#MaharashtraLiveNews Nagpur भूखंड माफियांवर मकोका लावा भाजप आ. कृष्णा खोपडे यांची मागणी #MVMNews नागपूर : उपराजधानीत भागांमध्ये भूखंड माफियांची दहशत असून, पोलिसांकडे एका दिवसात अडीचशेहून अधिक तक्रारी आल्या. अनेक ठिकाणी पोलिसच आरोपींना सहकार्य करत असून, पोलिस तक्रारींची दखल घेत नाही, असा आरोप करत भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी भूखंड माफियांवर मकोकाअंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांचे अभय असल्याने बऱ्याच भूखंड माफियांची हिंमत वाढली आहे. एकच प्लॉट दोन ते तीन जणांना विकल्यावरदेखील पोलिस दखल घेत नाही. तक्रारदारांना अदखलपात्र गुन्ह्याची प्रत देण्यात येते किंवा काही तरी कारण देत तक्रार घेण्यासच नकार देण्यात येतो. पूर्व नागपुरात वाठोडा, पारडी, कळमना, नंदनवन या पोलिस ठाण्याअंतर्गत अशा घटना मोठ्या प्रमाणात घडतात. अशा माफियांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी खोपडे यांनी केली आहे. एका घटनेत भूखंड माफियांनी मौजा तरोडी येथील मनपाची जागा विकली. मात्र, तरीदेखील मनपाच्या अधिकाऱ्यांनी मौन बाळगले. या प्रकरणात त्यांनी तक्रार का दाखल केली नाही, असा सवाल खोपडे यांनी उपस्थित केला. बाबा ताजुद्दीन अँड डेव्हलपर्सने हा प्रकार केला होता. मी स्वतः २०२२ व २०२३ मध्ये आयुक्तांना पत्र लिहून हा प्रकार कळवला होता. मात्र, मनपाच्या स्थावर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कुठलीही कारवाई केली नव्हती. संबंधित जागेच्या सातबारावर मनपाची नोंद आहे. मनपाच्या अधिकाऱ्यांच्या समर्थनातूनच असे प्रकार घडत असल्याचा दावा खोपडे यांनी केला.

- Matka Roti of Nagpur Indian Street Food1
- #MaharashtraLiveNews Gadchiroli राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर ढगात भरकटलं अन्... अजित पवार यांनी सांगितलं किस्सा.... #MVMNews नागपूर : नागपूर ते गडचिरोली असा हेलिकॉप्टरने प्रवास करणारे राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे हेलिकॉप्टर ढगाळ वातावरणामुळे भरकटल्याची मोठी बातमी समोर आली आहे. या हेलिकॉप्टरमध्ये अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे देखील उपस्थित होते. हेलिकॉप्टर पायलटने प्रसंगावधान दाखवत हेलिकॉप्टर जमीनीवर उतरवल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे नागपूरहून गडचिरोली दौऱ्यावर जात होते. या प्रवासादरम्यान त्यांचे हेलिकॉप्टर खराब वातावरणामुळे ढगात भरकटले. उपमुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर ढगात भरकटल्याची माहिती समोर येताच प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. मात्र, हेलिकॉप्टर ढगात भरकल्यानंतर पायलटने मोठ्या कौशल्याने हेलिकॉप्टर जमीनीवर उतरवल्यामुळे पुढील मोठी दूर्घटना टळली आहे. शिवाय आता सर्वजण सुखरुप आहेत. मात्र, उपमुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर भरकटल्याची बातमी सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली आहे.1
- India's Most Unique Nadda Kabab Making In Nagpur1
- Live Crab Market of Nagpur1
- Most Famous Dilkush Dosa Of Nagpur1
- Celebrity Dolly Chaiwala of Nagpur | Part 21
- Mega Chikki Factory of Nagpur1
- 10 Moharram Nagpur MH1