logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

रावसाहेब देशमुख पतसंस्था दहा टक्के लाभांश देणार - तुकाराम सागडे राशीन वृत्तसेवा : अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन येथील रावसाहेब देशमुख नागरी सहकारी पतसंस्था सभासदांना दहा टक्के लाभांश वाटप करणार असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष तुकाराम सागडे यांनी केले . ते राशीन येथे रावसाहेब देशमुख पतसंस्थेच्या 37 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते . ते म्हणाले की , संस्थेचे संस्थापक माजी जिल्हा परिषद सदस्य विजयराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व के. रा . उर्फ बापूसाहेब देशमुख यांच्या आशीर्वादाने व आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय कैलासवासी रावसाहेब देशमुख यांच्या नावाने ही संस्था १९९० मध्ये ५२ हजार पाचशे रुपये भाग भांडवलावर सुरू करून ची आपल्या सर्वांचे सहकार्याने भरभराट होत आहे . एकतीस मार्च २०२६ अखेर संस्थेची सभासद संख्या चार हजार दहा आहे . हे संस्थेने सादर केलेल्या अर्थिक पत्रकावरून दिसून येते आहे . संस्थेचे वसुल भागभांडवल २ कोटी ७८ लाख ७९ हजार ७२२, निधी ५ कोटी ५४ लाख ४८ हजार ४३२ ठेवी १७३ कोटी २७ लाख ७६ हजार १२८ फक्त असून सुरक्षित गुंतवणूक रु ५८ कोटी २७ लाख १९ हजार ३३५ .०० कर्जवाटप ११२ कोटी ६२ लाख ५९ हजार ७२६ झालेले आहे. संस्थेस सन २०२५-२६ या अर्थिक वर्षात रु १ कोटी ४५ हजार ३५६.०० नफा झालेला आहे. संस्थेवर असलेल्या विश्वासामुळे दिवसें दिवस संस्थेच्या ठेवी वाढत आहेत. संस्था सभासदांच्या हिताच्या दृष्टीने वाहन तारण कर्ज , घर बांधणी कर्ज द.सा.द.शे ११ टक्के व्याज दराने देत आहे.स्थावर तारण कर्ज (गृह बांधणी/बिगरशेती प्लॉट खरेदी कर्ज) - सदर कर्ज हे राशीन, कर्जत, मिरजगाव या गावांमध्ये देण्यात येते. रू २० लाख व त्यापेक्षा जादा हायपोथिकेशन कॅशक्रेडीट कर्ज, कॅशक्रेडीट कर्ज, घेणा-या व कर्जाचे व्याज दर तीन महीन्यांनी नावे टाकलेल्या तारखेपासून दि १ ते १० तारखेपर्यंत भरल्यास व कर्ज दिल्यापासून एक वर्षाच्या आत संपूर्ण कर्ज भरल्यास अगर व्याजाची रक्कम भरून कर्ज रिन्युअल केल्यास व्याज दरात २ % रिबेट दिला जातो . व रिबेटची रक्कम कर्ज खाते मध्यवर्ग केली जाते . संस्था इतर बँक प्रमाणे कर्जावर कुठलेही छुपे चार्जेस आकारत नाही . वरील कर्ज हे विना विलंब त्वरित मिळेल तेव्हा कर्जत तालुक्यातील ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे सांगितले . संस्थेच्या वतीनेशाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने संस्थेच्या वतीने दरवर्षी इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत प्रथम तीन क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येते . तसेच ईद निमित्त कर्जत , मिरजगाव , राशीन येथील मुस्लिम बांधवांना फळांचे वाटप केले जाते . त्याचप्रमाणे गावांमध्ये होणारे अखंड हरिनाम सप्ताह सहकार्य केले जाते . तसेच १५ ऑगस्ट २६ जानेवारी या राष्ट्रीय सणानिमित्त विद्यार्थ्यांना अल्पउपहाराचे वाटप केले जाते .संस्थेने सभासद , बिगर सभासद यांच्या सोयीसाठी राशीन , मिरजगाव , कर्जत या शाखांमध्ये 365 दिवस सोनेतारण कर्ज सुविधा उपलब्ध केली आहे . तसेच व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी अल्प कमिशन मध्ये देशात कोठेही आरटीजीएस व एनईएफटी सुविधा त्याचप्रमाणे ड्राफ्टची सुविधा उपलब्ध केलेली आहे . सन 2025- 26 सहकारी वर्षाचे शासकीय लेखापरीक्षण में निलेश आर .मुथा अँड कंपनी चार्टर्ड अकाउंटं अहमदनगर यांनी पूर्ण केले असून त्यांनी संस्थेत ऑडिट 'अ' वर्ग दिला आहे .संस्थेचे सर्व भागधारक ठेवीदार कर्जदार खातेदार हितचिंतक यांच्या सहकाऱ्यांच्या बळावर संस्थेची प्रगती कडे वाटचाल चालू आहे असे सांगितले . यावेळी संस्थेच्या वतीने सर्वांना स्नेह भोजनाच्या आयोजन करण्यात आले होते .

