logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सिल्लोडमध्ये पोलीस अधिकाऱ्यांचा विशेष सोहळा: डॉ. दिनेशकुमार कोल्हे साहेबांना निरोप, विश्वजीत काईगडे साहेबांचे स्वागत! सिल्लोड शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आज एक अत्यंत आत्मीय व प्रेरणादायक कार्यक्रम पार पडला. या विशेष सोहळ्यात आपल्या उत्कृष्ट कर्तव्यनिंष्टेने सिल्लोडकरांच्या मनात स्थान निर्माण केलेले उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) डॉ. दिनेशकुमार कोल्हे साहेब यांना भावभीनी विदाई देण्यात आली. तसेच, सिल्लोडचे नवनियुक्त उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून पदभार स्वीकारणारे श्री. विश्वजीत काईगडे साहेब यांचे शहरात जोरदार स्वागत करण्यात आले. पोलीस प्रशासनाच्या या सुंदर आयोजनाची संपूर्ण बातमी पाहा फक्त AQS NEWS DIGITAL वर. 🔗 लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका! #Sillod #AqsNewsDigital #MaharashtraPolice #DySPSillod #PoliceFarewell #PoliceWelcome #SillodNews #AQSNEWS

3 hrs ago
user_Anis qureshi sillod
Anis qureshi sillod
Local News Reporter Sillod, Aurangabad•
3 hrs ago

सिल्लोडमध्ये पोलीस अधिकाऱ्यांचा विशेष सोहळा: डॉ. दिनेशकुमार कोल्हे साहेबांना निरोप, विश्वजीत काईगडे साहेबांचे स्वागत! सिल्लोड शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आज एक अत्यंत आत्मीय व प्रेरणादायक कार्यक्रम पार पडला. या विशेष सोहळ्यात आपल्या उत्कृष्ट कर्तव्यनिंष्टेने सिल्लोडकरांच्या मनात स्थान निर्माण केलेले उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) डॉ. दिनेशकुमार कोल्हे साहेब यांना भावभीनी विदाई देण्यात आली. तसेच, सिल्लोडचे नवनियुक्त उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून पदभार स्वीकारणारे श्री. विश्वजीत काईगडे साहेब यांचे शहरात जोरदार स्वागत करण्यात आले. पोलीस प्रशासनाच्या या सुंदर आयोजनाची संपूर्ण बातमी पाहा फक्त AQS NEWS DIGITAL वर. 🔗 लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका! #Sillod #AqsNewsDigital #MaharashtraPolice #DySPSillod #PoliceFarewell #PoliceWelcome #SillodNews #AQSNEWS

More news from Aurangabad and nearby areas
  • सिल्लोडमध्ये पोलीस अधिकाऱ्यांचा विशेष सोहळा: डॉ. दिनेशकुमार कोल्हे साहेबांना निरोप, विश्वजीत काईगडे साहेबांचे स्वागत! सिल्लोड शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आज एक अत्यंत आत्मीय व प्रेरणादायक कार्यक्रम पार पडला. या विशेष सोहळ्यात आपल्या उत्कृष्ट कर्तव्यनिंष्टेने सिल्लोडकरांच्या मनात स्थान निर्माण केलेले उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) डॉ. दिनेशकुमार कोल्हे साहेब यांना भावभीनी विदाई देण्यात आली. तसेच, सिल्लोडचे नवनियुक्त उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून पदभार स्वीकारणारे श्री. विश्वजीत काईगडे साहेब यांचे शहरात जोरदार स्वागत करण्यात आले. पोलीस प्रशासनाच्या या सुंदर आयोजनाची संपूर्ण बातमी पाहा फक्त AQS NEWS DIGITAL वर. 🔗 लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका! #Sillod #AqsNewsDigital #MaharashtraPolice #DySPSillod #PoliceFarewell #PoliceWelcome #SillodNews #AQSNEWS
    1
    सिल्लोडमध्ये पोलीस अधिकाऱ्यांचा विशेष सोहळा: डॉ. दिनेशकुमार कोल्हे साहेबांना निरोप, विश्वजीत काईगडे साहेबांचे स्वागत!
सिल्लोड शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आज एक अत्यंत आत्मीय व प्रेरणादायक कार्यक्रम पार पडला. या विशेष सोहळ्यात आपल्या उत्कृष्ट कर्तव्यनिंष्टेने सिल्लोडकरांच्या मनात स्थान निर्माण केलेले उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) डॉ. दिनेशकुमार कोल्हे साहेब यांना भावभीनी विदाई देण्यात आली.
