logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

अहिल्यानगरमध्ये संगीत नाट्य महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद पहिल्याच दिवशी ‘संत कान्होपात्रा’च्या प्रयोगाला रसिकांची मोठी गर्दी अहिल्यानगर, दि. २५ ऑगस्ट २०२६ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय ‘संगीत नाट्य महोत्सवा’ला अहिल्यानगरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. माऊली सभागृह येथे आयोजित या महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी ‘संगीत ऊस डोंगा परी’ या संगीत नाट्यप्रयोगाला नाट्यरसिकांची मोठी गर्दी झाली. रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात महोत्सवाचा प्रारंभ झाला. महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ रंगकर्मी श्री. सुरेश साखळकर, ज्येष्ठ संगीतकार पंडित डॉ. विकास कशाळकर, ज्येष्ठ रंगकर्मी श्री. विजयकांत कुलकर्णी आणि श्री. मुकुंद मराठे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमुळे महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले. मराठी संगीत रंगभूमीच्या समृद्ध आणि वैभवशाली परंपरेचे दर्शन घडविण्याच्या उद्देशाने दि. २५ ते २७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत दररोज सायंकाळी ६.३० वाजता माऊली सभागृह, अहिल्यानगर येथे विविध संगीत नाट्यप्रयोग सादर करण्यात येत आहेत. या महोत्सवातील सर्व प्रयोग रसिकांसाठी विनामूल्य असून, पहिल्याच दिवशी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संगीत नाट्यपरंपरेप्रती असलेली आपली आस्था व्यक्त केली. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी 'संगीत ऊस डोंगा परी' हा संगीत नाट्यप्रयोग श्रुती संगीत निकेतन अहिल्यानगर यांच्या वतीने सादर करण्यात आला. या नाटकाचे लेखक ना. वि. कुलकर्णी, संगीत मास्टर कृष्णराव आणि दिग्दर्शक श्री. सुरेश साखळकर आहेत. अभिजात संगीत, प्रभावी अभिनय आणि दर्जेदार रंगमंचीय सादरीकरण यामुळे या प्रयोगाला रसिकांची विशेष दाद मिळाली. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, बुधवार, दि. २६ ऑगस्ट रोजी ‘संत कान्होपात्रा’ हा संगीत नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. या प्रयोगाचे लेखक ना.वि. कुलकर्णी असून,संगीत मास्टर कृष्णाराव, दिग्दर्शन सुरेश साखवळकर यांचे आहे. या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण बालगंधर्व संगीत रसिक मंडळ पुणे, अहिल्यानगर यांच्या वतीने करण्यात येणार आहे. महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी, गुरुवार, दि. २७ ऑगस्ट रोजी ‘संगीत संशय कल्लोळ’ हा प्रसिद्ध संगीत नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. या नाटकाचे लेखक गो. ब. देवल असून, दिग्दर्शक श्री. मनोहर जोशी आहेत. या प्रयोगाचे सादरीकरण खल्वायन, रत्नागिरी यांच्या वतीने करण्यात येणार आहे. संगीत, नाट्य, अभिनय, साहित्य आणि गायन यांचा सुरेख संगम असलेल्या संगीत नाटकांच्या माध्यमातून मराठी रंगभूमीची समृद्ध परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या महोत्सवातून करण्यात येत आहे. पहिल्याच दिवशी मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा संगीत नाट्यकलेविषयी रसिकांच्या मनात असलेल्या जिव्हाळ्याचे द्योतक ठरला आहे. अहिल्यानगर व परिसरातील नाट्यरसिक, संगीतप्रेमी, विद्यार्थी, कलाकार आणि सांस्कृतिकप्रेमींनी पुढील दोन दिवसांच्या संगीत नाट्यप्रयोगांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक यांनी केले आहे.

16 hrs ago
user_राविराज शिंदे
राविराज शिंदे
Photographer अहमदनगर, अहमदनगर, महाराष्ट्र•
16 hrs ago
d52e037d-2dc5-4412-a1f9-f34e1d27db0f

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • शिक्षण मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, खाजगी क्लासेससाठी नवीन धोरण, धाकधूक वाढली..
    1
    शिक्षण मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, खाजगी क्लासेससाठी नवीन धोरण, धाकधूक वाढली..