1 hr ago
user_राशीन - कर्जत एक्स्प्रेस
राशीन - कर्जत एक्स्प्रेस
कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
1 hr ago
0a1be6d0-9560-4b33-bc34-95431d6722dd

रावसाहेब देशमुख पतसंस्था दहा टक्के लाभांश देणार - तुकाराम सागडे राशीन वृत्तसेवा : अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन येथील रावसाहेब देशमुख नागरी सहकारी पतसंस्था सभासदांना दहा टक्के लाभांश वाटप करणार असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष तुकाराम सागडे यांनी केले . ते राशीन येथे रावसाहेब देशमुख पतसंस्थेच्या 37 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते . ते म्हणाले की , संस्थेचे संस्थापक माजी जिल्हा परिषद सदस्य विजयराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व के. रा . उर्फ बापूसाहेब देशमुख यांच्या आशीर्वादाने व आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय कैलासवासी रावसाहेब देशमुख यांच्या नावाने ही संस्था १९९० मध्ये ५२ हजार पाचशे रुपये भाग भांडवलावर सुरू करून ची आपल्या सर्वांचे सहकार्याने भरभराट होत आहे . एकतीस मार्च २०२६ अखेर संस्थेची सभासद संख्या चार हजार दहा आहे . हे संस्थेने सादर केलेल्या अर्थिक पत्रकावरून दिसून येते आहे . संस्थेचे वसुल भागभांडवल २ कोटी ७८ लाख ७९ हजार ७२२, निधी ५ कोटी ५४ लाख ४८ हजार ४३२ ठेवी १७३ कोटी २७ लाख ७६ हजार १२८ फक्त असून सुरक्षित गुंतवणूक रु ५८ कोटी २७ लाख १९ हजार ३३५ .०० कर्जवाटप ११२ कोटी ६२ लाख ५९ हजार ७२६ झालेले आहे. संस्थेस सन २०२५-२६ या अर्थिक वर्षात रु १ कोटी ४५ हजार ३५६.०० नफा झालेला आहे. संस्थेवर असलेल्या विश्वासामुळे दिवसें दिवस संस्थेच्या ठेवी वाढत आहेत. संस्था सभासदांच्या हिताच्या दृष्टीने वाहन तारण कर्ज , घर बांधणी कर्ज द.सा.द.शे ११ टक्के व्याज दराने देत आहे.स्थावर तारण कर्ज (गृह बांधणी/बिगरशेती प्लॉट खरेदी कर्ज) - सदर कर्ज हे राशीन, कर्जत, मिरजगाव या गावांमध्ये देण्यात येते. रू २० लाख व त्यापेक्षा जादा हायपोथिकेशन कॅशक्रेडीट कर्ज, कॅशक्रेडीट कर्ज, घेणा-या व कर्जाचे व्याज दर तीन महीन्यांनी नावे टाकलेल्या तारखेपासून दि १ ते १० तारखेपर्यंत भरल्यास व कर्ज दिल्यापासून एक वर्षाच्या आत संपूर्ण कर्ज भरल्यास अगर व्याजाची रक्कम भरून कर्ज रिन्युअल केल्यास व्याज दरात २ % रिबेट दिला जातो . व रिबेटची रक्कम कर्ज खाते मध्यवर्ग केली जाते . संस्था इतर बँक प्रमाणे कर्जावर कुठलेही छुपे चार्जेस आकारत नाही . वरील कर्ज हे विना विलंब त्वरित मिळेल तेव्हा कर्जत तालुक्यातील ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे सांगितले . संस्थेच्या वतीनेशाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने संस्थेच्या वतीने दरवर्षी इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत प्रथम तीन क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येते . तसेच ईद निमित्त कर्जत , मिरजगाव , राशीन येथील मुस्लिम बांधवांना फळांचे वाटप केले जाते . त्याचप्रमाणे गावांमध्ये होणारे अखंड हरिनाम सप्ताह सहकार्य केले जाते . तसेच १५ ऑगस्ट २६ जानेवारी या राष्ट्रीय सणानिमित्त विद्यार्थ्यांना अल्पउपहाराचे वाटप केले जाते .संस्थेने सभासद , बिगर सभासद यांच्या सोयीसाठी राशीन , मिरजगाव , कर्जत या शाखांमध्ये 365 दिवस सोनेतारण कर्ज सुविधा उपलब्ध केली आहे . तसेच व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी अल्प कमिशन मध्ये देशात कोठेही आरटीजीएस व एनईएफटी सुविधा त्याचप्रमाणे ड्राफ्टची सुविधा उपलब्ध केलेली आहे . सन 2025- 26 सहकारी वर्षाचे शासकीय लेखापरीक्षण में निलेश आर .मुथा अँड कंपनी चार्टर्ड अकाउंटं अहमदनगर यांनी पूर्ण केले असून त्यांनी संस्थेत ऑडिट 'अ' वर्ग दिला आहे .संस्थेचे सर्व भागधारक ठेवीदार कर्जदार खातेदार हितचिंतक यांच्या सहकाऱ्यांच्या बळावर संस्थेची प्रगती कडे वाटचाल चालू आहे असे सांगितले . यावेळी संस्थेच्या वतीने सर्वांना स्नेह भोजनाच्या आयोजन करण्यात आले होते .

