logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात १ जून २०२६ रोजी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहराच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक घेतली. या बैठकीत शहरातील नाले, रस्ते, सार्वजनिक सुविधा, स्वच्छता व्यवस्था, अतिक्रमण निर्मूलन, हॉकर्स व्यवस्थापन, स्वच्छतागृहांचे आधुनिकीकरण, वृक्षारोपण, पालखी सोहळ्याची तयारी आणि अग्निसुरक्षा यासह विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, अजय सुर्यवंशी, मनोज सेठिया, उप आयुक्त सचिन पवार, डॉ. प्रदीप ठेंगल, संदीप खोत, सीताराम बहुरे, राजेश आगळे, व्यंकटेश दुर्वास, सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे, अमित पंडीत, तानाजी नरळे, मुख्य उद्यान अधिक्षक महेश गारगोटे यांच्यासह क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे, अश्विनी गायकवाड, परशुराम वाघमोडे, अतुल पाटील, पुजा दुधनाळे आदींनी ऑनलाइन पद्धतीने उपस्थिती लावली. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शहरातील नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत राहील याची खात्री करण्यास सांगितले. ज्या ठिकाणी नाल्यांची कामे पूर्ण झाली आहेत, तेथील कामांची गुणवत्ता आणि परिणामकारकता संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तपासण्याचे निर्देश देण्यात आले. नाल्यांची रुंदी, खोली आणि पाणी वाहून नेण्याची क्षमता या बाबींचा विचार करून अहवाल सादर करण्याची सूचनाही त्यांनी केली. अतिक्रमण हटविल्यानंतर त्याच ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही, यासाठी क्षेत्रीय कार्यालयांनी सातत्याने निरीक्षण ठेवणे आवश्यक असून, फुटपाथ, मोकळ्या जागा तसेच महापालिकेच्या मालकीच्या जागांवर होणाऱ्या अतिक्रमणांवर नियमित कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. शहरातील फेरीवाल्यांसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय हॉकर्स झोन निश्चित करून त्यांना अधिकृत जागा उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेला गती देण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या, ज्यामुळे सार्वजनिक रस्ते, चौक आणि फुटपाथवरील अतिक्रमण कमी होऊन वाहतूक व्यवस्थेला मदत होईल असे त्यांनी नमूद केले. शहराला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी वारंवार कचरा टाकला जाणाऱ्या ठिकाणांची ओळख पटवून तेथे सुशोभीकरण, हरितीकरण किंवा वृक्षारोपण करण्याचे निर्देश देण्यात आले, जेणेकरून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण होऊन सार्वजनिक ठिकाणी कचरा साचण्याचे प्रमाण कमी होईल. अनधिकृत फ्लेक्स, बेकायदेशीर जाहिरात फलक आणि परवानगीविना उभारण्यात आलेल्या जाहिरातींवर सातत्याने लक्ष ठेवून नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. महापालिकेतर्फे शहरासाठी स्वतंत्र ‘टॉयलेट पॉलिसी’ तयार केली जात असून, त्यासाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांचे सर्वेक्षण अचूक आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने करण्यावर आयुक्तांनी भर दिला. जी स्वच्छतागृहे जीर्णावस्थेत आहेत किंवा नागरिकांच्या गरजांनुसार अपुरी ठरत आहेत, त्याठिकाणी आधुनिक सुविधा असलेली स्वच्छतागृहे उभारण्यावर भर देण्यास सांगण्यात आले. महिलांसाठी बसविण्यात आलेल्या सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशिन्स कार्यरत असल्याची नियमित खातरजमा करण्याचे आदेशही देण्यात आले. शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी प्रमुख रस्त्यांवरील दुभाजकांमध्ये आकर्षक आणि पर्यावरणपूरक वृक्ष लागवड करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. महापालिकेच्या मोकळ्या जागांवर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण मोहीम राबविण्यासाठी सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना, पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांचा सहभाग वाढविण्याचे आवाहन करण्यात आले. शक्य त्या ठिकाणी अशा जागांचा विकास करून मुलांसाठी खेळाची मैदाने, सार्वजनिक उद्याने किंवा नागरिकांसाठी खुल्या सुविधा निर्माण करण्यावर भर देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. येत्या पावसाळ्यात पाणी साचण्याची किंवा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असलेल्या संवेदनशील भागांमधील सीसीटीव्ही कॅमेरे सुस्थितीत आणि कार्यान्वित असल्याची खात्री करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने निर्णय घेण्यासाठी आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत असणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, आषाढीवारी पालखी सोहळा २०२६ च्या पार्श्वभूमीवर पालखी मार्गावरील सर्व अडथळे दूर करणे, अतिक्रमण हटविणे आणि रस्त्यांची दुरुस्ती करण्याच्या कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या. पालखी मार्गावरील खड्डे बुजविण्यात आल्याची खातरजमा करावी, तसेच दिंड्यांच्या मुक्काम आणि विसावा स्थळी २४ तास स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध राहील यासाठी आवश्यक व्यवस्था करण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले.