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • आपले गाडीचे पेपर (RC)हरवले, खराब झालं,5 मिनिटात काढून मिळेल. License हरवले, मतदान कार्ड मोबाईल नंबर लिंक फक्त 1 मिनीटात,pan कार्ड नवे, अपडेट, दुरुस्ती सर्व संबंधित कामासाठी,account open,मनी ट्रांसफर, पैसे काढणे,mobile दुरुस्ती, software, सेल, service and charger,battery, झेरॉक्स, color xerox, महा ID कार्ड, accessories, ऑनलाईन प्रिंट,संपर्क सुपर मोबाईल galaxy AND MULTI Services वाळूज , आपले गाडीचे पेपर (RC)हरवले, खराब झालं,5 मिनिटात काढून मिळेल. License हरवले, मतदान कार्ड मोबाईल नंबर लिंक फक्त 1 मिनीटात,pan कार्ड नवे, अपडेट, दुरुस्ती सर्व संबंधित कामासाठी,account open,मनी ट्रांसफर, पैसे काढणे,mobile दुरुस्ती, software, सेल, service and charger,battery, झेरॉक्स, color xerox, महा ID कार्ड, accessories, ऑनलाईन प्रिंट,संपर्क सुपर मोबाईल galaxy AND MULTI Services वाळूज ,
    1
    आपले गाडीचे पेपर (RC)हरवले, खराब झालं,5 मिनिटात काढून मिळेल. License हरवले, मतदान कार्ड मोबाईल नंबर लिंक फक्त 1 मिनीटात,pan कार्ड नवे, अपडेट, दुरुस्ती सर्व संबंधित कामासाठी,account open,मनी ट्रांसफर, पैसे काढणे,mobile दुरुस्ती, software, सेल, service and charger,battery, झेरॉक्स, color xerox, महा ID कार्ड, accessories, ऑनलाईन प्रिंट,संपर्क सुपर मोबाईल galaxy AND MULTI Services वाळूज ,

    user_MG Patel
    MG Patel
    Business banking service गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • नेपाळमध्ये चीनच्या बाजूने कोसी नदीला आलेल्या महापुरामुळे हाहाकार माजला असून, हजारो लोक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
    1
    नेपाळमध्ये चीनच्या बाजूने कोसी नदीला आलेल्या महापुरामुळे हाहाकार माजला असून, हजारो लोक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    13 min ago
  • नाशिकमध्ये 'कांदा एक्सप्रेस' रोखली! "रॅकमध्ये सडका अन् खराब कांदा"; गणेश निंबाळकरांचा नाफेडवर गंभीर आरोप नाशिकमध्ये 'कांदा एक्सप्रेस' रोखली! "रॅकमध्ये सडका अन् खराब कांदा"; गणेश निंबाळकरांचा नाफेडवर गंभीर आरोप लासलगाव (विशेष प्रतिनिधी) : नाफेड (NAFED) आणि एनसीसीएफच्या (NCCF) वतीने दिल्लीसाठी रवाना होणाऱ्या मालगाडीमध्ये (कांदा एक्सप्रेस) अत्यंत निकृष्ट, सडका आणि खराब कांदा पाठवला जात असल्याचा खळबळजनक आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख गणेश निंबाळकर यांनी केला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या निंबाळकर यांनी शेतकऱ्यांसह थेट लासलगाव रेल्वे स्थानकाचा मालधक्का गाठून 'कांदा एक्सप्रेस' रोखून धरली. [1, 2, 3] गोण्या उघडून दाखवण्याची मागणी आणि आंदोलन: आधीच विविध सोपस्कार आणि पॅकिंगअभावी सुमारे १६ तास रखडलेली ही मालगाडी बुधवारी रवाना होण्याच्या तयारीत होती. मात्र, गाडीत भरलेला माल खराब असल्याचा संशय आल्याने गणेश निंबाळकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला. "कांद्याच्या गोण्या उघडून दाखवा," अशी मागणी करत त्यांनी रेल्वे रुळावर आणि गाडीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. हा सडका कांदा दोन दिवसांत पूर्णपणे खराब होईल आणि यामुळे खुल्या बाजारातील चांगल्या शेतमालाचे भाव पाडण्याचे कारस्थान रचले जात आहे, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.