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • कर्जत तालुक्यात अंगणवाडी विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचे धान्य निकृष्ट
    1
    कर्जत तालुक्यात अंगणवाडी विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचे धान्य निकृष्ट
    user_कर्जत लाईव्ह
    कर्जत लाईव्ह
    Advertising agency कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • नेपाळ मधील आलेल्या महापुरामुळे झालेली विध्वसक दृश्याचा व्हिडीओ
    1
    नेपाळ मधील आलेल्या महापुरामुळे झालेली विध्वसक दृश्याचा व्हिडीओ
    user_Shoukat  Shaikh
    Shoukat Shaikh
    बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    21 min ago
  • बारामती गुन्हेगारी वाढलेली आहे या प्रश्नावर उपविभागीय पोलीस अधिकारी यांचा उत्तर
    1
    बारामती गुन्हेगारी वाढलेली आहे या प्रश्नावर उपविभागीय पोलीस अधिकारी यांचा उत्तर
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • इन्स्टाग्राम रीलसाठी पिस्तूलचा धाक; बाबुर्डी येथील तरुणावर सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा इन्स्टाग्रामवरील ‘आभासी भाईगिरी’ पडली महागात; सुपा पोलिसांची तरुणावर शस्त्रास्त्र कायद्यान्वये कारवाई सुपा, बारामती | इन्स्टाग्रामवर रील बनवताना पिस्तूल सदृश्य वस्तू हातात घेऊन प्रक्षोभक आणि धमकीवजा मजकूर पोस्ट करणाऱ्या तरुणावर सुपा पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. सुपा पोलिसांच्या सायबर मॉनिटरिंग पथकाच्या निदर्शनास २४ ऑगस्ट रोजी "prem_jagtap_0295" या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ प्रसारित झाल्याचे आढळले. या व्हिडिओमध्ये बाबुर्डी, ता. बारामती येथील प्रेम प्रताप जगताप याने पिस्तूल सदृश्य वस्तू हातात घेतल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या व्हिडिओवर “आलीशान युवा प्रतिष्ठान” असा मजकूर तसेच “शांत है इसका मतलब ये नही की हम संत है..! जंगल अपना है, और कानुन भी अपना है” अशा स्वरूपाचा प्रक्षोभक मजकूर वापरण्यात आल्याचे पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा पोलिसांचा आरोप आहे. या प्रकरणी सुपा पोलिसांनी स्वतःहून फिर्याद दाखल करून संबंधित तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३५१(२)(३), २२३, भारतीय शस्त्र कायदा कलम ३(२५), तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) व १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार रुपेश साळुंके करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांच्या पथकाने केली. पोलिसांनी सोशल मीडिया वापरणाऱ्या तरुणांना स्पष्ट इशारा दिला आहे—रीलच्या माध्यमातून शस्त्रांचे प्रदर्शन करून किंवा दहशत निर्माण करणारा आशय प्रसारित करून कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. ‘रीलसाठी रिअल लाईफ धोक्यात घालू नका’, असा संदेश सुपा पोलिसांनी दिला आहे. AP CRIME NEWS LIVE — जनहितासाठी निर्भीड बातमी, लोकजागृतीसाठी सदैव पुढे.