16 hrs ago
user_City Mirror News
City Mirror News
Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
16 hrs ago
1bb4ce7b-998d-4c10-96d6-ba4918f1a737

पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात १ जून २०२६ रोजी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहराच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक घेतली. या बैठकीत शहरातील नाले, रस्ते, सार्वजनिक सुविधा, स्वच्छता व्यवस्था, अतिक्रमण निर्मूलन, हॉकर्स व्यवस्थापन, स्वच्छतागृहांचे आधुनिकीकरण, वृक्षारोपण, पालखी सोहळ्याची तयारी आणि अग्निसुरक्षा यासह विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, अजय सुर्यवंशी, मनोज सेठिया, उप आयुक्त सचिन पवार, डॉ. प्रदीप ठेंगल, संदीप खोत, सीताराम बहुरे, राजेश आगळे, व्यंकटेश दुर्वास, सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे, अमित पंडीत, तानाजी नरळे, मुख्य उद्यान अधिक्षक महेश गारगोटे यांच्यासह क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे, अश्विनी गायकवाड, परशुराम वाघमोडे, अतुल पाटील, पुजा दुधनाळे आदींनी ऑनलाइन पद्धतीने उपस्थिती लावली. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शहरातील नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत राहील याची खात्री करण्यास सांगितले. ज्या ठिकाणी नाल्यांची कामे पूर्ण झाली आहेत, तेथील कामांची गुणवत्ता आणि परिणामकारकता संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तपासण्याचे निर्देश देण्यात आले. नाल्यांची रुंदी, खोली आणि पाणी वाहून नेण्याची क्षमता या बाबींचा विचार करून अहवाल सादर करण्याची सूचनाही त्यांनी केली. अतिक्रमण हटविल्यानंतर त्याच ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही, यासाठी क्षेत्रीय कार्यालयांनी सातत्याने निरीक्षण ठेवणे आवश्यक असून, फुटपाथ, मोकळ्या जागा तसेच महापालिकेच्या मालकीच्या जागांवर होणाऱ्या अतिक्रमणांवर नियमित कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. शहरातील फेरीवाल्यांसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय हॉकर्स झोन निश्चित करून त्यांना अधिकृत जागा उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेला गती देण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या, ज्यामुळे सार्वजनिक रस्ते, चौक आणि फुटपाथवरील अतिक्रमण कमी होऊन वाहतूक व्यवस्थेला मदत होईल असे त्यांनी नमूद केले. शहराला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी वारंवार कचरा टाकला जाणाऱ्या ठिकाणांची ओळख पटवून

870d28b5-655f-44de-bd47-82944dad393b

तेथे सुशोभीकरण, हरितीकरण किंवा वृक्षारोपण करण्याचे निर्देश देण्यात आले, जेणेकरून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण होऊन सार्वजनिक ठिकाणी कचरा साचण्याचे प्रमाण कमी होईल. अनधिकृत फ्लेक्स, बेकायदेशीर जाहिरात फलक आणि परवानगीविना उभारण्यात आलेल्या जाहिरातींवर सातत्याने लक्ष ठेवून नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. महापालिकेतर्फे शहरासाठी स्वतंत्र ‘टॉयलेट पॉलिसी’ तयार केली जात असून, त्यासाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांचे सर्वेक्षण अचूक आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने करण्यावर आयुक्तांनी भर दिला. जी स्वच्छतागृहे जीर्णावस्थेत आहेत किंवा नागरिकांच्या गरजांनुसार अपुरी ठरत आहेत, त्याठिकाणी आधुनिक सुविधा असलेली स्वच्छतागृहे उभारण्यावर भर देण्यास सांगण्यात आले. महिलांसाठी बसविण्यात आलेल्या सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशिन्स कार्यरत असल्याची नियमित खातरजमा करण्याचे आदेशही देण्यात आले. शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी प्रमुख रस्त्यांवरील दुभाजकांमध्ये आकर्षक आणि पर्यावरणपूरक वृक्ष लागवड करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. महापालिकेच्या मोकळ्या जागांवर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण मोहीम राबविण्यासाठी सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना, पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांचा सहभाग वाढविण्याचे आवाहन करण्यात आले. शक्य त्या ठिकाणी अशा जागांचा विकास करून मुलांसाठी खेळाची मैदाने, सार्वजनिक उद्याने किंवा नागरिकांसाठी खुल्या सुविधा निर्माण करण्यावर भर देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. येत्या पावसाळ्यात पाणी साचण्याची किंवा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असलेल्या संवेदनशील भागांमधील सीसीटीव्ही कॅमेरे सुस्थितीत आणि कार्यान्वित असल्याची खात्री करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने निर्णय घेण्यासाठी आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत असणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, आषाढीवारी पालखी सोहळा २०२६ च्या पार्श्वभूमीवर पालखी मार्गावरील सर्व अडथळे दूर करणे, अतिक्रमण हटविणे आणि रस्त्यांची दुरुस्ती करण्याच्या कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या. पालखी मार्गावरील खड्डे बुजविण्यात आल्याची खातरजमा करावी, तसेच दिंड्यांच्या मुक्काम आणि विसावा स्थळी २४ तास स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध राहील यासाठी आवश्यक व्यवस्था करण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पुणे विधान परिषद निवडणुकीत होणारी लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी नसेल. या निवडणुकीत मुख्य सामना महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातच पाहायला मिळेल.
    1
    पुणे विधान परिषद निवडणुकीत होणारी लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी नसेल. या निवडणुकीत मुख्य सामना महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातच पाहायला मिळेल.
    user_लोकमान्य टाइम्स
    लोकमान्य टाइम्स
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • केशव सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना वीज समस्येचा सामना करावा लागत आहे. या वीज समस्येमुळे शेतकरी सध्या त्रस्त आहेत.
    1
    केशव सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना वीज समस्येचा सामना करावा लागत आहे. या वीज समस्येमुळे शेतकरी सध्या त्रस्त आहेत.
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • पिंपरी-चिंचवड येथील भोसरी परिसरातून तृतीयपंथी समाजसेविका सोनी बाबू वाघमारे यांनी काही व्यक्तींविरोधात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत त्यांनी खंडणीची मागणी, मारहाण, जीवे मारण्याच्या धमक्या, बदनामी आणि मानसिक छळ अशा गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. तक्रारीनुसार, संबंधित व्यक्तींकडून वाघमारे यांच्याकडे वारंवार पैशांची मागणी करण्यात येत असून, ती पूर्ण न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशा धमक्या दिल्या जात आहेत. याशिवाय, तक्रारदार, त्यांच्या कुटुंबीयांना आणि शिष्यांना त्रास देणे, त्यांच्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये अडथळे निर्माण करणे आणि त्यांची बदनामी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. वाघमारे यांनी काही व्यक्तींची नावे नमूद करत त्यांच्याकडून संघटित पद्धतीने छळ केला जात असल्याचा दावा केला आहे. या प्रकारामुळे स्वतःच्या आणि कुटुंबीयांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचे सांगत, सोनी बाबू वाघमारे यांनी संबंधित व्यक्तींविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणात करण्यात आलेल्या आरोपांची पोलीस प्रशासनाकडून पडताळणी सुरू असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच यातील वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असे सांगण्यात आले आहे.
    1
    पिंपरी-चिंचवड येथील भोसरी परिसरातून तृतीयपंथी समाजसेविका सोनी बाबू वाघमारे यांनी काही व्यक्तींविरोधात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत त्यांनी खंडणीची मागणी, मारहाण, जीवे मारण्याच्या धमक्या, बदनामी आणि मानसिक छळ अशा गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.

