माना फाट्यावर प्लास्टिकच्या दाण्यांनी भरलेल्या ट्रकला भीषण आग! | एसी केबिनमध्ये शॉर्टसर्किट मूर्तिजापूर तालुक्यातील माना फाटा येथे प्लास्टिकच्या दाण्यांनी भरलेल्या ट्रकला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी, १५ सप्टेंबर रोजी सकाळी घडली. गुजरातमधील दहेज येथून प्लास्टिकचे दाणे घेऊन कलकत्त्याच्या दिशेने जाणाऱ्या NL 01 AJ 4266 क्रमांकाच्या ट्रकच्या एसी केबिनमध्ये शॉर्टसर्किट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले. माना पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या घटनेत ट्रकच्या एसी केबिनचे मोठे नुकसान झाले असून प्लास्टिकच्या दाण्यांचेही नुकसान झाले आहे. सुदैवाने चालकासह कोणालाही दुखापत झाली नाही आणि मोठा अनर्थ टळला. 📍 घटनास्थळ: माना फाटा, मूर्तिजापूर तालुका, अकोला 🚛 ट्रक: NL 01 AJ 4266 🔥 प्राथमिक कारण: एसी केबिनमधील शॉर्टसर्किट इंडिया न्यूज आर सेवन | भारताची आवाज उपसंपादक मोहम्मद रिज़वान सिद्दिकी, मूर्तिजापूर बातमी आवडल्यास Like, Share आणि Subscribe करा.
माना फाट्यावर प्लास्टिकच्या दाण्यांनी भरलेल्या ट्रकला भीषण आग! | एसी केबिनमध्ये शॉर्टसर्किट मूर्तिजापूर तालुक्यातील माना फाटा येथे प्लास्टिकच्या दाण्यांनी भरलेल्या ट्रकला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी, १५ सप्टेंबर रोजी सकाळी घडली. गुजरातमधील दहेज येथून प्लास्टिकचे दाणे घेऊन कलकत्त्याच्या दिशेने जाणाऱ्या NL 01 AJ 4266 क्रमांकाच्या ट्रकच्या एसी केबिनमध्ये शॉर्टसर्किट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले. माना पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या घटनेत ट्रकच्या एसी केबिनचे मोठे नुकसान झाले असून प्लास्टिकच्या दाण्यांचेही नुकसान झाले आहे. सुदैवाने चालकासह कोणालाही दुखापत झाली नाही आणि मोठा अनर्थ टळला. 📍 घटनास्थळ: माना फाटा, मूर्तिजापूर तालुका, अकोला 🚛 ट्रक: NL 01 AJ 4266 🔥 प्राथमिक कारण: एसी केबिनमधील शॉर्टसर्किट इंडिया न्यूज आर सेवन | भारताची आवाज उपसंपादक मोहम्मद रिज़वान सिद्दिकी, मूर्तिजापूर बातमी आवडल्यास Like, Share आणि Subscribe करा.
