logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

डेरवण-राजेवाडी धरण दुरुस्ती कामाची आमदारांकडून पाहणी; 14.99 कोटींच्या कामाला गती डेरवण-राजेवाडी धरण दुरुस्ती कामाची आमदारांकडून पाहणी; 14.99 कोटींच्या कामाला गती प्रतिनिधी : स्वाती हडकर चिपळूण : डेरवण-राजेवाडी धरणाच्या दुरुस्तीसाठी रु. 14 कोटी 99 लाखांचा निधी शासन स्तरावर पाठपुरावा करून उपलब्ध करून देण्यात आला असून, या कामाची प्रत्यक्ष पाहणी आमदार शेखर निकम यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह केली. सन 2025 पासून सुरू असलेल्या या दुरुस्ती कामाचा आढावा घेताना आमदार निकम यांनी चिपळूण जलसंधारण विभागाचे उपअभियंता सागर भराडे, जिल्हा परिषद सदस्या पूजा निकम, जि. प. सदस्य संजय कदम तसेच ग्रामस्थ यांच्यासमवेत कामाची सद्यस्थिती जाणून घेतली. यावेळी उपअभियंता सागर भराडे यांनी माहिती देताना सांगितले की, धरणाचे काम सध्या जलद गतीने सुरू असून मातीकाम 20 मे 2026 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच गेट वॉल्व बसविण्याचे कामही मे अखेरपर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. यावर्षी साधारण 40 टक्के पाणीसाठा धरणात साठेल, अशी अपेक्षा आहे. मागील काही वर्षांपासून धरणातील गळतीमुळे परिसरातील सुमारे 40 गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आपण कटिबद्ध असल्याचे आमदार निकम यांनी स्पष्ट केले. तसेच सन 2027 पर्यंत धरणाचे काम पूर्ण क्षमतेने पूर्ण करून परिसरात मुबलक पाणीसाठा उपलब्ध करून देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या पाहणी दौर्‍यामुळे धरण दुरुस्तीच्या कामाला आणखी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

3 hrs ago
user_चिपळुण न्यूज सं.स्वाती हडकर
चिपळुण न्यूज सं.स्वाती हडकर
चिपळूण, रत्नागिरी, महाराष्ट्र•
3 hrs ago
0fa92bba-c0bb-4e0a-a81d-0ee87831eaa8

डेरवण-राजेवाडी धरण दुरुस्ती कामाची आमदारांकडून पाहणी; 14.99 कोटींच्या कामाला गती डेरवण-राजेवाडी धरण दुरुस्ती कामाची आमदारांकडून पाहणी; 14.99 कोटींच्या कामाला गती प्रतिनिधी : स्वाती हडकर चिपळूण : डेरवण-राजेवाडी धरणाच्या दुरुस्तीसाठी रु. 14 कोटी 99 लाखांचा निधी शासन स्तरावर पाठपुरावा करून उपलब्ध करून देण्यात आला असून, या कामाची प्रत्यक्ष पाहणी आमदार शेखर निकम यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह केली. सन 2025 पासून सुरू असलेल्या या दुरुस्ती कामाचा आढावा घेताना आमदार निकम यांनी चिपळूण जलसंधारण विभागाचे उपअभियंता सागर भराडे, जिल्हा परिषद सदस्या पूजा निकम, जि. प. सदस्य संजय कदम तसेच ग्रामस्थ यांच्यासमवेत कामाची सद्यस्थिती जाणून घेतली. यावेळी उपअभियंता सागर भराडे यांनी माहिती देताना सांगितले की, धरणाचे काम सध्या जलद गतीने सुरू असून मातीकाम 20 मे 2026 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच गेट वॉल्व बसविण्याचे कामही मे अखेरपर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. यावर्षी साधारण 40 टक्के पाणीसाठा धरणात साठेल, अशी अपेक्षा आहे. मागील काही वर्षांपासून धरणातील गळतीमुळे परिसरातील सुमारे 40 गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आपण कटिबद्ध असल्याचे आमदार निकम यांनी स्पष्ट केले. तसेच सन 2027 पर्यंत धरणाचे काम पूर्ण क्षमतेने पूर्ण करून परिसरात मुबलक पाणीसाठा उपलब्ध करून देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या पाहणी दौर्‍यामुळे धरण दुरुस्तीच्या कामाला आणखी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा आशीर्वाद घेतला महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना च्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त साहेबांनी आशीर्वाद दिला आणि मी कायम राहुल तुझ्यासोबत आहे हे शब्द साहेबांचे ऊर्जा देतात एवढ्या व्यस्त वेळेतून राहुलला भेटायचे हे साहेबांच्या लक्षात राहतं हीच माझ्यासाठी सर्वात मोठी ताकद आहे साहेब महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेवटच्या पोलिसांची मदत करेल आणि प्रामाणिक काम करेल तुमची साथ आणि आशीर्वाद असाच माझ्या डोक्यावर राहू द्या ही विनंती महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी व त्या परिवाराला महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा राहुल अर्जुनराव दुबाले संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना तथा महाराष्ट्र शासन गृह विभाग पोलीस निराकरण समन्वय समिती सदस्य
    1
    आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा आशीर्वाद घेतला महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना च्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त साहेबांनी आशीर्वाद दिला आणि मी कायम राहुल तुझ्यासोबत आहे हे शब्द साहेबांचे ऊर्जा देतात एवढ्या व्यस्त वेळेतून राहुलला भेटायचे हे साहेबांच्या लक्षात राहतं हीच माझ्यासाठी सर्वात मोठी ताकद आहे साहेब महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेवटच्या पोलिसांची मदत करेल आणि प्रामाणिक काम करेल तुमची साथ आणि आशीर्वाद असाच माझ्या डोक्यावर राहू द्या ही विनंती महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी व त्या परिवाराला महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 
राहुल अर्जुनराव दुबाले 
संस्थापक अध्यक्ष 
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना
तथा महाराष्ट्र शासन गृह विभाग पोलीस निराकरण समन्वय समिती सदस्य
    user_चिपळुण न्यूज सं.स्वाती हडकर
    चिपळुण न्यूज सं.स्वाती हडकर
    चिपळूण, रत्नागिरी, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया
    1
    Post by संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया
    user_संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया
    संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया
    Local Politician जावळी, सातारा, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • सातारा वाई. वाई नगरपरिषद पाणी पुरवठा विभागचा ढिसाळ कारभार समोर येत आहे मात्र पाणी पुरवठा विभाग अधिकारी व ठेकेदार यांचे कडून जाणीव पूर्वक डोळे केली जात फआहे.पाणी शुद्धीकरणासाठी वाई नगर परिषद महिन्याला लाखों रुपये खर्च करत आहे आणि तेच हजारों लिटर पाणी रोज अशा पद्धतीने गटारित सोडले जात आहे एकी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाच्या बैठका चालू आणि एकीकडे वाई नगरपरिषद पाणी पुरवठा विभागाचा ढिसाळ कारभार याची चर्चा मात्र चांगलीच रंगत आहे.
    1
    सातारा वाई. वाई नगरपरिषद पाणी पुरवठा विभागचा ढिसाळ कारभार समोर येत आहे मात्र पाणी पुरवठा विभाग अधिकारी व ठेकेदार यांचे कडून जाणीव पूर्वक डोळे केली जात फआहे.पाणी शुद्धीकरणासाठी वाई नगर परिषद महिन्याला लाखों रुपये खर्च करत आहे आणि तेच हजारों लिटर पाणी रोज अशा पद्धतीने गटारित सोडले जात आहे एकी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाच्या बैठका चालू आणि एकीकडे वाई नगरपरिषद पाणी पुरवठा विभागाचा ढिसाळ कारभार याची चर्चा मात्र चांगलीच रंगत आहे.
    user_Nityanand More
    Nityanand More
    Auto Rickshaw Driver वाई, सातारा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • विक्रम शिंदे /भोर दि.16 डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती भोर तालुका (एक तालुका, एक जयंती) यांच्या वतीने विश्वरत्न, बोधिसत्व, परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अविनाश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. यामध्ये सामुहिक बुद्धवंदना, भव्य मिरवणूक/शोभारथ, व्याख्यान, अभिवादन सभा, आरोग्य शिबिर(निमा), पथनाट्य (अं.नि.स संघटना), आंबेडकरी जलसा (भोर तालुका सिंगर ग्रुप), भोजन इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेला स्वराज्य निर्माण करून दिले, तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी त्या स्वराज्याला संविधानाच्या माध्यमातून टिकविले, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. भोर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय व अभ्यासिका साठी 2.50 कोटी मंजूर केले आहेत.. अभिवादन सभेवेळी दिवंगत नेते अजित दादा पवार यांनी आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्या माध्यमातून निधी मंजूर केल्याचे रणजितदादा शिवतरे, नगराध्यक्ष नाना आवारे, गटनेते केदार देशपांडे यांनी जाहीर केले. या कार्यक्रमाला पुणे जिल्हा परिषदेचे मा.उपाध्यक्ष रणजीत दादा शिवतरे, जिल्हा परिषदेचे सदस्य विक्रमदादा खुटवड, प्रविणशेठ जगदाळे, नगराध्यक्ष रामचंद्र नाना आवारे, सभापती मनिषाताई कंक, उपसभापती विशाल बंटी कोंडे, गटनेते केदार देशपांडे, उपविभागीय अधिकारी डॉ.विकास खरात, तहसीलदार राजेंद्र नजन, मुख्याधिकारी गजानन शिंदे, पोलिस निरीक्षक अण्णासाहेब पवार, पंचायत समिती सदस्य राजेश बोडके, नगरसेवक कुणाल धुमाळ, अनिल भेलके, वन अधिकारी संतोष कंक, अध्यक्ष भोर शहर संदिप शेटे, विद्यार्थी अध्यक्ष प्रशांत पडवळ, ओबीसी अध्यक्ष मारूती गोरे, डॉ.अरूण बुरांडे, डॉ.इम्रान खान, डॉ.राजेश धिवार, नेहा डोंबे, परवेझ शेख, सोमनाथ ढवळे, बाळासाहेब खुटवड, बाळा शेटे, गौतम शेलार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. भोर तालुक्यातील अविनाश गायकवाड, राजन घोडेस्वार, गणेश साळुंके, अरूण रणखांबे, अक्षय गायकवाड, रणजीत रणखांबे, मयूर गायकवाड, नितीन माने, निलेश घोडेस्वार, सतीश गायकवाड, संतोष जाधव, सिद्धोधन कांबळे, प्रकाश ओव्हाळ, स्वप्निल सावंत, विशाल शाक्य, महेंद्र सपकाळ, सुनील गायकवाड श्रीकांत जाधव, अमोल भालेराव, विकास सपकाळ, दिपक गायकवाड, अनिल गायकवाड, युवराज शेलार, अंकुश साळुंके इत्यादी प्रमुख कार्यकर्त्यांनी जयंती महोत्सवाचे आयोजन केले होते. प्रास्ताविक मयूर गायकवाड यांनी, सूत्रसंचालन राजन घोडेस्वार, तर आभार अविनाश गायकवाड यांनी मानले. 🙏
    1
    विक्रम शिंदे /भोर दि.16 डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती भोर तालुका (एक तालुका, एक जयंती) यांच्या वतीने विश्वरत्न, बोधिसत्व, परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अविनाश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. यामध्ये सामुहिक बुद्धवंदना, भव्य मिरवणूक/शोभारथ, व्याख्यान, अभिवादन सभा, आरोग्य शिबिर(निमा), पथनाट्य (अं.नि.स संघटना), आंबेडकरी जलसा (भोर तालुका सिंगर ग्रुप), भोजन इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेला स्वराज्य निर्माण करून दिले, तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी त्या स्वराज्याला संविधानाच्या माध्यमातून टिकविले, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. भोर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय व अभ्यासिका साठी 2.50 कोटी मंजूर केले आहेत.. अभिवादन सभेवेळी दिवंगत नेते अजित दादा पवार यांनी आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्या माध्यमातून निधी मंजूर केल्याचे रणजितदादा शिवतरे, नगराध्यक्ष नाना आवारे, गटनेते केदार देशपांडे यांनी जाहीर केले.
