मराठा सेवा संघाचे मराठा भूषण पुरस्कार जाहीर...!! --------------- (प्रतिनिधी):- मराठा सेवा संघ बीड व अंतर्गत सर्व कक्ष यांच्या वतीने दरवर्षी शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या वर्षीही शिवजन्मोत्सव सोहळा दिनांक २०/०२/२०२६ शुक्रवार वार रोजी ठीक-सांय. ०७:००वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बीड या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रम प्रसंगी विविध क्षेत्रात कार्यरत समाजातील तळागाळातील व्यक्तीसाठी योगदान देणाऱ्या समाज रत्नांचा मराठा भूषण पुरस्कार देऊन विशेष गौरव करण्यात येणार आहे. शिवजन्मोत्सव सोहळ्यात मराठा भूषण पुरस्काराने सामाजिक क्षेत्रात अतुलनीय कार्य करणारे शिवश्री डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, वैद्यकीय क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे प्रसिद्ध बाल रोगतज्ञ शिवश्री डॉ.प्रदीप शेळके, सामाजिक व उद्योग क्षेत्रातील शिवश्री अँड.प्रकाश कवठेकर, महिला मधून जिजाऊ रत्न पुरस्काराने शिवमती जयश्रीताई पांडुरंग सावंत तसेच विशेष गौरव पुरस्काराने समाज प्रबोधनकार शिवश्री संतोष डोंगरे व प्रशासकीय क्षेत्रातून शिवश्री मधुकर शेळके यांना मान्यवरांच्या हस्ते मराठा समाज भूषण पुरस्कार देवून गौरव करण्यात येणार आहे. या वेळी प्रसिद्ध व्याख्याते शिवश्री हनुमंत पवार यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीडचे तहसीलदार मा.चंद्रकांत शेळके साहेब हे राहणार असून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बीड जिल्ह्याच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शिवमती प्रियाराणी पाटील, शिवश्री अजय पाटील (अध्यक्ष छत्रपती शाहू महाराज नागरी सहकारी बँक बीड), बीड जिल्हा हिवताप अधिकारी शिवश्री विजयसिंह शिंदे, मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष शिवश्री अशोक ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत. या सर्व मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये मान्यवरांना मराठा समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तरी सर्व शिवप्रेमींनी शिवजन्मोत्सव व मराठा भूषण पुरस्कार सोहळयास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन मराठा सेवा संघ बीड, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड व अंतर्गत सर्व कक्षाच्या वतीने करण्यात येते.

- Post by शेख महेशर ताहेर(पञकार)1
- बालेपीर भागातील नागरिकांची मागणी तीन ते चार दिवसाला पाणी सोडण्यात यावे.1
- शेवगाव (लक्ष्मण मडके) सुसरे ( पाथर्डी) येथील ग्रामसेवक दीर्घकाळ अनुपस्थित राहत असल्याने ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज ठप्प झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विविध शासकीय कामांसाठी नागरिकांना वारंवार ग्रामपंचायत कार्यालयात चकरा माराव्या लागत असून, जन्म-मृत्यू दाखले, उत्पन्न व रहिवासी प्रमाणपत्रे, शासकीय योजनांचे प्रस्ताव, कर नोंदी तसेच पाणी व रस्ते विषयक कामे प्रलंबित राहिल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या संदर्भात ग्रामस्थांच्या वतीने गटविकास अधिकारी, पंचायत समिती पाथर्डी यांच्याकडे लेखी निवेदन देण्यात आले आहे. अर्जदार श्री. उदय सुरेश काकासाहेब (रा. सुसरे, ता. पाथर्डी) यांनी निवेदनात नमूद केले आहे की, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी (सचिव) असून कार्यालयात नियमित उपस्थित राहणे, ग्रामसभेचे आयोजन करणे, विविध नोंदी व दाखले देणे, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि ग्रामपंचायतीचे प्रशासकीय कामकाज सुरळीत ठेवणे ही त्यांची जबाबदारी आहे. मात्र गेल्या महिनाभरापासून संबंधित ग्रामसेवक वारंवार अनुपस्थित राहत असल्याने प्रशासनिक यंत्रणा विस्कळीत झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासोबतच, निवेदन देण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांना संबंधित ग्रामसेवकाने कथितरित्या दमदाटी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. “माझा भाऊ पीएसआय आहे. मला कोणी हिशोब मागितला तर ३५३ चा खोटा गुन्हा दाखल करीन आणि आईचं दूध आठवायला लावीन,” अशा स्वरूपाचे वक्तव्य ग्रामसेवकाने केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या वेळी सुरेश उदागे, संदीप उदागे व सतीश पिसोटे उपस्थित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे गावातील वातावरण तापले असून, संबंधित ग्रामसेवकाविरुद्ध तात्काळ चौकशी करून शिस्तभंगाची कारवाई करावी तसेच सुसरे गावासाठी स्वतंत्र व नियमित नवीन ग्रामसेवकाची दोन दिवसांत नेमणूक करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. अन्यथा पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे पंचायत समिती प्रशासनासमोर ग्रामपातळीवरील कामकाज सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले असून, संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा सुसरे ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.4
- जालना - आयशर व दुचाकीचा अपघात एकजण ठार एक गंभीर ! भरघाव आयशर दुचाकीला धडकला जालन्यात भीषण अपघाताची एक घटना समोर येत असून भारघव आयशर व दुचाकीचा अपघात होऊन एक तरुण जण ठार तर एक गंभीर झाल्याची घटना आज मंगळवारी 17 फेब्रुवारी रोजी घडलीय.1
- Post by YUVA JALNA NEWS1
- भोकरदन मराठी पत्रकार संघाची निवडणूक बिनविरोध, अध्यक्ष पदी सांडू पाटील नामदे, सचिव पदी दिपक सोळंके, तर उपाध्यक्ष पदी सुरेश शेळके, शेख सलीम यांची निवड Bharat 24taas News1
- नागपुर से वर्धा जा रही ग्रैंड ट्रैक एक्सप्रेस ट्रेन में लगी भीषण आग, सामने आया खौफनाक वीडियो। महाराष्ट्र के वर्धा से एक बड़ी खबर सामने आ रही है। यहां ग्रैंड ट्रैक एक्सप्रेस ट्रेन की एक बोगी में भीषण आग लग गई। आग लगने की सूचना मिलटे ही ट्रेन को रुकवा गया और सभी यात्रियों को बाहर निकाला गया। इस हादसे में किसी यात्री के घायल होने की खबर नहीं है। ट्रेन में आग लगने का वीडियो भी सामने आया है। वीडियो में साफ देखा जा सकता है कि ट्रेन की बोगी से आग की लपटें निकल रही है। ट्रेन रेलवे ट्रैक पर खड़ी है और आग बुझाने की कोशिश की जा रही है। जानाकरी के अनुसार, यह ट्रेन नागपुर से वर्धा जा रही थी। हेलोडी के पास अचानक ट्रेन की एक बोगी में आग लग गई। फिलहाल आग पर काबू पा लिया गया है।1
- Post by शेख महेशर ताहेर(पञकार)1