वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका वाढला; महानगरपालिकेचे सतर्कतेचे आवाहन परभणीत चार ठिकाणी ‘उष्माघात कक्ष’ सुरू परभणी (प्रतिनिधी) : एप्रिल महिन्यात तापमानात सातत्याने वाढ होत असून सरासरीपेक्षा सुमारे ३ अंशांनी वाढ नोंदवल्याने शहरात उष्माघाताचा धोका तीव्र झाला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. महापौर सय्यद इकबाल, आयुक्त नितीन नार्वेकर आणि महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना सावंत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी सहाय्यक आयुक्त गजानन जाधव उपस्थित होते. उन्हात काम करणारे मजूर, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, गर्भवती महिला तसेच मधुमेह व हृदयविकार असलेले रुग्ण आणि मद्यपान करणाऱ्या व्यक्तींना उष्माघाताचा धोका अधिक असल्याचे सांगण्यात आले. सुरुवातीला चक्कर येणे, ताप येणे, अंगात गोळे येणे अशी लक्षणे दिसतात, तर गंभीर अवस्थेत त्वचा कोरडी पडणे, तीव्र डोकेदुखी, रक्तदाब वाढणे, मानसिक अस्वस्थता व बेशुद्धावस्था अशी लक्षणे आढळू शकतात. उष्माघाताची लक्षणे दिसल्यास संबंधित व्यक्तीला तातडीने थंड व हवेशीर ठिकाणी हलवून थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, पंखा किंवा कुलरचा वापर करावा, तसेच शक्य असल्यास थंड पाण्याने अंघोळ घालावी, असा सल्ला देण्यात आला आहे. नागरिकांनी दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे, हलक्या रंगाचे सैल कपडे परिधान करावेत, तसेच टोपी, छत्री व सनग्लासेसचा वापर करावा. लहान मुलांना बंद वाहनात ठेवू नये. मद्यपान, चहा, कॉफी व शीतपेये टाळण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने साखला प्लॉट, इनायत नगर, खंडोबा बाजार आणि खानापूर येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ‘उष्माघात कक्ष’ सुरू केले आहेत. कोणतीही लक्षणे जाणवल्यास नागरिकांनी तातडीने जवळच्या केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन महापौर सय्यद इकबाल व आयुक्त नितीन नार्वेकर यांनी केले आहे.

- Post by Ramesh Mulgir1
- LIVE “श्री. अशोकराव गोंगे यांच्या जयगुरुदेव ॲग्रो एजन्सीचा भव्य शुभारंभ समारंभ संपन्न.” #maxparbhani #parbhani #pathri #maharashtra MAX PARBHANI LIVE 11
- नागरिकांनो उत्स्फूर्तपणे स्व-गणना करा - जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांचे आवाहन1
- Post by Jafar tarodekar1
- Post by Mohsin ahmed khan1
- तेलंगाना के बोर्ड के अध्यक्ष परभणी जिले के केंद्र निरीक्षक अजमतउल्लाह हुसैनी के नेतृत्व में जिंतूर शहर संगठन सूजन अभियान5
- शासनाच्या स्पष्ट नियमांनुसार ग्रामपंचायत अधिकारी यांनी मुख्यालयी वास्तव्यास राहणे बंधनकारक असताना अनेक अधिकारी ना मुख्यालयी वास्तव्यास आहेत, ना स्वतःच्या ग्रामपंचायतीत वेळेवर हजर असतात. यामुळे सामान्य नागरिकांना छोट्या छोट्या कामांसाठी तालुक्याच्या ठिकाणी वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. मंगरूळ ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती अंबुलगे यांच्याकडे मंगरूळ व वांजुळा पुनर्वसन अशा दोन ग्रामपंचायतींचा कार्यभार आहे. परंतु प्रत्यक्ष पाहणीमध्ये त्या दोन्ही ठिकाणी अनुपस्थित असल्याचे स्पष्ट झाले. पंचायत समितीमध्ये चौकशी केली असता त्या रजेवरही नसल्याचे समोर आले. म्हणजेच रजेवर नाहीत, ग्रामपंचायतीत नाहीत, मुख्यालयी वास्तव्यास नाहीत, मग नेमके अधिकारी कुठे आहेत? ग्रामपंचायतचे दप्तर गावात नसून तालुक्याच्या ठिकाणी ठेवले जाते, ग्रामस्थांना वेळेवर सेवा मिळत नाही, आणि प्रशासन कागदोपत्रीच चालते हीच आजची खरी परिस्थिती आहे. संभाजी ब्रिगेड मंठा याचा तीव्र निषेध करते आणि संबंधित ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर तात्काळ विभागीय चौकशी, पगार कपात, शिस्तभंग कारवाई आणि संपूर्ण तालुक्यात विशेष तपासणी मोहीम राबविण्याची ठाम मागणी करते. गावकऱ्यांचा हक्क हिरावणाऱ्यांना आता जाब द्यावाच लागेल. संभाजी ब्रिगेड अन्याय सहन करणार नाही. जय जिजाऊ! जय शिवराय! जय संविधान! प्रयत्न आज करण्यात आला. शासनाच्या स्पष्ट नियमांनुसार ग्रामपंचायत अधिकारी यांनी मुख्यालयी वास्तव्यास राहणे बंधनकारक असताना अनेक अधिकारी ना मुख्यालयी वास्तव्यास आहेत, ना स्वतःच्या ग्रामपंचायतीत वेळेवर हजर असतात. यामुळे सामान्य नागरिकांना छोट्या छोट्या कामांसाठी तालुक्याच्या ठिकाणी वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. मंगरूळ ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती अंबुलगे यांच्याकडे मंगरूळ व वांजुळा पुनर्वसन अशा दोन ग्रामपंचायतींचा कार्यभार आहे. परंतु प्रत्यक्ष पाहणीमध्ये त्या दोन्ही ठिकाणी अनुपस्थित असल्याचे स्पष्ट झाले. पंचायत समितीमध्ये चौकशी केली असता त्या रजेवरही नसल्याचे समोर आले. म्हणजेच रजेवर नाहीत, ग्रामपंचायतीत नाहीत, मुख्यालयी वास्तव्यास नाहीत, मग नेमके अधिकारी कुठे आहेत? ग्रामपंचायतचे दप्तर गावात नसून तालुक्याच्या ठिकाणी ठेवले जाते, ग्रामस्थांना वेळेवर सेवा मिळत नाही, आणि प्रशासन कागदोपत्रीच चालते हीच आजची खरी परिस्थिती आहे. संभाजी ब्रिगेड मंठा याचा तीव्र निषेध करते आणि संबंधित ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर तात्काळ विभागीय चौकशी, पगार कपात, शिस्तभंग कारवाई आणि संपूर्ण तालुक्यात विशेष तपासणी मोहीम राबविण्याची ठाम मागणी करते. गावकऱ्यांचा हक्क हिरावणाऱ्यांना आता जाब द्यावाच लागेल. संभाजी ब्रिगेड अन्याय सहन करणार नाही. जय जिजाऊ! जय शिवराय! जय संविधान!1
- राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आयटीआय कर्मचाऱ्यांचे बेमुद्दत कामबंद आंदोलन सुरू1