    1
    इन्स्टाग्राम रीलसाठी पिस्तूलचा धाक; बाबुर्डी येथील तरुणावर सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा
इन्स्टाग्रामवरील ‘आभासी भाईगिरी’ पडली महागात; सुपा पोलिसांची तरुणावर शस्त्रास्त्र कायद्यान्वये कारवाई
सुपा, बारामती | 
इन्स्टाग्रामवर रील बनवताना पिस्तूल सदृश्य वस्तू हातात घेऊन प्रक्षोभक आणि धमकीवजा मजकूर पोस्ट करणाऱ्या तरुणावर सुपा पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे.
सुपा पोलिसांच्या सायबर मॉनिटरिंग पथकाच्या निदर्शनास २४ ऑगस्ट रोजी "prem_jagtap_0295" या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ प्रसारित झाल्याचे आढळले. या व्हिडिओमध्ये बाबुर्डी, ता. बारामती येथील प्रेम प्रताप जगताप याने पिस्तूल सदृश्य वस्तू हातात घेतल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या व्हिडिओवर “आलीशान युवा प्रतिष्ठान” असा मजकूर तसेच “शांत है इसका मतलब ये नही की हम संत है..! जंगल अपना है, और कानुन भी अपना है” अशा स्वरूपाचा प्रक्षोभक मजकूर वापरण्यात आल्याचे पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
या प्रकरणी सुपा पोलिसांनी स्वतःहून फिर्याद दाखल करून संबंधित तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३५१(२)(३), २२३, भारतीय शस्त्र कायदा कलम ३(२५), तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) व १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार रुपेश साळुंके करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांच्या पथकाने केली.
पोलिसांनी सोशल मीडिया वापरणाऱ्या तरुणांना स्पष्ट इशारा दिला आहे—रीलच्या माध्यमातून शस्त्रांचे प्रदर्शन करून किंवा दहशत निर्माण करणारा आशय प्रसारित करून कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
‘रीलसाठी रिअल लाईफ धोक्यात घालू नका’, असा संदेश सुपा पोलिसांनी दिला आहे.
AP CRIME NEWS LIVE — जनहितासाठी निर्भीड बातमी, लोकजागृतीसाठी सदैव पुढे.
    user_Apcrimenewslive
    Apcrimenewslive
    Baramati, Pune•
    6 hrs ago
  • 🚨 BARAMATI CRIME : “जंगल अपना, कानून भी अपना…!” हातात पिस्तुलसदृश्य वस्तू घेवून रिल बनवणं पडलं महागात; सुपे पोलिसांनी ठोकल्या बेड्या..! 🚨 BARAMATI CRIME : “जंगल अपना, कानून भी अपना…!” हातात पिस्तुलसदृश्य वस्तू घेवून रिल बनवणं पडलं महागात; सुपे पोलिसांनी ठोकल्या बेड्या..! बारामती : लाईक्स, व्ह्यूज आणि फॉलोअर्सच्या नादात हातात पिस्तूलसदृश वस्तू घेऊन धमकीवजा रील बनवणं तरुणाला चांगलंच महागात पडलं..! बारामती तालुक्यातील सुपे पोलिसांच्या सायबर मॉनिटरिंग पथकाच्या निदर्शनास रील येताच प्रेम प्रताप जगताप या तरुणाविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यासह विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आलीय..
