गायरान जमिनीवरील अतिक्रमणधारकांची नावे ७/१२ वर नोंदविण्याची मागणी ; विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांना पँथर्स रिपब्लिन पार्टीचे निवेदन खुलताबाद - तालुक्यातील मौजे निरगुडी (ठाकूरवाडी), ता. खुलताबाद येथील सर्वे नं. ४२ व ४३ तसेच फेररचनेनंतरचे गट नं. ७० व १५ मधील गायरान जमिनीवर सन १९७८ पासून शेती करणाऱ्या उर्वरित अतिक्रमणधारकांची अतिक्रमणे शासन नियमानुसार नियमित करून त्यांच्या नावांची ७/१२ उताऱ्यावर नोंद करावी, अशी मागणी पँथर्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे खुलताबाद तालुका अध्यक्ष राजअनंत भगवंतराव सुरतकर यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्त यांच्यासह जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. संबंधित गायरान जमिनीवर भिल, ठाकूर, बंजारा (लमाण), महार, मांग तसेच इतर समाजातील नागरिक अनेक वर्षांपासून शेती करून उदरनिर्वाह करीत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.सदरील निवेदन गुरुवारी तहसीलदार खुलताबाद यांना देखील देण्यात आले. शासनाच्या १९७८ ते १९९० या कालावधीतील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याच्या धोरणानुसार संबंधित ठिकाणी ३४ अतिक्रमणधारकांचे शेतपट्टे असल्याचे सांगण्यात आले. त्यापैकी २७ अतिक्रमणधारकांची नावे नियमानुकूल करण्यात आली असून, उर्वरित अतिक्रमणधारकांच्या जमिनी अद्याप त्यांच्या नावावर करण्यात आलेल्या नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. संबंधित अतिक्रमणधारकांपैकी काही जण वयोवृद्ध झाले असून काहींचे निधन झाले आहे. त्यांच्या वारसांकडून आजही संबंधित जमिनीची लागवड केली जात आहे. अनेक कुटुंबे मागील ४० ते ५० वर्षांपासून याच ठिकाणी वास्तव्यास असून त्यांच्या नावावर वीज मीटर, मतदान नोंदणी तसेच घरकुलासारख्या शासकीय योजनांचा लाभ असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मात्र, ७/१२ वर नाव नसल्यामुळे त्यांना भूमिहीन म्हणून संबोधले जात असल्याचेही सांगण्यात आले. शासकीय आदेश व परिपत्रकानुसार गायरान, शासकीय पड व संबंधित जमिनीवरील पात्र अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची तरतूद असतानाही महसूल प्रशासनाकडून कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी, तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्याकडे वेळोवेळी निवेदने देऊनही प्रश्न प्रलंबित असल्याचे पँथर्स रिपब्लिकन पार्टीने म्हटले आहे. दरम्यान, २९ जुलै २०२६ रोजी खुलताबाद तहसील कार्यालयासमोर संबंधित गायरानधारकांनी आमरण उपोषण सुरू केले होते. त्यावेळी तहसीलदार कार्यालयाकडून एका महिन्यानंतर चौकशी करून कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, मुदत उलटूनही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने आता जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून उर्वरित पात्र अतिक्रमणधारकांच्या जमिनी नियमानुकूल कराव्यात व गट नं. ७० व १५ च्या ७/१२ उताऱ्यावर त्यांच्या नावांची नोंद करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मागणीची पूर्तता न झाल्यास पँथर्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन, रास्ता रोको तसेच आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन पात्र अतिक्रमणधारकांना न्याय द्यावा, अशी मागणी राजअनंत सुरतकर यांनी केली आहे.
गायरान जमिनीवरील अतिक्रमणधारकांची नावे ७/१२ वर नोंदविण्याची मागणी ; विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांना पँथर्स रिपब्लिन पार्टीचे निवेदन खुलताबाद - तालुक्यातील मौजे निरगुडी (ठाकूरवाडी), ता. खुलताबाद येथील सर्वे नं. ४२ व ४३ तसेच फेररचनेनंतरचे गट नं. ७० व १५ मधील गायरान जमिनीवर सन १९७८ पासून शेती करणाऱ्या उर्वरित अतिक्रमणधारकांची अतिक्रमणे शासन नियमानुसार नियमित करून त्यांच्या नावांची ७/१२ उताऱ्यावर नोंद करावी, अशी मागणी पँथर्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे खुलताबाद तालुका अध्यक्ष राजअनंत भगवंतराव सुरतकर यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्त यांच्यासह जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. संबंधित गायरान जमिनीवर भिल,
ठाकूर, बंजारा (लमाण), महार, मांग तसेच इतर समाजातील नागरिक अनेक वर्षांपासून शेती करून उदरनिर्वाह करीत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.सदरील निवेदन गुरुवारी तहसीलदार खुलताबाद यांना देखील देण्यात आले. शासनाच्या १९७८ ते १९९० या कालावधीतील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याच्या धोरणानुसार संबंधित ठिकाणी ३४ अतिक्रमणधारकांचे शेतपट्टे असल्याचे सांगण्यात आले. त्यापैकी २७ अतिक्रमणधारकांची नावे नियमानुकूल करण्यात आली असून, उर्वरित अतिक्रमणधारकांच्या जमिनी अद्याप त्यांच्या नावावर करण्यात आलेल्या नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. संबंधित अतिक्रमणधारकांपैकी काही जण वयोवृद्ध झाले असून काहींचे निधन झाले आहे. त्यांच्या वारसांकडून आजही संबंधित जमिनीची लागवड केली जात आहे. अनेक कुटुंबे मागील ४० ते
