logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

गोळेगाव बु.च्या जि.प. शाळेत मुख्याध्यापक मद्यधुंद अवस्थेत? शाळा समिती व शिक्षण विभागाच्या भूमिकेवरही गावकऱ्यांचे प्रश्नचिन्ह; शिक्षकाविना विद्यार्थी शाळेत राहिल्याचा आरोप गोळेगाव बु.च्या जि.प. शाळेत मुख्याध्यापक मद्यधुंद अवस्थेत? शाळा समिती व शिक्षण विभागाच्या भूमिकेवरही गावकऱ्यांचे प्रश्नचिन्ह; शिक्षकाविना विद्यार्थी शाळेत राहिल्याचा आरोप.. गोळेगाव बु., ता. शेगाव : पंचायत समिती शेगाव अंतर्गत येणाऱ्या गोळेगाव बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत १५ सप्टेंबर रोजी धक्कादायक प्रकार घडल्याचा आरोप गावकरी व पालकांनी केला आहे. मुख्याध्यापक गणवीर सर हे मद्यधुंद अवस्थेत शाळेत आल्याचा आरोप असून, या घटनेमुळे शाळेच्या शिस्तीबरोबरच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सहाय्यक शिक्षक डाबेराव सर हे सुट्टीवर असताना मुख्याध्यापक गणवीर शाळेत आले. मात्र, त्यांची अवस्था पाहून शाळा समितीचे अध्यक्ष निलेश गावंडे यांनी त्यांना शाळेतून परत जाण्यास सांगितल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर काही काळ विद्यार्थी शाळेत शिक्षकाविना असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना विचारणा केली असता मुख्याध्यापक मद्यपान करून आल्याचे त्यांनी सांगितल्याचा दावा गावकऱ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, शिक्षकाविना विद्यार्थी शाळेत असतानाही संबंधित विभागाला तत्काळ माहिती का देण्यात आली नाही, असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. पंचायत समिती शिक्षण विभागाला अन्य माध्यमातून माहिती मिळाल्यानंतर सुट्टीवर असलेल्या डाबेराव शिक्षकांना पुन्हा शाळेत पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येते. ते दुपारी बारा वाजल्यानंतर शाळेत पोहोचल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची? शाळेत शिक्षकांची उपस्थिती नसताना विद्यार्थी कोणाच्या जबाबदारीवर होते? या काळात एखादी दुर्घटना घडली असती तर त्याची जबाबदारी कोणाची राहिली असती, असा संतप्त सवाल पालक व ग्रामस्थांकडून केला जात आहे. गणवीर यांच्याविरोधात गेल्या दोन-तीन वर्षांपासून शाळेत वेळेवर न येणे, वेळेपूर्वी निघून जाणे, वारंवार सुट्ट्या घेणे तसेच मद्यपान करून शाळेत येणे अशा तक्रारी शिक्षण विभागाकडे करण्यात आल्याचा दावा गावकऱ्यांनी केला आहे. मात्र, या तक्रारींवर ठोस कारवाई का झाली नाही? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. वारंवार गैरहजेरीचा आरोप; पटसंख्या घटल्याचा दावा गेल्या एक-दोन महिन्यांत मुख्याध्यापक मोठ्या प्रमाणावर सुट्टीवर असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याने काही पालकांनी आपल्या पाल्यांना इतर शाळांमध्ये दाखल केल्याचेही सांगितले जाते. त्यामुळे गोळेगाव बुद्रुक जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या घटत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. शिक्षकांच्या कथित गैरवर्तनाकडे आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहिले नाही, तर ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांवरील पालकांचा विश्वास आणखी कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ‘अर्थपूर्ण दुर्लक्ष’चा आरोप; चौकशीची मागणी मुख्याध्यापकांविरोधात वारंवार तक्रारी होऊनही कारवाई होत नसल्याने संबंधित शाळा समिती आणि शिक्षण विभाग ‘अर्थपूर्ण दुर्लक्ष’ करीत असल्याचा आरोप गावकरी व पालकांनी केला आहे. मात्र, या आरोपांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून १५ सप्टेंबरच्या घटनेची सत्यता स्पष्ट करावी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी निश्चित करावी आणि दोष आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ व पालकांकडून होत आहे. शिक्षण विभाग पंचायत समिती शेगाव या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन काय भूमिका घेतो, याकडे गोळेगाव बुद्रुकसह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

1 hr ago
user_Sachin kadukar
Sachin kadukar
Photographer Shegaon, Buldhana•
1 hr ago
d79e0c99-cac4-4057-89e4-26256f37a368

गोळेगाव बु.च्या जि.प. शाळेत मुख्याध्यापक मद्यधुंद अवस्थेत? शाळा समिती व शिक्षण विभागाच्या भूमिकेवरही गावकऱ्यांचे प्रश्नचिन्ह; शिक्षकाविना विद्यार्थी शाळेत राहिल्याचा आरोप गोळेगाव बु.च्या जि.प. शाळेत मुख्याध्यापक मद्यधुंद अवस्थेत? शाळा समिती व शिक्षण विभागाच्या भूमिकेवरही गावकऱ्यांचे प्रश्नचिन्ह; शिक्षकाविना विद्यार्थी शाळेत राहिल्याचा आरोप.. गोळेगाव बु., ता. शेगाव : पंचायत समिती शेगाव अंतर्गत येणाऱ्या गोळेगाव बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत १५ सप्टेंबर रोजी धक्कादायक प्रकार घडल्याचा आरोप गावकरी व पालकांनी केला आहे. मुख्याध्यापक गणवीर सर हे मद्यधुंद अवस्थेत शाळेत आल्याचा आरोप असून, या घटनेमुळे शाळेच्या शिस्तीबरोबरच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सहाय्यक शिक्षक डाबेराव सर हे सुट्टीवर असताना मुख्याध्यापक गणवीर शाळेत आले. मात्र, त्यांची अवस्था पाहून शाळा समितीचे अध्यक्ष निलेश गावंडे यांनी त्यांना शाळेतून परत जाण्यास सांगितल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर काही काळ विद्यार्थी शाळेत शिक्षकाविना असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना विचारणा केली असता मुख्याध्यापक मद्यपान करून आल्याचे त्यांनी सांगितल्याचा दावा गावकऱ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, शिक्षकाविना विद्यार्थी शाळेत असतानाही संबंधित विभागाला तत्काळ माहिती का देण्यात आली नाही, असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. पंचायत समिती शिक्षण विभागाला अन्य माध्यमातून माहिती मिळाल्यानंतर सुट्टीवर असलेल्या डाबेराव शिक्षकांना पुन्हा शाळेत पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येते. ते दुपारी बारा वाजल्यानंतर शाळेत पोहोचल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची? शाळेत शिक्षकांची उपस्थिती नसताना विद्यार्थी कोणाच्या जबाबदारीवर होते? या काळात एखादी दुर्घटना घडली असती तर त्याची जबाबदारी कोणाची राहिली

c5b0e4e3-1574-4616-8c15-077b619ffa98

असती, असा संतप्त सवाल पालक व ग्रामस्थांकडून केला जात आहे. गणवीर यांच्याविरोधात गेल्या दोन-तीन वर्षांपासून शाळेत वेळेवर न येणे, वेळेपूर्वी निघून जाणे, वारंवार सुट्ट्या घेणे तसेच मद्यपान करून शाळेत येणे अशा तक्रारी शिक्षण विभागाकडे करण्यात आल्याचा दावा गावकऱ्यांनी केला आहे. मात्र, या तक्रारींवर ठोस कारवाई का झाली नाही? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. वारंवार गैरहजेरीचा आरोप; पटसंख्या घटल्याचा दावा गेल्या एक-दोन महिन्यांत मुख्याध्यापक मोठ्या प्रमाणावर सुट्टीवर असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याने काही पालकांनी आपल्या पाल्यांना इतर शाळांमध्ये दाखल केल्याचेही सांगितले जाते. त्यामुळे गोळेगाव बुद्रुक जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या घटत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. शिक्षकांच्या कथित गैरवर्तनाकडे आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहिले नाही, तर ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांवरील पालकांचा विश्वास आणखी कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ‘अर्थपूर्ण दुर्लक्ष’चा आरोप; चौकशीची मागणी मुख्याध्यापकांविरोधात वारंवार तक्रारी होऊनही कारवाई होत नसल्याने संबंधित शाळा समिती आणि शिक्षण विभाग ‘अर्थपूर्ण दुर्लक्ष’ करीत असल्याचा आरोप गावकरी व पालकांनी केला आहे. मात्र, या आरोपांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून १५ सप्टेंबरच्या घटनेची सत्यता स्पष्ट करावी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी निश्चित करावी आणि दोष आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ व पालकांकडून होत आहे. शिक्षण विभाग पंचायत समिती शेगाव या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन काय भूमिका घेतो, याकडे गोळेगाव बुद्रुकसह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • *प्रभाग क्र १० हिरवेगार करण्याचा संकल्प!* ----------- नगरसेवक दिलीप बोचे यांच्या पुढाकाराने ट्री-गार्डसह वृक्षारोपण; नागरिकांनी स्वीकारली संगोपनाची जबाबदारी -------------- *प्रभाग क्र १० हिरवेगार करण्याचा संकल्प!* ----------- नगरसेवक दिलीप बोचे यांच्या पुढाकाराने ट्री-गार्डसह वृक्षारोपण; नागरिकांनी स्वीकारली संगोपनाची जबाबदारी -------------- ​अकोट तालुका प्रतिनिधी.... श्री संत वासुदेव महाराजांच्या पावन वास्तव्याने पुनीत झालेल्या संत वासुदेव नगर परिसरासह संपुर्ण प्रभाग १० मध्ये पर्यावरण संवर्धनाचा दृढ संकल्प करीत वृक्षारोपण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. संपूर्ण परिसर हिरवागार व पर्यावरणपूरक बनवण्याच्या उद्देशाने ट्री-गार्डसह वृक्षांची लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे, रोपलेल्या प्रत्येक वृक्षाचे जतन व संगोपन करण्याची जबाबदारी स्थानिक नगरवासीयांनी स्वतःहून स्वीकारली आहे. ​हा उपक्रम प्रभाग क्रमांक १० चे नगरसेवक दिलीप बोचे व सौ. विजयाताई बोचे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ज्येष्ठ नेते नानासाहेब हिंगणकर, अकोट शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनगरे, वृक्षमित्र प्राचार्य गजानन चोपडे आणि मुकुंदराव गावंडे आदी मान्यवरांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. *​'स्व. विश्वासराव चोपडे स्मृती वृक्ष' उपक्रम'* प्राचार्य गजाननराव चोपडे यांनी त्यांचे वडील स्वर्गीय विश्वासराव चोपडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ १०० पर्यावरणपूरक झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पांतर्गत त्यांनी स्वतः ट्री-गार्डसह मोठ्या वृक्षांची रोपे उपलब्ध करून दिली. त्यांच्या या सामाजिक व पर्यावरणीय योगदानाचे सर्वत्र कौतुक होत आहे. *​मान्यवरांची उपस्थिती* या प्रेरणादायी सोहळ्याला सुरेश कराळे, नंदकिशोर हिंगणकर, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष राममूर्ती वालसिंगे,नारायणराव अनासाने, पत्रकार विजय शिंदे सहपत्नीक, विनायकराव सपकाळ, प्रदीप ओळंबे, विजय वानखडे, अमोल बोरकर, दीपक पाटील, मनोहर रेचे, विलासराव चोरे, डॉ. लाड,माधव अनासाने, ऍड विपुल भिसे, भिकू गटकळ, अजय मोरे, प्रफुल्ल थोरात,शुभम जाधव, विक्रम सावंत, नागोराव कुलट,राजकुमार सिकजी मंगेश हिंगणकर,ऍड राठी, चोपडे साहेब,ऍड वल्लभ जोत,रमेश तासतोडे,विलास जाधव, नारायण मंडले, संजय गाडगे, यांच्यासह प्रभाग क्र १० परिसरातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी दिलिप बोचे यांनी सर्वांचे आभार मानलेत.