तसेच, सिल्लोडचे नवनियुक्त उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून पदभार स्वीकारणारे श्री. विश्वजीत काईगडे साहेब यांचे शहरात जोरदार स्वागत करण्यात आले. पोलीस प्रशासनाच्या या सुंदर आयोजनाची संपूर्ण बातमी पाहा फक्त AQS NEWS DIGITAL वर.
🔗 लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका!
#Sillod #AqsNewsDigital #MaharashtraPolice #DySPSillod #PoliceFarewell #PoliceWelcome #SillodNews #AQSNEWS
    user_Anis qureshi sillod
    Anis qureshi sillod
    Local News Reporter Sillod, Aurangabad•
    3 hrs ago
  • भोकरदन पोलिसांची धडाकेबाज कामगिरी मध्य प्रदेशातून ८ लाख ८० हजारांची रोकड हस्तगत
    1
    भोकरदन पोलिसांची धडाकेबाज कामगिरी मध्य प्रदेशातून ८ लाख ८० हजारांची रोकड हस्तगत
    user_अब तक न्यूज महाराष्ट्र
    अब तक न्यूज महाराष्ट्र
    Local News Reporter भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • भोकरदन येथे चोरीस गेलेल्या **₹9 लाखांपैकी ₹8.80 लाखांची रोख रक्कम** मध्य प्रदेशातून जप्त भोकरदन येथे चोरीस गेलेल्या **₹9 लाखांपैकी ₹8.80 लाखांची रोख रक्कम** मध्य प्रदेशातून जप्त करण्यात आली असून **तीन आरोपींना अटक** करण्यात आली आहे. 23 जुलै रोजी बँकेतून काढलेली रक्कम पिकअप वाहनातून चोरट्यांनी लंपास केली होती. सीसीटीव्ही, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मध्य प्रदेशातील आरोपींना जेरबंद केले. आरोपींकडून **₹8.80 लाखांची रोख रक्कम** जप्त करण्यात आली असून, ही कारवाई पोलीस अधीक्षक तेघबीरसिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण बिडवे व भोकरदन पोलीस पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
    1
    भोकरदन येथे चोरीस गेलेल्या **₹9 लाखांपैकी ₹8.80 लाखांची रोख रक्कम** मध्य प्रदेशातून जप्त
भोकरदन येथे चोरीस गेलेल्या **₹9 लाखांपैकी ₹8.80 लाखांची रोख रक्कम** मध्य प्रदेशातून जप्त करण्यात आली असून **तीन आरोपींना अटक** करण्यात आली आहे.
23 जुलै रोजी बँकेतून काढलेली रक्कम पिकअप वाहनातून चोरट्यांनी लंपास केली होती. सीसीटीव्ही, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मध्य प्रदेशातील आरोपींना जेरबंद केले.
आरोपींकडून **₹8.80 लाखांची रोख रक्कम** जप्त करण्यात आली असून, ही कारवाई पोलीस अधीक्षक तेघबीरसिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण बिडवे व भोकरदन पोलीस पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor Bhokardan, Jalna•
    11 hrs ago
  • दिवसाढवळ्या 9 लाखांची रक्कम लंपास, भोकरदन पोलिसांची धडाकेबाज कारवाई . मध्य प्रदेशातून 8 लाख 80 हजार हस्तगत, 3 आंतरराज्य चोरटे गजाआड महिलांचा विश्वास परत मिळवला बचत गटाच्या महिलांनी पोलिसांचा केला सत्कार भोकरदन शहर आणि परिसरात खळबळ उडवून देणाऱ्या 9 लाख रुपयांच्या चोरी प्रकरणाचा भोकरदन पोलिसांनी अवघ्या 5 दिवसांत छडा लावला आहे. मध्य प्रदेशातील राजगड आणि गुणा जिल्ह्यातून 3 आंतरराज्य चोरट्यांना अटक करून 8 लाख 80 हजार रुपये रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे. या धडाकेबाज कारवाईने कोटा जहागीर येथील जय योगेश्वर बचत गटाच्या महिलांचा जीव भांड्यात पडला असून त्यांनी पोलिसांचा सत्कार करून आभार मानले दि. 