Shuru
Apke Nagar Ki App…
कारचा सांगाडा... कार पूर्णपणे जळुन खाख... पुणे सोलापूर हायवे बिल्ट कंपनी जवळ पहाटे एक वाजता कारला लागली अचानक आग...
समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
कारचा सांगाडा... कार पूर्णपणे जळुन खाख... पुणे सोलापूर हायवे बिल्ट कंपनी जवळ पहाटे एक वाजता कारला लागली अचानक आग...
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा1
- वर्धा–नागपूर रेल्वे महामार्गावर तुळजापूर रेल्वे स्टेशनजवळ जीटी एक्सप्रेसला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि रेल्वे प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू आहे. प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असून घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.1
- AJITDADA STATUE : बारामतीच्या तिरंगा सर्कल येथील नटराज कलामंडळासमोर अजितदादांचा १० फुटी पुतळा उभारला जाणार आहे.. संस्थेचे अध्यक्ष किरण गुजर यांनी याबद्दल माहिती देत पुतळ्याचं काम अंतिम टप्प्यात आल्याचं सांगितलंय.. #AjitPawar #politics #baramatikar #viralpost #viralvideo #maharashtra #development #fypシ #explore #BreakingNews #MaharashtraPolitics1
- शिरूर-आमदाबाद-मलठण अष्टविनायक महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तीन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रकरणी Shirur Police Station येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदाबाद (ता. शिरूर) हद्दीत आमदाबाद फाट्यापुढे, माषेरेमळा येथे थोरात तलाठी यांच्या घरासमोर हा अपघात घडला. टोयोटा ग्लांजा (क्र. एमएच १२ एक्सएक्स २४८६) या चारचाकी वाहनाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून समोरील वाहनास जोरदार धडक दिल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. या अपघातात धीरज राजू पवळे (वय २४), त्यांची पत्नी वैभव धीरज पवळे (वय २१) व सासू गोपिका राजू पवळे (वय ४५, सर्व रा. कोयाळी, ता. खेड, जि. पुणे) हे गंभीर जखमी झाले. तिघांनाही डोक्याला, हात-पायांना तसेच छाती व मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातात त्यांचा तीन वर्षांचा मुलगा विराज धीरज पवळे याचा दुर्दैवी मृत्यू झाला. जखमींना तातडीने शिरूर येथील श्री गणेशा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या प्रकरणी शिवम सत्यवान साळवे (वय २८, रा. मलठण, ता. शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी संदीप प्रभाकर पुंडे (रा. कान्हूरमेसाई, ता. शिरूर, जि. पुणे) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५ (अ)(ब), ३२४ (४), १०६ (१) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा क्रमांक १३३/२०२६ दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.1
- अहिल्यानगरच्या भिंगारजवळ आलमगीर परिसरातील एका घरात शिरलेला बिबट्या जेरबंद करण्यात आला. सोमवारी सकाळी वन विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.1
- *सातारा नगर परिषदेचे स्वच्छता वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती सभापती श्री.धनंजय बाजीराव जांभळे यांना विनंतीपूर्वक अर्ज करत आहे या विषयी लवकरात लवकर मार्गी लावावा सौ. प्रतिभा सुनील शेलार संस्थापिका : महालक्ष्मी आधार फाउंडेशन* सातारा शहरात अनेक परिसरामध्ये व गल्लीबोळांमध्ये पाळीव गाय व म्हैस फिरत असतात रस्त्यावर कधी बसतात तर कधी रस्त्यावर उभे राहतात कधी गल्लीबोळ्यामध्ये जाऊन घराघराच्या दरवाज्यात उभे राहून घरातील नागरिकांकडून चपाती भाकरी अशा प्रकारचे पदार्थ घेऊन खातात आणि कोणताही पदार्थ घेतल्याशिवाय तिकडून हलतही नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांना खूप त्रास होत आहेत हे पाळीव गाय म्हैस हे ज्यांच्या मालकीचे आहेत ते सकाळी या गाय म्हैस यांचे अतिप्रमाणात दूध धारा मार्फत काढतात. आणि त्या जनावरांना मोकाट सोडतात त्यामुळे परिसरात दिवसभर त्यांचा शहरातील नागरिकांना त्रास होतो तसेच संध्याकाळ झाली की या गाय