    4
    *प्रभाग क्र १० हिरवेगार करण्याचा संकल्प!*
-----------
नगरसेवक दिलीप बोचे यांच्या पुढाकाराने ट्री-गार्डसह वृक्षारोपण; नागरिकांनी स्वीकारली संगोपनाची जबाबदारी
--------------
*प्रभाग क्र १० हिरवेगार करण्याचा संकल्प!*
-----------
नगरसेवक दिलीप बोचे यांच्या पुढाकाराने ट्री-गार्डसह वृक्षारोपण; नागरिकांनी स्वीकारली संगोपनाची जबाबदारी
--------------
​अकोट तालुका प्रतिनिधी....
श्री संत वासुदेव महाराजांच्या पावन वास्तव्याने पुनीत झालेल्या संत वासुदेव नगर परिसरासह संपुर्ण प्रभाग १० मध्ये पर्यावरण संवर्धनाचा दृढ संकल्प करीत वृक्षारोपण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. 
संपूर्ण परिसर हिरवागार व पर्यावरणपूरक बनवण्याच्या उद्देशाने ट्री-गार्डसह वृक्षांची लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे, रोपलेल्या प्रत्येक वृक्षाचे जतन व संगोपन करण्याची जबाबदारी स्थानिक नगरवासीयांनी स्वतःहून स्वीकारली आहे.
​हा उपक्रम प्रभाग क्रमांक १० चे नगरसेवक दिलीप बोचे व सौ. विजयाताई बोचे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ज्येष्ठ नेते नानासाहेब हिंगणकर, अकोट शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार  किशोर  जुनगरे, वृक्षमित्र प्राचार्य गजानन चोपडे आणि मुकुंदराव गावंडे आदी मान्यवरांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
*​'स्व. विश्वासराव चोपडे स्मृती वृक्ष' उपक्रम'*
प्राचार्य गजाननराव चोपडे यांनी त्यांचे वडील स्वर्गीय विश्वासराव चोपडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ १०० पर्यावरणपूरक झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पांतर्गत त्यांनी स्वतः ट्री-गार्डसह मोठ्या वृक्षांची रोपे उपलब्ध करून दिली. त्यांच्या या सामाजिक व पर्यावरणीय योगदानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
*​मान्यवरांची उपस्थिती*
या प्रेरणादायी सोहळ्याला सुरेश कराळे, नंदकिशोर हिंगणकर, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष राममूर्ती वालसिंगे,नारायणराव अनासाने, पत्रकार विजय शिंदे सहपत्नीक, विनायकराव सपकाळ, प्रदीप ओळंबे, विजय वानखडे, अमोल बोरकर, दीपक पाटील, मनोहर रेचे, विलासराव चोरे, डॉ. लाड,माधव अनासाने,  ऍड विपुल भिसे, भिकू गटकळ, अजय मोरे, प्रफुल्ल थोरात,शुभम जाधव, विक्रम सावंत, नागोराव कुलट,राजकुमार सिकजी मंगेश हिंगणकर,ऍड राठी, चोपडे साहेब,ऍड वल्लभ जोत,रमेश तासतोडे,विलास जाधव, नारायण मंडले, संजय गाडगे, यांच्यासह प्रभाग क्र १० परिसरातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी दिलिप बोचे यांनी सर्वांचे आभार मानलेत.
    user_राजकुमार वानखडे राज
    राजकुमार वानखडे राज
    News Anchor अकोट, अकोला, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • बुलढाण्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकरी आक्रमक; लोणारमध्ये वाजवले 'डफडे', ३० सप्टेंबरपर्यंत निर्णय न झाल्यास सिंदखेडराजा येथे बैलजोड्यांसह चक्काजामचा इशारा!
    1
    बुलढाण्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकरी आक्रमक; लोणारमध्ये वाजवले 'डफडे', ३० सप्टेंबरपर्यंत निर्णय न झाल्यास सिंदखेडराजा येथे बैलजोड्यांसह चक्काजामचा इशारा!
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • माना फाट्यावर प्लास्टिकच्या दाण्यांनी भरलेल्या ट्रकला भीषण आग! | एसी केबिनमध्ये शॉर्टसर्किट मूर्तिजापूर तालुक्यातील माना फाटा येथे प्लास्टिकच्या दाण्यांनी भरलेल्या ट्रकला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी, १५ सप्टेंबर रोजी सकाळी घडली. गुजरातमधील दहेज येथून प्लास्टिकचे दाणे घेऊन कलकत्त्याच्या दिशेने जाणाऱ्या NL 01 AJ 4266 क्रमांकाच्या ट्रकच्या एसी केबिनमध्ये शॉर्टसर्किट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले. माना पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या घटनेत ट्रकच्या एसी केबिनचे मोठे नुकसान झाले असून प्लास्टिकच्या दाण्यांचेही नुकसान झाले आहे. सुदैवाने चालकासह कोणालाही दुखापत झाली नाही आणि मोठा अनर्थ टळला. 📍 घटनास्थळ: माना फाटा, मूर्तिजापूर तालुका, अकोला 🚛 ट्रक: NL 01 AJ 4266 🔥 प्राथमिक कारण: एसी केबिनमधील शॉर्टसर्किट इंडिया न्यूज आर सेवन | भारताची आवाज उपसंपादक मोहम्मद रिज़वान सिद्दिकी, मूर्तिजापूर बातमी आवडल्यास Like, Share आणि Subscribe करा.
    1
    माना फाट्यावर प्लास्टिकच्या दाण्यांनी भरलेल्या ट्रकला भीषण आग! | एसी केबिनमध्ये शॉर्टसर्किट
मूर्तिजापूर तालुक्यातील माना फाटा येथे प्लास्टिकच्या दाण्यांनी भरलेल्या ट्रकला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी, १५ सप्टेंबर रोजी सकाळी घडली.
गुजरातमधील दहेज येथून प्लास्टिकचे दाणे घेऊन कलकत्त्याच्या दिशेने जाणाऱ्या NL 01 AJ 4266 क्रमांकाच्या ट्रकच्या एसी केबिनमध्ये शॉर्टसर्किट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले.
माना पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या घटनेत ट्रकच्या एसी केबिनचे मोठे नुकसान झाले असून प्लास्टिकच्या दाण्यांचेही नुकसान झाले आहे.