23 जुलै 2026 रोजी दुपारी 4 ते 4.30 च्या सुमारास कोटा जहागीर येथील जय योगेश्वर बचत गटाच्या महिला बबीता भागाजी इच्चे वय 40 या भारतीय स्टेट बँक भोकरदन शाखेतून बचत गटाचे 9 लाख रुपये काढून त्यांच्या पिकअप वाहन क्रमांक MH-21-BH-0504 मध्ये ठेवून भोकरदन ते जाफ्राबाद रोडवरील रत्नमाला लॉनजवळ चहा पिण्यासाठी थांबल्या. काही क्षणांतच अज्ञात चोरट्यांनी वाहनाची डावी बाजूची काच फोडून आतील रोख रक्कम लंपास केली. या घटने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. गुन्हा दाखल होताच मा. पोलीस अधीक्षक श्री. तेघबीरसिंह संधू, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. डॉ. नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. किरण बिडवे यांनी विशेष पथक तयार केले. पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच SBI बँक आणि परिसरातील CCTV फुटेज तपासले. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे चोरटे मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील गुलखेडी येथे असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस उपनिरीक्षक राहुल बांगर, संतोष बनकर, पोलीस अंमलदार यांच्या पथकाने तात्काळ मध्य प्रदेशात धाव घेऊन 3 आरोपींना ताब्यात घेतले. 1.राहुल उत्तम सिसोदीया वय 22, रा. गुलखेडी, ता. पचोर, जि. राजगड 2.कालू उर्फ शिवप्रसाद सिसोदीया, रा. कडीया, ता. पचोर, जि. राजगड 3.कल्लू उर्फ जगप्रकाश सांसी वय 25, रा. मुगावली, ता. गुणा, जि. अशोकनगर आरोपींकडून 8 लाख 80 हजार रुपये रोख हस्तगत करण्यात आले पोलिसांच्या तपासात समोर आले की, हे आरोपी टोळीने काम करतात. एकजण बँकेत आणि सोन्याच्या दुकानात रेकी करतो, तर दुसरा वाहनासह बाहेर लक्ष ठेवतो. गुन्हा करून ते लगेच लॉजवर थांबत नाहीत आणि मोटारसायकलसह हेल्मेटचा वापर करतात पोलिसांनी हस्तगत केलेली रक्कम आज भोकरदन पोलीस स्टेशनच्या आवारात बचत गटाच्या महिलांना परत करण्यात आली. पैसे परत मिळाल्याने महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. महिलांनी पोलीस निरीक्षक किरण बिडवे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी बचत गटाच्या महिला म्हणाल्या, आमची आयुष्यभराची पुंजी होती. पोलीसांनी ती परत मिळवून दिली. आमचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. या प्रकरणानंतर पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, मोठी रक्कम एकट्याने घेऊन जाऊ नये. शक्यतो ऑनलाईन व्यवहार करावा. रक्कम उघडपणे दाखवू नये. बँकेतून पैसे काढल्यानंतर थेट घरी किंवा ऑफिसला जावे. निर्जन ठिकाणी वाहन थांबवू नये. संशयास्पद व्यक्ती दिसल्यास तात्काळ 112 किंवा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. या यशस्वी कारवाईबद्दल मा. पोलीस अधीक्षक तेघबीरसिंह संधू यांनी संपूर्ण भोकरदन पोलीस टीमचे कौतुक केले आहे. इसरारखान पठाण पत्रकार भोकरदन तर्फे भोकरदन पोलिसांच्या या तत्पर आणि व्यावसायिक कामगिरीचे अभिनंदन!
    4
    दिवसाढवळ्या 9 लाखांची रक्कम लंपास, भोकरदन पोलिसांची धडाकेबाज कारवाई . 
  मध्य प्रदेशातून 8 लाख 80 हजार हस्तगत, 3 आंतरराज्य चोरटे गजाआड   
  महिलांचा विश्वास परत मिळवला बचत गटाच्या महिलांनी पोलिसांचा केला सत्कार  
भोकरदन  शहर आणि परिसरात खळबळ उडवून देणाऱ्या 9 लाख रुपयांच्या चोरी प्रकरणाचा भोकरदन पोलिसांनी अवघ्या 5 दिवसांत छडा लावला आहे. मध्य प्रदेशातील राजगड आणि गुणा जिल्ह्यातून 3 आंतरराज्य चोरट्यांना अटक करून 8 लाख 80 हजार रुपये रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे. या धडाकेबाज कारवाईने कोटा जहागीर येथील जय योगेश्वर बचत गटाच्या महिलांचा जीव भांड्यात पडला असून त्यांनी पोलिसांचा सत्कार करून आभार मानले  
दि. 23 जुलै 2026 रोजी दुपारी 4 ते 4.30 च्या सुमारास कोटा जहागीर येथील जय योगेश्वर बचत गटाच्या महिला बबीता भागाजी इच्चे वय 40 या भारतीय स्टेट बँक भोकरदन शाखेतून बचत गटाचे 9 लाख रुपये काढून त्यांच्या पिकअप वाहन क्रमांक MH-21-BH-0504 मध्ये ठेवून भोकरदन ते जाफ्राबाद रोडवरील रत्नमाला लॉनजवळ चहा पिण्यासाठी थांबल्या.  
