logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

एसटीच्या ढिसाळ नियोजनामुळे शालेय सहली धोक्यात | विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ? एसटीच्या ढिसाळ नियोजनामुळे शालेय सहली धोक्यात | विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ? जिल्ह्यातील शालेय सहली आता धोक्यात आल्या आहेत! विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. एसटी महामंडळाच्या ढिसाळ नियोजनामुळे दोन गंभीर घटना समोर आल्या आहेत… आणि आता अनेक शाळांनी सहलींना ब्रेक लावण्याचा निर्णय घेतला आहे. नेमकं काय घडलं? पाहूया सविस्तर… अहिल्यानगर तालुक्यातील जेऊर येथील संतुकनाथ इंग्लिश विद्यालयाची कोकण दर्शन सहल आयोजित करण्यात आली होती. या सहलीसाठी तारकपूर आगाराकडून पाच बसेस देण्यात आल्या. मात्र प्रवास सुरू झाल्यानंतर काही अंतरावरच एका बसचा बिघाड झाला. शिरूरजवळ बस अचानक बंद पडली… विद्यार्थ्यांचा ताफा रस्त्यात अडकला. शिरूर आगारातून सीएनजी बस मागविण्यात आली,पण ती घाट मार्गासाठी सक्षम नव्हती! तळेगाव दाभाडे येथे पुन्हा बस बदलावी लागली आणि पालीजवळ बसच्या चाकातून धूर निघू लागल्याने आणखी गोंधळ उडाला. विद्यार्थिनींना दाटीवाटीत बसवण्यात आलं… शेवटी श्रीवर्धन आगारातून नवीन बस मागवून सहल कसाबसा पूर्ण करण्यात आली. या सगळ्या प्रकारात विद्यार्थ्यांना शारीरिक थकवा, मानसिक ताण आणि भीतीचा सामना करावा लागला. या घटनेनंतर काही दिवसांतच नेवासा तालुक्यातील पिंपरी शहाली येथील जिल्हा परिषद शाळेच्या बसला अपघात झाला. प्राथमिक तपासात समोर आलं की, चालकाला सलग अतिरिक्त ड्युटी देण्यात आली होती.थकलेल्या अवस्थेतच त्याला प्रवासासाठी पाठवण्यात आलं. परिणामी चालकाचा ताबा सुटून अपघात झाला. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली… मात्र अनेक विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती झाल्या. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. शिक्षक संघटनांचा आरोप आहे की – बसची फिटनेस तपासणी होत नाही चालकांची वैद्यकीय तपासणी होत नाही विश्रांती वेळ दिली जात नाही आणि प्रवासासाठी योग्य बस निवडली जात नाही “उत्पन्न वाढवण्यासाठी जुन्या आणि बिघडलेल्या बसेस सहलींसाठी दिल्या जात आहेत”अशी संतप्त प्रतिक्रिया शिक्षक आणि पालकांनी दिली आहे. या घटनांनंतर अनेक शाळांनी सहली रद्द केल्या आहेत.काहींनी पुढील आदेश येईपर्यंत सहली स्थगित ठेवल्या आहेत. “जोपर्यंत एसटी प्रशासन सुरक्षिततेबाबत ठोस उपाययोजना करत नाही, तोपर्यंत सहली काढायच्या नाहीत,” अशी भूमिका मुख्याध्यापकांनी घेतली आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अनुभवाधारित शिक्षणावरही होणार आहे. काही शाळा खासगी स्कूलबस किंवा ट्रॅव्हल्सचा पर्याय तपासत आहेत. पण अपघात झाल्यास जबाबदारी कोण घेणार? “स्कूलबसने सहल काढली आणि अपघात झाला तर जबाबदार कोण?” असा थेट सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे. शालेय शिक्षण विभागाकडून स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे नसल्याने शाळाही संभ्रमात आहेत. आता एसटी प्रशासनाला शाळांना भेटी देऊन विश्वास निर्माण करावा लागणार आहे. बसची स्थिती, चालकांची पात्रता, आपत्कालीन व्यवस्था, सुरक्षिततेची हमी हे सर्व स्पष्ट करावं लागेल. जिल्हा प्रशासनाने सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि शालेय सहलींसाठी स्वतंत्र, सुरक्षित आणि आधुनिक बसेस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाही. एसटी प्रशासनाने विश्वासार्हता सिद्ध केली तरच शालेय सहली पुन्हा सुरू होतील. या प्रकरणाबाबत तुमचं मत काय आहे? कॉमेंट करून नक्की सांगा.