सुदैवाने चालकासह कोणालाही दुखापत झाली नाही आणि मोठा अनर्थ टळला.
📍 घटनास्थळ: माना फाटा, मूर्तिजापूर तालुका, अकोला
🚛 ट्रक: NL 01 AJ 4266
🔥 प्राथमिक कारण: एसी केबिनमधील शॉर्टसर्किट
इंडिया न्यूज आर सेवन | भारताची आवाज
उपसंपादक मोहम्मद रिज़वान सिद्दिकी, मूर्तिजापूर
बातमी आवडल्यास Like, Share आणि Subscribe करा.
    user_MOHAMMED RIZWAN RAHEMAN
    MOHAMMED RIZWAN RAHEMAN
    Construction Contractor मूर्तिजापूर, अकोला, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • रिसोड तहसीलदार बनल्या रिल्स स्टर ... रोहित पवार.........
    1
    रिसोड तहसीलदार बनल्या रिल्स स्टर ... रोहित पवार.........
    user_Suresh Badrigiri Giri
    Suresh Badrigiri Giri
    Mechanic रिसोड, वाशिम, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • मंजूर झालेले सोलर संबंधित सोलर कंपनीने बसवल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान सोलर तात्काळ बसून देण्याची सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव यांची महावितरण कडे मागणी मंजुर सोलर परंतु न बसवल्यामुळे शेतकऱ्यांचे पाण्या अभावी नुकसान! (शेतकऱ्यांनी वर्ग संबंधित ऑफिसमध्ये मारतात चक्ररा) तात्काळ सोलर बसवावे जाधव यांनी केली मागणी, मालेगाव प्रतिनिधी,दि,१५:- ‌पावसाने तर मारली दांडी परंतु सोलर व महावितरण अधिकारी पण देत आहेत उडवा उडी चे उत्तर, पाण्याअभावी शेतकऱ्यांचे शेतातील हळद सोयाबीन इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात होत आहे नुकसान शासन दरबारी शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सोलर सह इतर योजना असल्या तरी मात्र पात्र लाभार्थ्यांनी दोन दोन तीन तीन महिने पूर्वी लागणारी कागदपत्रे व सोलर साठी लागणारी रक्कम ची भरणा केली परंतु अद्यापही त्यांना सोलर कंपनी मार्फत सोलर तसेच महावितरण कंपनीकडून पाहिजे तसे सहकार्य मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत असून खंत शेतकरी वर्ग व्यक्त करत आहेत, मालेगाव तालुक्यातील जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी विविध सोलर कंपन्याकडे ऑनलाइन अर्ज केले आहेत, अमानी येथील शेतकरी राजू भिमराव गवळी,व अनिल गंगाराम जाधव यांनी मागील दोन - महीन्यापृर्वी सोलर साठी,ओस्वाल कंपनी साठी ऑनलाइन अर्ज केला तसेच लागणारी रक्कम सुद्धा भरली परंतु अद्याप यांच्या शेतात बोरवर सोलर बसवण्यात आले नसल्याने यांचे हळद ,सोयाबीन इतर पिक वाळून चालले यांनी मालेगाव महावितरण कंपनीकडे तसेच वाशिम कंपनीकडे चकरा मारून परेशान झाले असता आज दिनांक 15 सप्टेंबर रोजी महावितरणचे अधीक्षक अभियंता मंडळ कार्यालय वाशिम संदीप दत्तात्रेय दरवडे यांची प्रत्यक्ष भेट सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव तसेच शेतकरी राजु गवळी यांनी घेतली असता, त्यांनी संबंधित महावितरणचे उपकार्यकारी अभियंता व्हि बी चव्हाण, तसेच ओसवाल कंपनीचे विनोद ब्रह्मेकर यांच्याशी संपर्क साधून या शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासंदर्भात सांगितले, याबाबत ओबीसी सेलचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख विवेक गवळी यांनी सुद्धा दूरध्वनीवरून साहेबांशी संपर्क साधून विचारणा केली, सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव यांनी थेट महावितरण चे वरिष्ठ अधीक्षक दरवडे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांची व्यथा मांडली व त्यांनी तात्काळ दाखल घेऊन दोनच दिवसात सोलर बसवल्या जातील असे यावेळी जाधव यांना सांगितले, जाधव यांनी महावितरण व सोलर कंपनी वाले शेतकऱ्याकडून पैशाची मागणी देखील करतात असे सांगितले असता, दरवडे म्हणाले ज्यांनी पैशाची मागणी केली असेल त्यांना डायरेक्ट लाच लुचपत विभागाकडे तक्रार करून पकडून द्या , काही शेतकरी तर आमचे अधिकाऱ्यांचे पाय धरायचे राहिले हो साहेब असे म्हणाले तेव्हा या बाबीची तात्काळ दखल घेऊन पात्र परंतु सोलर पासून वंचित असलेले सर्व शेतकऱ्यांचे सोलर तात्काळ बसून द्यावे अशी मागणीही अनिल जाधव यांनी यावेळी केली
    2
    मंजूर झालेले सोलर संबंधित सोलर कंपनीने बसवल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान सोलर तात्काळ बसून देण्याची सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव यांची महावितरण कडे मागणी
मंजुर सोलर परंतु न बसवल्यामुळे  शेतकऱ्यांचे पाण्या अभावी नुकसान! (शेतकऱ्यांनी वर्ग संबंधित ऑफिसमध्ये मारतात चक्ररा) तात्काळ सोलर बसवावे जाधव यांनी केली मागणी, मालेगाव प्रतिनिधी,दि,१५:- ‌पावसाने तर मारली दांडी परंतु सोलर व महावितरण अधिकारी पण देत आहेत उडवा उडी चे उत्तर, पाण्याअभावी शेतकऱ्यांचे शेतातील हळद सोयाबीन इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात होत आहे नुकसान शासन दरबारी शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सोलर सह इतर योजना असल्या तरी मात्र पात्र लाभार्थ्यांनी दोन दोन तीन तीन महिने पूर्वी लागणारी कागदपत्रे व सोलर साठी लागणारी रक्कम ची भरणा केली परंतु अद्यापही त्यांना सोलर कंपनी मार्फत सोलर तसेच महावितरण कंपनीकडून पाहिजे तसे सहकार्य मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत असून खंत शेतकरी वर्ग व्यक्त करत आहेत, मालेगाव तालुक्यातील जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी विविध सोलर कंपन्याकडे ऑनलाइन  अर्ज केले आहेत, अमानी येथील शेतकरी राजू भिमराव गवळी,व अनिल गंगाराम जाधव यांनी मागील दोन - महीन्यापृर्वी सोलर साठी,ओस्वाल कंपनी साठी ऑनलाइन अर्ज केला तसेच लागणारी रक्कम सुद्धा भरली परंतु अद्याप यांच्या शेतात बोरवर सोलर बसवण्यात आले नसल्याने यांचे हळद ,सोयाबीन इतर पिक वाळून चालले यांनी मालेगाव महावितरण कंपनीकडे तसेच वाशिम कंपनीकडे चकरा मारून परेशान झाले असता आज दिनांक 15 सप्टेंबर रोजी महावितरणचे अधीक्षक अभियंता मंडळ कार्यालय वाशिम संदीप दत्तात्रेय दरवडे यांची प्रत्यक्ष भेट सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव तसेच शेतकरी राजु गवळी यांनी घेतली असता, त्यांनी संबंधित महावितरणचे उपकार्यकारी अभियंता व्हि बी  चव्हाण, तसेच ओसवाल कंपनीचे विनोद ब्रह्मेकर यांच्याशी संपर्क साधून या शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासंदर्भात सांगितले, याबाबत ओबीसी सेलचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख विवेक गवळी यांनी सुद्धा दूरध्वनीवरून साहेबांशी संपर्क साधून विचारणा केली, सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव यांनी थेट महावितरण चे वरिष्ठ अधीक्षक दरवडे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांची व्यथा मांडली व त्यांनी तात्काळ दाखल घेऊन दोनच दिवसात सोलर बसवल्या जातील असे यावेळी जाधव यांना सांगितले, जाधव यांनी महावितरण व सोलर कंपनी वाले शेतकऱ्याकडून पैशाची मागणी देखील करतात असे सांगितले असता, दरवडे म्हणाले ज्यांनी पैशाची मागणी केली असेल त्यांना डायरेक्ट लाच लुचपत विभागाकडे तक्रार करून पकडून द्या , काही शेतकरी तर आमचे अधिकाऱ्यांचे पाय धरायचे राहिले हो साहेब असे म्हणाले तेव्हा या बाबीची तात्काळ दखल घेऊन पात्र परंतु सोलर पासून वंचित असलेले सर्व शेतकऱ्यांचे सोलर तात्काळ बसून द्यावे अशी मागणीही अनिल जाधव यांनी यावेळी केली
    user_सारनाथ अवचार
    सारनाथ अवचार
    पत्रकार मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • पाटोदा येथे भगवे वादळ! मनोज जरांगे पाटलांच्या स्वागताला जनसागराचा महासागर, मुंबईकडे रवाना होण्याआधी ऐतिहासिक शक्तिप्रदर्शन क्रेनच्या सहाय्याने ५० फुटी भव्य हार घालून संघर्ष योद्ध्याचे स्वागत एक मराठा-लाख मराठा च्या घोषणांनी पाटोदा दुमदुमले मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या वेशीवर लढाई लढण्यासाठी निघालेले मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची पाटोदा शहरात जंगी मिरवणूक आणि सत्कार करण्यात आला. मराठा आरक्षण मिळावं यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून संघर्ष करणाऱ्या या योद्ध्याला पाहण्यासाठी आणि त्यांच्या एका हाकेवर हजारो मराठा बांधव पाटोदा शहरात लोटले होते. जिथे नजर जाईल तिथे फक्त डोकेच डोके दिसत होते. या व्हिडीओमध्ये दिसत असलेले हे दृश्य कोणत्याही चित्रपटातील नसून, पाटोदा शहराच्या मुख्य बाजारपेठेतील आहे. रस्त्यावर पाय ठेवायला जागा नाही, इतका प्रचंड जनसमुदाय एकाच ठिकाणी जमा झाला होता. मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी पाटोदा शहरात हा विराट जनसागर उसळला होता. क्रेनवरील भव्य हार ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू दुपारच्या सुमारास पाटोदा शहराच्या मध्यवर्ती भागात हा ऐतिहासिक सोहळा पार पडला. हजारो युवकांनी डोक्यावर भगव्या टोप्या, कपाळावर भगवा टिळा आणि हातात भगवे झेंडे घेऊन जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या दुकानांवर, इमारतींच्या छतावर, टेरेसवर आणि क्रेनवर उभे राहून लोक हा ऐतिहासिक क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद करत होते. या गर्दीच्या मध्यभागी फुलांनी सजवलेली काळी-पांढरी फॉर्च्युनर गाडी हळूहळू पुढे सरकत होती. गाडीच्या बॉनेटवर झेंडूच्या फुलांचा खच पडला होता. गाडीवर उभे राहून मनोज जरांगे पाटील हात जोडून आणि हात उंचावून जनतेचे अभिवादन करत होते. पोलिसांना आणि स्वयंसेवकांना गर्दी नियंत्रित करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. या स्वागत सोहळ्याचे सर्वात मोठे आकर्षण ठरले ते क्रेनच्या सहाय्याने घातलेला ५० फूट लांबीचा भव्य हार! एका मोठ्या क्रेनच्या सहाय्याने हा अवाढव्य फुलांचा हार जरांगे पाटलांच्या दिशेने खाली आणण्यात आला. हा हार गळ्यात पडताच उपस्थित हजारो मराठा बांधवांनी एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय च्या घोषणांनी आसमंत दणाणून सोडला. प्रत्येक ठिकाणी जनसागराचा महासागर मनोज जरांगे पाटील हे केवळ एक व्यक्ती नसून, तो एक विचार आहे. मराठा आरक्षणासाठी ते जिथे जिथे जात आहेत, तिथे तिथे जनसागराचा महासागर होत आहे. अंतरवाली सराटी पासून मुंबई पर्यंतच्या त्यांच्या प्रत्येक प्रवासात असेच लाखो मराठा बांधव त्यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर येत आहेत. पाटोदा येथे झालेला हा सत्कार म्हणजे केवळ स्वागत नव्हते, तर मराठा समाजाने दाखवलेले ऐक्य आणि ताकदीचे शक्ती प्रदर्शन होते. आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, या जरांगे पाटलांच्या निर्धाराला पाठिंबा देण्यासाठी हा जनसमुदाय लोटला होता. या विराट जनसागराने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले असून, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पाटोदा येथून हा जंगी सत्कार स्वीकारून मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आपल्या हजारो गाड्यांच्या ताफ्यासह आरक्षणाच्या अंतिम लढाईसाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
    1
    पाटोदा येथे भगवे वादळ! मनोज जरांगे पाटलांच्या स्वागताला जनसागराचा महासागर, मुंबईकडे रवाना होण्याआधी ऐतिहासिक शक्तिप्रदर्शन

क्रेनच्या सहाय्याने ५० फुटी भव्य हार घालून संघर्ष योद्ध्याचे स्वागत एक मराठा-लाख मराठा च्या घोषणांनी पाटोदा दुमदुमले
मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या वेशीवर लढाई लढण्यासाठी निघालेले मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची पाटोदा शहरात जंगी मिरवणूक आणि सत्कार करण्यात आला. मराठा आरक्षण मिळावं यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून संघर्ष करणाऱ्या या योद्ध्याला पाहण्यासाठी आणि त्यांच्या एका हाकेवर हजारो मराठा बांधव पाटोदा शहरात लोटले होते. जिथे नजर जाईल तिथे फक्त डोकेच डोके दिसत होते.
