#MaharashtraLiveNews Nagpur धावत्या कारमध्ये प्रेमीयुगुलाचे अश्लील चाळे…इंस्टावर चित्रफित प्रसारित होताच… #MVMNews नागपूर : प्रेयसी धावत्या कारच्या स्टेअरिंगवर बसून कार चालविणाऱ्या प्रियकराशी अश्लील चाळे करीत असल्याची एक चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाली. पुढे ती पोलीस आयुक्तांपर्यंत पोहचली. आयुक्तांनी प्रेयसी-आणि प्रियकराचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने सीताबर्डी पोलिसांनी प्रेमीयुगुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपी सूरज हा सनदी लेखापाल (सीए) तर त्याची प्रेयसी अभियंता आहे. दोघांचेही गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. दोघांनाही सोबत फिरायला जायची सवय होती. सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास सूरज हा प्रेयसीसोबत कारने प्रतापनगरातील एका दुकानात मिसळ खाण्यासाठी जात होता. मात्र, शंकरनगर ते लक्ष्मीनगर चौकापर्यंतच्या रस्त्यावरून कार धावत असताना त्याच्या प्रेयसीने अचानक त्याच्याशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. काही मिनिटातच ती धावत्या कारच्या स्टेअरिंगवर बसली. तिने प्रियकराशी अश्लील चाळे सुरु केले. हा सर्व प्रकार रस्त्यावरील अन्य वाहनचालक बघत होते. मात्र, दोघांना काहीही फरक पडत नव्हता. या दरम्यान, एक पत्रकारही त्याच रस्त्याने जात होता. त्याच्या लक्षात हा प्रकार आला. त्याने मोबाईलने प्रेमीयुगुलाच्या चाळ्यांची चित्रफीत तयार केली. ती चित्रफीत इंस्टाग्रामवर प्रसारित केली. काही मिनिटातच ती शहरातील अनेकांच्या मोबाईलवर बघितल्या गेली. अनेकांनी या प्रकाराबाबत रोष व्यक्त केला.

- Matka Roti of Nagpur Indian Street Food1
- #MaharashtraLiveNews Gadchiroli राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर ढगात भरकटलं अन्... अजित पवार यांनी सांगितलं किस्सा.... #MVMNews नागपूर : नागपूर ते गडचिरोली असा हेलिकॉप्टरने प्रवास करणारे राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे हेलिकॉप्टर ढगाळ वातावरणामुळे भरकटल्याची मोठी बातमी समोर आली आहे. या हेलिकॉप्टरमध्ये अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे देखील उपस्थित होते. हेलिकॉप्टर पायलटने प्रसंगावधान दाखवत हेलिकॉप्टर जमीनीवर उतरवल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे नागपूरहून गडचिरोली दौऱ्यावर जात होते. या प्रवासादरम्यान त्यांचे हेलिकॉप्टर खराब वातावरणामुळे ढगात भरकटले. उपमुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर ढगात भरकटल्याची माहिती समोर येताच प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. मात्र, हेलिकॉप्टर ढगात भरकल्यानंतर पायलटने मोठ्या कौशल्याने हेलिकॉप्टर जमीनीवर उतरवल्यामुळे पुढील मोठी दूर्घटना टळली आहे. शिवाय आता सर्वजण सुखरुप आहेत. मात्र, उपमुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर भरकटल्याची बातमी सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली आहे.1
- India's Most Unique Nadda Kabab Making In Nagpur1
- Live Crab Market of Nagpur1
- Most Famous Dilkush Dosa Of Nagpur1
- Celebrity Dolly Chaiwala of Nagpur | Part 21
- Mega Chikki Factory of Nagpur1
- 10 Moharram Nagpur MH1