    1
    नाशिकमध्ये 'कांदा एक्सप्रेस' रोखली! "रॅकमध्ये सडका अन् खराब कांदा"; गणेश निंबाळकरांचा नाफेडवर गंभीर आरोप
नाशिकमध्ये 'कांदा एक्सप्रेस' रोखली! "रॅकमध्ये सडका अन् खराब कांदा"; गणेश निंबाळकरांचा नाफेडवर गंभीर आरोप
लासलगाव (विशेष प्रतिनिधी) :
नाफेड (NAFED) आणि एनसीसीएफच्या (NCCF) वतीने दिल्लीसाठी रवाना होणाऱ्या मालगाडीमध्ये (कांदा एक्सप्रेस) अत्यंत निकृष्ट, सडका आणि खराब कांदा पाठवला जात असल्याचा खळबळजनक आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख गणेश निंबाळकर यांनी केला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या निंबाळकर यांनी शेतकऱ्यांसह थेट लासलगाव रेल्वे स्थानकाचा मालधक्का गाठून 'कांदा एक्सप्रेस' रोखून धरली. [1, 2, 3]
गोण्या उघडून दाखवण्याची मागणी आणि आंदोलन:
आधीच विविध सोपस्कार आणि पॅकिंगअभावी सुमारे १६ तास रखडलेली ही मालगाडी बुधवारी रवाना होण्याच्या तयारीत होती. मात्र, गाडीत भरलेला माल खराब असल्याचा संशय आल्याने गणेश निंबाळकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला. "कांद्याच्या गोण्या उघडून दाखवा," अशी मागणी करत त्यांनी रेल्वे रुळावर आणि गाडीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. हा सडका कांदा दोन दिवसांत पूर्णपणे खराब होईल आणि यामुळे खुल्या बाजारातील चांगल्या शेतमालाचे भाव पाडण्याचे कारस्थान रचले जात आहे, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.
    user_Janardhan nitin jadhav
    Janardhan nitin jadhav
    Farmer येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • बिहारमध्ये ६ वर्षांचा चिमुकला आंदोलनात उतरला; सरकारकडे मागितला राजीनामा! पटना : बिहारमध्ये पहिलीत शिकणाऱ्या सहा वर्षीय आदित्य कुमारचा सरकारविरोधातील सवालांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा, अशी मागणी करत आदित्यने आंदोलनात सहभाग घेत सरकारच्या राजीनाम्याची मागणी केली. त्याच्या निरागस पण थेट सवालांनी उपस्थितांचे लक्ष वेधले असून, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा मुद्दा त्याने आंदोलनातून मांडला आहे.
    1
    बिहारमध्ये ६ वर्षांचा चिमुकला आंदोलनात उतरला; सरकारकडे मागितला राजीनामा!
पटना : बिहारमध्ये पहिलीत शिकणाऱ्या सहा वर्षीय आदित्य कुमारचा सरकारविरोधातील सवालांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा, अशी मागणी करत आदित्यने आंदोलनात सहभाग घेत सरकारच्या राजीनाम्याची मागणी केली.
त्याच्या निरागस पण थेट सवालांनी उपस्थितांचे लक्ष वेधले असून, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा मुद्दा त्याने आंदोलनातून मांडला आहे.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • येवला येथे श्री ऋणमुक्तेश्वर मंदिरात भौम प्रदोष व महापूजा उत्साह: भस्मआरती आणि भजनाने मंदिर परिसर भक्तिमय येवला येथे श्री ऋणमुक्तेश्वर मंदिरात भौम प्रदोष व महापूजा उत्साह: भस्मआरती आणि भजनाने मंदिर परिसर भक्तिमय ​येवला: येथील प्रसिद्ध श्री ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरात भौम प्रदोषानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. याप्रसंगी श्री भौमनाथ महादेवाची विशेष महापूजा आणि आकर्षक भस्मारती पार पडली. भौम प्रदोषानिमित्त श्री भौमनाथ महादेवांचा मनमोहक शृंगार करण्यात आला होता. ​भौमनाथ महादेव हे मंगळ देवाचे स्वामी आणि अत्यंत आवडते रूप मानले जातात. महाआरतीनंतर आयोजित करण्यात आलेल्या भजन संध्येने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय आणि चैतन्यमय झाला होता. या सोहळ्याचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. ​दरम्यान, पवित्र श्रावण महिन्याचे औचित्य साधून मंदिर व्यवस्थापनातर्फे विशेष आवाहन करण्यात आले आहे. श्रावण महिन्यात प्रदोषानिमित्त ज्या भाविकांना मंदिरात महाप्रसादाची (पंगत) सेवा द्यायची असेल, त्यांनी लवकरात लवकर मंदिर समितीशी संपर्क साधावा. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    1
    येवला येथे श्री ऋणमुक्तेश्वर मंदिरात भौम प्रदोष व महापूजा उत्साह: भस्मआरती आणि भजनाने मंदिर परिसर भक्तिमय
येवला येथे श्री ऋणमुक्तेश्वर मंदिरात भौम प्रदोष व महापूजा उत्साह: भस्मआरती आणि भजनाने मंदिर परिसर भक्तिमय
​येवला:
येथील प्रसिद्ध श्री ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरात भौम प्रदोषानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. याप्रसंगी श्री भौमनाथ महादेवाची विशेष महापूजा आणि आकर्षक भस्मारती पार पडली. भौम प्रदोषानिमित्त श्री भौमनाथ महादेवांचा मनमोहक शृंगार करण्यात आला होता.
