Shuru
Apke Nagar Ki App…
Mega Chikki Factory of Nagpur
Shahbaz Khan
Mega Chikki Factory of Nagpur
More news from Nagpur and nearby areas
- #MaharashtraLiveNews Nagpur भूखंड माफियांवर मकोका लावा भाजप आ. कृष्णा खोपडे यांची मागणी #MVMNews नागपूर : उपराजधानीत भागांमध्ये भूखंड माफियांची दहशत असून, पोलिसांकडे एका दिवसात अडीचशेहून अधिक तक्रारी आल्या. अनेक ठिकाणी पोलिसच आरोपींना सहकार्य करत असून, पोलिस तक्रारींची दखल घेत नाही, असा आरोप करत भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी भूखंड माफियांवर मकोकाअंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांचे अभय असल्याने बऱ्याच भूखंड माफियांची हिंमत वाढली आहे. एकच प्लॉट दोन ते तीन जणांना विकल्यावरदेखील पोलिस दखल घेत नाही. तक्रारदारांना अदखलपात्र गुन्ह्याची प्रत देण्यात येते किंवा काही तरी कारण देत तक्रार घेण्यासच नकार देण्यात येतो. पूर्व नागपुरात वाठोडा, पारडी, कळमना, नंदनवन या पोलिस ठाण्याअंतर्गत अशा घटना मोठ्या प्रमाणात घडतात. अशा माफियांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी खोपडे यांनी केली आहे. एका घटनेत भूखंड माफियांनी मौजा तरोडी येथील मनपाची जागा विकली. मात्र, तरीदेखील मनपाच्या अधिकाऱ्यांनी मौन बाळगले. या प्रकरणात त्यांनी तक्रार का दाखल केली नाही, असा सवाल खोपडे यांनी उपस्थित केला. बाबा ताजुद्दीन अँड डेव्हलपर्सने हा प्रकार केला होता. मी स्वतः २०२२ व २०२३ मध्ये आयुक्तांना पत्र लिहून हा प्रकार कळवला होता. मात्र, मनपाच्या स्थावर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कुठलीही कारवाई केली नव्हती. संबंधित जागेच्या सातबारावर मनपाची नोंद आहे. मनपाच्या अधिकाऱ्यांच्या समर्थनातूनच असे प्रकार घडत असल्याचा दावा खोपडे यांनी केला.1
- #MaharashtraLiveNews Nagpur धावत्या कारमध्ये प्रेमीयुगुलाचे अश्लील चाळे…इंस्टावर चित्रफित प्रसारित होताच… #MVMNews नागपूर : प्रेयसी धावत्या कारच्या स्टेअरिंगवर बसून कार चालविणाऱ्या प्रियकराशी अश्लील चाळे करीत असल्याची एक चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाली. पुढे ती पोलीस आयुक्तांपर्यंत पोहचली. आयुक्तांनी प्रेयसी-आणि प्रियकराचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने सीताबर्डी पोलिसांनी प्रेमीयुगुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपी सूरज हा सनदी लेखापाल (सीए) तर त्याची प्रेयसी अभियंता आहे. दोघांचेही गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. दोघांनाही सोबत फिरायला जायची सवय होती. सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास सूरज हा प्रेयसीसोबत कारने प्रतापनगरातील एका दुकानात मिसळ खाण्यासाठी जात होता. मात्र, शंकरनगर ते लक्ष्मीनगर चौकापर्यंतच्या रस्त्यावरून कार धावत असताना त्याच्या प्रेयसीने अचानक त्याच्याशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. काही मिनिटातच ती धावत्या कारच्या स्टेअरिंगवर बसली. तिने प्रियकराशी अश्लील चाळे सुरु केले. हा सर्व प्रकार रस्त्यावरील अन्य वाहनचालक बघत होते. मात्र, दोघांना काहीही फरक पडत नव्हता. या दरम्यान, एक पत्रकारही त्याच रस्त्याने जात होता. त्याच्या लक्षात हा प्रकार आला. त्याने मोबाईलने प्रेमीयुगुलाच्या चाळ्यांची चित्रफीत तयार केली. ती चित्रफीत इंस्टाग्रामवर प्रसारित केली. काही मिनिटातच ती शहरातील अनेकांच्या मोबाईलवर बघितल्या गेली. अनेकांनी या प्रकाराबाबत रोष व्यक्त केला.1
- Making of Tobacco Maava in Nagpur1
- Param ki daal | Thegreatindianfoodie | Nagpur1
- Nagpur Mohoram | मोहोरम ला निघाली सवारी | Maharashtra Darshan1
- Nagpur वाली Pav Bhaji🥺❤️1
- Explore the Massive Mr. DIY Store in Nagpur1
- nagpur ka sabji market 🍆🥔1