घागर मोर्चाने प्रशासनाला झटका; लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे मानोरा : तालुक्यातील गादेगाव येथे भीषण पाणीटंचाईमुळे नागरिकांचे हाल होत असताना अखेर संतप्त ग्रामस्थांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन छेडले. पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आलेल्या महिलांनी आक्रमक भूमिका घेतल्याने प्रशासनाची धावपळ उडाली. गावातील नळ योजना २२ एप्रिलपर्यंत सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा माजी सरपंच भारत आडे यांनी यापूर्वीच गटविकास अधिकाऱ्यांना दिला होता. मात्र, ठोस कार्यवाही न झाल्याने अखेर २२ एप्रिल रोजी महिलांनी मोठ्या संख्येने एकत्र येत घागर मोर्चा काढला व ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. परिस्थिती चिघळण्याची चिन्हे दिसताच ग्रामपंचायत प्रशासनाने तत्काळ दखल घेतली. सचिव उल्हास खत्री यांनी सायंकाळपर्यंत गावातील नळ पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. या आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणेदार नैना पोहेकर यांनी पोलिसांचा बंदोबस्त वाढवून घटनास्थळी ताफा पाठवला होता. जमादार सुनील नेमाने, चेतन भोयर यांच्यासह पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवत चोख बंदोबस्त केला. गादेगावातील या आंदोलनामुळे पाणीटंचाईच्या प्रश्नावर प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
घागर मोर्चाने प्रशासनाला झटका; लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे मानोरा : तालुक्यातील गादेगाव येथे भीषण पाणीटंचाईमुळे नागरिकांचे हाल होत असताना अखेर संतप्त ग्रामस्थांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन छेडले. पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आलेल्या महिलांनी आक्रमक भूमिका घेतल्याने प्रशासनाची धावपळ उडाली. गावातील नळ योजना २२ एप्रिलपर्यंत सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा माजी सरपंच भारत आडे यांनी यापूर्वीच गटविकास अधिकाऱ्यांना दिला होता. मात्र, ठोस कार्यवाही न झाल्याने अखेर २२ एप्रिल रोजी महिलांनी मोठ्या संख्येने एकत्र येत घागर मोर्चा काढला व ग्रामपंचायत
कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. परिस्थिती चिघळण्याची चिन्हे दिसताच ग्रामपंचायत प्रशासनाने तत्काळ दखल घेतली. सचिव उल्हास खत्री यांनी सायंकाळपर्यंत गावातील नळ पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. या आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणेदार नैना पोहेकर यांनी पोलिसांचा बंदोबस्त वाढवून घटनास्थळी ताफा पाठवला होता. जमादार सुनील नेमाने, चेतन भोयर यांच्यासह पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवत चोख बंदोबस्त केला. गादेगावातील या आंदोलनामुळे पाणीटंचाईच्या प्रश्नावर प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
- Post by Santosh Dhakulkar1
- Post by Shaikh irfan Shaikh isa1
- Post by Amravati News Update1
- Post by Sagar Shinde1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- मूर्तिजापूर: विज्ञानाच्या युगात आजही समाजाला अंधश्रद्धेचा विळखा असल्याचे एक संतापजनक उदाहरण अकोला जिल्ह्यातील निंभा (ता. मूर्तिजापूर) येथे समोर आले आहे. एका भोंदू बाबाने उपचाराच्या नावाखाली लहान मुलांच्या जीवाशी खेळ मांडल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला असून, या प्रकारामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. निंभा गावातील मधु महाराज आणि चेतन महाराज यांच्याकडून हा अघोरी प्रकार सुरू असल्याचे बोलले जात आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक भोंदू बाबा चक्क एका लहान बाळाला आपल्या दातांनी धरून हवेत फिरवताना दिसत आहे. उपचाराच्या नावाखाली सुरू असलेला हा अघोरी प्रकार अत्यंत जीवघेणा असून, यामुळे त्या चिमुरड्याचा जीव धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली होती. कायद्याचा भंग या संदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 'जादू-टोणा विरोधी कायदा' अस्तित्वात आहे. अशा प्रकारे अंधश्रद्धेचा प्रसार करणे आणि अघोरी प्रथांचे पालन करणे हा या कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे. तसेच, ज्या व्यक्तीकडे अधिकृत वैद्यकीय पदवी किंवा परवाना नाही, अशी व्यक्ती उपचार करत असेल तर तो ड्रग्ज अँड मॅजिक रेमिडीज ॲक्ट' अंतर्गतही गुन्हा ठरतो. नागरिकांमध्ये संताप निंभा गावातील या प्रकाराचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. "आजच्या काळातही अशा प्रकारे लहान मुलांच्या जिवाशी खेळ खेळला जाणे दुर्दैवी आहे," अशी भावना व्यक्त होत आहे. या प्रकरणी पोलीस प्रशासन आणि संबंधित विभाग काय कारवाई करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अशा भोंदू बाबांपासून सावध राहण्याचे आवाहनही सुज्ञ नागरिकांकडून केले जात आहे.1
- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण तापलं! नगरपंचायतीकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत प्रसिद्ध रील स्टार भाऊ कदम यांनी तीव्र इशारा दिला आहे. “यावेळी विषय टाळण्याचा प्रयत्न करू नका… अन्यथा अशी आग लागेल की विझवणे कठीण जाईल आणि आमच्यासमोर उभं राहणंही अवघड होईल,” असा संतप्त इशारा त्यांनी दिला. स्थानिक नागरिकांमध्येही नाराजी वाढताना दिसत असून, लवकर निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाची शक्यता व्यक्त होत आहे. #छत्रपतीशिवाजीमहाराज #भाऊकदम #नगरपंचायत #महाराष्ट्रन्यूज #शिवराय लोकआक्रोश BreakingNews1
- Post by Shaikh irfan Shaikh isa1