- माना फाट्यावर प्लास्टिकच्या दाण्यांनी भरलेल्या ट्रकला भीषण आग! | एसी केबिनमध्ये शॉर्टसर्किट मूर्तिजापूर तालुक्यातील माना फाटा येथे प्लास्टिकच्या दाण्यांनी भरलेल्या ट्रकला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी, १५ सप्टेंबर रोजी सकाळी घडली. गुजरातमधील दहेज येथून प्लास्टिकचे दाणे घेऊन कलकत्त्याच्या दिशेने जाणाऱ्या NL 01 AJ 4266 क्रमांकाच्या ट्रकच्या एसी केबिनमध्ये शॉर्टसर्किट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले. माना पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या घटनेत ट्रकच्या एसी केबिनचे मोठे नुकसान झाले असून प्लास्टिकच्या दाण्यांचेही नुकसान झाले आहे. सुदैवाने चालकासह कोणालाही दुखापत झाली नाही आणि मोठा अनर्थ टळला. 📍 घटनास्थळ: माना फाटा, मूर्तिजापूर तालुका, अकोला 🚛 ट्रक: NL 01 AJ 4266 🔥 प्राथमिक कारण: एसी केबिनमधील शॉर्टसर्किट इंडिया न्यूज आर सेवन | भारताची आवाज उपसंपादक मोहम्मद रिज़वान सिद्दिकी, मूर्तिजापूर बातमी आवडल्यास Like, Share आणि Subscribe करा.1
- आमच्या गावाची स्वच्छता आमच्या dalambi गावामध्ये खूप प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे. ओला कचरा सुखा कचरा आणि घरातील wastage कचरा यामुळे गावात बिमारी च प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.3
- अकोली जहागीर शेतशिवारात बिबट्याची दहशत; शेतकरी, शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण कुत्र्याची शिकार; दोन-तीन दिवसांपूर्वी रुईखेड शितशिवारात गायीचीही शिकार केल्याची घटना! अकोली जहागीर शेतशिवारात बिबट्याची दहशत; शेतकरी, शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण कुत्र्याची शिकार; दोन-तीन दिवसांपूर्वी रुईखेड शितशिवारात गायीचीही शिकार केल्याची घटना! अकोट तालुका प्रतिनिधी... अकोट तालुक्यातील अकोली जहागीर परिसरातील शेतशिवारात बिबट्याचा वावर असल्याने शेतकरी व शेतमजूर वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिबट्याने आकोली जहांगीर शेतशिवारात एका कुत्र्याची शिकार केली असून, दोन-तीन दिवसांपूर्वी रुईखेड शेतशिविरात एका गायीचीही शिकार सुद्धा केल्याची घटना घडल्याचे येथील नागरीकांन कडुन सांगण्यात येत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शेतात काम करण्यासाठी जाणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांमध्ये चिंतेचे व भिंतीचे वातावरण आहे. बिबट्याचा वावर वाढल्याने भविष्यात मनुष्य किंवा पाळीव प्राण्यांवर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वन विभागाने तातडीने या परिसराची पाहणी करून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी व नागरिकांकडून जोर धरत आहे.2
- ऋषिपंचमी निमित्त संत नगरी शेगाव भक्तिमय; श्रींच्या पालखीची भव्य प्रभातफेरी जागो जागी रांगोळी काढून स्वागत. ऋषिपंचमी निमित्त संत नगरी शेगाव भक्तिमय; श्रींच्या पालखीची भव्य प्रभातफेरी शेगाव : ऋषिपंचमीच्या पावन पर्वावर संत नगरी शेगाव आज श्री संत गजानन महाराजांच्या भक्तिरसात न्हाऊन निघाली. श्री संत गजानन महाराजांनी दि. ८ सप्टेंबर १९१० रोजी संजीवनी समाधी घेतली. त्यांच्या समाधीला ११६ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर श्रींच्या पालखीची अश्वांसह व पताकाधारी वारकरी, पालखीचे भोई, सेवेकरी आणि भाविकांच्या उपस्थितीत भव्य प्रभातफेरी संत नगरीतून काढण्यात आली. प्रभातफेरीदरम्यान सर्वत्र “गण गण गणात बोते” आणि “श्री संत