वाढत्या उन्हाळ्यात भाविकांना दिलासा; अंबाबाई आणि जोतिबा मंदिरात देवस्थान समितीची विशेष व्यवस्था कोल्हापूर: प्रतिनिधी करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि वाडी रत्नागिरी येथील श्री केदारलिंग जोतिबा मंदिरात सध्या उन्हाळी सुट्ट्यांमुळे भाविकांची मोठी गर्दी होत आहे. यावर्षी उन्हाचा कडाका प्रचंड असल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने विशेष 'थंडावा' देणारे नियोजन करण्यात आले आहे. या उपाययोजनांची माहिती देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे यांनी दिली. उन्हावर मात करण्यासाठी 'थंडावा' नियोजन सचिव शिवराज नाईकवडे यांनी सांगितले की, वाढत्या तापमानाचा विचार करून भाविकांना उन्हापासून वाचवण्यासाठी मंदिर परिसरात विविध ठिकाणी विशेष 'मॅटिंग' टाकण्यात आले आहे. जमिनीची उष्णता कमी करण्यासाठी आणि भाविकांच्या पायांना चटके बसू नयेत म्हणून उष्णतारोधक पांढरे पट्टे मारण्याचे कामही पूर्ण करण्यात आले आहे. यासोबतच भाविकांसाठी शुद्ध आणि थंड पिण्याच्या पाण्याची ठिकठिकाणी सोय करण्यात आली आहे. मर्यादित जागेतही सोयीसुविधांवर भर सध्या दोन्ही मंदिरांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या संवर्धन योजनेअंतर्गत आणि पुरातत्व विभागामार्फत जतनाची कामे सुरू आहेत. या कामासाठी क्रेन आणि ट्रॉलीची सातत्याने ये-जा सुरू असते, त्यामुळे संपूर्ण मंदिर परिसरात कायमस्वरूपी मंडप उभारणे तांत्रिकदृष्ट्या शक्य झालेले नाही. मात्र, जिथे जिथे जागा उपलब्ध आहे आणि जिथे तांत्रिक अडचण नाही, अशा सर्व ठिकाणी प्रशासनाने मंडप उभारले आहेत. या मंडपांमध्ये उकाड्यापासून बचाव करण्यासाठी पंखे आणि कुलरची व्यवस्था करण्यात आली असल्याचे नाईकवडे यांनी नमूद केले. प्रशासनाचे भाविकांना आवाहन हवामान खात्याने दिलेल्या उष्णतेच्या लाटेच्या (Heat Wave) इशाऱ्यांनुसार भाविकांनी आपल्या प्रवासाचे आणि दर्शनाचे नियोजन करावे, असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे. विशेषतः लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींच्या प्रकृतीचा विचार करून कडाक्याच्या उन्हाची वेळ टाळून योग्य वेळेतच दर्शनाचा लाभ घ्यावा, अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

- Post by Digital media.1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- मावळ पुणे :- मावळ तालुक्यात अंमली पदार्थांचे जाळे वाढत असल्याची गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली असून एमडीसारखे घातक पदार्थ नेमके कुठून येतात, असा सवाल मावळ आमदार सुनील शेळके यांनी उपस्थित केला असून तरुणाई मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत असल्याचे चित्र आहे. आमदार सुनील शेळके यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत, “आज प्रत्येक घरात एक व्यक्ती व्यसनाधीन झाल्याची परिस्थिती आहे. आपल्या मुलांकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे,” असे स्पष्ट केले.... जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर महिलांनी आंदोलन करत या प्रश्नाकडे लक्ष वेधले असतानाही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याची टीकाही करण्यात आली. चांगल्या कुटुंबातील मुलं-मुली व्यसनाच्या आहारी जात असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वडगाव मावळ येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना शेळके यांनी समाज, प्रशासन आणि पालकांनी एकत्र येऊन या समस्येवर ठोस उपाययोजना करण्याचे आवाहन केले... : सुनील शेळके, आमदार मावळ #मावळ #पुणे #अमलीपदार्थ #व्यसनाधीनता #तरुणाई #ड्रग्ससंकट #एमडीड्रग्स #मावळबातम्या #सुनीलशेळके #आंदोलन #पालकजागृती #व्यसनमुक्ती #समाजजागृती #Maval #Pune #DrugMenace #DrugAddiction #YouthCrisis #MDDrugs #AntiDrugs #BreakingNews #SunilShelke #Protest #SocialAwareness #SaveYouth #DrugFreeIndia #MavalNews #PuneNews #DrugCrisis #YouthAtRisk #StopDrugs #Awareness #Breaking #GroundReport #RealityCheck #VoiceOfPeople1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- अकोला: जळीत इसम मृत्यू प्रकरण; सोशल मीडियावरील अफवांना छेद, 'सीसीटीव्ही'मुळे आत्महत्येचा खुलासा1
- Post by कर्जत लाईव्ह1
- मावळ पुणे :- लोणावळा-खंडाळ्यात टॅक्सी चालकांचे तीन दिवसीय साखळी आंदोलन सुरू असून, बेकायदेशीर ॲप-आधारित कंपन्यांविरोधात टॅक्सी चालक मालक वेलफेअर असोसिएशन आक्रमक झालीये टॅक्सी चालकांच्या उपोषणाला शिवसेना उबाटा चे प्रवक्ते संजय राऊत यांनी काल रात्री धावती भेट दिली, आणि या आंदोलकांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी खासदार संजय राऊत यांनी आंदोलनकर्त्याना आश्वासन दिलं याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी बोलून लवकरच तोडगा काढू.... #लोणावळा #खंडाळा #मावळ #टॅक्सीआंदोलन #टॅक्सीचालक #उपोषण #अॅपकंपन्या #बेकायदेशीरसेवा #संजयराऊत #शिवसेना #परिवहनमंत्री #प्रतापसरनाईक #आंदोलन #महाराष्ट्रबातम्या #Lonavala #Khandala #Maval #TaxiStrike #TaxiDrivers #Protest #HungerStrike #AppBasedCompanies #IllegalTransport #SanjayRaut #ShivSena #PratapSarnaik #MaharashtraNews #BreakingNews1
- सोलापुरात गणवेश गारमेंट केंद्राला भीषण आग; लाखोंचे कापड खाक1
- अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ गावाजवळ पिकप क्लोजर पलटी होऊन आठ ते दहा जणांना किरकोळ जखमी झाले आहेत. यातील जखमी बार्शी तालुक्यातील जामगाव येथील क्लोजर असल्याची माहिती स्थानिकांनी दिले आहेत.1