तक्रारीनुसार, संबंधित व्यक्तींकडून वाघमारे यांच्याकडे वारंवार पैशांची मागणी करण्यात येत असून, ती पूर्ण न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशा धमक्या दिल्या जात आहेत. याशिवाय, तक्रारदार, त्यांच्या कुटुंबीयांना आणि शिष्यांना त्रास देणे, त्यांच्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये अडथळे निर्माण करणे आणि त्यांची बदनामी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. वाघमारे यांनी काही व्यक्तींची नावे नमूद करत त्यांच्याकडून संघटित पद्धतीने छळ केला जात असल्याचा दावा केला आहे.

या प्रकारामुळे स्वतःच्या आणि कुटुंबीयांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचे सांगत, सोनी बाबू वाघमारे यांनी संबंधित व्यक्तींविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणात करण्यात आलेल्या आरोपांची पोलीस प्रशासनाकडून पडताळणी सुरू असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच यातील वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असे सांगण्यात आले आहे.
    user_वरद महाराष्ट्र वार्ता
    वरद महाराष्ट्र वार्ता
    Local News Reporter पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • पिंपरी चिंचवडमधील म्हाळुंगे सावरदरी येथील 'टाईने रिबेल' या नव्याने स्थापन होत असलेल्या बीअर कंपनीतून ३६ लाख रुपये किमतीच्या १० बीअर स्टोअरेज टँकची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली होती. या गुन्ह्याचा उत्तर महाळुंगे एम.आय.डी.सी. पोलिसांनी यशस्वीरित्या छडा लावला असून, या प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, कंपनीच्या एका विश्वासू माजी कामगारानेच या चोरीचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे. फिर्यादी विवेक खैरे यांना सुमारे ४० दिवसांनंतर या चोरीची माहिती मिळाल्याने पोलिसांना तपासासाठी कोणताही थेट दुवा उपलब्ध नव्हता. मात्र, पोलीस पथकाने परिसरातील जवळपास ३० ते ३५ कंपन्यांचे ६०० GB पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासले. या फुटेजच्या आधारे संशयित क्रेन आणि ट्रकची ओळख पटवण्यात आली. तांत्रिक तपासानंतर पोलिसांनी कंपनीचा माजी कामगार प्रसाद विनोद राजळे याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणात मुख्य सूत्रधार प्रसाद राजळे याच्यासह चोरीला मदत करणारे आणि मुद्देमाल खरेदी करणारे चंदन अर्जुन सिंग, अली अहमद चौधरी, फिरोज असगर अली खान, किसनकुमार सुभाषचंद्र गुप्ता आणि नियाज मोहम्मद इसराईल यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून कुदळवाडी, चिखली आणि मुंब्रा येथून चोरीला गेलेल्या ३६ लाख रुपये किमतीच्या सर्व १० स्टील टाक्या यशस्वीरित्या जप्त केल्या आहेत.
    1
    पिंपरी चिंचवडमधील म्हाळुंगे सावरदरी येथील 'टाईने रिबेल' या नव्याने स्थापन होत असलेल्या बीअर कंपनीतून ३६ लाख रुपये किमतीच्या १० बीअर स्टोअरेज टँकची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली होती. या गुन्ह्याचा उत्तर महाळुंगे एम.आय.डी.सी. पोलिसांनी यशस्वीरित्या छडा लावला असून, या प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, कंपनीच्या एका विश्वासू माजी कामगारानेच या चोरीचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे.

फिर्यादी विवेक खैरे यांना सुमारे ४० दिवसांनंतर या चोरीची माहिती मिळाल्याने पोलिसांना तपासासाठी कोणताही थेट दुवा उपलब्ध नव्हता. मात्र, पोलीस पथकाने परिसरातील जवळपास ३० ते ३५ कंपन्यांचे ६०० GB पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासले. या फुटेजच्या आधारे संशयित क्रेन आणि ट्रकची ओळख पटवण्यात आली. तांत्रिक तपासानंतर पोलिसांनी कंपनीचा माजी कामगार प्रसाद विनोद राजळे याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणात मुख्य सूत्रधार प्रसाद राजळे याच्यासह चोरीला मदत करणारे आणि मुद्देमाल खरेदी करणारे चंदन अर्जुन सिंग, अली अहमद चौधरी, फिरोज असगर अली खान, किसनकुमार सुभाषचंद्र गुप्ता आणि नियाज मोहम्मद इसराईल यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी आरोपींकडून कुदळवाडी, चिखली आणि मुंब्रा येथून चोरीला गेलेल्या ३६ लाख रुपये किमतीच्या सर्व १० स्टील टाक्या यशस्वीरित्या जप्त केल्या आहेत.