    1
    🚨 BARAMATI CRIME :  “जंगल अपना, कानून भी अपना…!”  हातात पिस्तुलसदृश्य वस्तू घेवून रिल बनवणं पडलं महागात; सुपे पोलिसांनी ठोकल्या बेड्या..! 

🚨 BARAMATI CRIME :  “जंगल अपना, कानून भी अपना…!”  हातात पिस्तुलसदृश्य वस्तू घेवून रिल बनवणं पडलं महागात; सुपे पोलिसांनी ठोकल्या बेड्या..! 
बारामती : लाईक्स, व्ह्यूज आणि फॉलोअर्सच्या नादात हातात पिस्तूलसदृश वस्तू घेऊन धमकीवजा रील बनवणं तरुणाला चांगलंच महागात पडलं..! बारामती तालुक्यातील सुपे पोलिसांच्या सायबर मॉनिटरिंग पथकाच्या निदर्शनास रील येताच प्रेम प्रताप जगताप या तरुणाविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यासह विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आलीय..
    user_News Katta Live
    News Katta Live
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • * ऑัगस्टला शिरूरमध्े मोफत महाआरोग्य शिबिर; हजरतमोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त खिदमत फाउंडेशनचा उपक्रम;मोतीबिंद्ू तपासणी व शस्रक्रियेसह विविध आरोग्य तपासणयांचीसुविधा.. शिरूर, संपूर्ण जगाला शांती, एकता आणि बंधुभावाचा संदेश देणारे हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त खिदमत फाउंडेशन, शिरूर यांच्या वतीने वर्ष ६ वे मोफत महाआरोग्य शिबिर तसेच मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत शिरूर नगरपालिका मंगल कार्यालयात हे शिबिर होणार आहे. या शिबिराचे उद्घाटन दानशूर उद्योगपती तथा चेअरमन, माणिकचंद उद्योग समूह, प्रकाशशेठ रसिकलालजी धारीवाल (मा. सभागृह नेते, शिरूर नगरपालिका) यांच्या हस्ते होणार आहे. शिबिरात मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया, ई.सी.जी., रक्तदाब, शुगर, त्वचारोग, गर्भधारणा व प्रसूतीसंबंधी मार्गदर्शन, शरीरावरील गाठींची तपासणी, बालरोग, दंतरोग, जनरल हेल्थ चेकअप, कान-नाक-घसा, मुळव्याध, हाडांची तपासणी, स्त्रीरोग, पंचकर्म तसेच पक्षाघात (पॅरॅलिसिस) आदी विविध तपासण्या करण्यात येणार आहेत. गरजू रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार असून, त्यासाठी दर्शा फ्रीडम फाउंडेशन, राजगुरुनगर यांचे सौजन्य लाभले आहे. तसेच डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटर, पिंपरी, पुणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. शिरूरमधील विविध नामांकित वैद्यकीय संस्थांसह तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग या शिबिरात राहणार आहे. मातोश्री मदनबाई धारीवाल हॉस्पिटल, सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी, श्री गणेशा हॉस्पिटल, वेदांता क्रिटीकेअर हॉस्पिटल, मिरा नर्सिंग होम, सुखायु हॉस्पिटल, डॉ. नीरज शहा संचालित रुबी हॉल क्लिनिक, शिरूर यांच्यासह विविध वैद्यकीय संस्थांचा सहभाग राहणार आहे. मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमास अमोल कोल्हे, शिवाजीराव आढळराव पाटील, ज्ञानेश्वर उर्फ माऊली (आबा) कटके, अशोकबापू रावसाहेबदादा पवार, ऐश्वर्याताई अभिजीत पाचर्णे, स्वातीताई विठ्ठलशेठ घावटे, राजेंद्र गावडे, प्रितम पाटील, बाळासाहेब म्हस्के, मितेश गादिया, विनोद पाटील, राहुलदादा पाचर्णे, नितीनदादा पाचर्णे, जाकिरखान पठाण, रविंद्रजी धनक, धर्मेंद्र खांडरे, नसीम खान यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, सर्वपक्षीय पदाधिकारी, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. “गरजू नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याचा प्रयत्न” — अध्यक्ष: हाजी आसिफभाई शेख खिदमत फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी आसिफ हाजी अ. हमिद शेख (साई पान) म्हणाले, “हजरत मोहम्मद पैगंबर यांनी संपूर्ण मानवजातीला शांती, एकता, बंधुभाव आणि माणुसकीचा संदेश दिला. त्याच विचारांना अनुसरून जयंतीनिमित्त समाजातील गरजू नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आर्थिक परिस्थितीमुळे अनेक नागरिक आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष करतात. अशा नागरिकांना या शिबिराच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व योग्य मार्गदर्शन मिळावे, हा आमचा मुख्य उद्देश आहे. नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा.” “एकाच ठिकाणी विविध आरोग्य तपासण्यांची सुविधा” — सचिव: हाजी मुस्ताकभाई शेख फाउंडेशनचे सचिव हाजी मुस्ताक हाजी उस्मान शेख म्हणाले, “या शिबिरात मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रियेसह विविध आजारांची तपासणी, ई.सी.जी., रक्तदाब, शुगर, डोळे, दात, हाडे, स्त्रीरोग, बालरोग, कान-नाक-घसा आणि इतर आरोग्य तपासण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गरजू रुग्णांना मोफत चष्मेही देण्यात येणार आहेत. शिरूर शहर व परिसरातील नागरिकांसाठी ही आरोग्यसेवेची मोठी संधी असून, कोणत्याही नागरिकाने ही संधी दवडू नये. जास्तीत जास्त नागरिकांनी शिबिरात सहभागी व्हावे.” खिदमत फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी आसिफ हाजी अ. हमिद शेख, उपाध्यक्ष हाजी फारुक रज्जाकभाई बागवान, सदस्य हाजी फिरोज अब्दुल गफुर बागवान, सचिव हाजी मुस्ताक हाजी उस्मान शेख तसेच मतिन शेख, हुसैन पठाण, शोऐब बागवान, हाजी मुन्नाभाई शेख, अलि पठाण, मन्सुर खान, आवेज शेख, जैद शेख, जैद बागवान, फिरोज शहा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते शिबिराच्या आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत. विनोद प्रकाश भालेराव यांचे विशेष सहकार्य लाभले असून, रुग्णांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था शिबिरासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे शिरूर शहर व परिसरातील नागरिकांनी शनिवार, दि. २९ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत शिरूर नगरपालिका मंगल कार्यालयात उपस्थित राहून मोफत आरोग्यसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन खिदमत फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. > *विशेष चौकट* > > *खिदमत फाउंडेशन, शिरूर* > > *अध्यक्ष : हाजी आसिफ हाजी अ. हमिद शेख (साई पान)*
    1
    * ऑัगस्टला शिरूरमध्े मोफत महाआरोग्य शिबिर; हजरतमोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त खिदमत फाउंडेशनचा उपक्रम;मोतीबिंद्ू तपासणी व शस्रक्रियेसह विविध आरोग्य तपासणयांचीसुविधा..
शिरूर, संपूर्ण जगाला शांती, एकता आणि बंधुभावाचा संदेश देणारे हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त खिदमत फाउंडेशन, शिरूर यांच्या वतीने वर्ष ६ वे  मोफत महाआरोग्य शिबिर तसेच मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत शिरूर नगरपालिका मंगल कार्यालयात हे शिबिर होणार आहे. या शिबिराचे उद्घाटन दानशूर उद्योगपती तथा चेअरमन, माणिकचंद उद्योग समूह, प्रकाशशेठ रसिकलालजी धारीवाल (मा. सभागृह नेते, शिरूर नगरपालिका) यांच्या हस्ते होणार आहे.
