logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

कल कर्जाळ बंधारा पाण्याखाली जाण्याची शक्यता; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन कर्जाळ बंधारा पाण्याखाली जाण्याची शक्यता; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आला आहे. कल कर्जाळ परिसरात पाण्याची आवक वेगाने वाढत असून, कर्जाळ बंधारा पुढील सुमारे १० मिनिटांत पाण्याखाली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाने आणि स्थानिकांनी नागरिकांना या मार्गाचा वापर टाळण्याचे आवाहन केले आहे. बंधाऱ्यावरून प्रवास करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे या मार्गाने येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांनी तात्काळ पर्यायी मार्गाचा वापर करावा. तसेच कोणत्याही परिस्थितीत बंधाऱ्यावर गर्दी करू नये किंवा पाण्यात उतरण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि ही माहिती इतरांपर्यंतही पोहोचवून सहकार्य करावे.

4 hrs ago
user_Akkalkot news
Akkalkot news
Fitness Trainer अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र•
4 hrs ago

कल कर्जाळ बंधारा पाण्याखाली जाण्याची शक्यता; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन कर्जाळ बंधारा पाण्याखाली जाण्याची शक्यता; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आला आहे. कल कर्जाळ परिसरात पाण्याची आवक वेगाने वाढत असून, कर्जाळ बंधारा पुढील सुमारे १० मिनिटांत पाण्याखाली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाने आणि स्थानिकांनी नागरिकांना या मार्गाचा वापर टाळण्याचे आवाहन केले आहे. बंधाऱ्यावरून प्रवास करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे या मार्गाने येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांनी तात्काळ पर्यायी मार्गाचा वापर करावा. तसेच कोणत्याही परिस्थितीत बंधाऱ्यावर गर्दी करू नये किंवा पाण्यात उतरण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि ही माहिती इतरांपर्यंतही पोहोचवून सहकार्य करावे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • कल कर्जाळ बंधारा पाण्याखाली जाण्याची शक्यता; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन कर्जाळ बंधारा पाण्याखाली जाण्याची शक्यता; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आला आहे. कल कर्जाळ परिसरात पाण्याची आवक वेगाने वाढत असून, कर्जाळ बंधारा पुढील सुमारे १० मिनिटांत पाण्याखाली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाने आणि स्थानिकांनी नागरिकांना या मार्गाचा वापर टाळण्याचे आवाहन केले आहे. बंधाऱ्यावरून प्रवास करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे या मार्गाने येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांनी तात्काळ पर्यायी मार्गाचा वापर करावा. तसेच कोणत्याही परिस्थितीत बंधाऱ्यावर गर्दी करू नये किंवा पाण्यात उतरण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि ही माहिती इतरांपर्यंतही पोहोचवून सहकार्य करावे.
    1
    कल कर्जाळ बंधारा पाण्याखाली जाण्याची शक्यता; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
कर्जाळ बंधारा पाण्याखाली जाण्याची शक्यता; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आला आहे.
कल कर्जाळ परिसरात पाण्याची आवक वेगाने वाढत असून, कर्जाळ बंधारा पुढील सुमारे १० मिनिटांत पाण्याखाली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाने आणि स्थानिकांनी नागरिकांना या मार्गाचा वापर टाळण्याचे आवाहन केले आहे.
बंधाऱ्यावरून प्रवास करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे या मार्गाने येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांनी तात्काळ पर्यायी मार्गाचा वापर करावा. तसेच कोणत्याही परिस्थितीत बंधाऱ्यावर गर्दी करू नये किंवा पाण्यात उतरण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि ही माहिती इतरांपर्यंतही पोहोचवून सहकार्य करावे.
    user_Akkalkot news
    Akkalkot news
    Fitness Trainer अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • सोलापूर महानगरपालिका मध्ये MT सिरीस मतदान धारकांना घेऊन सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांना एम ठी सिरीज मतदान कार्ड चे धारकांना घेऊन थेट आयुक्तांना प्रश्न
    1
    सोलापूर महानगरपालिका मध्ये MT सिरीस मतदान धारकांना घेऊन
सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांना एम ठी सिरीज  मतदान कार्ड चे धारकांना घेऊन थेट आयुक्तांना प्रश्न
    user_ईलियास नजीर शेख
    ईलियास नजीर शेख
    Salesperson सोलापूर उत्तर, सोलापूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • भारतीय शेतकरी कामगार पक्ष ७९ वा वर्धापन दिनानिमित्त सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना क्रांतिकारी लाल सलाम
    1
    भारतीय शेतकरी कामगार पक्ष ७९ वा वर्धापन दिनानिमित्त सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना क्रांतिकारी लाल सलाम
    user_भाई लक्ष्मण  सोळुंके
    भाई लक्ष्मण सोळुंके
    Bus tour agency निलंगा, लातूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • सारोळा चौकात एसटी बसचा अपघात थोडक्यात टळला; 60 ते 70 प्रवाशांचा जीव भांड्यात लातूर, दि. 1 ऑगस्ट : शहरातील नांदेड रोडवरील सारोळा चौक येथे शनिवारी रात्री सुमारे 9.40 वाजण्याच्या सुमारास उदगीर डेपोच्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसचा अपघात थोडक्यात टळल्याची घटना घडली. या बसमध्ये अंदाजे 60 ते 70 प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बस काही काळ चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झाल्याची अधिकृत माहिती रात्री उशिरापर्यंत उपलब्ध नव्हती. घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, चालकाने मद्यपान केले होते का किंवा नेमके कारण काय होते, याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. या घटनेची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी प्रवासी व नागरिकांकडून करण्यात येत आहे. सारोळा चौकात एसटी बसचा अपघात थोडक्यात टळला; 60 ते 70 प्रवाशांचा जीव भांड्यात लातूर, दि. 1 ऑगस्ट : शहरातील नांदेड रोडवरील सारोळा चौक येथे शनिवारी रात्री सुमारे 9.40 वाजण्याच्या सुमारास उदगीर डेपोच्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसचा अपघात थोडक्यात टळल्याची घटना घडली. या बसमध्ये अंदाजे 60 ते 70 प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बस काही काळ चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झाल्याची अधिकृत माहिती रात्री उशिरापर्यंत उपलब्ध नव्हती. घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, चालकाने मद्यपान केले होते का किंवा नेमके कारण काय होते, याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. या घटनेची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी प्रवासी व नागरिकांकडून करण्यात येत आहे.
    1
    सारोळा चौकात एसटी बसचा अपघात थोडक्यात टळला; 60 ते 70 प्रवाशांचा जीव भांड्यात

लातूर, दि. 1 ऑगस्ट : शहरातील नांदेड रोडवरील सारोळा चौक येथे शनिवारी रात्री सुमारे 9.40 वाजण्याच्या सुमारास उदगीर डेपोच्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसचा अपघात थोडक्यात टळल्याची घटना घडली. या बसमध्ये अंदाजे 60 ते 70 प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बस काही काळ चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झाल्याची अधिकृत माहिती रात्री उशिरापर्यंत उपलब्ध नव्हती.

घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, चालकाने मद्यपान केले होते का किंवा नेमके कारण काय होते, याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. या घटनेची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी प्रवासी व नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सारोळा चौकात एसटी बसचा अपघात थोडक्यात टळला; 60 ते 70 प्रवाशांचा जीव भांड्यात
लातूर, दि. 1 ऑगस्ट : शहरातील नांदेड रोडवरील सारोळा चौक येथे शनिवारी रात्री सुमारे 9.40 वाजण्याच्या सुमारास उदगीर डेपोच्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसचा अपघात थोडक्यात टळल्याची घटना घडली. या बसमध्ये अंदाजे 60 ते 70 प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बस काही काळ चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झाल्याची अधिकृत माहिती रात्री उशिरापर्यंत उपलब्ध नव्हती.
घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, चालकाने मद्यपान केले होते का किंवा नेमके कारण काय होते, याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. या घटनेची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी प्रवासी व नागरिकांकडून करण्यात येत आहे.
