logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

खरीप हंगाम 2026 साठी सुधारित पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 जुलै पर्यंत -जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, नांदेड नांदेड दि. 12 जुलै :- खरीप हंगाम 2026 या पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक, पिकपेरा, स्वयंघोषणापत्र, 7/12, आठ-अ व शेतकरी ओळखपत्र क्रमांक या कागदपत्रांची आवश्यकता आहे. पिक विमा भरण्याची अंतिम शुक्रवार 31 जुलै 2026 आहे. यात कोणत्याही प्रकारची मुदतवाढ मिळणार नसल्याने शेवटच्या दिवसांची वाट न बघता अधिकाधिक शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नांदेड यांनी केले आहे. योजनेची `प्रमुख वैशिष्ट्ये सदरची योजना ही अधिसूचित केलेल्या पिकांसाठी केवळ अधिसूचित क्षेत्रासाठी लागू असेल. प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार, तसेच, बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. मात्र भाडेपट्टीने शेती करणारास नोंदणीकृत (रजिस्टर्ड) भाडेकरार पीक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी 2 टक्के, रब्बी हंगामासाठी 1.5 टक्के तसेच खरीप व रबी हंगामातील नगदी पिकांसाठी 5 टक्के असा मर्यादित ठेवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2026 व रब्बी हंगाम 2026-27 या 1 वर्षाकरिता सर्व अधिसूचित पिकांसाठी जोखिमस्तर 70 टक्के असा निश्चित करण्यात आला आहे. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे उंबरठा उत्पादन हे मागील 7 वर्षापैकी सर्वाधिक उत्पादनाध्या 5 वर्षांचे सरासरी उत्पादन गुणिले त्या पिकाचा जोखीमस्तर विचारात घेवून निश्चित केले जाईल. या योजनेत मृत शेतकऱ्यांच्या नावे, तसेच इतर अवैध मार्गानी विमा काढला गेल्यास तो अर्ज रद्द करण्यात येईल. तसेच योजनेत सहभागासाठी शेतकऱ्यांना ओळखपत्र क्रमांक (AGRISTACK Farmer ID) असणे अनिवार्य आहे. जोखमीच्या बाबी योजनेअंतर्गत खरीप हंगामाकरिता पीक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत विविध नैसर्गिक आपत्ती किंवा पिक उत्पादनावर विपरीत परिणाम करणाऱ्या इतर बाबींमुळे हंगामाच्या शेवटी, पीक कापणी प्रयोग आधारे, तांत्रिक उत्पादन आधारे, सदर महसूल मंडळामध्ये पिकाच्या उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट गृहीत धरून नुकसान भरपाई देय राहील. समाविष्ट पिके व विमा हप्ता ज्वारी पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रति हे. 33 हजार रुपये तर शेतकरी हिस्सा रक्कम प्रति हे. 660 रुपये आहे. याप्रमाणे सोयाबीन 62 हजार 500 रुपये शेतकरी हिस्सा 1 हजार 250, मूग 30 हजार रुपये शेतकरी हिस्सा 600 रुपये, उडीद 2 हजार 700 रुपये शेतकरी हिस्सा 270 रुपये, तूर 47 हजार रुपये शेतकरी हिस्सा 940 रुपये तर कापूस पिकासाठी 65 हजार रुपये शेतकरी हिस्सा प्रति हे. 1 हजार 300 रुपये याप्रमाणे आहे. महत्वाच्या बाबी नांदेड जिल्ह्यामध्ये इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लि. पत्ता नववा मजला, ऑफिस ए, नेक्सस वेस्टेंड, सेक्टर 1, बिल्डिंग ए, सर्वे नंबर 169 / 1, परिहार चौकाजवळ, डीपी रोड औंध पुणे- 411 007 व ई-मेल सपोर्ट आगरी ऍट द रेट इसको तो किया डॉट सी ओ डॉट इन या विमा कंपनी मार्फत ही योजना राबविण्यात येणार आहे. योजनेत सहभागी होऊ इच्छिणारे बिगर कर्जदार शेतकरी आपल्या विमा प्रस्तावाची आवेदन पत्रे भरून व्यापारी बँकांच्या स्थानिक शाखेत, प्रादेशिक ग्रामीण बँकेत, प्राथमिक कृषि पत पुरवठा सहकारी संस्था आपले सरकार सेवा केंद्र, विमा कंपनीच्या अधिकृत विमा प्रतिनिधी किंवा विमा मध्यस्थामार्फत विमा हप्ता रकमेसह सादर करतील. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्याचा व न होण्याचा पर्याय उपलब्ध आहे. शेतकरी योजनेत सहभाग नोंदविण्यास इच्छुक नसेल तर तसे घोषणापत्र योजनेतील सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस अगोदर पर्यंत देणे आवश्यक आहे. जे शेतकरी योजनेत सहभागी न होण्याबाबत घोषणापत्र देणार नाहीत या सर्व शेतकऱ्यांना योजनेमध्ये सहभाग बंधनकारक मानला जाईल. विमा योजनेअंतर्गत जोखिमीअंतर्गत निश्चित होणारे नुकसान भरपाई ही केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेच्या अटी व शर्तीच्या अधिन राहून निश्चित केले जाते. हंगामात घेण्यात आलेल्या पिक कापणी प्रयोगातून प्राप्त होणाऱ्या सरासरी उत्पन्नाची तुलना ही उंबरठा उत्पन्नाशी करुन हंगामाच्या शेवटी नुकसान भरपाई निश्चित करण्यात येते. सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये शेतकरी सहभागासाठी प्रति अर्ज किमान 0.10 हेक्टर मर्यादा राहील. *बोगस पीक विमा प्रकरणात फौजदारी कारवाई* ज्या सर्व्हे नंबरसाठी व क्षेत्रासाठी पीक विमा काढण्यात आलेला आहे, त्या क्षेत्राच्या 7/12 उताऱ्यावर शेतकऱ्याचे नाव नसणे, बोगस 7/12 व पीक पेरा नोंदीच्या आधारे पीक विम्याची बोगस प्रकरणे करणे, दुसऱ्या शेतकऱ्याच्या संस्थेच्या क्षेत्रावर बोगस भाडेकरारद्वारे योजनेत सहभाग घेणे, विहित भाडेकरार न करता परस्पर विमा उतरवणे अशा बाबी निदर्शनास आल्यास अशा प्रकरणात सबंधित दोषर्षीवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. तसेच महसूल दस्तऐवजामध्ये फेरफार करून शासनाचे फसवणूकीच्या प्रयत्नाबाबत गुन्हे दाखल करण्यात येतील. बोगस किंवा फसवणूकीच्या उद्देशाने विमा घेतल्याचे आढळून आल्यास, संबंधित अर्जदारास पीक विमा योजना, नमो शेतकरी महासन्मान योजनेसारख्या डीबीटीद्वारे लाभ देण्यात येणाऱ्या कृषि विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यापासून पाच वर्ष बंदी घालण्यात येईल. *डिजिटल पीक सर्वेक्षण* पीक विमा नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांनी डिजिटल पीक सर्वेक्षण अंतर्गत पीकांची नोंद करणे बंधनकारक राहील. विमा योजनेत विमा घेतलेले पीक व डिजिटल पीक सर्वेक्षण नोंदविलेले पीक यामध्ये तफावतीचा मुद्दा उद्भवल्यास डिजिटल पीक सर्वेक्षणामध्ये नोंदविलेले पीक अंतिम गृहीत धरण्यात येईल. तसेच डिजिटल पीक सर्वेक्षण व प्रत्यक्ष पेरलेले पीक यामध्ये विसंगती आढळून आल्यास विमा अर्ज कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. अर्ज करण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक आहे. पिक विम्यातील अर्ज हा आधार वरील नावाप्रमाणेच असावा. पिक विम्यातील नुकसान भरपाई ही केंद्र शासनाच्या विमा पोर्टलद्वारे आधार संलग्न बँक खात्यामध्ये करण्यात येते. यासाठी आपले बँक खाते आधार संलग्न पेमेंट मिळण्यासाठी अधिकृत असणे आवश्यक आहे. याकरिता आपले बँक मॅनेजर माहिती देऊ शकतात. आधार कार्ड वरील नाव व बँक खात्यावरील नाव सारखे असावे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी नजीकच्या उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, विमा प्रतिनिधीशी संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

