लोकसहभागातून आरोग्याचा जागर; ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ परभणी (प्रतिनिधी) – ग्रामीण महाराष्ट्राचा आरोग्यदृष्ट्या कायापालट करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे महत्त्वाकांक्षी अभियान हाती घेतले असून, या राज्यव्यापी उपक्रमाची १ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने १० फेब्रुवारी रोजी या योजनेला मान्यता दिल्यानंतर आता प्रत्यक्ष अंमलबजावणीला प्रारंभ होत आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या पुढाकारातून ही मोहीम राबवली जाणार आहे. या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे उपचारांपेक्षा प्रतिबंधावर भर देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आरोग्यदायी सवयी, स्वच्छता, शुद्ध पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन आणि पोषण यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. तसेच संसर्गजन्य आजार, जीवनशैलीशी संबंधित आजार, माता-बाल आरोग्य आणि मानसिक आरोग्य या विषयांनाही अभियानात महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. या उपक्रमात ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद स्तरावरील सर्व यंत्रणा सक्रिय सहभागी होणार असून, लोकसहभागातून व्यापक आरोग्य चळवळ उभी करण्याचा सरकारचा मानस आहे. ‘आरोग्यसंपन्न गाव’ किताबासाठी स्पर्धा अभियानाच्या अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा आणि गाव पातळीवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. ठरवलेल्या निकषांनुसार ७० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या गावांना ‘आरोग्यसंपन्न गाव’ म्हणून गौरविण्यात येणार आहे. अशा गावांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख पुरस्कार देऊन प्रोत्साहन दिले जाईल. या योजनेसाठी राज्य सरकारने ८०.७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, आरोग्य केंद्रे आणि गावांना कोट्यवधी रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत. कोट्यवधींची पारितोषिके जाहीर राज्य स्तरावर जिल्हा परिषदांना अनुक्रमे ५ कोटी, ३ कोटी आणि २ कोटी रुपये इतकी पारितोषिके दिली जाणार आहेत. पंचायत समित्यांसाठीही २ कोटी, १.५ कोटी आणि १.२५ कोटी रुपयांचे पुरस्कार निश्चित करण्यात आले आहेत. तसेच ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपआरोग्य केंद्रांनाही स्वतंत्र पुरस्कार देण्यात येणार आहेत. गाव स्तरावर उत्कृष्ट ठरणाऱ्या गावांना जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर अनुक्रमे २५ लाख, १ कोटी आणि ५ कोटी रुपयांपर्यंतची पारितोषिके मिळणार आहेत. दरवर्षी १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत हे अभियान राबवले जाणार असून, प्रत्येक गावाला आरोग्य क्षेत्रात सुधारणा करून पुरस्कार मिळवण्याची संधी मिळणार आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि सर्वसमावेशक करण्याच्या दिशेने ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे अभियान महत्त्वाचे पाऊल ठरणार असून, यातून सुदृढ आणि निरोगी समाज घडण्यास मोठी मदत होणार आहे.