    user_Abdulkhadir shaikh
    Abdulkhadir shaikh
    Yoga instructor शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आम आदमी पार्टी, बीडच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आम आदमी पार्टी, बीडच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी सैनिक अशोक येडे (जिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी, बीड), सय्यद सादेक (शहराध्यक्ष), माऊली शिंदे (जिल्हा बॉडी सदस्य), बाळासाहेब मोरे पाटील (संस्थापक अध्यक्ष, शिवशाही आंबेडकर विचार मंच), भीमराव कुटे (सामाजिक कार्यकर्ते) तसेच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणी आणि शाहिरीतून सामाजिक न्याय, समता आणि वंचितांच्या हक्कांसाठी दिलेला लढा आजही समाजाला प्रेरणा देणारा आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जपत समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
    2
    साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आम आदमी पार्टी, बीडच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आम आदमी पार्टी, बीडच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी सैनिक अशोक येडे (जिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी, बीड), सय्यद सादेक (शहराध्यक्ष), माऊली शिंदे (जिल्हा बॉडी सदस्य), बाळासाहेब मोरे पाटील (संस्थापक अध्यक्ष, शिवशाही आंबेडकर विचार मंच), भीमराव कुटे (सामाजिक कार्यकर्ते) तसेच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणी आणि शाहिरीतून सामाजिक न्याय, समता आणि वंचितांच्या हक्कांसाठी दिलेला लढा आजही समाजाला प्रेरणा देणारा आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जपत समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • भीमा नदीच्या वाढत्या पाण्यात खानापूर बंधाऱ्यावरून जीव धोक्यात घालून नागरिकांचा प्रवास सततच्या पावसामुळे भीमा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असून, खानापूर बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागल्याने नागरिकांचा प्रवास धोकादायक बनला आहे. जीव मुठीत धरून नागरिकांना या बंधाऱ्यावरून ये-जा करावी लागत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. खानापूर परिसरातील अनेक नागरिक कामानिमित्त, शिक्षणासाठी तसेच दैनंदिन गरजांसाठी या मार्गाचा वापर करतात. मात्र वाढत्या पाण्यामुळे बंधाऱ्यावरून प्रवास करताना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तरीही पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने अनेकांना धोका पत्करून प्रवास करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून आवश्यक सुरक्षेची उपाययोजना करावी, धोक्याच्या ठिकाणी सूचना फलक व बॅरिकेड्स लावावेत आणि परिस्थिती गंभीर झाल्यास वाहतूक बंद करून पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, पावसाचा जोर कायम राहिल्यास भीमा नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, नागरिकांनी कोणताही धोका पत्करू नये व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
    1
    भीमा नदीच्या वाढत्या पाण्यात खानापूर बंधाऱ्यावरून जीव धोक्यात घालून नागरिकांचा प्रवास
सततच्या पावसामुळे भीमा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असून, खानापूर बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागल्याने नागरिकांचा प्रवास धोकादायक बनला आहे. जीव मुठीत धरून नागरिकांना या बंधाऱ्यावरून ये-जा करावी लागत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
खानापूर परिसरातील अनेक नागरिक कामानिमित्त, शिक्षणासाठी तसेच दैनंदिन गरजांसाठी या मार्गाचा वापर करतात. मात्र वाढत्या पाण्यामुळे बंधाऱ्यावरून प्रवास करताना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तरीही पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने अनेकांना धोका पत्करून प्रवास करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून आवश्यक सुरक्षेची उपाययोजना करावी, धोक्याच्या ठिकाणी सूचना फलक व बॅरिकेड्स लावावेत आणि परिस्थिती गंभीर झाल्यास वाहतूक बंद करून पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, पावसाचा जोर कायम राहिल्यास भीमा नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, नागरिकांनी कोणताही धोका पत्करू नये व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
    user_Akkalkot news
    Akkalkot news
    Fitness Trainer अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत घरफोडीतील 16 गुन्हे उघडकीस, 4 ताब्यात, 12 लाख रुपयांच्यावर मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत 16 गुन्हे उघडकीस, 4 ताब्यात, 12 लाख रुपयांच्यावर मुद्देमाल जप्त. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. रविवार दिनांक 2 ऑगस्ट 2026. लातूर जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून घरफोडी व चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दि. ०१ ऑगस्ट २०२६ रोजी केलेल्या दोन कारवायांमध्ये ३ सराईत आरोपी व १ विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेऊन कर्नाटक राज्यातील बिदर येथील एका गुन्ह्यासह तब्बल १५ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यास यश मिळविले आहे. पहिल्या कारवाईत लातूर शहरातील रेल्वे स्टेशन चौक परिसरातून १) योगेश शंकर पवार (वय ४३, रा. बेळी, ता. मुखेड, जि. नांदेड, सध्या उमरगा) यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने चाकूर येथील घरफोडीची कबुली देत कर्नाटक राज्यातील कमालनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीचाही गुन्हा केल्याची माहिती दिली. त्याच्याकडून चोरीतील सोन्याची अंगठी व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या कारवाईत चाकूर येथील आयटीआय महाविद्यालयासमोर सापळा रचून २)राजू जगन्नाथ शिंदे (रा. पांगरी, ता. परळी, जि. बीड), ३)कट्टप्पा हणमंत भोसले (रा. बोरी, ता. जिंतूर, जि. परभणी) तसेच एका विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपींनी चाकूर, उदगीर शहर, उदगीर ग्रामीण, अहमदपूर, किनगाव, जळकोट तसेच इतर ठिकाणी रात्रीच्या वेळी बंद घरे फोडून चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींच्या चौकशीवरून चाकूर पोलीस ठाण्याचे ५, उदगीर ग्रामीणचे ३, उदगीर शहरचे २, अहमदपूरचे २, किनगावचे १, जळकोटचे १ तसेच कर्नाटक राज्यातील कमालनगर पोलीस ठाण्याचा १ अशा एकूण १५ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले. या कारवाईत ७१ ग्रॅम सोन्याचे दागिने, ३२५ ग्रॅम चांदीचे दागिने व १,१५,३०० रोख रक्कम असा एकूण १२,३५,३०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालामध्ये सोन्याच्या अंगठ्या, मंगळसूत्र, झुमके, कुड्या, पोत, सरपाळे, ओम पेंडंट, चांदीच्या साखळ्या, कडे, पैंजण, जोडवे, करंडे तसेच रोख रक्कमेचा समावेश आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला असून, चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करून संबंधित पोलीस ठाण्यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. आरोपींकडून आणखी काही घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे. ही उल्लेखनीय कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग व्यंकट माने, पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, पोलीस अंमलदार माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, रामलिंग शिंदे, तुराब पठाण, सुरेश कलमे, गणेश साठे, पाराजी पुट्टेवाड, तुळशीराम बरूरे, श्रीनिवास जांभळे तसेच सायबर सेलचे पोलीस अंमलदार शैलेश सुडे यांनी यशस्वीपणे पार पाडली.
