharaj Jayanti Chhatrapati Shivaji Maharaj Shiv Jayanti Celebration Kolhapur Festival Maharashtra Festivalकोल्हापुरात शिवजयंतीचा जल्लोष | छत्रपती शिवाजी महाराज जयंती 2026s Shivaji Maharaj Status Shivaji Maharaj Video Shiv Jayanti Kolhapur 2026 Maharashtra Culture Dhol Tasha Pathak Shiv Jayanti Utsav Kolhapur News Shivaji Maharaj Jayanti Celebration1
- सिंधुदुर्ग गेल्या अनेक वर्षांपासून मानपान, वाद आणि मतभेदांमुळे बंद अवस्थेत असलेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंदिरे आता पुन्हा एकदा उघडणार आहेत. महाराष्ट्र मंदिर महासंघाने सुरू केलेल्या विशेष अभियानामुळे हे सकारात्मक चित्र पाहायला मिळत असून, दोन दशकांपासून कुलूपबंद असलेली काही मंदिरे आता भक्तांसाठी खुली झाली आहेत. महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य संघटक संजय जोशी यांनी सिंधुदुर्ग येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी त्यांनी जिल्हयातील मंदिरांच्या सद्यस्थितीवर आणि महासंघाच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला. प्राथमिक सर्वेक्षणात जिल्ह्यातील सुमारे २५ मंदिरे वादांमुळे बंद किंवा बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे समोर आले आहे. महासंघाने गेल्या दोन वर्षांत गावपातळीवर बैठका घेऊन, दोन गटांमधील मतभेद मिटवून सामंजस्य घडवून आणण्याचे काम केले आहे. आतापर्यंत १० मंदिरांच्या विश्वस्तांशी संपर्क साधण्यात आला असून, त्यापैकी ४ मंदिरे पूर्णपणे पूर्ववत सुरू झाली आहेत. यात देऊळ आणि माडखोल येथील मंदिरांचा प्रामुख्याने समावेश आहे. केवळ मंदिर उघडणेच नव्हे, तर बंद पडत चाललेल्या धार्मिक प्रथा आणि परंपरा पुन्हा सुरू करण्यावरही महासंघाने भर दिला आहे. महाराष्ट्रासमोर नवा आदर्श संजय जोशी यांनी यावेळी सांगितले की, "सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंदिर विश्वस्तांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकोप्याने काम करण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श आहे." त्यांनी आवाहन केले की, राज्यातील इतर जिल्ह्यांतही जिथे मंदिरे बंद आहेत, तिथल्या विश्वस्तांनी एकत्र येऊन समाजाला मंदिरांचा 'ऊर्जास्त्रोत' पुन्हा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.1
- Post by मन्सूर शेख1
- अजितदादांच्या स्टाईलमध्येच युवा नेते जय पवारांनी सोडवला शाळेचा प्रश्न..! बारामती मतदारसंघात गावभेट दौऱ्यावर असताना युवा नेते जय अजितदादा पवार यांनी भिकोबा नगर येथील एका शाळेला भेट दिली. शाळेच्या अगदी शेजारी महावितरणच्या विद्युत लाईनचे खांब असल्यामुळे शॉर्टसर्किट होण्याचा धोका निर्माण झाला होता. कमी खर्चात कंटेनरच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या या शाळेसाठी ही परिस्थिती अत्यंत धोकादायक ठरत होती. याबाबत शाळेच्या प्राचार्यांनी जय पवार यांच्याकडे समस्या मांडताच त्यांनी तत्काळ महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. यावेळी जय पवार यांनी शाळेच्या कंटेनरमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली तसेच अनाथ मुलांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.1
- विक्रम शिंदे /भोर दि.20तालुक्याच्या भाटघर धरण क्षेत्रातील पसुरे मधील टोंगेवाडी येथे पुणे येथील आदिनाथ भक्तामर हीलिंग सेंटरच्या वतीने नागरिकांना आरोग्यहितकारक थंडगार पाण्यासाठी माठ मोफत वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे गौरव मुनोत,सुरेशनाना धुमाळ,दत्तात्रेयदादा धुमाळ,संतोष धुमाळ,मनोज धुमाळ तसेच महिला भगिनी,युवक उपस्थित होते. प्रति कुटुंब एक असे माठ वितरित करण्यात आले. उपस्थित नागरिकांनी व महिलांनी माठ मिळाल्याचा आनंद व्यक्त केला.1
- पिंपरी चिंचव्हडं :- नारी शक्ती वंदन विधेयक संसदेत मंजूर होण्यास विरोध करणाऱ्या इंडिया आघाडीच्या खासदारांच्या निषेधार्थ आज पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकांनी आक्रमक पवित्रा घेतला.... भाजपच्या सर्व महिला नगरसेविकांनी काळे पेहराव परिधान करून सभागृहाच्या कामकाजात सहभाग नोंदवत आपला निषेध व्यक्त केला. केंद्र सरकारने महिलांना राजकारणात हक्काचे प्रतिनिधित्व देण्यासाठी नारी शक्ती वंदन विधेयक आणले आहे. मात्र, विरोधी पक्षातील इंडिया आघाडीच्या खासदारांनी या विधेयकावरून घेतलेल्या भूमिकेचा भाजप महिला आघाडीने तीव्र शब्दांत निषेध केला. महिलांच्या सक्षमीकरणाचा मार्ग रोखणाऱ्या विरोधकांचा चेहरा जनतेसमोर उघड झाला आहे, अशी भावना यावेळी नगरसेविकांनी व्यक्त केली. सभागृहाचे कामकाज सुरू होताच, काळ्या साड्या परिधान केलेल्या भाजप नगरसेविकांनी लक्ष वेधून घेतले. यावेळी घोषणाबाजी करत विरोधकांच्या भूमिकेचा धिक्कार करण्यात आला. या अनोख्या आंदोलनामुळे महापालिकेतील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले.... #नारीशक्तीवंदनविधेयक #महिलाआरक्षण #भाजप #भाजपमहिलाआघाडी #पिंपरीचिंचवड #महापालिका #निषेधआंदोलन #काळीसाडी #राजकारण #महिलासक्षमीकरण #इंडियाआघाडी #घोषणाबाजी #NariShaktiVandanBill #WomenReservation #BJP #BJPMahilaMorcha #PimpriChinchwad #MunicipalCorporation #Protest #BlackSareeProtest #Politics #WomenEmpowerment #INDIAAlliance #Sloganeering1
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर शहरात भव्य मिरवणुका काढण्यात आल्या. यावेळी सध्या चर्चेत असलेल्या ‘खरात प्रकरणा’वर टीकात्मक भाष्य करणारा देखावा विशेष लक्षवेधी ठरला. अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीला बळी पडू नका, असा ठाम संदेश या देखाव्यातून नागरिकांना देण्यात आला. सामाजिक जागरूकतेचा हा अनोखा प्रयत्न नागरिकांच्या चर्चेचा विषय बनला आहे.1