6 hrs ago
user_Deepak Vijay Kaswa
Deepak Vijay Kaswa
अहमदनगर, अहमदनगर, महाराष्ट्र•
6 hrs ago

एसटीच्या ढिसाळ नियोजनामुळे शालेय सहली धोक्यात | विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ? एसटीच्या ढिसाळ नियोजनामुळे शालेय सहली धोक्यात | विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ? जिल्ह्यातील शालेय सहली आता धोक्यात आल्या आहेत! विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. एसटी महामंडळाच्या ढिसाळ नियोजनामुळे दोन गंभीर घटना समोर आल्या आहेत… आणि आता अनेक शाळांनी सहलींना ब्रेक लावण्याचा निर्णय घेतला आहे. नेमकं काय घडलं? पाहूया सविस्तर… अहिल्यानगर तालुक्यातील जेऊर येथील संतुकनाथ इंग्लिश विद्यालयाची कोकण दर्शन सहल आयोजित करण्यात आली होती. या सहलीसाठी तारकपूर आगाराकडून पाच बसेस देण्यात आल्या. मात्र प्रवास सुरू झाल्यानंतर काही अंतरावरच एका बसचा बिघाड झाला. शिरूरजवळ बस अचानक बंद पडली… विद्यार्थ्यांचा ताफा रस्त्यात अडकला. शिरूर आगारातून सीएनजी बस मागविण्यात आली,पण ती घाट मार्गासाठी सक्षम नव्हती! तळेगाव दाभाडे येथे पुन्हा बस बदलावी लागली आणि पालीजवळ बसच्या चाकातून धूर निघू लागल्याने आणखी गोंधळ उडाला. विद्यार्थिनींना दाटीवाटीत बसवण्यात आलं… शेवटी श्रीवर्धन आगारातून नवीन बस मागवून सहल कसाबसा पूर्ण करण्यात आली. या सगळ्या प्रकारात विद्यार्थ्यांना शारीरिक थकवा, मानसिक ताण आणि भीतीचा सामना करावा लागला. या घटनेनंतर काही दिवसांतच नेवासा तालुक्यातील पिंपरी शहाली येथील जिल्हा परिषद शाळेच्या बसला अपघात झाला. प्राथमिक तपासात समोर आलं की, चालकाला सलग अतिरिक्त ड्युटी देण्यात आली होती.थकलेल्या अवस्थेतच त्याला प्रवासासाठी पाठवण्यात आलं. परिणामी चालकाचा ताबा सुटून अपघात झाला. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली… मात्र अनेक विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती झाल्या. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. शिक्षक संघटनांचा आरोप आहे की – बसची फिटनेस तपासणी होत नाही चालकांची वैद्यकीय तपासणी होत नाही विश्रांती वेळ दिली जात नाही आणि प्रवासासाठी योग्य बस निवडली जात नाही “उत्पन्न वाढवण्यासाठी जुन्या आणि बिघडलेल्या बसेस सहलींसाठी दिल्या जात आहेत”अशी संतप्त प्रतिक्रिया शिक्षक आणि पालकांनी दिली आहे. या घटनांनंतर अनेक शाळांनी सहली रद्द केल्या आहेत.काहींनी पुढील आदेश येईपर्यंत सहली स्थगित ठेवल्या आहेत. “जोपर्यंत एसटी प्रशासन सुरक्षिततेबाबत ठोस उपाययोजना करत नाही, तोपर्यंत सहली काढायच्या नाहीत,” अशी भूमिका मुख्याध्यापकांनी घेतली आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अनुभवाधारित शिक्षणावरही होणार आहे. काही शाळा खासगी स्कूलबस किंवा ट्रॅव्हल्सचा पर्याय तपासत आहेत. पण अपघात झाल्यास जबाबदारी कोण घेणार? “स्कूलबसने सहल काढली आणि अपघात झाला तर जबाबदार कोण?” असा थेट सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे. शालेय शिक्षण विभागाकडून स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे नसल्याने शाळाही संभ्रमात आहेत. आता एसटी प्रशासनाला शाळांना भेटी देऊन विश्वास निर्माण करावा लागणार आहे. बसची स्थिती, चालकांची पात्रता, आपत्कालीन व्यवस्था, सुरक्षिततेची हमी हे सर्व स्पष्ट करावं लागेल. जिल्हा प्रशासनाने सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि शालेय सहलींसाठी स्वतंत्र, सुरक्षित आणि आधुनिक बसेस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाही. एसटी प्रशासनाने विश्वासार्हता सिद्ध केली तरच शालेय सहली पुन्हा सुरू होतील. या प्रकरणाबाबत तुमचं मत काय आहे? कॉमेंट करून नक्की सांगा.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • झरेश्वर महादेव मंदिरात प्रथम वर्धापन दिनानिमित्त शिवलिलामृत पारायण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न. ह.भ.प.सदगुरू परमपूज्य श्री.राघव चैतन्य बाबा यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता अहिल्यानगर तालुक्यातील आशितोष भगवान झरेश्वर महादेव मंदिर शिवमल्हारगडच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त नगर तालुक्यातील हिवरे झरे येथे श्रीमद् भागवत कथा व शिवलिलामृत पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 9 फेब्रुवारीपासून या सोहळ्यास सुरवात झाली तर 16 फेब्रुवारी रोजी हरिभक्त पारायण राघव चैतन्य बाबा यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताह कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या सप्ताहात 9 फेब्रुवारी रोजी भागवत महात्म्य,10 फेब्रुवारी रोजी परीक्षित दिग्विजय,जय विजय कथा, 11 फेब्रुवारीला ध्रृव व्याख्यान,अजामेळ व्याख्यान, हिरण्यकश्यपू वध, १२ फेब्रुवारी रोजी गजेंद्र मोक्ष, वामन अवतार, १३ फेब्रुवारी रोजी श्रीराम चरित्र, श्रीकृष्ण जन्मोत्सव, १४ फेब्रुवारी रोजी गोकुळलिला, गोवर्धन लिला, रासलिला १५ फेब्रुवारी रोजी कंस वध श्रीकृष्ण रुक्मिणी विवाह परिक्षित उद्धार यावर कथा प्रवचन झाले तर १६ फेब्रुवारी रोजी ह.भ.प.सदगुरू परमपूज्य श्री.राघव चैतन्य बाबा यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली.रविवार 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते 8 या वेळेस शिवअभिषेक तसेच होम हवन झाला. त्याबरोबरच १६ फेब्रुवारी रोजी भागवत ग्रंथ मिरवणूक व ग्राम प्रदक्षिणा काढण्यात आली. या धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी दररोज मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला. हा आठ दिवसाचा पारायण सोहळा संपन्न करण्यासाठी आशुतोष झरेश्वर मंदिर पंच कमेटीचे खजिनदार रोहिदास भांडवलकर ,अध्यक्ष नारायण रोडे, उपाध्यक्ष ओंकार काटे, सदस्य संजय टकले,अक्षय काटे आदी कमिटीचे पदाधिकारी व हिवरे झरे येथील सर्व ग्रामस्थ व भजन मंडळी यांनी अथक परिश्रम घेतले. या पारायण सोहळ्यानिमित्त टकले परिवार, आंबदास काटे, राहुल बहिरट (खडकी), अभय सिंघ राठी (कमांडर) अहिल्यानगर, समस्त रोडे परिवार, झरेकर परिवार,गोरक्ष गायकवाड, समस्त काटे परिवार,बाबा शेठ झरेकर, आदी दानशूर भूमिपुत्रांनी अन्नदान करून विशेष योगदान केले.राजाराम रखमाजी वाबळे यांनी सभामंडप, परिसर पेंविंग ब्लॉक दिले.
    1
    झरेश्वर महादेव मंदिरात प्रथम वर्धापन दिनानिमित्त शिवलिलामृत पारायण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.
ह.भ.प.सदगुरू परमपूज्य श्री.राघव चैतन्य बाबा यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता
अहिल्यानगर तालुक्यातील आशितोष भगवान झरेश्वर महादेव मंदिर शिवमल्हारगडच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त नगर तालुक्यातील हिवरे झरे येथे श्रीमद् भागवत कथा व शिवलिलामृत पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 9 फेब्रुवारीपासून या सोहळ्यास सुरवात झाली तर 16 फेब्रुवारी रोजी हरिभक्त पारायण राघव चैतन्य बाबा यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताह कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या सप्ताहात 9 फेब्रुवारी रोजी भागवत महात्म्य,10 फेब्रुवारी रोजी परीक्षित दिग्विजय,जय विजय कथा, 11 फेब्रुवारीला ध्रृव व्याख्यान,अजामेळ व्याख्यान, हिरण्यकश्यपू वध, १२ फेब्रुवारी रोजी गजेंद्र मोक्ष, वामन अवतार, १३ फेब्रुवारी रोजी श्रीराम चरित्र, श्रीकृष्ण जन्मोत्सव, १४ फेब्रुवारी रोजी गोकुळलिला, गोवर्धन लिला, रासलिला १५ फेब्रुवारी रोजी कंस वध श्रीकृष्ण रुक्मिणी विवाह परिक्षित उद्धार यावर कथा प्रवचन झाले तर १६ फेब्रुवारी रोजी ह.भ.प.सदगुरू परमपूज्य श्री.राघव चैतन्य बाबा यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली.रविवार 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते 8 या वेळेस शिवअभिषेक तसेच होम हवन झाला. त्याबरोबरच १६ फेब्रुवारी रोजी भागवत ग्रंथ मिरवणूक व ग्राम प्रदक्षिणा काढण्यात आली. या धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी दररोज मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला. 
हा आठ दिवसाचा पारायण सोहळा संपन्न करण्यासाठी आशुतोष झरेश्वर मंदिर पंच कमेटीचे खजिनदार रोहिदास भांडवलकर ,अध्यक्ष
नारायण रोडे, उपाध्यक्ष ओंकार काटे, सदस्य संजय टकले,अक्षय काटे आदी कमिटीचे पदाधिकारी व हिवरे झरे येथील सर्व ग्रामस्थ व भजन मंडळी यांनी अथक परिश्रम घेतले.
या पारायण सोहळ्यानिमित्त टकले परिवार, आंबदास काटे, राहुल बहिरट (खडकी), अभय सिंघ राठी (कमांडर) अहिल्यानगर, समस्त रोडे परिवार, झरेकर परिवार,गोरक्ष गायकवाड, समस्त काटे परिवार,बाबा शेठ झरेकर,
आदी दानशूर भूमिपुत्रांनी अन्नदान करून विशेष योगदान केले.राजाराम रखमाजी वाबळे यांनी सभामंडप, परिसर पेंविंग ब्लॉक दिले.