काही क्षणांतच अज्ञात चोरट्यांनी वाहनाची डावी बाजूची काच फोडून आतील रोख रक्कम लंपास केली. या घटने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली होती.
गुन्हा दाखल होताच मा. पोलीस अधीक्षक श्री. तेघबीरसिंह संधू, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. डॉ. नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. किरण बिडवे यांनी विशेष पथक तयार केले.  
पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच SBI बँक आणि परिसरातील CCTV फुटेज तपासले. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे चोरटे मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील गुलखेडी येथे असल्याचे निष्पन्न झाले.  
पोलीस उपनिरीक्षक राहुल बांगर, संतोष बनकर, पोलीस अंमलदार यांच्या पथकाने तात्काळ मध्य प्रदेशात धाव घेऊन 3 आरोपींना ताब्यात घेतले.  
1.राहुल उत्तम सिसोदीया वय 22, रा. गुलखेडी, ता. पचोर, जि. राजगड  
2.कालू उर्फ शिवप्रसाद सिसोदीया, रा. कडीया, ता. पचोर, जि. राजगड 
3.कल्लू उर्फ जगप्रकाश सांसी वय 25, रा. मुगावली, ता. गुणा, जि. अशोकनगर  
आरोपींकडून 8 लाख 80 हजार रुपये रोख हस्तगत करण्यात आले  
पोलिसांच्या तपासात समोर आले की, हे आरोपी टोळीने काम करतात. एकजण बँकेत आणि सोन्याच्या दुकानात रेकी करतो, तर दुसरा वाहनासह बाहेर लक्ष ठेवतो. गुन्हा करून ते लगेच लॉजवर थांबत नाहीत आणि मोटारसायकलसह हेल्मेटचा वापर करतात 
पोलिसांनी हस्तगत केलेली रक्कम आज भोकरदन पोलीस स्टेशनच्या आवारात बचत गटाच्या महिलांना परत करण्यात आली. पैसे परत मिळाल्याने महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. महिलांनी पोलीस निरीक्षक किरण बिडवे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.  
यावेळी बचत गटाच्या महिला म्हणाल्या, आमची आयुष्यभराची पुंजी होती. पोलीसांनी ती परत मिळवून दिली. आमचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.  
या प्रकरणानंतर पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, मोठी रक्कम एकट्याने घेऊन जाऊ नये. शक्यतो ऑनलाईन व्यवहार करावा. रक्कम उघडपणे दाखवू नये. बँकेतून पैसे काढल्यानंतर थेट घरी किंवा ऑफिसला जावे. निर्जन ठिकाणी वाहन थांबवू नये. संशयास्पद व्यक्ती दिसल्यास तात्काळ 112 किंवा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.  
या यशस्वी कारवाईबद्दल मा. पोलीस अधीक्षक तेघबीरसिंह संधू यांनी संपूर्ण भोकरदन पोलीस टीमचे कौतुक केले आहे. इसरारखान पठाण पत्रकार भोकरदन तर्फे भोकरदन पोलिसांच्या या तत्पर आणि व्यावसायिक कामगिरीचे अभिनंदन!