गजानन महाराज की जय” या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले. टाळ-मृदंगाचा निनाद, भगव्या पताका, अश्व आणि पालखीचे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. श्रींच्या नामस्मरणाने संपूर्ण शेगाव नगरीत आध्यात्मिक आणि चैतन्यमय वातावरण निर्माण झाले. श्री संत गजानन महाराजांच्या चरणी कोटी कोटी नमन करून, श्री महाराज सर्व भक्तांवर सदैव कृपादृष्टी ठेवोत, सर्वांना सुख, शांती, आरोग्य व समृद्धी लाभो, अशी भक्तिभावाने प्रार्थना करण्यात आली.4
- शेतकऱ्यांच्या ‘क्रांतिकारी राजा’चे बुलढाण्यात दणक्यात आगमन; शेतकऱ्यांच्या ‘क्रांतिकारी राजा’चे बुलढाण्यात दणक्यात आगमन;1
- स्मार्ट मिटर लावण्याचा आग्रह करत असाल तर स्मार्ट रोहित्रही द्या व शेतकऱ्यांना दिवसा 8 तास अखंड विज पुरवठा द्या -दिलीपकुमार सानंदा खामगाव : खामगाव विधानसभा मतदार संघामध्ये गेल्या 40 ते 45 दिवसांपासुन पाऊस नव्हता अश्या वेळेस शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह हा हंगामी पिकांवर अवलंबुन आहे.त्या माध्यमातून पाण्याची सुविधा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या.पावसाळयाचे दिवस असतांना सुध्दा फक्त एक-दोन दिवस तोही कमी प्रमाणात पाऊस पडला. रोहित्र जळाल्यानंतर नियम असा आहे की, 24 तासाच्या आत ते रोहित्र दिले पाहिजे. वेळेवर रोहित्र मिळाले नाही, व वरुण राजाही बरसला नाही अश्या परिस्थितीमध्ये काही ठिकाणी विहिरींना पाणी असुन सुध्दा रोहित्र जळाल्यामुळे त्यांना पाणी देता येत नव्हतं,महावितरणचे अधिकारी-कर्मचारी हेे फोन उचलत नव्हते.फोन उचलले तर उडवा-उडवीचे उत्तरे देत होते. महावितरणच्या कारभाराबदद्ल शेतकरी बांधवांमध्ये तीव्र संताप होता. म्हणून दि.15 सप्टेंबर 2026 रोजी खामगाव येथील कार्यकारी अभियंता यांच्या दालनात कास्तकार बांधवांना घेवुन त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी अभियंत्यांना जाब विचारला. ज्या ठिकाणचे रोहित्र जळाले त्या ठिकाणी शक्यतो 24 तासाच्या आत रोहित्र दिले जातील, सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या प्रमाणे स्मार्ट मिटर लावण्याचा त्यांचा आग्रह असतो, त्या विषयी मोठया प्रमाणात तक्रारी आहेत.खामगाव मतदार संघातील रोहित्रांची अत्यंत दयनीय परिस्थिती आहे त्या जळुन केव्हाही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.स्मार्ट मिटरचा तुमचा आग्रह आहे तेव्हा त्याच प्रमाणे स्मार्ट रोहित्र खामगाव विधानसभा मतदार संघात बसवावे व दिवसामध्ये 8 तास सलग विज शेतकरी बांधवांना द्यावी.अन्यथा बळीराजासाठी तीव्र आंदोलन करणार असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता सखाराम थानवी यांना दिला. यावेळेस त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंजाबरावदादा देशमुख, खामगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने, शहर उपाध्यक्ष नरहरी टिकार गुरुजी, खामगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मनोज वानखडे, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष बिलाल खाँ पठान, कृ.उ.बा.स.संचालक विलाससिंग इंगळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बबलु राठोड, सर्कल प्रमुख जयराम मुंडाले, एजाज देशमुख, श्याम गायगोळ, गणेश पाटील, रोहित राजपुत,गजानन जाधव,समीर शेख,माजी सरपंच विलास इंगळे आदी उपस्थित होते. पुढे बोलतांना माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा म्हणाले की, रोहित्रावर लावलेले बॉक्समधील कटआऊट, केबल उघडया स्थितीत असुन ते जिर्ण व धोकादायक स्थितीत आहे.