आणि म्हैस आपल्या मालकाकडे परत जातात आणि संध्याकाळी परत दूध धारा मार्फत काढले जाते. अशाप्रकारे या फिरत असणारे पाळीव गाय आणि म्हैस यांचा नागरिकांना खूपच त्रास होत आहे तसेच जागोजागी अति प्रमाणात गाय आणि म्हैस यांचे मूत्र व शेण पसरलेले असते त्यामुळे परिसर ही घाण होत असतो अशातच पाऊसही भरपूर पडतो त्यामुळे हे सर्व घाण प्रत्येकाच्या चपलांना लागून आपापल्या घरात जात असते. पाळीव गाय म्हैस यांचे जे मालक आहेत ते यांचं सकाळ संध्याकाळ दूध काढतात आणि दिवसभर भटकायला बाहेर सोडतात तसेच त्या गाय म्हैस बरोबर त्यांचा मालक नसतोच मुळीच, त्यामुळे कुठे शाळेची मुलं व महिला वृद्ध व्यक्ती व नागरिक रस्त्यावर जात असतात किंवा गाड्या जात असतात त्यांना अडचणी निर्माण होत आहेत आणि हे सरासर चुकीच्या पद्धतीने चालू आहे. सातारा नगरपरिषदेने याविषयी लवकरात लवकर कारवाई करावी ज्या गाय आणि म्हैस आहेत त्यांच्या मालकांना भेटून या सर्व गोष्टींची पूर्व सूचना द्यावी. भटक्या कायम आहेस असत्या तर शासनाला ताब्यात दिले असत्या पण पाळीव असल्यामुळे त्यांच्या मालकांना त्याची पूर्व सूचना द्यावी लागणार आहे त्यांचे मालक कोण आहेत तेही माहीत नसतं लवकरात लवकर सातारा नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी अभिजीत बापट यांनी यावर काही उपाययोजना कराव्या जेणेकरून नागरिकांमध्ये त्रास होणार नाही अन्यथा नागरिकांनाच हा विषय हातात घेऊन काही कारवाई करावी लागणार आहे. कृपया करून सातारा नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी यावर तात्काळ लक्ष देऊन कारवाई करणे गरजेचे आहे.1
- (प्रतिनिधी):- मराठा सेवा संघ बीड व अंतर्गत सर्व कक्ष यांच्या वतीने दरवर्षी शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या वर्षीही शिवजन्मोत्सव सोहळा दिनांक २०/०२/२०२६ शुक्रवार वार रोजी ठीक-सांय. ०७:००वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बीड या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रम प्रसंगी विविध क्षेत्रात कार्यरत समाजातील तळागाळातील व्यक्तीसाठी योगदान देणाऱ्या समाज रत्नांचा मराठा भूषण पुरस्कार देऊन विशेष गौरव करण्यात येणार आहे. शिवजन्मोत्सव सोहळ्यात मराठा भूषण पुरस्काराने सामाजिक क्षेत्रात अतुलनीय कार्य करणारे शिवश्री डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, वैद्यकीय क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे प्रसिद्ध बाल रोगतज्ञ शिवश्री डॉ.प्रदीप शेळके, सामाजिक व उद्योग क्षेत्रातील शिवश्री अँड.प्रकाश कवठेकर, महिला मधून जिजाऊ रत्न पुरस्काराने शिवमती जयश्रीताई पांडुरंग सावंत तसेच विशेष गौरव पुरस्काराने समाज प्रबोधनकार शिवश्री संतोष डोंगरे व प्रशासकीय क्षेत्रातून शिवश्री मधुकर शेळके यांना मान्यवरांच्या हस्ते मराठा समाज भूषण पुरस्कार देवून गौरव करण्यात येणार आहे. या वेळी प्रसिद्ध व्याख्याते शिवश्री हनुमंत पवार यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीडचे तहसीलदार मा.चंद्रकांत शेळके साहेब हे राहणार असून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बीड जिल्ह्याच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शिवमती प्रियाराणी पाटील, शिवश्री अजय पाटील (अध्यक्ष छत्रपती शाहू महाराज नागरी सहकारी बँक बीड), बीड जिल्हा हिवताप अधिकारी शिवश्री विजयसिंह शिंदे, मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष शिवश्री अशोक ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत. या सर्व मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये मान्यवरांना मराठा समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तरी सर्व शिवप्रेमींनी शिवजन्मोत्सव व मराठा भूषण पुरस्कार सोहळयास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन मराठा सेवा संघ बीड, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड व अंतर्गत सर्व कक्षाच्या वतीने करण्यात येते.1
- Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा1