logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

ग्रामसेवकाच्या गैरहजेरीवरून सुसरे गावातून संताप; दोन दिवसांत नवीन ग्रामसेवक नेमण्याची मागणी शेवगाव (लक्ष्मण मडके) सुसरे ( पाथर्डी) येथील ग्रामसेवक दीर्घकाळ अनुपस्थित राहत असल्याने ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज ठप्प झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विविध शासकीय कामांसाठी नागरिकांना वारंवार ग्रामपंचायत कार्यालयात चकरा माराव्या लागत असून, जन्म-मृत्यू दाखले, उत्पन्न व रहिवासी प्रमाणपत्रे, शासकीय योजनांचे प्रस्ताव, कर नोंदी तसेच पाणी व रस्ते विषयक कामे प्रलंबित राहिल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या संदर्भात ग्रामस्थांच्या वतीने गटविकास अधिकारी, पंचायत समिती पाथर्डी यांच्याकडे लेखी निवेदन देण्यात आले आहे. अर्जदार श्री. उदय सुरेश काकासाहेब (रा. सुसरे, ता. पाथर्डी) यांनी निवेदनात नमूद केले आहे की, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी (सचिव) असून कार्यालयात नियमित उपस्थित राहणे, ग्रामसभेचे आयोजन करणे, विविध नोंदी व दाखले देणे, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि ग्रामपंचायतीचे प्रशासकीय कामकाज सुरळीत ठेवणे ही त्यांची जबाबदारी आहे. मात्र गेल्या महिनाभरापासून संबंधित ग्रामसेवक वारंवार अनुपस्थित राहत असल्याने प्रशासनिक यंत्रणा विस्कळीत झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासोबतच, निवेदन देण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांना संबंधित ग्रामसेवकाने कथितरित्या दमदाटी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. “माझा भाऊ पीएसआय आहे. मला कोणी हिशोब मागितला तर ३५३ चा खोटा गुन्हा दाखल करीन आणि आईचं दूध आठवायला लावीन,” अशा स्वरूपाचे वक्तव्य ग्रामसेवकाने केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या वेळी सुरेश उदागे, संदीप उदागे व सतीश पिसोटे उपस्थित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे गावातील वातावरण तापले असून, संबंधित ग्रामसेवकाविरुद्ध तात्काळ चौकशी करून शिस्तभंगाची कारवाई करावी तसेच सुसरे गावासाठी स्वतंत्र व नियमित नवीन ग्रामसेवकाची दोन दिवसांत नेमणूक करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. अन्यथा पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे पंचायत समिती प्रशासनासमोर ग्रामपातळीवरील कामकाज सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले असून, संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा सुसरे ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

7 hrs ago
user_Press Reporter Laxman Madake जनता आवाज व लोक आवाज
Press Reporter Laxman Madake जनता आवाज व लोक आवाज
शेवगाव, अहमदनगर, महाराष्ट्र•
7 hrs ago
615cb124-1a70-432c-8b06-209541c820ed

ग्रामसेवकाच्या गैरहजेरीवरून सुसरे गावातून संताप; दोन दिवसांत नवीन ग्रामसेवक नेमण्याची मागणी शेवगाव (लक्ष्मण मडके) सुसरे ( पाथर्डी) येथील ग्रामसेवक दीर्घकाळ अनुपस्थित राहत असल्याने ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज ठप्प झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विविध शासकीय कामांसाठी नागरिकांना वारंवार ग्रामपंचायत कार्यालयात चकरा माराव्या लागत असून, जन्म-मृत्यू दाखले, उत्पन्न व रहिवासी प्रमाणपत्रे, शासकीय योजनांचे प्रस्ताव, कर नोंदी तसेच पाणी व रस्ते विषयक कामे प्रलंबित राहिल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या संदर्भात ग्रामस्थांच्या वतीने गटविकास अधिकारी, पंचायत

63b280ce-a54b-4e1b-be6b-5a77f23ae0f2

समिती पाथर्डी यांच्याकडे लेखी निवेदन देण्यात आले आहे. अर्जदार श्री. उदय सुरेश काकासाहेब (रा. सुसरे, ता. पाथर्डी) यांनी निवेदनात नमूद केले आहे की, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी (सचिव) असून कार्यालयात नियमित उपस्थित राहणे, ग्रामसभेचे आयोजन करणे, विविध नोंदी व दाखले देणे, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि ग्रामपंचायतीचे प्रशासकीय कामकाज सुरळीत ठेवणे ही त्यांची जबाबदारी आहे. मात्र गेल्या महिनाभरापासून संबंधित ग्रामसेवक वारंवार अनुपस्थित राहत असल्याने

122cec4e-f84e-485e-8cf9-7883a6aad5b0

प्रशासनिक यंत्रणा विस्कळीत झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासोबतच, निवेदन देण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांना संबंधित ग्रामसेवकाने कथितरित्या दमदाटी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. “माझा भाऊ पीएसआय आहे. मला कोणी हिशोब मागितला तर ३५३ चा खोटा गुन्हा दाखल करीन आणि आईचं दूध आठवायला लावीन,” अशा स्वरूपाचे वक्तव्य ग्रामसेवकाने केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या वेळी सुरेश उदागे, संदीप उदागे व सतीश पिसोटे उपस्थित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे गावातील वातावरण तापले असून,

संबंधित ग्रामसेवकाविरुद्ध तात्काळ चौकशी करून शिस्तभंगाची कारवाई करावी तसेच सुसरे गावासाठी स्वतंत्र व नियमित नवीन ग्रामसेवकाची दोन दिवसांत नेमणूक करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. अन्यथा पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे पंचायत समिती प्रशासनासमोर ग्रामपातळीवरील कामकाज सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले असून, संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा सुसरे ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • सिल्लोड शहरात शोककळा, माजी मंत्री आ.अब्दुल सत्तार यांच्या पत्नीचे निधन, सिल्लोड शहराच्या माजी नगराध्यक्षा नफीसा बेगम अब्दुल सत्तार यांचे निधन सिल्लोड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या नगराध्यक्षा नफिसा बेगम यांचा निधन. अंत्ययात्रा मध्ये हजारो नागरिकांनी...
    1
    सिल्लोड शहरात शोककळा, माजी मंत्री  आ.अब्दुल सत्तार यांच्या पत्नीचे निधन, सिल्लोड शहराच्या माजी नगराध्यक्षा नफीसा बेगम अब्दुल सत्तार यांचे निधन सिल्लोड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या नगराध्यक्षा नफिसा बेगम यांचा निधन. अंत्ययात्रा मध्ये हजारो नागरिकांनी...
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • अहिल्यानगरात ‘हिंद-दी-चादर’ जनजागृतीची सुरुवात ! श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त विशेष चित्ररथाचे लोकार्पण या चित्ररथाद्वारे जिल्हाभर त्यांच्या शौर्य-त्याग, धर्मरक्षण आणि मानवतेच्या संदेशाचा प्रसार होणार. 📍भव्य समागम : २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ – खारघर, नवी मुंबई 👉 सर्व भाविकांनी उपस्थित राहण्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे आवाहन #HindDiChadar #GuruTeghBahadurJi #शौर्यआणित्याग #धर्मरक्षण #SikhHistory #Ahilyanagar #NaviMumbai #Samagam2026 #InspirationalHistory #MaharashtraEvents #ReligiousHarmony #WaheguruJi #MarathiReels #ViralReels #TrendingNow
    1
    अहिल्यानगरात ‘हिंद-दी-चादर’ जनजागृतीची सुरुवात !
श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त विशेष चित्ररथाचे लोकार्पण
या चित्ररथाद्वारे जिल्हाभर त्यांच्या शौर्य-त्याग, धर्मरक्षण आणि मानवतेच्या संदेशाचा प्रसार होणार.
📍भव्य समागम : २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ – खारघर, नवी मुंबई
👉 सर्व भाविकांनी उपस्थित राहण्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे आवाहन
#HindDiChadar #GuruTeghBahadurJi #शौर्यआणित्याग #धर्मरक्षण #SikhHistory #Ahilyanagar #NaviMumbai #Samagam2026 #InspirationalHistory #MaharashtraEvents #ReligiousHarmony #WaheguruJi #MarathiReels #ViralReels #TrendingNow
    user_राविराज शिंदे
    राविराज शिंदे
    Farmer Nagar, Ahmednagar•
    23 hrs ago
  • Post by शेख महेशर ताहेर(पञकार)
    1
    Post by शेख महेशर ताहेर(पञकार)
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • बालेपीर भागातील नागरिकांची मागणी तीन ते चार दिवसाला पाणी सोडण्यात यावे.
    1
    बालेपीर भागातील नागरिकांची मागणी तीन ते चार दिवसाला पाणी सोडण्यात यावे.
    user_AapTak Hindi News Channel
    AapTak Hindi News Channel
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • नागपुर से वर्धा जा रही ग्रैंड ट्रैक एक्सप्रेस ट्रेन में लगी भीषण आग, सामने आया खौफनाक वीडियो। महाराष्ट्र के वर्धा से एक बड़ी खबर सामने आ रही है। यहां ग्रैंड ट्रैक एक्सप्रेस ट्रेन की एक बोगी में भीषण आग लग गई। आग लगने की सूचना मिलटे ही ट्रेन को रुकवा गया और सभी यात्रियों को बाहर निकाला गया। इस हादसे में किसी यात्री के घायल होने की खबर नहीं है। ट्रेन में आग लगने का वीडियो भी सामने आया है। वीडियो में साफ देखा जा सकता है कि ट्रेन की बोगी से आग की लपटें निकल रही है। ट्रेन रेलवे ट्रैक पर खड़ी है और आग बुझाने की कोशिश की जा रही है। जानाकरी के अनुसार, यह ट्रेन नागपुर से वर्धा जा रही थी। हेलोडी के पास अचानक ट्रेन की एक बोगी में आग लग गई। फिलहाल आग पर काबू पा लिया गया है।
    1
    नागपुर से वर्धा जा रही ग्रैंड ट्रैक एक्सप्रेस ट्रेन में लगी भीषण आग, सामने आया खौफनाक वीडियो।
महाराष्ट्र के वर्धा से एक बड़ी खबर सामने आ रही है। यहां ग्रैंड ट्रैक एक्सप्रेस ट्रेन की एक बोगी में भीषण आग लग गई। आग लगने की सूचना मिलटे ही ट्रेन को रुकवा गया और सभी यात्रियों को बाहर निकाला गया। इस हादसे में किसी यात्री के घायल होने की खबर नहीं है। ट्रेन में आग लगने का वीडियो भी सामने आया है। वीडियो में साफ देखा जा सकता है कि ट्रेन की बोगी से आग की लपटें निकल रही है। ट्रेन रेलवे ट्रैक पर खड़ी है और आग बुझाने की कोशिश की जा रही है। जानाकरी के अनुसार, यह ट्रेन नागपुर से वर्धा जा रही थी। हेलोडी के पास अचानक ट्रेन की एक बोगी में आग लग गई। फिलहाल आग पर काबू पा लिया गया है।
    user_Krishna Bhabal
    Krishna Bhabal
    Bank of india Maharashtra•
    12 hrs ago
  • जालन्यात पहिल्यांदा पत्रकार संरक्षण कायदा अनुसार गुन्हा नोंद पत्रकारीते यश
    1
    जालन्यात पहिल्यांदा पत्रकार संरक्षण कायदा अनुसार गुन्हा नोंद पत्रकारीते यश
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    पत्रकार जालना, जालना, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • एसटीच्या ढिसाळ नियोजनामुळे शालेय सहली धोक्यात | विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ? जिल्ह्यातील शालेय सहली आता धोक्यात आल्या आहेत! विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. एसटी महामंडळाच्या ढिसाळ नियोजनामुळे दोन गंभीर घटना समोर आल्या आहेत… आणि आता अनेक शाळांनी सहलींना ब्रेक लावण्याचा निर्णय घेतला आहे. नेमकं काय घडलं? पाहूया सविस्तर… अहिल्यानगर तालुक्यातील जेऊर येथील संतुकनाथ इंग्लिश विद्यालयाची कोकण दर्शन सहल आयोजित करण्यात आली होती. या सहलीसाठी तारकपूर आगाराकडून पाच बसेस देण्यात आल्या. मात्र प्रवास सुरू झाल्यानंतर काही अंतरावरच एका बसचा बिघाड झाला. शिरूरजवळ बस अचानक बंद पडली… विद्यार्थ्यांचा ताफा रस्त्यात अडकला. शिरूर आगारातून सीएनजी बस मागविण्यात आली,पण ती घाट मार्गासाठी सक्षम नव्हती! तळेगाव दाभाडे येथे पुन्हा बस बदलावी लागली आणि पालीजवळ बसच्या चाकातून धूर निघू लागल्याने आणखी गोंधळ उडाला. विद्यार्थिनींना दाटीवाटीत बसवण्यात आलं… शेवटी श्रीवर्धन आगारातून नवीन बस मागवून सहल कसाबसा पूर्ण करण्यात आली. या सगळ्या प्रकारात विद्यार्थ्यांना शारीरिक थकवा, मानसिक ताण आणि भीतीचा सामना करावा लागला. या घटनेनंतर काही दिवसांतच नेवासा तालुक्यातील पिंपरी शहाली येथील जिल्हा परिषद शाळेच्या बसला अपघात झाला. प्राथमिक तपासात समोर आलं की, चालकाला सलग अतिरिक्त ड्युटी देण्यात आली होती.