या व्हिडीओमध्ये दिसत असलेले हे दृश्य कोणत्याही चित्रपटातील नसून, पाटोदा शहराच्या मुख्य बाजारपेठेतील आहे. रस्त्यावर पाय ठेवायला जागा नाही, इतका प्रचंड जनसमुदाय एकाच ठिकाणी जमा झाला होता. मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी पाटोदा शहरात हा विराट जनसागर उसळला होता.
क्रेनवरील भव्य हार ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू
दुपारच्या सुमारास पाटोदा शहराच्या मध्यवर्ती भागात हा ऐतिहासिक सोहळा पार पडला. हजारो युवकांनी डोक्यावर भगव्या टोप्या, कपाळावर भगवा टिळा आणि हातात भगवे झेंडे घेऊन जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या  दुकानांवर, इमारतींच्या छतावर, टेरेसवर आणि क्रेनवर उभे राहून लोक हा ऐतिहासिक क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद करत होते.
या गर्दीच्या मध्यभागी फुलांनी सजवलेली काळी-पांढरी फॉर्च्युनर गाडी हळूहळू पुढे सरकत होती. गाडीच्या बॉनेटवर झेंडूच्या फुलांचा खच पडला होता. गाडीवर उभे राहून मनोज जरांगे पाटील हात जोडून आणि हात उंचावून जनतेचे अभिवादन करत होते. पोलिसांना आणि स्वयंसेवकांना गर्दी नियंत्रित करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती.
या स्वागत सोहळ्याचे सर्वात मोठे आकर्षण ठरले ते क्रेनच्या सहाय्याने घातलेला ५० फूट लांबीचा भव्य हार! एका मोठ्या क्रेनच्या सहाय्याने हा अवाढव्य फुलांचा हार जरांगे पाटलांच्या दिशेने खाली आणण्यात आला. हा हार गळ्यात पडताच उपस्थित हजारो मराठा बांधवांनी एक मराठा  लाख मराठा, जय जिजाऊ  जय शिवराय च्या घोषणांनी आसमंत दणाणून सोडला.
प्रत्येक ठिकाणी जनसागराचा महासागर
मनोज जरांगे पाटील हे केवळ एक व्यक्ती नसून, तो एक विचार आहे. मराठा आरक्षणासाठी ते जिथे जिथे जात आहेत, तिथे तिथे जनसागराचा महासागर होत आहे. अंतरवाली सराटी पासून मुंबई पर्यंतच्या त्यांच्या प्रत्येक प्रवासात असेच लाखो मराठा बांधव त्यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर येत आहेत. 
पाटोदा येथे झालेला हा सत्कार म्हणजे केवळ स्वागत नव्हते, तर मराठा समाजाने दाखवलेले ऐक्य आणि ताकदीचे शक्ती प्रदर्शन होते. आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, या जरांगे पाटलांच्या निर्धाराला पाठिंबा देण्यासाठी हा जनसमुदाय लोटला होता.