1 hr ago
user_Mohammad Rafikh
Mohammad Rafikh
Graphic designer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
1 hr ago
ad538bf8-334f-43c3-a1ec-df68c8663326

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • नांदेडच्या पीर-बुरहान परिसरात आज महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे एका युवकाच्या बोटाला गंभीर दुखापत झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. गंभीर जखमी झालेल्या या युवकाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, या घटनेमुळे पीर-बुरहान परिसरात काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
    1
    नांदेडच्या पीर-बुरहान परिसरात आज महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे एका युवकाच्या बोटाला गंभीर दुखापत झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. गंभीर जखमी झालेल्या या युवकाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, या घटनेमुळे पीर-बुरहान परिसरात काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
    user_Mohammad Rafikh
    Mohammad Rafikh
    Graphic designer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून संघटनेच्या वतीने आज नांदेड ते पूर्णा रस्त्यावरील तळणी फाटा येथे जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरकारवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला सध्या योग्य भाव मिळत नसून, सरकारने बी-बियाणे व खतांचे दर वाढवल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. निवडून येण्यापूर्वी सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आता जाचक अटी घालून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम सरकार करत आहे. शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज तातडीने माफ करावे, अन्यथा यापुढे आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.
    1
    शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून संघटनेच्या वतीने आज नांदेड ते पूर्णा रस्त्यावरील तळणी फाटा येथे जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनादरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरकारवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला सध्या योग्य भाव मिळत नसून, सरकारने बी-बियाणे व खतांचे दर वाढवल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

निवडून येण्यापूर्वी सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आता जाचक अटी घालून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम सरकार करत आहे. शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज तातडीने माफ करावे, अन्यथा यापुढे आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    उमरी, नांदेड, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे महेश बिरगड यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. महेश बिरगड यांना मारहाण झाल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे.
    1
    हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे महेश बिरगड यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. महेश बिरगड यांना मारहाण झाल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे.
    user_दिपक हैबतराव चोरमले
    दिपक हैबतराव चोरमले
    Local Politician औंढा (नागनाथ), हिंगोली, महाराष्ट्र•
    41 min ago
  • महाराष्ट्रात सुरेश भुमरे यांनी धनगर समाजाच्या ताकदीबाबत थेट इशारा दिला आहे. धनगर समाजाला अजिबात कमी समजू नका, कारण या समाजात आमदार घडवण्याची आणि त्यांना पाडण्याचीही पूर्ण ताकद आहे, असे रोखठोक प्रतिपादन भुमरे यांनी केले आहे.
    1
    महाराष्ट्रात सुरेश भुमरे यांनी धनगर समाजाच्या ताकदीबाबत थेट इशारा दिला आहे. धनगर समाजाला अजिबात कमी समजू नका, कारण या समाजात आमदार घडवण्याची आणि त्यांना पाडण्याचीही पूर्ण ताकद आहे, असे रोखठोक प्रतिपादन भुमरे यांनी केले आहे.
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    20 hrs ago
  • हिंगोली जिल्ह्यातील घोटा देवी येथे धनगर समाज युवा मल्हार सेनेचे मराठवाडा अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ पावडे यांनी मेंढपाळांच्या मुलांमध्ये शिक्षणाची गोडी लागावी आणि आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी स्वतः मुलांसोबत बसून अभ्यास करण्याचा एक प्रेरणादायी उपक्रम सुरू केला आहे. केवळ शिक्षणाचे महत्त्व न सांगता, स्वतः विद्यार्थ्यांमध्ये बसून अभ्यास करत त्यांनी कृतीतून एक नवा आदर्श समाजापुढे ठेवला आहे. "मेंढपाळांच्या हातातील काठीसोबत त्यांच्या हातात पुस्तक आणि पेनही असले पाहिजे" या ध्येयाने प्रेरित होऊन वैजनाथ पावडे यांनी आपल्या निवासस्थानी या मुलांसाठी मोफत शिक्षण, मार्गदर्शन आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांच्या या उपक्रमामुळे मेंढपाळांच्या मुलांमध्ये शिक्षणाविषयी मोठा उत्साह निर्माण झाला असून पालकांमध्येही सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. वंचित मुलांचे उज्ज्वल भविष्य घडविण्याच्या या प्रयत्नांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, यामुळे धनगर समाजातील मुलांना शिक्षणाची नवी दिशा मिळत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
    1
    हिंगोली जिल्ह्यातील घोटा देवी येथे धनगर समाज युवा मल्हार सेनेचे मराठवाडा अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ पावडे यांनी मेंढपाळांच्या मुलांमध्ये शिक्षणाची गोडी लागावी आणि आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी स्वतः मुलांसोबत बसून अभ्यास करण्याचा एक प्रेरणादायी उपक्रम सुरू केला आहे. केवळ शिक्षणाचे महत्त्व न सांगता, स्वतः विद्यार्थ्यांमध्ये बसून अभ्यास करत त्यांनी कृतीतून एक नवा आदर्श समाजापुढे ठेवला आहे.