    2
    स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत घरफोडीतील 16 गुन्हे उघडकीस, 4 ताब्यात, 12 लाख  रुपयांच्यावर मुद्देमाल जप्त.
स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत 16 गुन्हे उघडकीस, 4 ताब्यात, 12 लाख  रुपयांच्यावर मुद्देमाल जप्त.
सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. 
रविवार दिनांक 2 ऑगस्ट 2026.
लातूर जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून घरफोडी व चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील  पथकाने दि. ०१ ऑगस्ट २०२६ रोजी केलेल्या दोन  कारवायांमध्ये ३ सराईत आरोपी व १ विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेऊन कर्नाटक राज्यातील बिदर येथील एका गुन्ह्यासह तब्बल १५ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यास यश मिळविले आहे.
पहिल्या कारवाईत लातूर शहरातील रेल्वे स्टेशन चौक परिसरातून 
१) योगेश शंकर पवार (वय ४३, रा. बेळी, ता. मुखेड, जि. नांदेड, सध्या उमरगा) 
यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने चाकूर येथील घरफोडीची कबुली देत कर्नाटक राज्यातील कमालनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीचाही गुन्हा केल्याची माहिती दिली. त्याच्याकडून चोरीतील सोन्याची अंगठी व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली.
त्यानंतर दुसऱ्या कारवाईत चाकूर येथील आयटीआय महाविद्यालयासमोर सापळा रचून 
२)राजू जगन्नाथ शिंदे (रा. पांगरी, ता. परळी, जि. बीड), 
३)कट्टप्पा हणमंत भोसले (रा. बोरी, ता. जिंतूर, जि. परभणी) 
तसेच एका विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपींनी चाकूर, उदगीर शहर, उदगीर ग्रामीण, अहमदपूर, किनगाव, जळकोट तसेच इतर ठिकाणी रात्रीच्या वेळी बंद घरे फोडून चोरी केल्याची कबुली दिली.
आरोपींच्या चौकशीवरून चाकूर पोलीस ठाण्याचे ५, उदगीर ग्रामीणचे ३, उदगीर शहरचे २, अहमदपूरचे २, किनगावचे १, जळकोटचे १ तसेच कर्नाटक राज्यातील कमालनगर पोलीस ठाण्याचा १ अशा एकूण १५ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले. या कारवाईत ७१ ग्रॅम सोन्याचे दागिने, ३२५ ग्रॅम चांदीचे दागिने व १,१५,३०० रोख रक्कम असा एकूण १२,३५,३०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालामध्ये सोन्याच्या अंगठ्या, मंगळसूत्र, झुमके, कुड्या, पोत, सरपाळे, ओम पेंडंट, चांदीच्या साखळ्या, कडे, पैंजण, जोडवे, करंडे तसेच रोख रक्कमेचा समावेश आहे.
या कारवाईमुळे जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला असून, चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करून संबंधित पोलीस ठाण्यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. आरोपींकडून आणखी काही घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे.
ही उल्लेखनीय कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग व्यंकट माने, पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, पोलीस अंमलदार माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, रामलिंग शिंदे, तुराब पठाण, सुरेश कलमे, गणेश साठे, पाराजी पुट्टेवाड, तुळशीराम बरूरे, श्रीनिवास जांभळे तसेच सायबर सेलचे पोलीस अंमलदार शैलेश सुडे यांनी यशस्वीपणे पार पाडली.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.