    user_Deepak Vijay Kaswa
    Deepak Vijay Kaswa
    अहमदनगर, अहमदनगर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • अहिल्यानगरच्या भिंगारजवळ आलमगीर परिसरातील एका घरात शिरलेला बिबट्या जेरबंद करण्यात आला. सोमवारी सकाळी वन विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
    1
    अहिल्यानगरच्या भिंगारजवळ आलमगीर परिसरातील एका घरात शिरलेला बिबट्या जेरबंद करण्यात आला. सोमवारी सकाळी वन विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
    user_राविराज शिंदे
    राविराज शिंदे
    Farmer Nagar, Ahmednagar•
    18 hrs ago
  • Post by AMINIYA COURIER
    1
    Post by AMINIYA COURIER
    user_AMINIYA COURIER
    AMINIYA COURIER
    शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • पुणे अहिल्यानगर‌ महामार्ग वाघोली मध्ये सतत वाहतूक कोंडी होत असते, आज देखील वाघोली मध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी पाहायला मिळाले, वाहतूक कोंडीतून मार्ग काढत नागरिकांना तासन्तास वाहतूक कोंडी थांबावे लागते.
    1
    पुणे अहिल्यानगर‌ महामार्ग वाघोली मध्ये सतत वाहतूक कोंडी होत असते, आज देखील वाघोली मध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी पाहायला मिळाले, वाहतूक कोंडीतून मार्ग काढत नागरिकांना तासन्तास वाहतूक कोंडी थांबावे लागते.
    user_Sachin Reporter Pune
    Sachin Reporter Pune
    पत्रकार Shirur, Pune•
    3 hrs ago
  • शेवगाव (लक्ष्मण मडके) सुसरे ( पाथर्डी) येथील ग्रामसेवक दीर्घकाळ अनुपस्थित राहत असल्याने ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज ठप्प झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विविध शासकीय कामांसाठी नागरिकांना वारंवार ग्रामपंचायत कार्यालयात चकरा माराव्या लागत असून, जन्म-मृत्यू दाखले, उत्पन्न व रहिवासी प्रमाणपत्रे, शासकीय योजनांचे प्रस्ताव, कर नोंदी तसेच पाणी व रस्ते विषयक कामे प्रलंबित राहिल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या संदर्भात ग्रामस्थांच्या वतीने गटविकास अधिकारी, पंचायत समिती पाथर्डी यांच्याकडे लेखी निवेदन देण्यात आले आहे. अर्जदार श्री. उदय सुरेश काकासाहेब (रा. सुसरे, ता. पाथर्डी) यांनी निवेदनात नमूद केले आहे की, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी (सचिव) असून कार्यालयात नियमित उपस्थित राहणे, ग्रामसभेचे आयोजन करणे, विविध नोंदी व दाखले देणे, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि ग्रामपंचायतीचे प्रशासकीय कामकाज सुरळीत ठेवणे ही त्यांची जबाबदारी आहे. मात्र गेल्या महिनाभरापासून संबंधित ग्रामसेवक वारंवार अनुपस्थित राहत असल्याने प्रशासनिक यंत्रणा विस्कळीत झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासोबतच, निवेदन देण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांना संबंधित ग्रामसेवकाने कथितरित्या दमदाटी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. “माझा भाऊ पीएसआय आहे. मला कोणी हिशोब मागितला तर ३५३ चा खोटा गुन्हा दाखल करीन आणि आईचं दूध आठवायला लावीन,” अशा स्वरूपाचे वक्तव्य ग्रामसेवकाने केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या वेळी सुरेश उदागे, संदीप उदागे व सतीश पिसोटे उपस्थित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे गावातील वातावरण तापले असून, संबंधित ग्रामसेवकाविरुद्ध तात्काळ चौकशी करून शिस्तभंगाची कारवाई करावी तसेच सुसरे गावासाठी स्वतंत्र व नियमित नवीन ग्रामसेवकाची दोन दिवसांत नेमणूक करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. अन्यथा पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे पंचायत समिती प्रशासनासमोर ग्रामपातळीवरील कामकाज सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले असून, संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा सुसरे ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
