स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत घरफोडीतील 16 गुन्हे उघडकीस, 4 ताब्यात, 12 लाख रुपयांच्यावर मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत 16 गुन्हे उघडकीस, 4 ताब्यात, 12 लाख रुपयांच्यावर मुद्देमाल जप्त. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. रविवार दिनांक 2 ऑगस्ट 2026. लातूर जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून घरफोडी व चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दि. ०१ ऑगस्ट २०२६ रोजी केलेल्या दोन कारवायांमध्ये ३ सराईत आरोपी व १ विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेऊन कर्नाटक राज्यातील बिदर येथील एका गुन्ह्यासह तब्बल १५ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यास यश मिळविले आहे. पहिल्या कारवाईत लातूर शहरातील रेल्वे स्टेशन चौक परिसरातून १) योगेश शंकर पवार (वय ४३, रा. बेळी, ता. मुखेड, जि. नांदेड, सध्या उमरगा) यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने चाकूर येथील घरफोडीची कबुली देत कर्नाटक राज्यातील कमालनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीचाही गुन्हा केल्याची माहिती दिली. त्याच्याकडून चोरीतील सोन्याची अंगठी व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या कारवाईत चाकूर येथील आयटीआय महाविद्यालयासमोर सापळा रचून २)राजू जगन्नाथ शिंदे (रा. पांगरी, ता. परळी, जि. बीड), ३)कट्टप्पा हणमंत भोसले (रा. बोरी, ता. जिंतूर, जि. परभणी) तसेच एका विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपींनी चाकूर, उदगीर शहर, उदगीर ग्रामीण, अहमदपूर, किनगाव, जळकोट तसेच इतर ठिकाणी रात्रीच्या वेळी बंद घरे फोडून चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींच्या चौकशीवरून चाकूर पोलीस ठाण्याचे ५, उदगीर ग्रामीणचे ३, उदगीर शहरचे २, अहमदपूरचे २, किनगावचे १, जळकोटचे १ तसेच कर्नाटक राज्यातील कमालनगर पोलीस ठाण्याचा १ अशा एकूण १५ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले. या कारवाईत ७१ ग्रॅम सोन्याचे दागिने, ३२५ ग्रॅम चांदीचे दागिने व १,१५,३०० रोख रक्कम असा एकूण १२,३५,३०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालामध्ये सोन्याच्या अंगठ्या, मंगळसूत्र, झुमके, कुड्या, पोत, सरपाळे, ओम पेंडंट, चांदीच्या साखळ्या, कडे, पैंजण, जोडवे, करंडे तसेच रोख रक्कमेचा समावेश आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला असून, चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करून संबंधित पोलीस ठाण्यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. आरोपींकडून आणखी काही घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे. ही उल्लेखनीय कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग व्यंकट माने, पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, पोलीस अंमलदार माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, रामलिंग शिंदे, तुराब पठाण, सुरेश कलमे, गणेश साठे, पाराजी पुट्टेवाड, तुळशीराम बरूरे, श्रीनिवास जांभळे तसेच सायबर सेलचे पोलीस अंमलदार शैलेश सुडे यांनी यशस्वीपणे पार पाडली.
स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत घरफोडीतील 16 गुन्हे उघडकीस, 4 ताब्यात, 12 लाख रुपयांच्यावर मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत 16 गुन्हे उघडकीस, 4 ताब्यात, 12 लाख रुपयांच्यावर मुद्देमाल जप्त. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. रविवार दिनांक 2 ऑगस्ट 2026. लातूर जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून घरफोडी व चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दि. ०१ ऑगस्ट २०२६ रोजी केलेल्या दोन कारवायांमध्ये ३ सराईत आरोपी व १ विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेऊन कर्नाटक राज्यातील बिदर येथील एका गुन्ह्यासह तब्बल १५ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यास यश मिळविले आहे. पहिल्या कारवाईत लातूर शहरातील रेल्वे स्टेशन चौक परिसरातून १) योगेश शंकर पवार (वय ४३, रा. बेळी, ता. मुखेड, जि. नांदेड, सध्या उमरगा) यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने चाकूर येथील घरफोडीची कबुली देत कर्नाटक राज्यातील कमालनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीचाही गुन्हा केल्याची माहिती दिली. त्याच्याकडून चोरीतील सोन्याची अंगठी व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या कारवाईत चाकूर येथील आयटीआय महाविद्यालयासमोर सापळा रचून २)राजू जगन्नाथ शिंदे (रा. पांगरी, ता. परळी, जि. बीड), ३)कट्टप्पा हणमंत भोसले (रा. बोरी, ता.