    user_इसरारखान पठाण
    इसरारखान पठाण
    Local News Reporter भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • सोन्याची अंगठी पाहण्याच्या बहाण्याने दुकानदाराची नजर चुकवून दीड तोळ्याची अंगठी घेऊन भामटा फरार; गंगापुरातील घटना सीसीटीव्हीत कैद सोन्याची अंगठी पाहण्याच्या बहाण्याने दुकानदाराची नजर चुकवून दीड तोळ्याची अंगठी घेऊन भामटा फरार; गंगापुरातील घटना सीसीटीव्हीत कैद ​प्रतिनिधी: जी. बी. हिवराळे दि. 27/07/2026 गंगापूर शहरातील राजीव गांधी चौक परिसरातील एका सराफा दुकानात ग्राहकाच्या वेषात आलेल्या एका भामट्याने सोन्याची अंगठी लांबवल्याची घटना घडली आहे. अंगठी पाहण्याच्या बहाण्याने नजर चुकवून सुमारे दीड तोळ्याची सोन्याची अंगठी घेऊन हा चोरटा फरार झाला. ही संपूर्ण घटना दुकानात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, याप्रकरणी गंगापूर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. ​घटनेचे ठिकाण: महेंद्र ज्वेलर्स, राजीव गांधी चौक परिसर, गंगापूर. ​दुकानाचे मालक: देवेंद्र सुवर्णकार. ​चोरी गेलेला ऐवज: अंदाजे दीड तोळा वजनाची सोन्याची अंगठी. ​मिळालेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे महेंद्र ज्वेलर्स हे दुकान सुरू असताना एक अज्ञाक तरुण दुकानात ग्राहक म्हणून आला. त्याने दुकानमालक देवेंद्र सुवर्णकार यांच्याकडे सोन्याची अंगठी दाखवण्याची मागणी केली. दुकानदाराने विश्वासाने काही अंगठ्या त्याच्यासमोर ठेवल्या. ​तरुण अंगठ्या पाहण्याचे नाटक करत असतानाच, त्याने संधी साधून त्यातील एक सुमारे दीड तोळ्याची अंगठी लपवली. त्यानंतर अंगठी पसंद पडत नसल्याचे सांगून तो दुकानदाराची नजर चुकवून तिथून निघून गेला. तो गेल्यानंतर दुकानदाराने स्टॉक तपासला असता सोन्याची अंगठी गायब असल्याचे लक्षात आले. ​सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती: ​दुकानदाराने तात्काळ दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, संबंधित भामटा अत्यंत चलाखीने अंगठी लांबवताना स्पष्टपणे दिसून आला. या घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या भामट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोहीम तीव्र केली असून, लवकَर च आरोपीला अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या धाडसी चोरीमुळे गंगापूर शहरातील सराफा व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
    1
    सोन्याची अंगठी पाहण्याच्या बहाण्याने दुकानदाराची नजर चुकवून दीड तोळ्याची अंगठी घेऊन भामटा फरार; गंगापुरातील घटना सीसीटीव्हीत कैद
सोन्याची अंगठी पाहण्याच्या बहाण्याने दुकानदाराची नजर चुकवून दीड तोळ्याची अंगठी घेऊन भामटा फरार; गंगापुरातील घटना सीसीटीव्हीत कैद
​प्रतिनिधी: जी. बी. हिवराळे 
दि. 27/07/2026
गंगापूर शहरातील राजीव गांधी चौक परिसरातील एका सराफा दुकानात ग्राहकाच्या वेषात आलेल्या एका भामट्याने सोन्याची अंगठी लांबवल्याची घटना घडली आहे. अंगठी पाहण्याच्या बहाण्याने नजर चुकवून सुमारे दीड तोळ्याची सोन्याची अंगठी घेऊन हा चोरटा फरार झाला. ही संपूर्ण घटना दुकानात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, याप्रकरणी गंगापूर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
​घटनेचे ठिकाण: महेंद्र ज्वेलर्स, राजीव गांधी चौक परिसर, गंगापूर.
​दुकानाचे मालक: देवेंद्र सुवर्णकार.
​चोरी गेलेला ऐवज: अंदाजे दीड तोळा वजनाची सोन्याची अंगठी.
​मिळालेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे महेंद्र ज्वेलर्स हे दुकान सुरू असताना एक अज्ञाक तरुण दुकानात ग्राहक म्हणून आला. त्याने दुकानमालक देवेंद्र सुवर्णकार यांच्याकडे  सोन्याची अंगठी दाखवण्याची मागणी केली. दुकानदाराने विश्वासाने काही अंगठ्या त्याच्यासमोर ठेवल्या.
​तरुण अंगठ्या पाहण्याचे नाटक करत असतानाच, त्याने संधी साधून त्यातील एक सुमारे दीड तोळ्याची अंगठी  लपवली. त्यानंतर अंगठी पसंद पडत नसल्याचे सांगून तो दुकानदाराची नजर चुकवून तिथून निघून गेला. तो गेल्यानंतर दुकानदाराने स्टॉक तपासला असता सोन्याची अंगठी गायब असल्याचे लक्षात आले.
​सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती:
​दुकानदाराने तात्काळ दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, संबंधित भामटा अत्यंत चलाखीने अंगठी लांबवताना स्पष्टपणे दिसून आला. या घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या भामट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोहीम तीव्र केली असून, लवकَर च आरोपीला अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या धाडसी चोरीमुळे गंगापूर शहरातील सराफा व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
    user_Gautam Hiwrale
    Gautam Hiwrale
    पत्रकार सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    16 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.