    4
    शेवगाव (लक्ष्मण मडके)
सुसरे ( पाथर्डी) येथील ग्रामसेवक दीर्घकाळ अनुपस्थित राहत असल्याने ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज ठप्प झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विविध शासकीय कामांसाठी नागरिकांना वारंवार ग्रामपंचायत कार्यालयात चकरा माराव्या लागत असून, जन्म-मृत्यू दाखले, उत्पन्न व रहिवासी प्रमाणपत्रे, शासकीय योजनांचे प्रस्ताव, कर नोंदी तसेच पाणी व रस्ते विषयक कामे प्रलंबित राहिल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
या संदर्भात ग्रामस्थांच्या वतीने गटविकास अधिकारी, पंचायत समिती पाथर्डी यांच्याकडे लेखी निवेदन देण्यात आले आहे. अर्जदार श्री. उदय सुरेश काकासाहेब (रा. सुसरे, ता. पाथर्डी) यांनी निवेदनात नमूद केले आहे की, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी (सचिव) असून कार्यालयात नियमित उपस्थित राहणे, ग्रामसभेचे आयोजन करणे, विविध नोंदी व दाखले देणे, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि ग्रामपंचायतीचे प्रशासकीय कामकाज सुरळीत ठेवणे ही त्यांची जबाबदारी आहे. मात्र गेल्या महिनाभरापासून संबंधित ग्रामसेवक वारंवार अनुपस्थित राहत असल्याने प्रशासनिक यंत्रणा विस्कळीत झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यासोबतच, निवेदन देण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांना संबंधित ग्रामसेवकाने कथितरित्या दमदाटी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. “माझा भाऊ पीएसआय आहे. मला कोणी हिशोब मागितला तर ३५३ चा खोटा गुन्हा दाखल करीन आणि आईचं दूध आठवायला लावीन,” अशा स्वरूपाचे वक्तव्य ग्रामसेवकाने केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या वेळी सुरेश उदागे, संदीप उदागे व सतीश पिसोटे उपस्थित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकारामुळे गावातील वातावरण तापले असून, संबंधित ग्रामसेवकाविरुद्ध तात्काळ चौकशी करून शिस्तभंगाची कारवाई करावी तसेच सुसरे गावासाठी स्वतंत्र व नियमित नवीन ग्रामसेवकाची दोन दिवसांत नेमणूक करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. अन्यथा पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे पंचायत समिती प्रशासनासमोर ग्रामपातळीवरील कामकाज सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले असून, संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा सुसरे ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
    user_Press Reporter Laxman Madake जनता आवाज व लोक आवाज
    Press Reporter Laxman Madake जनता आवाज व लोक आवाज
    शेवगाव, अहमदनगर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • 💪
    1
    💪
    user_Shaikh Irfan
    Shaikh Irfan
    अकोले, अहमदनगर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि फर्स्ट लेडी ब्रिजिट मॅक्रॉन यांचे हार्दिक स्वागत. मुंबईत आगमन झाले असता महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत, भारत-फ्रान्स भागीदारी आणखी मजबूत करून, त्यांच्या भारत भेटीदरम्यान त्यांचे स्वागत करणे ही सन्मानाची गोष्ट होती.
    1
    फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि फर्स्ट लेडी ब्रिजिट मॅक्रॉन यांचे हार्दिक स्वागत.
मुंबईत आगमन झाले असता महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत, भारत-फ्रान्स भागीदारी आणखी मजबूत करून, त्यांच्या भारत भेटीदरम्यान त्यांचे स्वागत करणे ही सन्मानाची गोष्ट होती.