जिंतूर, जि. परभणी) तसेच एका विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपींनी चाकूर, उदगीर शहर, उदगीर ग्रामीण, अहमदपूर, किनगाव, जळकोट तसेच इतर ठिकाणी रात्रीच्या वेळी बंद घरे फोडून चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींच्या चौकशीवरून चाकूर पोलीस ठाण्याचे ५, उदगीर ग्रामीणचे ३, उदगीर शहरचे २, अहमदपूरचे २, किनगावचे १, जळकोटचे १ तसेच कर्नाटक राज्यातील कमालनगर पोलीस ठाण्याचा १ अशा एकूण १५ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले. या कारवाईत ७१ ग्रॅम सोन्याचे दागिने, ३२५ ग्रॅम चांदीचे दागिने व १,१५,३०० रोख रक्कम असा एकूण १२,३५,३०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालामध्ये सोन्याच्या अंगठ्या, मंगळसूत्र, झुमके, कुड्या, पोत, सरपाळे, ओम पेंडंट, चांदीच्या साखळ्या, कडे, पैंजण, जोडवे, करंडे तसेच रोख रक्कमेचा समावेश आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला असून, चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करून संबंधित पोलीस ठाण्यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. आरोपींकडून आणखी काही घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे. ही उल्लेखनीय कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग व्यंकट माने, पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, पोलीस अंमलदार माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, रामलिंग शिंदे, तुराब पठाण, सुरेश कलमे, गणेश साठे, पाराजी पुट्टेवाड, तुळशीराम बरूरे, श्रीनिवास जांभळे तसेच सायबर सेलचे पोलीस अंमलदार शैलेश सुडे यांनी यशस्वीपणे पार पाडली.
- भारतीय शेतकरी कामगार पक्ष च्या वर्धापन दिनानिमित्त सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना क्रांतिकारी लाल सलाम व हार्दिक शुभेच्छा1
- कल कर्जाळ बंधारा पाण्याखाली जाण्याची शक्यता; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन कर्जाळ बंधारा पाण्याखाली जाण्याची शक्यता; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आला आहे. कल कर्जाळ परिसरात पाण्याची आवक वेगाने वाढत असून, कर्जाळ बंधारा पुढील सुमारे १० मिनिटांत पाण्याखाली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाने आणि स्थानिकांनी नागरिकांना या मार्गाचा वापर टाळण्याचे आवाहन केले आहे. बंधाऱ्यावरून प्रवास करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे या मार्गाने येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांनी तात्काळ पर्यायी मार्गाचा वापर करावा. तसेच कोणत्याही परिस्थितीत बंधाऱ्यावर गर्दी करू नये किंवा पाण्यात उतरण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि ही माहिती इतरांपर्यंतही पोहोचवून सहकार्य करावे.1
- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती महामानव अभिवादन ग्रुप तर्फे उत्साहात संपन्न... साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती महामानव अभिवादन ग्रुप तर्फे उत्साहात संपन्न... बीड (प्रतिनिधी) "जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मज भीमराव" असे उद्गार काढणारे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती महामानव अभिवादन ग्रुपने सर्व परिवर्तनवादी महापुरुषांच्या जयंत्या संपन्न करण्याचे जाहीर केल्याप्रमाणे बीड शहरात सर्वप्रथम 26 जून 2026 रोजी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सार्वजनिक रित्या बीड शहरांमध्ये संपन्न केली होती. त्यानुसार 1 ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ही जयंती संपूर्ण बीड शहरातील समाजबांधवांना एकत्रित करून तसेच विविध संघटनांना;भारतीय बौद्ध महासभा शाखा बीड, धम्म महासंघ बीड, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी यांचा सम्राट अशोक शाक्य संघ बीड तसेच इतर अनेक संघटनाना एकत्रित करून महामानव अभिवादन ग्रुपने बीड शहरांमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करत असताना सर्वप्रथम बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. समता सैनिक दला तर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देऊन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे रथातून सुवाद्यासह व विविध घोषणा देऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापर्यंत शोभायात्रा काढून रस्त्यामधील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या सर्व परिवर्तनवादी महापुरुषांचा आदर्श सतत डोळ्यासमोर राहावा व कृती कार्यक्रम करण्यास प्रवृत्त व्हावे हा उद्देश ठेवूनच महामानव अभिवादन ग्रुपच्या वतीने सर्व महापुरुषांच्या जयंती स्मृतिदिन मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहेत. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्या जवळ आल्यानंतर सर्वप्रथम समता सैनिक दलातर्फे पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना पुष्पमाला अर्पण करून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर रॅलीचे रूपांतर सभेमध्ये झाले. त्या ठिकाणी सेवानिवृत्त पी व्ही बनसोडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रबोधनात्मक विचार उपस्थित मान्यवरांकडून मांडण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महामानवाभिवादन ग्रुपचे अध्यक्ष जी .एम भोले सर यांनी केले तर प्रास्ताविक अमरसिंह ढाका राज्य संघटक भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य यांनी केले. ह्या प्रसंगी विचार मंचावर साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समिती चे अध्यक्ष ॲड तेजस वडमारे,कॉम्रेड नामदेवराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक जे. टी साळवे, सतिष कापसे, ॲड हनुमंत कांबळे,ॲड चंद्रवदन जाधव, कल्याण भंडारे, शिवाजी जोगदंड, रंजना चांदणे, कॅप्टन राजाभाऊ आठवले उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या, "शिका संघटित व्हा व संघर्ष करा" या बहुमोल उपदेशाचे महत्त्व लक्षात ठेवून प्रबोधनात्मक विचार मांडले. साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची आज समाजामध्ये बदल घडविण्यासाठी किती गरज आहे यावर सखोल प्रकाश टाकला. या कार्यक्रमास बीड शहरातील बहुसंख्य नागरिकांची, विविध संघटनेतील सदस्यांची महामानव अभिवादन ग्रुपच्या सर्व सदस्यांची उपस्थिती होती. शेवटी आभार प्रदर्शन प्रशांत वासनिक यांनी केले. या कार्यक्रमास वंचित चे माजी जिल्हाध्यक्ष अजय सरवदे, प्रा.अशोक गायकवाड, डी .एम राऊत, यु एस वाघमारे, प्रकाश खंडारे, आर.डी चक्रे, वसंतराव तरकसे , एस एस सोनवणे, बि.जी दळवी, वैशाली शिंदे, बी.डी तांगडे, अर्जुन जवंजाळ, कुमारथ पारवे, संजय मिसाळ, प्रवीण टाकणखार संदीप जाधव, बबन जोगदंड, राजू भोले, अनिल डोळस, सिद्धार्थ जगताप, नंदा भंडारे, अंजली वडमारे, शोभाताई आठवले, सूर्यकांत जोगदंड,बौद्धाचार्य ॲड भास्कर सोनवणे, शेवाळे साहेब यांची उपस्थिती होती.1
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळा संपन्न किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या किर्तन पासदगाव येथे संपन्न1
- भीमा नदीच्या वाढत्या पाण्यात खानापूर बंधाऱ्यावरून जीव धोक्यात घालून नागरिकांचा प्रवास सततच्या पावसामुळे भीमा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असून, खानापूर बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागल्याने नागरिकांचा प्रवास धोकादायक बनला आहे. जीव मुठीत धरून नागरिकांना या बंधाऱ्यावरून ये-जा करावी लागत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. खानापूर परिसरातील अनेक नागरिक कामानिमित्त, शिक्षणासाठी तसेच दैनंदिन गरजांसाठी या मार्गाचा वापर करतात. मात्र वाढत्या पाण्यामुळे बंधाऱ्यावरून प्रवास करताना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तरीही पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने अनेकांना धोका पत्करून प्रवास करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून आवश्यक सुरक्षेची उपाययोजना करावी, धोक्याच्या ठिकाणी सूचना फलक व बॅरिकेड्स लावावेत आणि परिस्थिती गंभीर झाल्यास वाहतूक बंद करून पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, पावसाचा जोर कायम राहिल्यास भीमा नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, नागरिकांनी कोणताही धोका पत्करू नये व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.1
- आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन किर्तनकार इंदुरीकर महाराज किर्तन सोहळा संपन्न1
- लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण इशारा परिषद नांदेड लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण इशारा परिषद नांदेड1