त्यामुळे त्या रोहित्रांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी. महावितरण अंतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जी कामे सुरु आहे,राजकीय पाठबळ असलेले अनेक कंत्राटदार आहे ते अरेरावी करुन त्या माध्यमातून निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्यांची व त्याला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची खैर नाही, आपण चांगल्या प्रकारची कामे करा असा इशारा देखील याप्रसंगी सानंदांनी दिला. आता गणेशोत्सव आहे गणेशोत्सवामध्ये विद्युत खंडीत होता काम नये.शेतकऱ्यांना दिवसा 8 तास लाईन देता यावी यासह अनेक विषयांवर चर्चा झाली.ज्यांना सिंगल फेजवरुन मिटर आहे परंतू त्यांना नियमानुसार विज पुरवठा होत नाही अश्यांना दिवस-रात्र विज पुरवठा देण्यात यावा.शेती पंपासाठी थ्री फेज विजपुरवठा सुरळीत ठेवावी.अनेक कुटुंब शेतात राहतात परंतु रात्रीच्या वेळेस वीज पुरवठा खंडित राहत असल्यामुळे साप,विंचू तसेच अन्य प्राण्यांपासून शेतकरी बांधव व त्यांच्या कुटुंबियांना धोका संभवतो व त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.नैसर्गिक परिस्थितीमुळे अडचणीचा सामना करावा लागत असल्यामुळे आपण चांगल्या प्रकारची कामे करावी,बळीराजा हा देशाचा पोशिंदा आहे,बळीराजावर जर अन्याय झाला तर मी सत्तेमध्ये असलो तरी आपला कारभार सुधारला नाही व भ्रष्टाचार करणाऱ्या कंत्राटदारांनां पाठीशी घातले तर लोकप्रिय पालकमंत्री मकरंद आबा पाटील व संबंधीत मंत्री महोदयांकडे याबाबत तक्रार करणार तसेच या ठिकाणी मोठया प्रमाणावर शेतकरी बांधवांना घेवुन आंदोलन करेल व त्याची सर्वस्वी जबाबदारी महावितरण व संबंधीत अधिकारी व कर्मचारी यांच्यावर राहील असेही यावेळी सानंदांनी सांगितले. यावेळी तानाजी चव्हाण,राजेंद्र जाधव,सुधाकर जाधव,गणेश इंगळे, प्रदिप इंगळे, पुरुषोत्तम भोसले, शेषराव भोसले, शेख साबीर शेख लाल,बाळु वाघमारे, अर्जुन गुजर,अरविंद अंभोरे,मयुर सातव,कुणाल राजपुत,प्रणव बिल्लारे, तुकाराम वाघमारे,सतीष सोळंके,योगेश बिल्लारे,संकेत गवई,संदिप दाभाडे,रामेश्वर अंभोरे, अभिषेक हिवरखेडे, अक्षय बदरखे यासह असंख्य शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.4
- पिकं करपली, डीपी बंद! कुरुममध्ये महावितरणविरोधात शेतकऱ्यांचा संताप; आंदोलनाचा इशारा मूर्तिजापूर तालुक्यातील कुरुम परिसरात महावितरणच्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा संतापाचा उद्रेक झाला आहे. पावसाचा ३५ ते ४० दिवसांचा खंड, करपण्याच्या मार्गावर असलेली सोयाबीन, मूग, उडीदची पिके आणि बंद डीपीमुळे सिंचनाचा खोळंबा यामुळे शेतकऱ्यांनी कुरुम महावितरण कार्यालयावर घेराव घातला. भारतीय किसान संघाचे विदर्भ प्रांत उपाध्यक्ष राहुल पुरुषोत्तम राठी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी बंद डीपी तातडीने सुरू करण्याची, तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची आणि अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. मागण्या मान्य न झाल्यास कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. पिकं वाचवायची की महावितरणच्या दारात हेलपाटे मारायचे? असा सवाल संतप्त शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. 📺 इंडिया न्यूज R7 — भारताची आवाज1
- ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन; गणेश मंडळाच्या बॅन्जोवर पोलिसांची कारवाई1