या विराट जनसागराने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले असून, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पाटोदा येथून हा जंगी सत्कार स्वीकारून मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आपल्या हजारो गाड्यांच्या ताफ्यासह आरक्षणाच्या अंतिम लढाईसाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
    user_इसरारखान पठाण
    इसरारखान पठाण
    Local News Reporter भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    30 min ago
  • स्मार्ट मिटर लावण्याचा आग्रह करत असाल तर स्मार्ट रोहित्रही द्या व शेतकऱ्यांना दिवसा 8 तास अखंड विज पुरवठा  द्या -दिलीपकुमार सानंदा खामगाव : खामगाव विधानसभा मतदार संघामध्ये गेल्या 40 ते 45 दिवसांपासुन पाऊस नव्हता अश्या वेळेस शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह हा हंगामी पिकांवर अवलंबुन आहे.त्या माध्यमातून पाण्याची सुविधा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या.पावसाळयाचे दिवस असतांना सुध्दा फक्त एक-दोन दिवस तोही कमी प्रमाणात पाऊस पडला. रोहित्र जळाल्यानंतर नियम असा आहे की, 24 तासाच्या आत ते रोहित्र दिले पाहिजे. वेळेवर रोहित्र मिळाले नाही, व वरुण राजाही बरसला नाही अश्या परिस्थितीमध्ये काही ठिकाणी विहिरींना पाणी असुन सुध्दा रोहित्र जळाल्यामुळे त्यांना पाणी देता येत नव्हतं,महावितरणचे अधिकारी-कर्मचारी हेे फोन उचलत नव्हते.फोन उचलले तर उडवा-उडवीचे उत्तरे देत होते.  महावितरणच्या कारभाराबदद्ल शेतकरी बांधवांमध्ये तीव्र संताप होता. म्हणून दि.15 सप्टेंबर 2026 रोजी खामगाव येथील कार्यकारी अभियंता यांच्या दालनात कास्तकार बांधवांना घेवुन त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी  अभियंत्यांना जाब विचारला. ज्या ठिकाणचे रोहित्र जळाले त्या ठिकाणी शक्यतो 24 तासाच्या आत रोहित्र दिले जातील, सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या प्रमाणे स्मार्ट मिटर लावण्याचा त्यांचा आग्रह असतो, त्या विषयी मोठया प्रमाणात तक्रारी आहेत.खामगाव मतदार संघातील रोहित्रांची अत्यंत दयनीय परिस्थिती आहे त्या जळुन  केव्हाही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.स्मार्ट मिटरचा तुमचा आग्रह आहे तेव्हा त्याच प्रमाणे स्मार्ट रोहित्र  खामगाव विधानसभा मतदार संघात बसवावे व दिवसामध्ये 8 तास सलग विज शेतकरी बांधवांना द्यावी.अन्यथा बळीराजासाठी तीव्र आंदोलन करणार असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता सखाराम थानवी यांना दिला. यावेळेस त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंजाबरावदादा देशमुख, खामगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने, शहर उपाध्यक्ष नरहरी टिकार गुरुजी, खामगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मनोज वानखडे, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष बिलाल खाँ पठान, कृ.उ.बा.स.संचालक विलाससिंग इंगळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बबलु राठोड, सर्कल प्रमुख जयराम मुंडाले, एजाज देशमुख, श्याम गायगोळ, गणेश पाटील, रोहित राजपुत,गजानन जाधव,समीर शेख,माजी सरपंच विलास इंगळे आदी उपस्थित होते. पुढे बोलतांना माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा म्हणाले की, रोहित्रावर लावलेले बॉक्समधील कटआऊट, केबल उघडया स्थितीत असुन ते जिर्ण व धोकादायक स्थितीत आहे.त्यामुळे त्या रोहित्रांची तात्काळ दुरुस्ती  करण्यात यावी.  महावितरण अंतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जी कामे सुरु आहे,राजकीय पाठबळ असलेले अनेक कंत्राटदार आहे  ते अरेरावी करुन त्या माध्यमातून निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्यांची व त्याला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची खैर  नाही, आपण चांगल्या प्रकारची कामे करा असा इशारा देखील याप्रसंगी सानंदांनी दिला. आता गणेशोत्सव आहे गणेशोत्सवामध्ये विद्युत खंडीत होता काम नये.शेतकऱ्यांना दिवसा 8 तास लाईन देता यावी यासह अनेक विषयांवर चर्चा झाली.ज्यांना सिंगल फेजवरुन मिटर आहे परंतू त्यांना नियमानुसार विज पुरवठा होत नाही अश्यांना दिवस-रात्र विज पुरवठा देण्यात यावा.शेती पंपासाठी थ्री फेज विजपुरवठा सुरळीत ठेवावी.अनेक कुटुंब शेतात राहतात परंतु रात्रीच्या वेळेस वीज पुरवठा खंडित राहत असल्यामुळे साप,विंचू तसेच अन्य प्राण्यांपासून शेतकरी बांधव व त्यांच्या कुटुंबियांना धोका संभवतो व त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.नैसर्गिक परिस्थितीमुळे अडचणीचा सामना करावा लागत असल्यामुळे आपण चांगल्या प्रकारची कामे करावी,बळीराजा हा देशाचा पोशिंदा आहे,बळीराजावर जर अन्याय झाला तर मी सत्तेमध्ये असलो तरी  आपला कारभार सुधारला नाही व भ्रष्टाचार करणाऱ्या कंत्राटदारांनां पाठीशी घातले तर लोकप्रिय पालकमंत्री  मकरंद आबा पाटील व संबंधीत मंत्री महोदयांकडे याबाबत तक्रार करणार तसेच या ठिकाणी मोठया प्रमाणावर शेतकरी बांधवांना घेवुन आंदोलन करेल व त्याची सर्वस्वी जबाबदारी महावितरण व संबंधीत अधिकारी व कर्मचारी  यांच्यावर राहील असेही यावेळी सानंदांनी सांगितले. यावेळी तानाजी चव्हाण,राजेंद्र जाधव,सुधाकर जाधव,गणेश इंगळे, प्रदिप इंगळे, पुरुषोत्तम भोसले, शेषराव भोसले, शेख साबीर शेख लाल,बाळु वाघमारे, अर्जुन गुजर,अरविंद अंभोरे,मयुर सातव,कुणाल राजपुत,प्रणव बिल्लारे, तुकाराम वाघमारे,सतीष सोळंके,योगेश बिल्लारे,संकेत गवई,संदिप दाभाडे,रामेश्वर अंभोरे, अभिषेक हिवरखेडे, अक्षय बदरखे यासह असंख्य शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.
    4
    स्मार्ट मिटर लावण्याचा आग्रह करत असाल तर स्मार्ट रोहित्रही द्या व शेतकऱ्यांना दिवसा 8 तास अखंड विज पुरवठा  द्या -दिलीपकुमार सानंदा


खामगाव :  खामगाव विधानसभा मतदार संघामध्ये गेल्या 40 ते 45 दिवसांपासुन पाऊस नव्हता अश्या वेळेस शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह हा हंगामी पिकांवर अवलंबुन आहे.त्या माध्यमातून पाण्याची सुविधा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या.पावसाळयाचे दिवस असतांना सुध्दा फक्त एक-दोन दिवस तोही कमी प्रमाणात पाऊस पडला. रोहित्र जळाल्यानंतर नियम असा आहे की, 24 तासाच्या आत ते रोहित्र दिले पाहिजे. वेळेवर रोहित्र मिळाले नाही, व वरुण राजाही बरसला नाही अश्या परिस्थितीमध्ये काही ठिकाणी विहिरींना पाणी असुन सुध्दा रोहित्र जळाल्यामुळे त्यांना पाणी देता येत नव्हतं,महावितरणचे अधिकारी-कर्मचारी हेे फोन उचलत नव्हते.फोन उचलले तर उडवा-उडवीचे उत्तरे देत होते.  महावितरणच्या कारभाराबदद्ल शेतकरी बांधवांमध्ये तीव्र संताप होता. म्हणून दि.15 सप्टेंबर 2026 रोजी खामगाव येथील कार्यकारी अभियंता यांच्या दालनात कास्तकार बांधवांना घेवुन त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी  अभियंत्यांना जाब विचारला.
