सिटी बस सेवा सुरू होताच गंगापुरात ज्योतीराम चिवडे पाटलांचे जंगी स्वागत! भाजपा. कामगार मोर्चाच्या इशाऱ्याला यश; मनपा प्रशासनाने तातडीने सुरू केली सिटी बस सेवा. सिटी बस सेवा सुरू होताच गंगापुरात ज्योतीराम चिवडे पाटलांचे जंगी स्वागत! भाजपा. कामगार मोर्चाच्या इशाऱ्याला यश; मनपा प्रशासनाने तातडीने सुरू केली सिटी बस सेवा. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. रविवार दिनांक 2 ऑगस्ट 2026. लातूर शहर महानगरपालिका हद्दीतील ग्रामीण व शहरी भागाला जोडणारी सिटी बस सेवा मनपा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे वारंवार बंद पडत होती. या समस्येविरोधात भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष ज्योतीराम चिवडे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला दिलेल्या टाळे ठोक आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर अखेर प्रशासनाला जाग आली असून, सिटी बस सेवा पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. या यशाबद्दल गंगापूर नगरीतील ग्रामस्थांच्या वतीने चिवडे पाटील यांचा जंगी सत्कार करण्यात आला. शहर व परिसरातील नागरिकांना भेडसावणारा सिटी बसचा प्रश्न सोडवण्यासाठी चिवडे पाटील यांनी कोणताही विलंब न करता लातूर महानगरपालिकेचे उपायुक्त पंजाबराव खानसोळे यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. "येत्या तीन दिवसांत सिटी बस सेवा पूर्ववत न झाल्यास महानगरपालिकेला टाळे ठोकण्यात येईल," असा इशारा त्यांनी दिला होता. या आंदोलनाला भाजप शहर जिल्हाध्यक्ष मा. श्री. अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी खंबीर पाठिंबा दर्शवला होता. या इशाऱ्याची गांभीर्याने दखल घेत मनपा प्रशासनाने तातडीने बैठक बोलावून सिटी बस सेवा पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेतला. गंगापूर येथे जल्लोषात स्वागत. सिटी बस पुन्हा रस्त्यावर धावू लागल्याने शहरासह ग्रामीण भागातील प्रवाशांमध्ये आणि विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. बस सेवा पूर्ववत झाल्याचे समजताच गंगापूर नगरीतील गावकऱ्यांनी एकत्र येत 'गोरगरिबांचे कैवारी' म्हणून ओळखले जाणारे ज्योतीराम चिवडे पाटील यांचा जंगी सत्कार केला. या प्रसंगी गावकऱ्यांनी "चिवडे पाटलांचा विजय असो" अशा घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला. "जनतेच्या प्रश्नासाठी सदैव तत्पर" – ज्योतीराम चिवडे पाटील सत्काराला उत्तर देताना चिवडे पाटील म्हणाले: नेत्यांचे पाठबळ: "लातूर जिल्ह्याचे नेते तथा माजी पालकमंत्री आ. संभाजी भैय्या पाटील निलंगेकर, आ. रमेश आप्पा कराड, आ. अभिमन्यू पवार, आ. बसवराज पाटील आणि अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच आपण सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावू शकत आहोत." जनतेचा विश्वास: "शालेय विद्यार्थी, शेतकरी आणि कामगारांच्या न्यायासाठी मी सदैव तत्पर आहे. गंगापूर आणि परिसरातील जनतेच्या कोणत्याही अडचणीत मी खंबीरपणे पाठीशी उभा राहीन." या कार्यक्रमास गंगापूर सोसायटीचे सदस्य दगडू भाई शेख, बलभीम भोसले, अप्पाराव मिंड, तुळशीदास चिवडे, राजकुमार गोरे, विकास चिवडे, अर्जुन रसाळ, चालक देशमुख, फारुक शेख, अब्दुल शेख, शांतिनाथ नाथबोने, सुरज शेख, आत्माराम शेलार, पाशा शेख, जमीर शेख यांच्यासह गावातील नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- भारतीय शेतकरी कामगार पक्ष च्या वर्धापन दिनानिमित्त सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना क्रांतिकारी लाल सलाम व हार्दिक शुभेच्छा1
- कल कर्जाळ बंधारा पाण्याखाली जाण्याची शक्यता; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन कर्जाळ बंधारा पाण्याखाली जाण्याची शक्यता; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आला आहे. कल कर्जाळ परिसरात पाण्याची आवक वेगाने वाढत असून, कर्जाळ बंधारा पुढील सुमारे १० मिनिटांत पाण्याखाली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाने आणि स्थानिकांनी नागरिकांना या मार्गाचा वापर टाळण्याचे आवाहन केले आहे. बंधाऱ्यावरून प्रवास करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे या मार्गाने येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांनी तात्काळ पर्यायी मार्गाचा वापर करावा. तसेच कोणत्याही परिस्थितीत बंधाऱ्यावर गर्दी करू नये किंवा पाण्यात उतरण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि ही माहिती इतरांपर्यंतही पोहोचवून सहकार्य करावे.1
- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती महामानव अभिवादन ग्रुप तर्फे उत्साहात संपन्न... साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती महामानव अभिवादन ग्रुप तर्फे उत्साहात संपन्न... बीड (प्रतिनिधी) "जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मज भीमराव" असे उद्गार काढणारे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती महामानव अभिवादन ग्रुपने सर्व परिवर्तनवादी महापुरुषांच्या जयंत्या संपन्न करण्याचे जाहीर केल्याप्रमाणे बीड शहरात सर्वप्रथम 26 जून 2026 रोजी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सार्वजनिक रित्या बीड शहरांमध्ये संपन्न केली होती. त्यानुसार 1 ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ही जयंती संपूर्ण बीड शहरातील समाजबांधवांना एकत्रित करून तसेच विविध संघटनांना;भारतीय बौद्ध महासभा शाखा बीड, धम्म महासंघ बीड, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी यांचा सम्राट अशोक शाक्य संघ बीड तसेच इतर अनेक संघटनाना एकत्रित करून महामानव अभिवादन ग्रुपने बीड शहरांमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करत असताना सर्वप्रथम बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. समता सैनिक दला तर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देऊन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे रथातून सुवाद्यासह व विविध घोषणा देऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापर्यंत शोभायात्रा काढून रस्त्यामधील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या सर्व परिवर्तनवादी महापुरुषांचा आदर्श सतत डोळ्यासमोर राहावा व कृती कार्यक्रम करण्यास प्रवृत्त व्हावे हा उद्देश ठेवूनच महामानव अभिवादन ग्रुपच्या वतीने सर्व महापुरुषांच्या जयंती स्मृतिदिन मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहेत. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्या जवळ आल्यानंतर सर्वप्रथम समता सैनिक दलातर्फे पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना पुष्पमाला अर्पण करून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर रॅलीचे रूपांतर सभेमध्ये झाले. त्या ठिकाणी सेवानिवृत्त पी व्ही बनसोडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रबोधनात्मक विचार उपस्थित मान्यवरांकडून मांडण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महामानवाभिवादन ग्रुपचे अध्यक्ष जी .एम भोले सर यांनी केले तर प्रास्ताविक अमरसिंह ढाका राज्य संघटक भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य यांनी केले. ह्या प्रसंगी विचार मंचावर साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समिती चे अध्यक्ष ॲड तेजस वडमारे,कॉम्रेड नामदेवराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक जे. टी साळवे, सतिष कापसे, ॲड हनुमंत कांबळे,ॲड चंद्रवदन जाधव, कल्याण भंडारे, शिवाजी जोगदंड, रंजना चांदणे, कॅप्टन राजाभाऊ आठवले उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या, "शिका संघटित व्हा व संघर्ष करा" या बहुमोल उपदेशाचे महत्त्व लक्षात ठेवून प्रबोधनात्मक विचार मांडले. साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची आज समाजामध्ये बदल घडविण्यासाठी किती गरज आहे यावर सखोल प्रकाश टाकला. या कार्यक्रमास बीड शहरातील बहुसंख्य नागरिकांची, विविध संघटनेतील सदस्यांची महामानव अभिवादन ग्रुपच्या सर्व सदस्यांची उपस्थिती होती. शेवटी आभार प्रदर्शन प्रशांत वासनिक यांनी केले. या कार्यक्रमास वंचित चे माजी जिल्हाध्यक्ष अजय सरवदे, प्रा.अशोक गायकवाड, डी .एम राऊत, यु एस वाघमारे, प्रकाश खंडारे, आर.डी चक्रे, वसंतराव तरकसे , एस एस सोनवणे, बि.जी दळवी, वैशाली शिंदे, बी.डी तांगडे, अर्जुन जवंजाळ, कुमारथ पारवे, संजय मिसाळ, प्रवीण टाकणखार संदीप जाधव, बबन जोगदंड, राजू भोले, अनिल डोळस, सिद्धार्थ जगताप, नंदा भंडारे, अंजली वडमारे, शोभाताई आठवले, सूर्यकांत जोगदंड,बौद्धाचार्य ॲड भास्कर सोनवणे, शेवाळे साहेब यांची उपस्थिती होती.1
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळा संपन्न किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या किर्तन पासदगाव येथे संपन्न1
- भीमा नदीच्या वाढत्या पाण्यात खानापूर बंधाऱ्यावरून जीव धोक्यात घालून नागरिकांचा प्रवास सततच्या पावसामुळे भीमा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असून, खानापूर बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागल्याने नागरिकांचा प्रवास धोकादायक बनला आहे. जीव मुठीत धरून नागरिकांना या बंधाऱ्यावरून ये-जा करावी लागत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. खानापूर परिसरातील अनेक नागरिक कामानिमित्त, शिक्षणासाठी तसेच दैनंदिन गरजांसाठी या मार्गाचा वापर करतात. मात्र वाढत्या पाण्यामुळे बंधाऱ्यावरून प्रवास करताना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तरीही पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने अनेकांना धोका पत्करून प्रवास करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून आवश्यक सुरक्षेची उपाययोजना करावी, धोक्याच्या ठिकाणी सूचना फलक व बॅरिकेड्स लावावेत आणि परिस्थिती गंभीर झाल्यास वाहतूक बंद करून पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, पावसाचा जोर कायम राहिल्यास भीमा नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, नागरिकांनी कोणताही धोका पत्करू नये व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.1
- आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन किर्तनकार इंदुरीकर महाराज किर्तन सोहळा संपन्न1
- लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण इशारा परिषद नांदेड लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण इशारा परिषद नांदेड1