"मेंढपाळांच्या हातातील काठीसोबत त्यांच्या हातात पुस्तक आणि पेनही असले पाहिजे" या ध्येयाने प्रेरित होऊन वैजनाथ पावडे यांनी आपल्या निवासस्थानी या मुलांसाठी मोफत शिक्षण, मार्गदर्शन आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

त्यांच्या या उपक्रमामुळे मेंढपाळांच्या मुलांमध्ये शिक्षणाविषयी मोठा उत्साह निर्माण झाला असून पालकांमध्येही सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. वंचित मुलांचे उज्ज्वल भविष्य घडविण्याच्या या प्रयत्नांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, यामुळे धनगर समाजातील मुलांना शिक्षणाची नवी दिशा मिळत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
    user_वैजनाथ पावडे
    वैजनाथ पावडे
    Building society हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • नांदेड जिल्ह्यातील देगलूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर देगलूर नगर परिषदेचे काँग्रेस नगरसेवक शत्रुघ्न वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे मराठवाडा उपाध्यक्ष चंद्रकांत दादा ठाणेकर यांच्या वतीने करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रा. डॉ. भिमराव माळगे सर, रिपाइंचे युवा नांदेड जिल्हाध्यक्ष अ‌ॅड. प्रकाश चंद्रकांत ठाणेकर, प्रा. अभिनंदन सिताफुले सर, बहुजन सेना तालुकाध्यक्ष रमेश भायेगावकर, भिमशक्ती सामाजिक संघटना तालुकाध्यक्ष किशोर आडेकर, भिमशक्ती सामाजिक संघटना तालुका उपाध्यक्ष भिमराव भुतनरे, मोहनराव भुताळे, आनंदा दिंडे आणि अशोक कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
    2
    नांदेड जिल्ह्यातील देगलूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर देगलूर नगर परिषदेचे काँग्रेस नगरसेवक शत्रुघ्न वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे मराठवाडा उपाध्यक्ष चंद्रकांत दादा ठाणेकर यांच्या वतीने करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला प्रा. डॉ. भिमराव माळगे सर, रिपाइंचे युवा नांदेड जिल्हाध्यक्ष अ‌ॅड. प्रकाश चंद्रकांत ठाणेकर, प्रा. अभिनंदन सिताफुले सर, बहुजन सेना तालुकाध्यक्ष रमेश भायेगावकर, भिमशक्ती सामाजिक संघटना तालुकाध्यक्ष किशोर आडेकर, भिमशक्ती सामाजिक संघटना तालुका उपाध्यक्ष भिमराव भुतनरे, मोहनराव भुताळे, आनंदा दिंडे आणि अशोक कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
    user_जयपाल चांदोबा दावनगीरकर
    जयपाल चांदोबा दावनगीरकर
    Social worker देगलूर, नांदेड, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • नांदेडमधील SGGS समोरील पूल कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर शिवसेनेचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर अत्यंत आक्रमक झाले आहेत. आमदार बोंढारकर यांनी थेट कोसळलेल्या पुलाच्या घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांनी आक्रमक पवित्रा घेत संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारला आणि त्याला चांगलेच धारेवर धरले. या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून यात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर अत्यंत कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार बोंढारकर यांनी केली आहे. अशा दुर्घटना भविष्यात पुन्हा घडू नयेत यासाठी सर्वच पुलांचे ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, या कामाशी संबंधित असणाऱ्या कंपनीला थेट काळ्या यादीत टाकण्याची मागणी करणार असल्याचेही बोंढारकर यांनी स्पष्ट केले।
    1
    नांदेडमधील SGGS समोरील पूल कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर शिवसेनेचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर अत्यंत आक्रमक झाले आहेत. आमदार बोंढारकर यांनी थेट कोसळलेल्या पुलाच्या घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांनी आक्रमक पवित्रा घेत संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारला आणि त्याला चांगलेच धारेवर धरले.

या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून यात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर अत्यंत कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार बोंढारकर यांनी केली आहे. अशा दुर्घटना भविष्यात पुन्हा घडू नयेत यासाठी सर्वच पुलांचे ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, या कामाशी संबंधित असणाऱ्या कंपनीला थेट काळ्या यादीत टाकण्याची मागणी करणार असल्याचेही बोंढारकर यांनी स्पष्ट केले।
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    उमरी, नांदेड, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील खरबा रोडवर दोन मोटरसायकलची समोरासमोर जोरदार टक्कर झाली आहे. या भीषण अपघातामध्ये एकाचा जागेवरच मृत्यू झाला आहे.
    1
    परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील खरबा रोडवर दोन मोटरसायकलची समोरासमोर जोरदार टक्कर झाली आहे. या भीषण अपघातामध्ये एकाचा जागेवरच मृत्यू झाला आहे.
    user_Ramesh Mulgir
    Ramesh Mulgir
    मानवत, परभणी, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.