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • डंपरचे चाक महिलेच्या पायावरून... बोल्हेगावात थरारक अपघात... अहिल्यानगरच्या बोल्हेगाव फाटा परिसरात आज सकाळी थरारक अपघात झाला. वीटाने भरलेल्या डंपरच्या चाकाखाली आल्याने एका महिलेचा पाय गंभीर जखमी झाला आहे. वारंवार अपघात होणाऱ्या या ठिकाणी गतीरोधक नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अहिल्यानगरच्या बोल्हेगाव फाटा परिसरात आज सकाळी पावणे दहा ते दहाच्या सुमारास वीटाने भरलेल्या डंपरच्या धडकेत एक महिला गंभीर जखमी झाली. डंपरचे चाक थेट महिलेच्या पायावरून गेल्याने तिचा पाय निकामी झाला आहे.या परिसरात रस्ता वारंवार खचत असल्यामुळे सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र, गतीरोधक नसल्याने येथे सातत्याने अपघात घडत आहेत. नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे मागणी करूनही दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप केला आहे.अपघात होताच नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. याच वेळी सनफार्मा विद्यालयातील विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती देण्यासाठी आलेले महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटनेचे कोषाध्यक्ष राजेंद्र धस यांनी परिस्थिती हाताळत जखमी महिलेला रिक्षातून तात्काळ रुग्णालयात दाखल केले.घटनेनंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, या परिसरात तातडीने गतीरोधक बसवावेत; अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे."या ठिकाणी सतत अपघात होत आहेत. प्रशासनाने गतीरोधक बसवले नाहीत, तर आम्ही आंदोलन करू." असा इशारा नागरिकांनी दिला आहे.बोल्हेगाव फाटा परिसरात वारंवार होणारे अपघात प्रशासनाच्या दुर्लक्षाचे जिवंत उदाहरण ठरत आहेत. आता तरी प्रशासन जागे होणार का, असा सवाल नागरिक करत आहेत.
    1
    डंपरचे चाक महिलेच्या पायावरून...
बोल्हेगावात थरारक अपघात...
अहिल्यानगरच्या बोल्हेगाव फाटा परिसरात आज सकाळी थरारक अपघात झाला. वीटाने भरलेल्या डंपरच्या चाकाखाली आल्याने एका महिलेचा पाय गंभीर जखमी झाला आहे. वारंवार अपघात होणाऱ्या या ठिकाणी गतीरोधक नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अहिल्यानगरच्या बोल्हेगाव फाटा परिसरात आज सकाळी पावणे दहा ते दहाच्या सुमारास वीटाने भरलेल्या डंपरच्या धडकेत एक महिला गंभीर जखमी झाली. डंपरचे चाक थेट महिलेच्या पायावरून गेल्याने तिचा पाय निकामी झाला आहे.या परिसरात रस्ता वारंवार खचत असल्यामुळे सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र, गतीरोधक नसल्याने येथे सातत्याने अपघात घडत आहेत. नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे मागणी करूनही दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप केला आहे.अपघात होताच नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. याच वेळी सनफार्मा विद्यालयातील विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती देण्यासाठी आलेले महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटनेचे कोषाध्यक्ष राजेंद्र धस यांनी परिस्थिती हाताळत जखमी महिलेला रिक्षातून तात्काळ रुग्णालयात दाखल केले.घटनेनंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, या परिसरात तातडीने गतीरोधक बसवावेत; अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे."या ठिकाणी सतत अपघात होत आहेत. प्रशासनाने गतीरोधक बसवले नाहीत, तर आम्ही आंदोलन करू." असा इशारा नागरिकांनी दिला आहे.बोल्हेगाव फाटा परिसरात वारंवार होणारे अपघात प्रशासनाच्या दुर्लक्षाचे जिवंत उदाहरण ठरत आहेत. आता तरी प्रशासन जागे होणार का, असा सवाल नागरिक करत आहेत.
    user_Deepak Vijay Kaswa
    Deepak Vijay Kaswa
    अहमदनगर, अहमदनगर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.