शिबिरात मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया, ई.सी.जी., रक्तदाब, शुगर, त्वचारोग, गर्भधारणा व प्रसूतीसंबंधी मार्गदर्शन, शरीरावरील गाठींची तपासणी, बालरोग, दंतरोग, जनरल हेल्थ चेकअप, कान-नाक-घसा, मुळव्याध, हाडांची तपासणी, स्त्रीरोग, पंचकर्म तसेच पक्षाघात (पॅरॅलिसिस) आदी विविध तपासण्या करण्यात येणार आहेत.
गरजू रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार असून, त्यासाठी दर्शा फ्रीडम फाउंडेशन, राजगुरुनगर यांचे सौजन्य लाभले आहे. तसेच डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटर, पिंपरी, पुणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
शिरूरमधील विविध नामांकित वैद्यकीय संस्थांसह तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग या शिबिरात राहणार आहे. मातोश्री मदनबाई धारीवाल हॉस्पिटल, सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी, श्री गणेशा हॉस्पिटल, वेदांता क्रिटीकेअर हॉस्पिटल, मिरा नर्सिंग होम, सुखायु हॉस्पिटल, डॉ. नीरज शहा संचालित रुबी हॉल क्लिनिक, शिरूर यांच्यासह विविध वैद्यकीय संस्थांचा सहभाग राहणार आहे.
मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमास अमोल कोल्हे,  शिवाजीराव आढळराव पाटील, ज्ञानेश्वर उर्फ माऊली (आबा) कटके, अशोकबापू रावसाहेबदादा पवार,  ऐश्वर्याताई अभिजीत पाचर्णे,  स्वातीताई विठ्ठलशेठ घावटे,  राजेंद्र गावडे,  प्रितम पाटील,  बाळासाहेब म्हस्के,  मितेश गादिया, विनोद पाटील, राहुलदादा पाचर्णे,  नितीनदादा पाचर्णे, जाकिरखान पठाण, रविंद्रजी धनक, धर्मेंद्र खांडरे, नसीम खान यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, सर्वपक्षीय पदाधिकारी, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
“गरजू नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याचा प्रयत्न” — अध्यक्ष: हाजी आसिफभाई शेख
खिदमत फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी आसिफ हाजी अ. हमिद शेख (साई पान) म्हणाले, “हजरत मोहम्मद पैगंबर यांनी संपूर्ण मानवजातीला शांती, एकता, बंधुभाव आणि माणुसकीचा संदेश दिला. त्याच विचारांना अनुसरून जयंतीनिमित्त समाजातील गरजू नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आर्थिक परिस्थितीमुळे अनेक नागरिक आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष करतात. अशा नागरिकांना या शिबिराच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व योग्य मार्गदर्शन मिळावे, हा आमचा मुख्य उद्देश आहे. नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा.”
“एकाच ठिकाणी विविध आरोग्य तपासण्यांची सुविधा” — सचिव: हाजी मुस्ताकभाई शेख
फाउंडेशनचे सचिव हाजी मुस्ताक हाजी उस्मान शेख म्हणाले, “या शिबिरात मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रियेसह विविध आजारांची तपासणी, ई.सी.जी., रक्तदाब, शुगर, डोळे, दात, हाडे, स्त्रीरोग, बालरोग, कान-नाक-घसा आणि इतर आरोग्य तपासण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गरजू रुग्णांना मोफत चष्मेही देण्यात येणार आहेत. शिरूर शहर व परिसरातील नागरिकांसाठी ही आरोग्यसेवेची मोठी संधी असून, कोणत्याही नागरिकाने ही संधी दवडू नये. जास्तीत जास्त नागरिकांनी शिबिरात सहभागी व्हावे.”
खिदमत फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी आसिफ हाजी अ. हमिद शेख, उपाध्यक्ष हाजी फारुक रज्जाकभाई बागवान, सदस्य हाजी फिरोज अब्दुल गफुर बागवान, सचिव हाजी मुस्ताक हाजी उस्मान शेख तसेच मतिन शेख, हुसैन पठाण, शोऐब बागवान, हाजी मुन्नाभाई शेख, अलि पठाण, मन्सुर खान, आवेज शेख, जैद शेख, जैद बागवान, फिरोज शहा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते शिबिराच्या आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत.