ज्या ठिकाणचे रोहित्र जळाले त्या ठिकाणी शक्यतो 24 तासाच्या आत रोहित्र दिले जातील, सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या प्रमाणे स्मार्ट मिटर लावण्याचा त्यांचा आग्रह असतो, त्या विषयी मोठया प्रमाणात तक्रारी आहेत.खामगाव मतदार संघातील रोहित्रांची अत्यंत दयनीय परिस्थिती आहे त्या जळुन  केव्हाही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.स्मार्ट मिटरचा तुमचा आग्रह आहे तेव्हा त्याच प्रमाणे स्मार्ट रोहित्र  खामगाव विधानसभा मतदार संघात बसवावे व दिवसामध्ये 8 तास सलग विज शेतकरी बांधवांना द्यावी.अन्यथा बळीराजासाठी तीव्र आंदोलन करणार असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता सखाराम थानवी यांना दिला.
यावेळेस त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंजाबरावदादा देशमुख, खामगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने, शहर उपाध्यक्ष नरहरी टिकार गुरुजी, खामगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मनोज वानखडे, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष बिलाल खाँ पठान, कृ.उ.बा.स.संचालक विलाससिंग इंगळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बबलु राठोड, सर्कल प्रमुख जयराम मुंडाले, एजाज देशमुख, श्याम गायगोळ, गणेश पाटील, रोहित राजपुत,गजानन जाधव,समीर शेख,माजी सरपंच विलास इंगळे आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा म्हणाले की, रोहित्रावर लावलेले बॉक्समधील कटआऊट, केबल उघडया स्थितीत असुन ते जिर्ण व धोकादायक स्थितीत आहे.त्यामुळे त्या रोहित्रांची तात्काळ दुरुस्ती  करण्यात यावी.  महावितरण अंतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जी कामे सुरु आहे,राजकीय पाठबळ असलेले अनेक कंत्राटदार आहे  ते अरेरावी करुन त्या माध्यमातून निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्यांची व त्याला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची खैर  नाही, आपण चांगल्या प्रकारची कामे करा असा इशारा देखील याप्रसंगी सानंदांनी दिला.
आता गणेशोत्सव आहे गणेशोत्सवामध्ये विद्युत खंडीत होता काम नये.शेतकऱ्यांना दिवसा 8 तास लाईन देता यावी यासह अनेक विषयांवर चर्चा झाली.ज्यांना सिंगल फेजवरुन मिटर आहे परंतू त्यांना नियमानुसार विज पुरवठा होत नाही अश्यांना दिवस-रात्र विज पुरवठा देण्यात यावा.शेती पंपासाठी थ्री फेज विजपुरवठा सुरळीत ठेवावी.अनेक कुटुंब शेतात राहतात परंतु रात्रीच्या वेळेस वीज पुरवठा खंडित राहत असल्यामुळे साप,विंचू तसेच अन्य प्राण्यांपासून शेतकरी बांधव व त्यांच्या कुटुंबियांना धोका संभवतो व त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.नैसर्गिक परिस्थितीमुळे अडचणीचा सामना करावा लागत असल्यामुळे आपण चांगल्या प्रकारची कामे करावी,बळीराजा हा देशाचा पोशिंदा आहे,बळीराजावर जर अन्याय झाला तर मी सत्तेमध्ये असलो तरी  आपला कारभार सुधारला नाही व भ्रष्टाचार करणाऱ्या कंत्राटदारांनां पाठीशी घातले तर लोकप्रिय पालकमंत्री  मकरंद आबा पाटील व संबंधीत मंत्री महोदयांकडे याबाबत तक्रार करणार तसेच या ठिकाणी मोठया प्रमाणावर शेतकरी बांधवांना घेवुन आंदोलन करेल व त्याची सर्वस्वी जबाबदारी महावितरण व संबंधीत अधिकारी व कर्मचारी  यांच्यावर राहील असेही यावेळी सानंदांनी सांगितले.
यावेळी तानाजी चव्हाण,राजेंद्र जाधव,सुधाकर जाधव,गणेश इंगळे, प्रदिप इंगळे, पुरुषोत्तम भोसले, शेषराव भोसले, शेख साबीर शेख लाल,बाळु वाघमारे, अर्जुन गुजर,अरविंद अंभोरे,मयुर सातव,कुणाल राजपुत,प्रणव बिल्लारे, तुकाराम वाघमारे,सतीष सोळंके,योगेश बिल्लारे,संकेत गवई,संदिप दाभाडे,रामेश्वर अंभोरे, अभिषेक हिवरखेडे, अक्षय बदरखे यासह असंख्य शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • भोकरदन तालुक्यातील भिवपूर ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी राहणीमान भत्त्यासह विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. भोकरदन तालुक्यातील भिवपूर ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी राहणीमान भत्त्यासह विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे.* *उपोषणकर्ते रामा जाधव यांनी आपल्या मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे. तसेच “ग्रामपंचायतीचा लिलाव करून माझे मानधन द्या” अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.*
    1
    भोकरदन तालुक्यातील भिवपूर ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी राहणीमान भत्त्यासह विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे.
भोकरदन तालुक्यातील भिवपूर ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी राहणीमान भत्त्यासह विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे.*
*उपोषणकर्ते रामा जाधव यांनी आपल्या मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे. तसेच “ग्रामपंचायतीचा लिलाव करून माझे मानधन द्या” अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.*
    user_विश्वास धसाळ Press
    विश्वास धसाळ Press
    भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    39 min ago
  • ईतवारा बाजार में अतिक्रमण है
    2
    ईतवारा बाजार में अतिक्रमण है
    user_Dipak Sonawal
    Dipak Sonawal
    अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.