या कार्यक्रमाला पुणे जिल्हा परिषदेचे मा.उपाध्यक्ष रणजीत दादा शिवतरे, जिल्हा परिषदेचे सदस्य विक्रमदादा खुटवड, प्रविणशेठ जगदाळे, नगराध्यक्ष रामचंद्र नाना आवारे, सभापती मनिषाताई कंक, उपसभापती विशाल बंटी कोंडे, गटनेते केदार देशपांडे, उपविभागीय अधिकारी डॉ.विकास खरात, तहसीलदार राजेंद्र नजन, मुख्याधिकारी गजानन शिंदे, पोलिस निरीक्षक अण्णासाहेब पवार, पंचायत समिती सदस्य राजेश बोडके, नगरसेवक कुणाल धुमाळ, अनिल भेलके, वन अधिकारी संतोष कंक, अध्यक्ष भोर शहर संदिप शेटे, विद्यार्थी अध्यक्ष प्रशांत पडवळ, ओबीसी अध्यक्ष मारूती गोरे, डॉ.अरूण बुरांडे, डॉ.इम्रान खान, डॉ.राजेश धिवार, नेहा डोंबे, परवेझ शेख, सोमनाथ ढवळे, बाळासाहेब खुटवड, बाळा शेटे, गौतम शेलार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 
भोर तालुक्यातील अविनाश गायकवाड, राजन घोडेस्वार, गणेश साळुंके, अरूण रणखांबे, अक्षय गायकवाड, रणजीत रणखांबे, मयूर गायकवाड, नितीन माने, निलेश घोडेस्वार, सतीश गायकवाड, संतोष जाधव, सिद्धोधन कांबळे, प्रकाश ओव्हाळ, स्वप्निल सावंत, विशाल शाक्य, महेंद्र सपकाळ, सुनील गायकवाड श्रीकांत जाधव, अमोल भालेराव, विकास सपकाळ, दिपक गायकवाड, अनिल गायकवाड, युवराज शेलार, अंकुश साळुंके इत्यादी प्रमुख कार्यकर्त्यांनी जयंती महोत्सवाचे आयोजन केले होते. प्रास्ताविक मयूर गायकवाड यांनी, सूत्रसंचालन राजन घोडेस्वार, तर आभार अविनाश गायकवाड यांनी मानले. 🙏
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • पिंपरी चिंचवड :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने चिखली येथील आदित्य लॉजवर छापा टाकून एका मोठ्या देहविक्रय व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे... या कारवाईत ९ पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, त्यात एका बांगलादेशी तरुणीचा समावेश आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या सूचनेनुसार, चिखली येथील देहू-आळंदी रोडवरील आदित्य लॉजवर ही धाड टाकण्यात आली. या ठिकाणी लॉजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. सुटका करण्यात आलेल्या ९ महिलांपैकी एका तरुणीला आरोपींनी बांगलादेशातून तस्करी करून आणले होते. तिला पुन्हा मायदेशी पाठवण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी लॉज मॅनेजर अशोक बाबुराव बाबर आणि कामगार अकिबुल खालेक मुल्ला या दोघांना अटक केली आहे. तसेच लॉज चालक सुदर्शन पवार, जागा मालक नाना बोराटे आणि साहिल ऊर्फ शाहीन मंडल यांच्याविरुद्ध चिखली पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता आणि पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे... #चिखली #पिंपरीचिंचवड #पोलीसकारवाई #देहविक्रयप्रकरण #मानवीतस्करी #रेस्क्यूऑपरेशन #महिलांचीसुटका #गुन्हेगारी #क्राईमन्यूज #पोलिसछापा #बांगलादेशीपीडित #आदित्यलॉज #Chikhali #PimpriChinchwad #PoliceRaid #SexRacketBusted #HumanTrafficking #RescueOperation #CrimeNews #WomenRescued #BangladeshiVictim #IllegalActivities #LodgeRaid #AdityaLodge
    1
    पिंपरी चिंचवड :-
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने चिखली येथील आदित्य लॉजवर छापा टाकून एका मोठ्या देहविक्रय व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे...
या कारवाईत ९ पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, त्यात एका बांगलादेशी तरुणीचा समावेश आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या सूचनेनुसार, चिखली येथील देहू-आळंदी रोडवरील आदित्य लॉजवर ही धाड टाकण्यात आली. या ठिकाणी लॉजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. सुटका करण्यात आलेल्या ९ महिलांपैकी एका तरुणीला आरोपींनी बांगलादेशातून तस्करी करून आणले होते. तिला पुन्हा मायदेशी पाठवण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी लॉज मॅनेजर अशोक बाबुराव बाबर आणि कामगार अकिबुल खालेक मुल्ला या दोघांना अटक केली आहे. तसेच लॉज चालक सुदर्शन पवार, जागा मालक नाना बोराटे आणि साहिल ऊर्फ शाहीन मंडल यांच्याविरुद्ध चिखली पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता आणि पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
#चिखली #पिंपरीचिंचवड #पोलीसकारवाई #देहविक्रयप्रकरण #मानवीतस्करी #रेस्क्यूऑपरेशन #महिलांचीसुटका #गुन्हेगारी #क्राईमन्यूज #पोलिसछापा #बांगलादेशीपीडित #आदित्यलॉज
#Chikhali #PimpriChinchwad #PoliceRaid #SexRacketBusted #HumanTrafficking #RescueOperation #CrimeNews #WomenRescued #BangladeshiVictim #IllegalActivities #LodgeRaid #AdityaLodge
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • कात्रज कोंढावा रोड परिसर शत्रुंजय मंदिरा समोर बी जे पार्क बिल्डिंग च्या समोर चा रस्ता. 10 वर्ष झाली रस्ता असाच आहे. कोणी दखल घेत नाही. त्यामुळे दुकानाच्या धंद्यावर मोठया प्रमाणावर फरक पडला आहे. तरी हे काम लवकरात लवकर करावे ही विनंती.
