Kolhapur: गोल्डलाईफ फसवणुकीतील नववा आरोपी अटकेत, शेअर मार्केटच्या आमिषाने घातला पाच कोटींचा गंडा कोल्हापूर : गोल्डलाईफ डिस्ट्रिब्युटर्स कंपनीकडून शेअर मार्केटच्या माध्यमातून गुंतवणुकीवर दरमहा साडेचार टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून पाच कोटी ६२ लाखांची फसवणूक केलेल्या टोळीतील नवव्या आरोपीला आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सोमवारी (दि. १६) अटक केली. अतुल बळवंत वाघ (रा. कदमवाडी, कोल्हापूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. गुन्हा दाखल होताच डिसेंबर २०२३ पासून तो पसार होता.अटकेतील आरोपी इंद्रजित सुभाष कदम (वय ४६, रा. प्रतिभानगर, कोल्हापूर) याने गोल्डलाईफ डिस्ट्रिब्युटर्स कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूक गोळा केली. शेअर मार्केटमधून गुंतवणुकीवर दरमहा साडेचार टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून त्याने ऑगस्ट २०२२ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत कोट्यवधी रुपये जमवले. प्रत्यक्षात परतावा आणि मुद्दल न मिळाल्याने गुंतवणूकदार विजया दीपक कांबळे (४६, रा. प्रतिभानगर) यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक महेश इंगळे करीत आहेत.एकूण नऊपैकी आठ आरोपींना अटक झाली होती. गुन्हा दाखल झाल्यापासून पसार असलेला एजंट अतुल वाघ याला पोलिस अंमलदार बाबूमिया काझी यांनी सोमवारी पाचगाव येथून अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्याला शुक्रवारपर्यंत (दि. २०) पोलिस कोठडी मिळाली.नऊ जणांवर गुन्हाकंपनीचा प्रमुख इंद्रजित कदम याच्यासह राहुल शशिकांत गाडवे (५२, रा. राजारामपुरी, सातवी गल्ली), कुमार जोतिराम उबाळे (५२, रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर), अमरदीप बाबूराव कुंडले (४९, रा. राजगड कॉलनी, कोल्हापूर), अतुल बळवंत वाघ (का. कदमवाडी), शैलेश नामदेव वाघ (रा. फुलेवाडी, कोल्हापूर), शैलेश अर्जुन मरगज (४२, रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर), आबासो बाळू वाडकर (४७) आणि सुनीता आबासो वाडकर (३८, दोघे रा. मणेर मळा, उचगाव) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.अडीच कोटींची मालमत्ता जप्तपोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून कंपनीचा प्रमुख कदम याच्यासह इतर संचालक आणि एजंट यांची अडीच कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. संबंधित मालमत्तेचा लिलाव करण्याच्या प्रक्रियेसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पत्रव्यवहार सुरू आहे. लवकरच याला मंजुरी मिळेल, अशी माहिती आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांनी दिली.

- *सातारा नगर परिषदेचे स्वच्छता वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती सभापती श्री.धनंजय बाजीराव जांभळे यांना विनंतीपूर्वक अर्ज करत आहे या विषयी लवकरात लवकर मार्गी लावावा सौ. प्रतिभा सुनील शेलार संस्थापिका : महालक्ष्मी आधार फाउंडेशन* सातारा शहरात अनेक परिसरामध्ये व गल्लीबोळांमध्ये पाळीव गाय व म्हैस फिरत असतात रस्त्यावर कधी बसतात तर कधी रस्त्यावर उभे राहतात कधी गल्लीबोळ्यामध्ये जाऊन घराघराच्या दरवाज्यात उभे राहून घरातील नागरिकांकडून चपाती भाकरी अशा प्रकारचे पदार्थ घेऊन खातात आणि कोणताही पदार्थ घेतल्याशिवाय तिकडून हलतही नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांना खूप त्रास होत आहेत हे पाळीव गाय म्हैस हे ज्यांच्या मालकीचे आहेत ते सकाळी या गाय म्हैस यांचे अतिप्रमाणात दूध धारा मार्फत काढतात. आणि त्या जनावरांना मोकाट सोडतात