​भौमनाथ महादेव हे मंगळ देवाचे स्वामी आणि अत्यंत आवडते रूप मानले जातात. महाआरतीनंतर आयोजित करण्यात आलेल्या भजन संध्येने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय आणि चैतन्यमय झाला होता. या सोहळ्याचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.
​दरम्यान, पवित्र श्रावण महिन्याचे औचित्य साधून मंदिर व्यवस्थापनातर्फे विशेष आवाहन करण्यात आले आहे. श्रावण महिन्यात प्रदोषानिमित्त ज्या भाविकांना मंदिरात महाप्रसादाची (पंगत) सेवा द्यायची असेल, त्यांनी लवकरात लवकर मंदिर समितीशी संपर्क साधावा.
ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • शिक्षण मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, खाजगी क्लासेससाठी नवीन धोरण, धाकधूक वाढली..
    1
    शिक्षण मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, खाजगी क्लासेससाठी नवीन धोरण, धाकधूक वाढली..
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • निर्वी येथे NH-548D मार्गावर दुचाकीचा अपघात; बाप्पू धुमाळ जखमी निर्वी : NH-548D निर्वी–जामखेड मार्गावर आज, दि. 26 ऑगस्ट 2026 रोजी दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात बाप्पू धुमाळ, रा. धुमाळवाडी, ता. शिरूर, जि. पुणे हे जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बाप्पू धुमाळ हे Hero Splendor दुचाकी क्रमांक MH-12-OB-5976 वरून प्रवास करत असताना निर्वी परिसरात अपघात झाला. या अपघातात त्यांच्या चेहऱ्याला दुखापत झाली असून दुचाकीचेही नुकसान झाले आहे. अपघातानंतर जखमी बाप्पू धुमाळ यांना तातडीने न्हावरे येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना शिरूर येथे पाठवण्यात आले. अपघाताची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदत करून जखमीला उपचारासाठी हलवले. या अपघातामुळे NH-548D निर्वी–जामखेड मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
    4
    निर्वी येथे NH-548D मार्गावर दुचाकीचा अपघात; बाप्पू धुमाळ जखमी
निर्वी : NH-548D निर्वी–जामखेड मार्गावर आज, दि. 26 ऑगस्ट 2026 रोजी दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात बाप्पू धुमाळ, रा. धुमाळवाडी, ता. शिरूर, जि. पुणे हे जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बाप्पू धुमाळ हे Hero Splendor दुचाकी क्रमांक MH-12-OB-5976 वरून प्रवास करत असताना निर्वी परिसरात अपघात झाला. या अपघातात त्यांच्या चेहऱ्याला दुखापत झाली असून दुचाकीचेही नुकसान झाले आहे.
अपघातानंतर जखमी बाप्पू धुमाळ यांना तातडीने न्हावरे येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना शिरूर येथे पाठवण्यात आले.
अपघाताची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदत करून जखमीला उपचारासाठी हलवले.
या अपघातामुळे NH-548D निर्वी–जामखेड मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
    user_Rajendra kulthe
    Rajendra kulthe
    Social worker शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.