थकलेल्या अवस्थेतच त्याला प्रवासासाठी पाठवण्यात आलं. परिणामी चालकाचा ताबा सुटून अपघात झाला. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली… मात्र अनेक विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती झाल्या. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. शिक्षक संघटनांचा आरोप आहे की – बसची फिटनेस तपासणी होत नाही चालकांची वैद्यकीय तपासणी होत नाही विश्रांती वेळ दिली जात नाही आणि प्रवासासाठी योग्य बस निवडली जात नाही “उत्पन्न वाढवण्यासाठी जुन्या आणि बिघडलेल्या बसेस सहलींसाठी दिल्या जात आहेत”अशी संतप्त प्रतिक्रिया शिक्षक आणि पालकांनी दिली आहे. या घटनांनंतर अनेक शाळांनी सहली रद्द केल्या आहेत.काहींनी पुढील आदेश येईपर्यंत सहली स्थगित ठेवल्या आहेत. “जोपर्यंत एसटी प्रशासन सुरक्षिततेबाबत ठोस उपाययोजना करत नाही, तोपर्यंत सहली काढायच्या नाहीत,” अशी भूमिका मुख्याध्यापकांनी घेतली आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अनुभवाधारित शिक्षणावरही होणार आहे. काही शाळा खासगी स्कूलबस किंवा ट्रॅव्हल्सचा पर्याय तपासत आहेत. पण अपघात झाल्यास जबाबदारी कोण घेणार? “स्कूलबसने सहल काढली आणि अपघात झाला तर जबाबदार कोण?” असा थेट सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे. शालेय शिक्षण विभागाकडून स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे नसल्याने शाळाही संभ्रमात आहेत. आता एसटी प्रशासनाला शाळांना भेटी देऊन विश्वास निर्माण करावा लागणार आहे. बसची स्थिती, चालकांची पात्रता, आपत्कालीन व्यवस्था, सुरक्षिततेची हमी हे सर्व स्पष्ट करावं लागेल. जिल्हा प्रशासनाने सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि शालेय सहलींसाठी स्वतंत्र, सुरक्षित आणि आधुनिक बसेस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाही. एसटी प्रशासनाने विश्वासार्हता सिद्ध केली तरच शालेय सहली पुन्हा सुरू होतील. या प्रकरणाबाबत तुमचं मत काय आहे? कॉमेंट करून नक्की सांगा.
    1
    एसटीच्या ढिसाळ नियोजनामुळे शालेय सहली धोक्यात | विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ?
जिल्ह्यातील शालेय सहली आता धोक्यात आल्या आहेत!
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
एसटी महामंडळाच्या ढिसाळ नियोजनामुळे दोन गंभीर घटना समोर आल्या आहेत…
आणि आता अनेक शाळांनी सहलींना ब्रेक लावण्याचा निर्णय घेतला आहे.
नेमकं काय घडलं? पाहूया सविस्तर…
अहिल्यानगर तालुक्यातील जेऊर येथील संतुकनाथ इंग्लिश विद्यालयाची कोकण दर्शन सहल आयोजित करण्यात आली होती.
या सहलीसाठी तारकपूर आगाराकडून पाच बसेस देण्यात आल्या.
मात्र प्रवास सुरू झाल्यानंतर काही अंतरावरच एका बसचा बिघाड झाला.
शिरूरजवळ बस अचानक बंद पडली…
विद्यार्थ्यांचा ताफा रस्त्यात अडकला.
शिरूर आगारातून सीएनजी बस मागविण्यात आली,पण ती घाट मार्गासाठी सक्षम नव्हती!
तळेगाव दाभाडे येथे पुन्हा बस बदलावी लागली आणि पालीजवळ बसच्या चाकातून धूर निघू लागल्याने आणखी गोंधळ उडाला.
