बीड जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारी विरोधात कृती समितीचे निवेदन; निनावी पत्र प्रकरणी कठोर कारवाईची मागणी; जिल्ह्याची बदनामी करण्याचे षडयंत्र:- डॉ.गणेश ढवळे ----- (प्रतिनिधी):- बीड जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, जाळपोळ प्रकरणांसह गंभीर गुन्ह्यांवर ठोस कारवाई करण्याची मागणी बीड जिल्हा कृती समितीने केली आहे. तसेच निनावी पत्रांच्या माध्यमातून प्रशासनाविषयी अविश्वास निर्माण करण्याच्या प्रकारावर तातडीने कारवाई करावी, अशी ही मागणी करण्यात आली आहे. गेल्या अडीच वर्षांपासून जिल्हा सामाजिक अस्वस्थतेच्या छायेत वावरत असून, जाळपोळ प्रकरणांमध्ये अपेक्षित ती प्रभावी कारवाई झालेली दिसून येत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या मुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. दरम्यान, अलीकडील काळात खून, दरोडे, अत्याचार या सारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या शिवाय, निनावी पत्रांच्या माध्यमातून समाजात भीती व संभ्रम निर्माण करण्याचा प्रकार वाढत असल्याचे निदर्शनास आणून देत, अशा प्रकरणांचा तांत्रिक पद्धतीने तपास करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे. जिल्ह्याची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याची शक्यता व्यक्त करत, जाळपोळ व इतर गंभीर गुन्ह्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी बीड जिल्हा कृती समिती सदस्य डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, रामनाथ खोड, शेख युनुस, माजी सैनिक अशोक येडे, बाळासाहेब मोरे पाटील, रामधन जमाले, सय्यद सादेक, सुहास जायभाये, किष्किंधा पांचाळ यांच्या वतीने करण्यात आली आहे.

- 17 लाख सरकारी कर्मचारी, जि प शिक्षक,-शिक्षके तर कर्मचारी आज पासून संपावर संपकाऱ्यांवर कार्यवाही चा सरकार चा इशारा.1
- जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे सुरू असलेल्या उपोषणादरम्यान घडलेली एक गंभीर घटना समोर आली आहे. शेख नावाच्या पोलीस अधिकाऱ्याने उपोषणकर्त्यास बळजबरीने पत्र देत ते वाचण्यासाठी कोणताही वेळ न देता त्यांना हटवण्याचा प्रयत्न केल्याचे संबंधित व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. या घटनेमुळे उपोषणकर्ते व नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच, या प्रकरणात वाद निर्माण करून उपोषणकर्त्यावर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येत आहे, जी अत्यंत गंभीर बाब आहे. लोकशाही व्यवस्थेत शांततामय आंदोलनाचा सन्मान राखणे आवश्यक असताना अशा प्रकारची जबरदस्ती अयोग्य व निषेधार्ह आहे. त्यामुळे संबंधित घटनेची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच, अशा प्रकारे वागणाऱ्या अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयातून तात्काळ बदली करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, अशी मागणीही करण्यात येत आहे. #अहिल्यानगर #जिल्हाधिकारी #मुख्यमंत्री1
- सिल्लोड : तालुक्यातील डोंगरगाव येथे घरकुलाचे हप्ते मिळत नसल्याने लाभार्थ्यांच्या तक्रारीला कंटाळून रोजगार सेवकांनी दिला राजीनामा1
- Post by Digital media.1
- लातूर जिल्ह्यातील अहमदपूर ते आंबेजोगाई हायवे रोडवर चालत्या कारणे घेतला पेट. वाहन चालकासह कार जळून खाक. सूरु ॲप इन मराठी न्यूज लातूर. सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026. लातूर जिल्ह्यात उन्हाचा पारा चढला असून सध्या 41 अंश ते 43 अंश पारा असून मोठ्या प्रमाणात उन्हाचा कडाका लागत आहे दुपारी बारा ते चार च्या दरम्यान बाहेर निघणे खूप कठीण झाले आहे. यातच लातूर जिल्ह्यातील अहमदपूर ते आंबेजोगाई हायवे रोडवर कार जात असताना या कारणे अचानक पेट घेतला वाहन चालकास छातीत दुखत असल्याने तो घराकडे जात होता अचानक पेट घेतल्याने वाहन चालकास बाहेर पडण्याचाही आगीने वेळ न दिल्याने वाहन चालकासह कारणे पेट घेत वाहन चालकाचा जागेवर मृत्यू झाला असून कार पूर्णपणे जळत असताना पाहायला दिसत आहे.1
- Post by Jafar tarodekar1
- 📍खळबळ जनक घटना लातूर येथील बिडवे इंजिनिअरिंग कॉलेज च्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये सिलेंडरचा स्फोट ? पहा व्हिडीओ1
- राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आयटीआय कर्मचाऱ्यांचे बेमुद्दत कामबंद आंदोलन सुरू1
- Post by Jafar tarodekar1