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • ८९ टक्के दिव्यांग असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याला घराघरांत जाऊन जनगणनेचे काम करण्याचे आदेश देण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे नागरिकांमध्ये आणि सामाजिक संघटनांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे. या प्रकरणी सामाजिक संघटनांनी प्रशासनाला जाब विचारला असून त्यांच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
    1
    ८९ टक्के दिव्यांग असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याला घराघरांत जाऊन जनगणनेचे काम करण्याचे आदेश देण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे नागरिकांमध्ये आणि सामाजिक संघटनांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे. या प्रकरणी सामाजिक संघटनांनी प्रशासनाला जाब विचारला असून त्यांच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील सारोळा परिसरात एका भीषण अपघातात दोन महाविद्यालयीन तरुणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. कॉलेजमध्ये प्रवेशाची स्वप्ने उराशी बाळगून घराबाहेर पडलेले हे तरुण घरी परतलेच नाहीत. अवघ्या तीन दिवसांपूर्वी घेतलेल्या नव्या दुचाकीवरून कॉलेजचे ॲडमिशन करून परत येत असताना, अज्ञात वाहनाने धडक दिल्याने या दोन मित्रांना आपला जीव गमवावा लागला. सारोळा येथील या भीषण अपघातामुळे नायगाव आणि शिरवळ परिसरात शोककळा पसरली आहे.
    1
    पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील सारोळा परिसरात एका भीषण अपघातात दोन महाविद्यालयीन तरुणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. कॉलेजमध्ये प्रवेशाची स्वप्ने उराशी बाळगून घराबाहेर पडलेले हे तरुण घरी परतलेच नाहीत. अवघ्या तीन दिवसांपूर्वी घेतलेल्या नव्या दुचाकीवरून कॉलेजचे ॲडमिशन करून परत येत असताना, अज्ञात वाहनाने धडक दिल्याने या दोन मित्रांना आपला जीव गमवावा लागला.

सारोळा येथील या भीषण अपघातामुळे नायगाव आणि शिरवळ परिसरात शोककळा पसरली आहे.
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • शिरूर तालुक्यातील सरदवाडी येथील कर्डे घाट परिसरात सोमवारी सायंकाळी भररस्त्यात झालेल्या थरारक गोळीबार आणि हल्ल्यात शिरूर येथील विशाल काळे (वय ३०) याचा मृत्यू झाला असून, केदार झाडगे जखमी झाला आहे. या घटनेमुळे शिरूर परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना केली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरदवाडी गावच्या हद्दीत न्हावरा फाटा-न्हावरा मार्गावरील राजस्थान ढाब्यासमोर सायंकाळी पाचच्या सुमारास हा प्रकार घडला. विशाल काळे, उमेश अनिल जगदाळे (वय २६) आणि केदार झाडगे हे तिघे जण टोयोटा टायझर (एमएच १२ एक्सक्यू ५१०४) या कारमधून न्हावऱ्याकडून शिरूरकडे जात होते. त्यावेळी न्हावरा फाटा बाजूकडून आलेल्या किया सोनेट (एमएच १४ एलए ११२८) या कारने त्यांच्या वाहनाला धडक दिली. त्यानंतर सोनेटमधून उतरलेल्या चार ते पाच अज्ञात व्यक्तींनी टोयोटा कारच्या पुढील काचेवर चार राउंड गोळीबार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या हल्ल्यानंतर तिघेही कारमधून उतरून जीव वाचवण्यासाठी पळू लागले. त्याचवेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोन जणांपैकी रेकॉर्डवरील आरोपी सनी यादव आणि त्याच्या साथीदारांनी त्यांच्यावर पुन्हा गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनास्थळी विशाल काळे हा मृतावस्थेत आढळून आला, त्याच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर मोठ्या दगडाने मारहाण केल्याच्या गंभीर जखमा दिसून आल्या. मृतदेहाजवळ दोन रिकामी काडतुसे आणि काही मोठे दगड आढळले आहेत. केदार झाडगे याच्या कपाळाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर शिरूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर उमेश जगदाळे हा घटनेच्या वेळी घटनास्थळावरून पळून गेला होता; मात्र तो नंतर पोलिसांसमोर हजर झाला. घटनेनंतर आरोपी किया सोनेट कार आणि मोटारसायकलवरून पसार झाले. शिरूर पोलिसांची विविध पथके घटनास्थळी दाखल झाली असून फॉरेन्सिक तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले आहे. आरोपी सनी यादव आणि त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र तपास पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, मृत विशाल काळे तसेच संशयित आरोपी सनी यादव हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, या घटनेमागील नेमके कारण आणि पूर्ववैमनस्याचा तपास सुरू आहे. या निर्घृण हत्येमुळे शिरूर तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढविला आहे. तपासाच्या पुढील टप्प्यात या हल्ल्यामागील सूत्रधार आणि अन्य सहभागी आरोपींची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
    2
    शिरूर तालुक्यातील सरदवाडी येथील कर्डे घाट परिसरात सोमवारी सायंकाळी भररस्त्यात झालेल्या थरारक गोळीबार आणि हल्ल्यात शिरूर येथील विशाल काळे (वय ३०) याचा मृत्यू झाला असून, केदार झाडगे जखमी झाला आहे. या घटनेमुळे शिरूर परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना केली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरदवाडी गावच्या हद्दीत न्हावरा फाटा-न्हावरा मार्गावरील राजस्थान ढाब्यासमोर सायंकाळी पाचच्या सुमारास हा प्रकार घडला. विशाल काळे, उमेश अनिल जगदाळे (वय २६) आणि केदार झाडगे हे तिघे जण टोयोटा टायझर (एमएच १२ एक्सक्यू ५१०४) या कारमधून न्हावऱ्याकडून शिरूरकडे जात होते. त्यावेळी न्हावरा फाटा बाजूकडून आलेल्या किया सोनेट (एमएच १४ एलए ११२८) या कारने त्यांच्या वाहनाला धडक दिली. त्यानंतर सोनेटमधून उतरलेल्या चार ते पाच अज्ञात व्यक्तींनी टोयोटा कारच्या पुढील काचेवर चार राउंड गोळीबार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या हल्ल्यानंतर तिघेही कारमधून उतरून जीव वाचवण्यासाठी पळू लागले. त्याचवेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोन जणांपैकी रेकॉर्डवरील आरोपी सनी यादव आणि त्याच्या साथीदारांनी त्यांच्यावर पुन्हा गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

घटनास्थळी विशाल काळे हा मृतावस्थेत आढळून आला, त्याच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर मोठ्या दगडाने मारहाण केल्याच्या गंभीर जखमा दिसून आल्या. मृतदेहाजवळ दोन रिकामी काडतुसे आणि काही मोठे दगड आढळले आहेत. केदार झाडगे याच्या कपाळाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर शिरूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर उमेश जगदाळे हा घटनेच्या वेळी घटनास्थळावरून पळून गेला होता; मात्र तो नंतर पोलिसांसमोर हजर झाला. घटनेनंतर आरोपी किया सोनेट कार आणि मोटारसायकलवरून पसार झाले. शिरूर पोलिसांची विविध पथके घटनास्थळी दाखल झाली असून फॉरेन्सिक तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले आहे. आरोपी सनी यादव आणि त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र तपास पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, मृत विशाल काळे तसेच संशयित आरोपी सनी यादव हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, या घटनेमागील नेमके कारण आणि पूर्ववैमनस्याचा तपास सुरू आहे.

या निर्घृण हत्येमुळे शिरूर तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढविला आहे. तपासाच्या पुढील टप्प्यात या हल्ल्यामागील सूत्रधार आणि अन्य सहभागी आरोपींची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
    user_Satish Dhumal
    Satish Dhumal
    Media house शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • माजी अर्थमंत्री आणि आमदार जयंत पाटील यांनी 'लाडकी बहीण योजना' आणि 'जलजीवन मिशन योजना' या सरकारी योजनांवर तीव्र टीका केली आहे. त्यांच्या मते, या दोन्ही योजनांचा फोलपणा आता जनतेसमोर उघड झाला आहे.
    1
    माजी अर्थमंत्री आणि आमदार जयंत पाटील यांनी 'लाडकी बहीण योजना' आणि 'जलजीवन मिशन योजना' या सरकारी योजनांवर तीव्र टीका केली आहे. त्यांच्या मते, या दोन्ही योजनांचा फोलपणा आता जनतेसमोर उघड झाला आहे.
    user_लोकमान्य टाइम्स
    लोकमान्य टाइम्स
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    13 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.