Shuru
Apke Nagar Ki App…
अहिल्यानगरच्या भिंगारजवळ आलमगीर परिसरातील एका घरात शिरलेला बिबट्या जेरबंद करण्यात आला. सोमवारी सकाळी वन विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
राविराज शिंदे
अहिल्यानगरच्या भिंगारजवळ आलमगीर परिसरातील एका घरात शिरलेला बिबट्या जेरबंद करण्यात आला. सोमवारी सकाळी वन विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- डंपरचे चाक महिलेच्या पायावरून... बोल्हेगावात थरारक अपघात... अहिल्यानगरच्या बोल्हेगाव फाटा परिसरात आज सकाळी थरारक अपघात झाला. वीटाने भरलेल्या डंपरच्या चाकाखाली आल्याने एका महिलेचा पाय गंभीर जखमी झाला आहे. वारंवार अपघात होणाऱ्या या ठिकाणी गतीरोधक नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अहिल्यानगरच्या बोल्हेगाव फाटा परिसरात आज सकाळी पावणे दहा ते दहाच्या सुमारास वीटाने भरलेल्या डंपरच्या धडकेत एक महिला गंभीर जखमी झाली. डंपरचे चाक थेट महिलेच्या पायावरून गेल्याने तिचा पाय निकामी झाला आहे.या परिसरात रस्ता वारंवार खचत असल्यामुळे सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र, गतीरोधक नसल्याने येथे सातत्याने अपघात घडत आहेत. नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे मागणी करूनही दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप केला आहे.अपघात होताच नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. याच वेळी सनफार्मा विद्यालयातील विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती देण्यासाठी आलेले महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटनेचे कोषाध्यक्ष राजेंद्र धस यांनी परिस्थिती हाताळत जखमी महिलेला रिक्षातून तात्काळ रुग्णालयात दाखल केले.घटनेनंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, या परिसरात तातडीने गतीरोधक बसवावेत; अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे."या ठिकाणी सतत अपघात होत आहेत. प्रशासनाने गतीरोधक बसवले नाहीत, तर आम्ही आंदोलन करू." असा इशारा नागरिकांनी दिला आहे.बोल्हेगाव फाटा परिसरात वारंवार होणारे अपघात प्रशासनाच्या दुर्लक्षाचे जिवंत उदाहरण ठरत आहेत. आता तरी प्रशासन जागे होणार का, असा सवाल नागरिक करत आहेत.1
- अहिल्यानगरच्या भिंगारजवळ आलमगीर परिसरातील एका घरात शिरलेला बिबट्या जेरबंद करण्यात आला. सोमवारी सकाळी वन विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.1
- शिरूर-आमदाबाद-मलठण अष्टविनायक महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तीन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रकरणी Shirur Police Station येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदाबाद (ता. शिरूर) हद्दीत आमदाबाद फाट्यापुढे, माषेरेमळा येथे थोरात तलाठी यांच्या घरासमोर हा अपघात घडला. टोयोटा ग्लांजा (क्र. एमएच १२ एक्सएक्स २४८६) या चारचाकी वाहनाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून समोरील वाहनास जोरदार धडक दिल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. या अपघातात धीरज राजू पवळे (वय २४), त्यांची पत्नी वैभव धीरज पवळे (वय २१) व सासू गोपिका राजू पवळे (वय ४५, सर्व रा. कोयाळी, ता. खेड, जि. पुणे) हे गंभीर जखमी झाले. तिघांनाही डोक्याला, हात-पायांना तसेच छाती व मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातात त्यांचा तीन वर्षांचा मुलगा विराज धीरज पवळे याचा दुर्दैवी मृत्यू झाला. जखमींना तातडीने शिरूर येथील श्री गणेशा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या प्रकरणी शिवम सत्यवान साळवे (वय २८, रा. मलठण, ता. शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी संदीप प्रभाकर पुंडे (रा. कान्हूरमेसाई, ता. शिरूर, जि. पुणे) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५ (अ)(ब), ३२४ (४), १०६ (१) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा क्रमांक १३३/२०२६ दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.1
- 💪1
- बालेपीर भागातील नागरिकांची मागणी तीन ते चार दिवसाला पाणी सोडण्यात यावे.1
- सिल्लोड शहरात शोककळा, माजी मंत्री आ.अब्दुल सत्तार यांच्या पत्नीचे निधन, सिल्लोड शहराच्या माजी नगराध्यक्षा नफीसा बेगम अब्दुल सत्तार यांचे निधन सिल्लोड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या नगराध्यक्षा नफिसा बेगम यांचा निधन. अंत्ययात्रा मध्ये हजारो नागरिकांनी...1
- पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या 'माझी वसुंधरा अभियान ५.०' मध्ये येवला शहराने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. राज्य स्तरावर ६ वा तर नाशिक विभाग स्तरावर प्रथम क्रमांक पटकावून येवला नगर परिषदेने ७५ लाख रुपयांचे घसघशीत बक्षीस जाहीर केले आहे. शहरात राबवलेले मोठ्या प्रमाणावरील वृक्षारोपण, मियावाकी वने, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौरऊर्जेचा वापर आणि प्लास्टिकमुक्त उपक्रमांना मिळालेला नागरिकांचा सक्रिय पाठिंबा या यशाचे गमक ठरला. या कामगिरीबद्दल अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ आणि नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, उपनगराध्यक्ष वर्षा गायकवाड व सर्व नगरसेवक यांनी येवलाकरांचे कौतुक केले आहे. मिळालेल्या बक्षीस रकमेतून शहरात नवीन हरित क्षेत्रे विकसित करणे, जलसंवर्धन प्रकल्प आणि नूतनीकरणयोग्य ऊर्जेला प्रोत्साहन देणारी विकासकामे हाती घेतली जाणार आहेत, ज्यामुळे येवला शहर पर्यावरणपूरक विकासाचे मॉडेल ठरेल. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला.1
- एसटीच्या ढिसाळ नियोजनामुळे शालेय सहली धोक्यात | विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ? जिल्ह्यातील शालेय सहली आता धोक्यात आल्या आहेत! विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. एसटी महामंडळाच्या ढिसाळ नियोजनामुळे दोन गंभीर घटना समोर आल्या आहेत… आणि आता अनेक शाळांनी सहलींना ब्रेक लावण्याचा निर्णय घेतला आहे. नेमकं काय घडलं? पाहूया सविस्तर… अहिल्यानगर तालुक्यातील जेऊर येथील संतुकनाथ इंग्लिश विद्यालयाची कोकण दर्शन सहल आयोजित करण्यात आली होती. या सहलीसाठी तारकपूर आगाराकडून पाच बसेस देण्यात आल्या. मात्र प्रवास सुरू झाल्यानंतर काही अंतरावरच एका बसचा बिघाड झाला. शिरूरजवळ बस अचानक बंद पडली… विद्यार्थ्यांचा ताफा रस्त्यात अडकला. शिरूर आगारातून सीएनजी बस मागविण्यात आली,पण ती घाट मार्गासाठी सक्षम नव्हती! तळेगाव दाभाडे येथे पुन्हा बस बदलावी लागली आणि पालीजवळ बसच्या चाकातून धूर निघू लागल्याने आणखी गोंधळ उडाला. विद्यार्थिनींना दाटीवाटीत बसवण्यात आलं… शेवटी श्रीवर्धन आगारातून नवीन बस मागवून सहल कसाबसा पूर्ण करण्यात आली. या सगळ्या प्रकारात विद्यार्थ्यांना शारीरिक थकवा, मानसिक ताण आणि भीतीचा सामना करावा लागला. या घटनेनंतर काही दिवसांतच नेवासा तालुक्यातील पिंपरी शहाली येथील जिल्हा परिषद शाळेच्या बसला अपघात झाला. प्राथमिक तपासात समोर आलं की, चालकाला सलग अतिरिक्त ड्युटी देण्यात आली होती.थकलेल्या अवस्थेतच त्याला प्रवासासाठी पाठवण्यात आलं. परिणामी चालकाचा ताबा सुटून अपघात झाला. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली… मात्र अनेक विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती झाल्या. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. शिक्षक संघटनांचा आरोप आहे की – बसची फिटनेस तपासणी होत नाही चालकांची वैद्यकीय तपासणी होत नाही विश्रांती वेळ दिली जात नाही आणि प्रवासासाठी योग्य बस निवडली जात नाही “उत्पन्न वाढवण्यासाठी जुन्या आणि बिघडलेल्या बसेस सहलींसाठी दिल्या जात आहेत”अशी संतप्त प्रतिक्रिया शिक्षक आणि पालकांनी दिली आहे. या घटनांनंतर अनेक शाळांनी सहली रद्द केल्या आहेत.काहींनी पुढील आदेश येईपर्यंत सहली स्थगित ठेवल्या आहेत. “जोपर्यंत एसटी प्रशासन सुरक्षिततेबाबत ठोस उपाययोजना करत नाही, तोपर्यंत सहली काढायच्या नाहीत,” अशी भूमिका मुख्याध्यापकांनी घेतली आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अनुभवाधारित शिक्षणावरही होणार आहे. काही शाळा खासगी स्कूलबस किंवा ट्रॅव्हल्सचा पर्याय तपासत आहेत. पण अपघात झाल्यास जबाबदारी कोण घेणार? “स्कूलबसने सहल काढली आणि अपघात झाला तर जबाबदार कोण?” असा थेट सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे. शालेय शिक्षण विभागाकडून स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे नसल्याने शाळाही संभ्रमात आहेत. आता एसटी प्रशासनाला शाळांना भेटी देऊन विश्वास निर्माण करावा लागणार आहे. बसची स्थिती, चालकांची पात्रता, आपत्कालीन व्यवस्था, सुरक्षिततेची हमी हे सर्व स्पष्ट करावं लागेल. जिल्हा प्रशासनाने सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि शालेय सहलींसाठी स्वतंत्र, सुरक्षित आणि आधुनिक बसेस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाही. एसटी प्रशासनाने विश्वासार्हता सिद्ध केली तरच शालेय सहली पुन्हा सुरू होतील. या प्रकरणाबाबत तुमचं मत काय आहे? कॉमेंट करून नक्की सांगा.1