त्यामुळे परिसरात दिवसभर त्यांचा शहरातील नागरिकांना त्रास होतो तसेच संध्याकाळ झाली की या गाय आणि म्हैस आपल्या मालकाकडे परत जातात आणि संध्याकाळी परत दूध धारा मार्फत काढले जाते. अशाप्रकारे या फिरत असणारे पाळीव गाय आणि म्हैस यांचा नागरिकांना खूपच त्रास होत आहे तसेच जागोजागी अति प्रमाणात गाय आणि म्हैस यांचे मूत्र व शेण पसरलेले असते त्यामुळे परिसर ही घाण होत असतो अशातच पाऊसही भरपूर पडतो त्यामुळे हे सर्व घाण प्रत्येकाच्या चपलांना लागून आपापल्या घरात जात असते. पाळीव गाय म्हैस यांचे जे मालक आहेत ते यांचं सकाळ संध्याकाळ दूध काढतात आणि दिवसभर भटकायला बाहेर सोडतात तसेच त्या गाय म्हैस बरोबर त्यांचा मालक नसतोच मुळीच, त्यामुळे कुठे शाळेची मुलं व महिला वृद्ध व्यक्ती व नागरिक रस्त्यावर जात असतात किंवा गाड्या जात असतात त्यांना अडचणी निर्माण होत आहेत आणि हे सरासर चुकीच्या पद्धतीने चालू आहे. सातारा नगरपरिषदेने याविषयी लवकरात लवकर कारवाई करावी ज्या गाय आणि म्हैस आहेत त्यांच्या मालकांना भेटून या सर्व गोष्टींची पूर्व सूचना द्यावी. भटक्या कायम आहेस असत्या तर शासनाला ताब्यात दिले असत्या पण पाळीव असल्यामुळे त्यांच्या मालकांना त्याची पूर्व सूचना द्यावी लागणार आहे त्यांचे मालक कोण आहेत तेही माहीत नसतं लवकरात लवकर सातारा नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी अभिजीत बापट यांनी यावर काही उपाययोजना कराव्या जेणेकरून नागरिकांमध्ये त्रास होणार नाही अन्यथा नागरिकांनाच हा विषय हातात घेऊन काही कारवाई करावी लागणार आहे. कृपया करून सातारा नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी यावर तात्काळ लक्ष देऊन कारवाई करणे गरजेचे आहे.1
- महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडियाच्या प्रदेशाध्यक्षपदी सतीश सावंत व उपाध्यक्षपदी चांदभैय शेख यांची निवड झाल्याने त्यांचा महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सांगोला येथे सत्कार आयोजित करण्यात आला होता.1
- विक्रम शिंदे /भोर दि.16 कापुरहोळ भोर वाई हा बहुचर्चित रस्ता अंतिम टप्प्यात आहे.मात्र आधी केलेल्या रस्ता खचण्याच्या घटना वारंवार घडत असून माळवाडी ते नेकलेस पॉईंट दरम्यान मोरी वरील रस्ता खचल्याने पोकलेनच्या सहायाने रस्ता उखडून आज (दि.16) दुरुस्तीचे काम सुरू केले आहे.मात्र या बाबत रस्त्याच्या कामांबाबत नागरिकांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे.रस्त्याच्या गुणवतेबाबत शंका व्यक्त केली आहे.1
- वर्धा–नागपूर रेल्वे महामार्गावर तुळजापूर रेल्वे स्टेशनजवळ जीटी एक्सप्रेसला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि रेल्वे प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू आहे. प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असून घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.1
- AJITDADA STATUE : बारामतीच्या तिरंगा सर्कल येथील नटराज कलामंडळासमोर अजितदादांचा १० फुटी पुतळा उभारला जाणार आहे.. संस्थेचे अध्यक्ष किरण गुजर यांनी याबद्दल माहिती देत पुतळ्याचं काम अंतिम टप्प्यात आल्याचं सांगितलंय.. #AjitPawar #politics #baramatikar #viralpost #viralvideo #maharashtra #development #fypシ #explore #BreakingNews #MaharashtraPolitics1
- Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा1
- Post by Raju Bawdiwale1
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती शहरात दहा फुट उंच सिलिकॉन मध्ये पुतळा उभा राहणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू सहकारी किरण गुजर यांनी दिली माहिती1