विद्यार्थिनींना दाटीवाटीत बसवण्यात आलं…
शेवटी श्रीवर्धन आगारातून नवीन बस मागवून सहल कसाबसा पूर्ण करण्यात आली.
या सगळ्या प्रकारात विद्यार्थ्यांना शारीरिक थकवा, मानसिक ताण आणि भीतीचा सामना करावा लागला.
या घटनेनंतर काही दिवसांतच नेवासा तालुक्यातील पिंपरी शहाली येथील जिल्हा परिषद शाळेच्या बसला अपघात झाला.
प्राथमिक तपासात समोर आलं की, चालकाला सलग अतिरिक्त ड्युटी देण्यात आली होती.थकलेल्या अवस्थेतच त्याला प्रवासासाठी पाठवण्यात आलं.
परिणामी चालकाचा ताबा सुटून अपघात झाला.
सुदैवाने मोठी जीवितहानी टळली…
मात्र अनेक विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती झाल्या.
या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
शिक्षक संघटनांचा आरोप आहे की –
बसची फिटनेस तपासणी होत नाही
चालकांची वैद्यकीय तपासणी होत नाही
विश्रांती वेळ दिली जात नाही
आणि प्रवासासाठी योग्य बस निवडली जात नाही
“उत्पन्न वाढवण्यासाठी जुन्या आणि बिघडलेल्या बसेस सहलींसाठी दिल्या जात आहेत”अशी संतप्त प्रतिक्रिया शिक्षक आणि पालकांनी दिली आहे.
या घटनांनंतर अनेक शाळांनी सहली रद्द केल्या आहेत.काहींनी पुढील आदेश येईपर्यंत सहली स्थगित ठेवल्या आहेत.
“जोपर्यंत एसटी प्रशासन सुरक्षिततेबाबत ठोस उपाययोजना करत नाही, तोपर्यंत सहली काढायच्या नाहीत,”
अशी भूमिका मुख्याध्यापकांनी घेतली आहे.
याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अनुभवाधारित शिक्षणावरही होणार आहे.
काही शाळा खासगी स्कूलबस किंवा ट्रॅव्हल्सचा पर्याय तपासत आहेत.
पण अपघात झाल्यास जबाबदारी कोण घेणार?
“स्कूलबसने सहल काढली आणि अपघात झाला तर जबाबदार कोण?”
असा थेट सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
शालेय शिक्षण विभागाकडून स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे नसल्याने शाळाही संभ्रमात आहेत.
आता एसटी प्रशासनाला शाळांना भेटी देऊन विश्वास निर्माण करावा लागणार आहे.
बसची स्थिती, चालकांची पात्रता, आपत्कालीन व्यवस्था, सुरक्षिततेची हमी
हे सर्व स्पष्ट करावं लागेल.
जिल्हा प्रशासनाने सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि शालेय सहलींसाठी स्वतंत्र, सुरक्षित आणि आधुनिक बसेस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाही.
एसटी प्रशासनाने विश्वासार्हता सिद्ध केली तरच शालेय सहली पुन्हा सुरू होतील.
या प्रकरणाबाबत तुमचं मत काय आहे?
कॉमेंट करून नक्की सांगा.
    user_Deepak Vijay Kaswa
    Deepak Vijay Kaswa
    अहमदनगर, अहमदनगर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • सिल्लोड चे आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नीचे निधन, सिल्लोड शहराच्या माजी नगराध्यक्षा नफीसा बेगम अब्दुल सत्तार यांचे निधन छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात शोककळा, दहा वाजता अंत्यविधी, अंत्यविधीत हजारोच्या संख्येने...
    1
    सिल्लोड चे आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नीचे निधन,
सिल्लोड शहराच्या माजी नगराध्यक्षा  नफीसा बेगम अब्दुल सत्तार यांचे निधन छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात शोककळा, दहा वाजता अंत्यविधी, अंत्यविधीत हजारोच्या संख्येने...