- मंठा तालुक्यातील मौजे पाटोदा शिवारातील निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या पाण्यात 26 मार्च रोजी एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा मंठा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावत खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. प्राथमिक तपासात मृतदेहाची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी विविध कोनातून तपास सुरू केला. शवविच्छेदन अहवालानुसार हा खून असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान तांत्रिक माहिती, फिंगरप्रिंट व स्थानिक माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांपर्यंत पोहोचत तपासाची दिशा निश्चित केली. या प्रकरणी विश्वनाथ साहेबराव आवचार राहणार विडोळी, तालुका. मंठा) व राजू गंगाधर धुमाळ राहणार आदर्श कॉलनी, परतूर) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी जुन्या वादातून खून केल्याची कबुली दिली आहे. 24 मार्च रोजी रात्री शेतामध्ये दोरीने गळा आवळून खून करून मृतदेह कालव्यात टाकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक जालना अजयकुमार बन्सल,अपर पोलीस अधिक्षक जालना आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी परतुर रामेश्वर रेंगे, यांच्या मार्गदर्शनाखाली मंठा पोलीस निरीक्षक पुरूषोत्तम देशमुख, गुन्ह्याचे तपास अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक निलेश इधाटे,पोलीस उप निरीक्षक विठ्ठल केंद्रे, संतोष माळगे व तपास पथकातील सर्वच पोलीस अंमलदार यांनी अत्यंत महत्वाची भुमीका बजावली आहे. पुढील तपास सुरू असून या कामगिरीबद्दल पोलिसांचे कौतुक होत आहे.1
- भोपाल कलेक्टर को कांग्रेस के नेतृत्व में ज्ञापन सौंपा।7
- जालन्यात कन्हैया नगर परिसरातील भीषण अपघात: भरधाव आयशर झाडावर आदळला; दोघांचा जागीच मृत्यू, परिसरात शोककळा..1
- हिंगोली | प्रतिनिधी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा समन्वयक राजू इंगोले, जिल्हा सचिव सिद्धांत गायकवाड, तसेच जिल्हा समन्वयक सरपंच राहुल करवंदे यांनी हिंगोली वंचित जिल्हाध्यक्ष नियुक्तीवर आक्षेप घेत पक्षश्रेष्ठींकडे आपले राजीनामे सादर केले होते. दरम्यान, आज पुन्हा एकदा “राजगृहातच राहण्याचा” निर्णय घेत त्यांनी वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब यशवंतराव आंबेडकर यांचे लहान बंधू तसेच रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज यशवंतराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेनेत अधिकृत प्रवेश केला. हा पक्षप्रवेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू व रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय युवा नेतृत्व अमनसाहेब आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वसमत येथे पार पडला. सदर पक्षप्रवेश कार्यक्रम युवक प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी म्हणून प्रदेशाध्यक्ष डॉ. सुशिल कुमार सुर्यवंशी, लिगल सेल महाराष्ट्र नेते ॲड. रावन धाबे, जिल्हाध्यक्ष कैलास जोंधळे, आकाश दातार, विक्की काशिदे, ॲड. धम्मरत्न कांबळे, ॲड. बालाजी खरात, ॲड. रामराव जुमडे, विजय कांबळे, केशव कदम, गोरख खिल्लारे, सूरज वाघमारे, संदीप थोरात, राजू गायकवाड, रवी खंडागळे, सचिन जोंधळे, अरविंद साळवे, भारत गडधने, भीमराव इंगोले, कामाजी खिल्लारे, संजय वाकळे, भारत वाकळे, देवा कांबळे, लखन सरतापे, यशवंत साळवे, महेंद्र घोंगडे , अक्षय खाडे, मारोती राठोड, अनिल राठोड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रवेशामुळे हिंगोली जिल्ह्यात रिपब्लिकन सेनेची ताकद वाढणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. सूत्रसंचनल ॲड. रावन धाबे यांनी केले. तर प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष कैलास जोंधळे यांनी केले. आभार भारत गडधणे यांनी मानले.1
- Post by वैजनाथ पावडे1
- भोकरदन शहरात भगवान महावीर जयंती निमित्त भव्य मिरवणूक1
- बीड जिल्ह्यातील पिंपळनेर ते माजलगाव अत्यंत निकिष्ट दर्जा स्थापन झाला आहे पिंपळनेर पासून माजलगाव ला जाणारा रस्ता याच्यावर गुत्तेदार आणि अर्धवट काम सोडून पूर्ण बिल उचलला आहे कलेक्टर बीड व रस्ता विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे या रस्त्याची दुर्दशा अत्यंत बिकट आहे मेन हवे रोड असताना देखील याच्यावर2
- जालना जिल्ह्यात ऑटो रिक्षा चालकांनी गॅस दरवाढ आणि कृत्रिम टंचाईच्या विरोधात तीव्र भूमिका घेतली आहे.1