Shuru
Apke Nagar Ki App…
श्रीपत रविवारी तालुका अंबाजोगाई येथे अखंड हरिनाम सप्ताहामध्ये कीर्तन
अशोक दगडू वाघमारे
श्रीपत रविवारी तालुका अंबाजोगाई येथे अखंड हरिनाम सप्ताहामध्ये कीर्तन
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by शेख महेशर ताहेर(पञकार)1
- "नारी शक्ती वंदन" विधेयकाच्या समर्थनासाठी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे महिलांना आवाहन1
- Post by Mohsin ahmed khan1
- लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणारा आरोपी जेरबंद, वाहनासह ८.५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. लातूर (प्रतिनिधी) शहरामध्ये प्रतिबंधित अन्न पदार्थ (गुटखा) विक्री व वाहतूक करणाऱ्यां विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिले आहेत. त्याअनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी उल्लेखनीय व प्रभावी कारवाई करून प्रतिबंधित गुटखा वाहनासह जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे १८.०० वाजता गांधी चौक पोलीस स्टेशन हद्दीतील मजगे नगर ते ट्विंकल लॅन्ड इंग्लिश स्कूल या मार्गावरून एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिजायर कार (क्रमांक MH-09 CV-9124) मधून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी वाहतूक करण्यात येत आहे अशी माहिती मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे पथकाने मजगे नगर ते ट्विंकल लॅन्ड इंग्लिश स्कूल रोडवरील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समोर सापळा रचून संशयित वाहन ताब्यात घेतले. चौकशीअंती चालकाने आपले नाव नागनाथ हरीभाऊ मुंडे (वय ४५ वर्ष, रा. मजगे नगर, लातूर)असे सांगितले. वाहनाची झडती घेतली असता गाडीतील सीट मागे व डिकीत पांढऱ्या पोत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आढळून आला. त्यामध्ये विमल पान मसाला अंदाजे ₹1,24,800/-,V-1 तंबाखू , अंदाजे ₹31,200/- स्विफ्ट डिजायर कार अंदाजे ₹7,00,000/- असा एकूण ₹8,56,000/चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन गांधी चौक, लातूर येथे भारतीय न्याय संहिता कलम 123, 274, 275, 223 अन्न सुरक्षा व मानके अधिनियम कलम 59 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, पोलीस अंमलदार अर्जुन रजपूत, रियाज सौदागर, साहेबराव हाके, मनोज खोसे, आनंद हल्लाळे यांनी केली आहे.2
- मुक्या प्राण्याची माणुसकी! रेल्वे रुळावरून चिमुकलीला दूर नेत वाचवले प्राण.. मुक्या प्राण्यांचे माणसांशी असलेले नाते किती घट्ट असते, याचा प्रत्यय देणारी हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. रेल्वे रुळावर एक चिमुकली उभी असताना अचानक भरधाव रेल्वे येत होती. जीवघेण्या क्षणी एका मुक्या प्राण्याने प्रसंगावधान राखत त्या चिमुकलीला रुळांपासून दूर नेले आणि तिचे प्राण वाचवले. या घटनेमुळे परिसरात त्या प्राण्याचे कौतुक होत असून, “मुक्या प्राण्यांमध्येही माणुसकी जिवंत आहे” अशी भावना व्यक्त केली जात आहे.1
- Post by Today One Live1
- (प्रतिनिधी):- बीड जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, जाळपोळ प्रकरणांसह गंभीर गुन्ह्यांवर ठोस कारवाई करण्याची मागणी बीड जिल्हा कृती समितीने केली आहे. तसेच निनावी पत्रांच्या माध्यमातून प्रशासनाविषयी अविश्वास निर्माण करण्याच्या प्रकारावर तातडीने कारवाई करावी, अशी ही मागणी करण्यात आली आहे. गेल्या अडीच वर्षांपासून जिल्हा सामाजिक अस्वस्थतेच्या छायेत वावरत असून, जाळपोळ प्रकरणांमध्ये अपेक्षित ती प्रभावी कारवाई झालेली दिसून येत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या मुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. दरम्यान, अलीकडील काळात खून, दरोडे, अत्याचार या सारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या शिवाय, निनावी पत्रांच्या माध्यमातून समाजात भीती व संभ्रम निर्माण करण्याचा प्रकार वाढत असल्याचे निदर्शनास आणून देत, अशा प्रकरणांचा तांत्रिक पद्धतीने तपास करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे. जिल्ह्याची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याची शक्यता व्यक्त करत, जाळपोळ व इतर गंभीर गुन्ह्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी बीड जिल्हा कृती समिती सदस्य डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, रामनाथ खोड, शेख युनुस, माजी सैनिक अशोक येडे, बाळासाहेब मोरे पाटील, रामधन जमाले, सय्यद सादेक, सुहास जायभाये, किष्किंधा पांचाळ यांच्या वतीने करण्यात आली आहे.1
- बालविवाह लावणाऱ्यांसह सहभागी सर्वांवरच गुन्हे दाखल करण्यात येणार - जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण1
- या रॅलीत महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. रॅलीदरम्यान महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत विधेयकाला ठाम पाठिंबा दर्शविला. महिलांना राजकीय क्षेत्रात योग्य प्रतिनिधित्व मिळावे, निर्णय प्रक्रियेत त्यांचा सक्रिय सहभाग वाढावा आणि महिला सक्षमीकरणाला चालना मिळावी, हा या विधेयकाचा प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले की, महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याच्या दृष्टीने हे विधेयक ऐतिहासिक ठरणार असून, देशाच्या प्रगतीत महिलांचा अधिक प्रभावी सहभाग सुनिश्चित होणार आहे. या रॅलीमुळे परिसरात नारी शक्तीचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला. मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या महिलांनी एकजुटीचे दर्शन घडवत रॅली यशस्वी केली.1