Shuru
Apke Nagar Ki App…
जय लक्ष्मी कंपनीने सिल्लोडच्या राजनगाव येथील म्हारोळा रोडवरील महार हडूळे अवैधपणे खोदून मुरुमाची वाहतूक सुरू केली आहे. हा प्रकार दिवसाढवळ्या सुरू असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
अरबाज शेख. शुरु रिपोर्टर
जय लक्ष्मी कंपनीने सिल्लोडच्या राजनगाव येथील म्हारोळा रोडवरील महार हडूळे अवैधपणे खोदून मुरुमाची वाहतूक सुरू केली आहे. हा प्रकार दिवसाढवळ्या सुरू असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
More news from Sillod and nearby areas
- जय लक्ष्मी कंपनीने सिल्लोडच्या राजनगाव येथील म्हारोळा रोडवरील महार हडूळे अवैधपणे खोदून मुरुमाची वाहतूक सुरू केली आहे. हा प्रकार दिवसाढवळ्या सुरू असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.1
- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात विहिरीची मोटर दुरुस्त करताना वडील आणि त्यांच्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. धानोरा येथे घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे.1
- जालना येथे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी काळी शाई आणि ऑइल फेकले. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर चौफुली परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत हा निषेध नोंदवला.1
- वाळूज पोलीस स्टेशनजवळ भीषण अपघात; महिला जखमी... वाळूज पोलीस स्टेशनजवळ भीषण अपघात; महिला जखमी कमलापूर कमानीकडे जाणाऱ्या रस्त्यावर, वाळूज पोलीस स्टेशन जवळ भीषण अपघात झाला. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली असून अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.1
- १२६२ किलो कांदा विकूनही शेतकऱ्याच्या हातात कवडी नाही; उलट अडत्यालाच द्यावा लागला १ रुपया छत्रपती संभाजीनगर पैठण: लाखो रुपये खर्च करून, उसनेवारी आणि कर्ज काढून पिकवलेल्या कांद्याला बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे. पैठण तालुक्यातील वरुडी गावातील कांदा उत्पादक शेतकरी प्रकाश गलधर यांनी तब्बल तीन महिने मेहनत घेऊन तयार केलेला १२६२ किलो कांदा बाजारात विक्रीसाठी नेला. मात्र बाजारात कांद्याला मिळालेल्या अत्यल्प दरामुळे हमाली, तोलाई आणि गोणी खर्च वजा जाता त्यांच्या हातात एकही रुपया उरला नाही. उलट अडत्याला १ रुपया द्यावा लागल्याची धक्कादायक परिस्थिती समोर आली आहे. कांदा उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी सातबारावर कर्ज काढले, तर काहींनी उसनेवारी करून पैसे उभे केले होते. मात्र बाजारातील पडलेल्या दरामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. सरकारी अधिकारी पंचनामे करून फोटो काढून गेले, पण प्रत्यक्ष मदत कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. कांद्याला हमीभाव द्यावा आणि शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.1
- जालना जिल्ह्यातील मामादेवी मस्तागडावर जागेच्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. तक्रारदाराची जागा इतरांना विकल्याच्या कारणावरून हा वाद पेटला होता. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.1
- महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण ('अ ब क ड') च्या मागणीसाठी मातंग समाजाने छत्रपती संभाजीनगर येथे भव्य मोर्चा काढला. हजारो समाजबांधव रस्त्यावर उतरले होते, त्यांनी आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवल्या.1
- हरियाणामुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी आज पश्चिम बंगालला भेट दिली. यावेळी त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या भूमीला नमन करत नवीन सरकारच्या स्थापनेबद्दल अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील 'विकसित भारता'च्या संकल्पात पश्चिम बंगाल महत्त्वाची भूमिका बजावेल, असे त्यांनी नमूद केले.1