विनोद प्रकाश भालेराव यांचे विशेष सहकार्य लाभले असून, रुग्णांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था शिबिरासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे शिरूर शहर व परिसरातील नागरिकांनी शनिवार, दि. २९ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत शिरूर नगरपालिका मंगल कार्यालयात उपस्थित राहून मोफत आरोग्यसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन खिदमत फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
> *विशेष चौकट*
>
> *खिदमत फाउंडेशन, शिरूर*
>
> *अध्यक्ष : हाजी आसिफ हाजी अ. हमिद शेख (साई पान)*
    user_पत्रकार . शाबान शाह
    पत्रकार . शाबान शाह
    Social worker शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • ‘विकृत, विक्षिप्त’ म्हणविलेल्या आरोपांवरून सारिका चंद्रकांत नागरे यांच्या विरोधात जनशक्ती एकवटली शिरूर : स्वतःला समाजसेविका म्हणून पुढे करणाऱ्या सारिका चंद्रकांत नागरे यांच्या कथित कार्यपद्धतीविरोधात नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून, त्यांच्या विरोधात जनशक्ती एकवटत असल्याचे चित्र आहे. नागरे यांच्या संदर्भात विविध आरोप व तक्रारी पुढे येत असून, या सर्व बाबींची प्रशासनाने निष्पक्षपणे चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. समाजसेवेच्या नावाखाली कोणतेही गैरप्रकार होत असतील किंवा सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय होत असेल, तर त्याची सत्यता अधिकृत चौकशीतून समोर आणणे आवश्यक असल्याची भूमिका नागरिकांनी घेतली आहे. संबंधित प्रकरणातील कागदपत्रे, पुरावे आणि तक्रारींची सखोल तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, नागरे यांच्या विरोधातील कथित आरोपांमुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून, नागरिकांमध्येही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता पारदर्शक चौकशी करून दोष आढळल्यास कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. ‘समाजसेवेच्या नावाखाली गैरप्रकारांना थारा नको; सत्य काय आहे हे निष्पक्ष चौकशीतून समोर आले पाहिजे,’ अशी भूमिका नागरिकांकडून व्यक्त होत असून, आता प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    1
    ‘विकृत, विक्षिप्त’ म्हणविलेल्या आरोपांवरून सारिका चंद्रकांत नागरे यांच्या विरोधात जनशक्ती एकवटली

शिरूर : स्वतःला समाजसेविका म्हणून पुढे करणाऱ्या सारिका चंद्रकांत नागरे यांच्या कथित कार्यपद्धतीविरोधात नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून, त्यांच्या विरोधात जनशक्ती एकवटत असल्याचे चित्र आहे. नागरे यांच्या संदर्भात विविध आरोप व तक्रारी पुढे येत असून, या सर्व बाबींची प्रशासनाने निष्पक्षपणे चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
समाजसेवेच्या नावाखाली कोणतेही गैरप्रकार होत असतील किंवा सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय होत असेल, तर त्याची सत्यता अधिकृत चौकशीतून समोर आणणे आवश्यक असल्याची भूमिका नागरिकांनी घेतली आहे. संबंधित प्रकरणातील कागदपत्रे, पुरावे आणि तक्रारींची सखोल तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, नागरे यांच्या विरोधातील कथित आरोपांमुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून, नागरिकांमध्येही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता पारदर्शक चौकशी करून दोष आढळल्यास कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
‘समाजसेवेच्या नावाखाली गैरप्रकारांना थारा नको; सत्य काय आहे हे निष्पक्ष चौकशीतून समोर आले पाहिजे,’ अशी भूमिका नागरिकांकडून व्यक्त होत असून, आता प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    user_Rajendra kulthe
    Rajendra kulthe
    Social worker शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • पालखी महामार्गाचे अपूर्ण काम दाखवून कोट्यवधींची बिले काढली; मंत्र्यांच्या नावाने धमकावल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे...
    1
    पालखी महामार्गाचे अपूर्ण काम दाखवून कोट्यवधींची बिले काढली; मंत्र्यांच्या नावाने धमकावल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे...
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.