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • (प्रतिनिधी):- मराठा सेवा संघ बीड व अंतर्गत सर्व कक्ष यांच्या वतीने दरवर्षी शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या वर्षीही शिवजन्मोत्सव सोहळा दिनांक २०/०२/२०२६ शुक्रवार वार रोजी ठीक-सांय. ०७:००वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बीड या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रम प्रसंगी विविध क्षेत्रात कार्यरत समाजातील तळागाळातील व्यक्तीसाठी योगदान देणाऱ्या समाज रत्नांचा मराठा भूषण पुरस्कार देऊन विशेष गौरव करण्यात येणार आहे. शिवजन्मोत्सव सोहळ्यात मराठा भूषण पुरस्काराने सामाजिक क्षेत्रात अतुलनीय कार्य करणारे शिवश्री डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, वैद्यकीय क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे प्रसिद्ध बाल रोगतज्ञ शिवश्री डॉ.प्रदीप शेळके, सामाजिक व उद्योग क्षेत्रातील शिवश्री अँड.प्रकाश कवठेकर, महिला मधून जिजाऊ रत्न पुरस्काराने शिवमती जयश्रीताई पांडुरंग सावंत तसेच विशेष गौरव पुरस्काराने समाज प्रबोधनकार शिवश्री संतोष डोंगरे व प्रशासकीय क्षेत्रातून शिवश्री मधुकर शेळके यांना मान्यवरांच्या हस्ते मराठा समाज भूषण पुरस्कार देवून गौरव करण्यात येणार आहे. या वेळी प्रसिद्ध व्याख्याते शिवश्री हनुमंत पवार यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीडचे तहसीलदार मा.चंद्रकांत शेळके साहेब हे राहणार असून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बीड जिल्ह्याच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शिवमती प्रियाराणी पाटील, शिवश्री अजय पाटील (अध्यक्ष छत्रपती शाहू महाराज नागरी सहकारी बँक बीड), बीड जिल्हा हिवताप अधिकारी शिवश्री विजयसिंह शिंदे, मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष शिवश्री अशोक ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत. या सर्व मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये मान्यवरांना मराठा समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तरी सर्व शिवप्रेमींनी शिवजन्मोत्सव व मराठा भूषण पुरस्कार सोहळयास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन मराठा सेवा संघ बीड, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड व अंतर्गत सर्व कक्षाच्या वतीने करण्यात येते.
    1
    (प्रतिनिधी):- मराठा सेवा संघ बीड व अंतर्गत सर्व कक्ष यांच्या वतीने दरवर्षी शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या वर्षीही शिवजन्मोत्सव सोहळा दिनांक २०/०२/२०२६ शुक्रवार वार रोजी ठीक-सांय. ०७:००वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बीड या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रम प्रसंगी विविध क्षेत्रात कार्यरत समाजातील तळागाळातील व्यक्तीसाठी योगदान देणाऱ्या समाज रत्नांचा मराठा भूषण पुरस्कार देऊन विशेष गौरव करण्यात येणार आहे. शिवजन्मोत्सव सोहळ्यात मराठा भूषण पुरस्काराने सामाजिक क्षेत्रात अतुलनीय कार्य करणारे शिवश्री डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, वैद्यकीय क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे प्रसिद्ध बाल रोगतज्ञ शिवश्री डॉ.प्रदीप शेळके, सामाजिक व उद्योग क्षेत्रातील शिवश्री अँड.प्रकाश कवठेकर, महिला मधून जिजाऊ रत्न पुरस्काराने शिवमती जयश्रीताई पांडुरंग सावंत तसेच विशेष गौरव पुरस्काराने समाज प्रबोधनकार शिवश्री संतोष डोंगरे व प्रशासकीय क्षेत्रातून शिवश्री मधुकर शेळके यांना मान्यवरांच्या हस्ते मराठा समाज भूषण पुरस्कार देवून गौरव करण्यात येणार आहे. या वेळी प्रसिद्ध व्याख्याते शिवश्री हनुमंत पवार यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीडचे तहसीलदार मा.चंद्रकांत शेळके साहेब हे राहणार असून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बीड जिल्ह्याच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शिवमती प्रियाराणी पाटील, शिवश्री अजय पाटील (अध्यक्ष छत्रपती शाहू महाराज नागरी सहकारी बँक बीड), बीड जिल्हा हिवताप अधिकारी शिवश्री विजयसिंह शिंदे, मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष शिवश्री अशोक ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत. या सर्व मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये मान्यवरांना मराठा समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तरी सर्व शिवप्रेमींनी शिवजन्मोत्सव व मराठा भूषण पुरस्कार सोहळयास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन मराठा सेवा संघ बीड, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड व अंतर्गत सर्व कक्षाच्या वतीने करण्यात येते.
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    14 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.