५० वर्षांपासून याच ठिकाणी वास्तव्यास असून त्यांच्या नावावर वीज मीटर, मतदान नोंदणी तसेच घरकुलासारख्या शासकीय योजनांचा लाभ असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मात्र, ७/१२ वर नाव नसल्यामुळे त्यांना भूमिहीन म्हणून संबोधले जात असल्याचेही सांगण्यात आले. शासकीय आदेश व परिपत्रकानुसार गायरान, शासकीय पड व संबंधित जमिनीवरील पात्र अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची तरतूद असतानाही महसूल प्रशासनाकडून कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी, तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्याकडे वेळोवेळी निवेदने देऊनही प्रश्न प्रलंबित असल्याचे पँथर्स रिपब्लिकन पार्टीने म्हटले आहे. दरम्यान, २९ जुलै २०२६ रोजी खुलताबाद तहसील कार्यालयासमोर संबंधित गायरानधारकांनी आमरण उपोषण सुरू केले होते. त्यावेळी
तहसीलदार कार्यालयाकडून एका महिन्यानंतर चौकशी करून कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, मुदत उलटूनही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने आता जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून उर्वरित पात्र अतिक्रमणधारकांच्या जमिनी नियमानुकूल कराव्यात व गट नं. ७० व १५ च्या ७/१२ उताऱ्यावर त्यांच्या नावांची नोंद करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मागणीची पूर्तता न झाल्यास पँथर्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन, रास्ता रोको तसेच आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन पात्र अतिक्रमणधारकांना न्याय द्यावा, अशी मागणी राजअनंत सुरतकर यांनी केली आहे.
- मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा; खासदार सोनवणे यांची मागणी मराठवाड्यात यंदा पावसाची स्थिती प्रतिकूल असून अनेक भागांत दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे. शेतकरी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना करून दुष्काळी मदत व आवश्यक सवलती जाहीर कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.1
- नेपाळमध्ये पुराच्या परिस्थितीत अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी माननीय मुख्यमंत्री श्री, देवेंद्र फडणवीस साहेब यांनी व्हिडिओ कॉलद्वारे थेट संवाद साधत त्यांची परिस्थिती जाणून घेतली. त्यांना धीर देत, घाबरू नका, शासन तुमच्यासोबत आहे, असा विश्वास दिला.1
- छत्रपती संभाजीनगर...शिक्षकांच्या मागण्यांसाठी मुप्टा आक्रमक; शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छत्रपती संभाजीनगर... शिक्षकांच्या मागण्यांसाठी मुप्टा आक्रमक; शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन ANC : छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाच्या मुद्द्यावर महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज टीचर्स असोसिएशन अर्थात मुप्टा संघटना आक्रमक झाली आहे. शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्या तातडीने सोडवाव्यात, या मागणीसाठी शेकडो शिक्षकांनी शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. जिल्हा परिषद शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची अट रद्द करावी, यासह इतर विविध मागण्या शिक्षकांनी प्रशासनासमोर मांडल्या. यासंदर्भात मुप्टाच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देत प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली. शिक्षकांच्या मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास येत्या काही दिवसांत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. त्यामुळे आता शिक्षण विभाग या मागण्यांवर काय निर्णय घेतो, याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे. बाईट- मुप्टा शिक्षक संघटना अध्यक्ष राजेंद्र जाधव2
- 📦 पार्सल पाठवायचंय? मग काळजी कशाला? घरातूनच Parcel Pickup 📦 वेगवान सेवा • सुरक्षित डिलिव्हरी • विश्वासू सेवा तुमचे Documents, Parcels किंवा Gifts कुठेही पाठवा Kiran Courier सोबत. आजच संपर्क करा आणि तुमची Courier Booking करा! 🚚 विश्वासाची कुरिअर सेवा – Kiran Courier 📞 Call Now / WhatsApp Now 9545789966 Hashtags: #KiranCourier #CourierService #Aurangabad #Sambhajinagar #Courier #ParcelDelivery #DoorstepPickup #FastDelivery #SafeDelivery #LocalCourier #CourierServiceAurangabad #ParcelService #DeliveryService1
- ईद-ए-मिलादनिमित्त जाधववाडीत भव्य रक्तदान शिबीर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद1
- ग्रामीण रुग्णालय कन्नड येथे सुविधेचा अभाव, मा.आमदार उदयसिंग राजपूत यांनी तीव्र शब्दात नाराजी1
- पाण्यावरून वाद पेटला, विरोधी पक्षनेते व सत्ता धारी यांच्यात मनपाच्या सभागृहात गदारोळ1
- चार लाख भाविकांनी खुलताबाद येथे पैगंबर मोहम्मद सल्ललाहुअलैह व सल्लम यांचे पोशाख व मू ए मुबारक चे दर्शन घेतले,1