    3
    कात्रज कोंढावा रोड परिसर शत्रुंजय मंदिरा समोर बी जे पार्क बिल्डिंग च्या समोर चा रस्ता.
10 वर्ष झाली रस्ता असाच आहे. कोणी दखल घेत नाही. त्यामुळे दुकानाच्या धंद्यावर मोठया प्रमाणावर फरक पडला आहे. तरी हे काम लवकरात लवकर करावे ही विनंती.
    user_श्री गणेश इंटरप्राईजेस
    श्री गणेश इंटरप्राईजेस
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    1
    Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • पिंपरी चिंचवड :- आकुर्डी येथील कै. फकीरभाई पानसरे उर्दू शाळेत आरटीई RTE प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्र पडताळणी प्रक्रियेदरम्यान प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. शेकडो पालक आपल्या मुलांसह शाळेत जमा झाले असताना, कर्मचारी कोणतीही पूर्वसूचना न देता निघून गेल्याने पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे... आरटीई प्रवेशासाठी १५ ते २२ एप्रिल हा कालावधी अत्यंत मर्यादित आहे. या अल्प मुदतीत कागदपत्रे पडताळणे आवश्यक असताना, शाळेतील कर्मचारी पालकांना उन्हात ताटकळत ठेवून अचानक निघून गेले. यामुळे संतापलेल्या पालकांनी विचारणा केली की, जर वेळेत पडताळणी झाली नाही आणि मुलांचे वर्ष वाया गेले, तर याला जबाबदार कोण ? असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्षण विभागाने आकुर्डीतील गैरसोयीची माहिती मिळताच जादा कर्मचारी पाठवले असून प्रक्रिया सुरळीत पार पडेल याची काळजी घेतली जात आहे. दरम्यान मुदत संपण्यापूर्वी आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित व्हावा, यासाठी पालकांची धावपळ सुरू असून प्रशासनाने अधिक संवेदनशीलतेने काम करण्याची मागणी होत आहे... #आकुर्डी #पिंपरीचिंचवड #आरटीईप्रवेश #शिक्षणविभाग #पालकांचा_संताप #प्रशासनाचा_गोंधळ #उन्हातहाल #शाळाप्रवेश #विद्यार्थीप्रश्न #RTEगोंधळ #Akurdi #PimpriChinchwad #RTEAdmission #EducationDepartment #ParentsProtest #AdministrativeFailure #SchoolAdmission #StudentIssues #RTEProcess #BreakingNews
    1
    पिंपरी चिंचवड :-
आकुर्डी येथील कै. फकीरभाई पानसरे उर्दू शाळेत आरटीई RTE प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्र पडताळणी प्रक्रियेदरम्यान प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. शेकडो पालक आपल्या मुलांसह शाळेत जमा झाले असताना, कर्मचारी कोणतीही पूर्वसूचना न देता निघून गेल्याने पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे...
आरटीई प्रवेशासाठी १५ ते २२ एप्रिल हा कालावधी अत्यंत मर्यादित आहे. या अल्प मुदतीत कागदपत्रे पडताळणे आवश्यक असताना, शाळेतील कर्मचारी पालकांना उन्हात ताटकळत ठेवून अचानक निघून गेले. यामुळे संतापलेल्या पालकांनी विचारणा केली की, जर वेळेत पडताळणी झाली नाही आणि मुलांचे वर्ष वाया गेले, तर याला जबाबदार कोण ? असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्षण विभागाने आकुर्डीतील गैरसोयीची माहिती मिळताच जादा कर्मचारी पाठवले असून प्रक्रिया सुरळीत पार पडेल याची काळजी घेतली जात आहे. दरम्यान मुदत संपण्यापूर्वी आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित व्हावा, यासाठी पालकांची धावपळ सुरू असून प्रशासनाने अधिक संवेदनशीलतेने काम करण्याची मागणी होत आहे...
#आकुर्डी #पिंपरीचिंचवड #आरटीईप्रवेश #शिक्षणविभाग #पालकांचा_संताप #प्रशासनाचा_गोंधळ #उन्हातहाल #शाळाप्रवेश #विद्यार्थीप्रश्न #RTEगोंधळ
#Akurdi #PimpriChinchwad #RTEAdmission #EducationDepartment #ParentsProtest #AdministrativeFailure #SchoolAdmission #StudentIssues #RTEProcess #BreakingNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.