Shuru
Apke Nagar Ki App…
आमच्या गावाची स्वच्छता आमच्या dalambi गावामध्ये खूप प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे. ओला कचरा सुखा कचरा आणि घरातील wastage कचरा यामुळे गावात बिमारी च प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.
विकास इंगळे
आमच्या गावाची स्वच्छता आमच्या dalambi गावामध्ये खूप प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे. ओला कचरा सुखा कचरा आणि घरातील wastage कचरा यामुळे गावात बिमारी च प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- आमच्या गावाची स्वच्छता आमच्या dalambi गावामध्ये खूप प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे. ओला कचरा सुखा कचरा आणि घरातील wastage कचरा यामुळे गावात बिमारी च प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.3
- माना फाट्यावर प्लास्टिकच्या दाण्यांनी भरलेल्या ट्रकला भीषण आग! | एसी केबिनमध्ये शॉर्टसर्किट मूर्तिजापूर तालुक्यातील माना फाटा येथे प्लास्टिकच्या दाण्यांनी भरलेल्या ट्रकला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी, १५ सप्टेंबर रोजी सकाळी घडली. गुजरातमधील दहेज येथून प्लास्टिकचे दाणे घेऊन कलकत्त्याच्या दिशेने जाणाऱ्या NL 01 AJ 4266 क्रमांकाच्या ट्रकच्या एसी केबिनमध्ये शॉर्टसर्किट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले. माना पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या घटनेत ट्रकच्या एसी केबिनचे मोठे नुकसान झाले असून प्लास्टिकच्या दाण्यांचेही नुकसान झाले आहे. सुदैवाने चालकासह कोणालाही दुखापत झाली नाही आणि मोठा अनर्थ टळला. 📍 घटनास्थळ: माना फाटा, मूर्तिजापूर तालुका, अकोला 🚛 ट्रक: NL 01 AJ 4266 🔥 प्राथमिक कारण: एसी केबिनमधील शॉर्टसर्किट इंडिया न्यूज आर सेवन | भारताची आवाज उपसंपादक मोहम्मद रिज़वान सिद्दिकी, मूर्तिजापूर बातमी आवडल्यास Like, Share आणि Subscribe करा.1
- ऋषिपंचमी निमित्त संत नगरी शेगाव भक्तिमय; श्रींच्या पालखीची भव्य प्रभातफेरी जागो जागी रांगोळी काढून स्वागत. ऋषिपंचमी निमित्त संत नगरी शेगाव भक्तिमय; श्रींच्या पालखीची भव्य प्रभातफेरी शेगाव : ऋषिपंचमीच्या पावन पर्वावर संत नगरी शेगाव आज श्री संत गजानन महाराजांच्या भक्तिरसात न्हाऊन निघाली. श्री संत गजानन महाराजांनी दि. ८ सप्टेंबर १९१० रोजी संजीवनी समाधी घेतली. त्यांच्या समाधीला ११६ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर श्रींच्या पालखीची अश्वांसह व पताकाधारी वारकरी, पालखीचे भोई, सेवेकरी आणि भाविकांच्या उपस्थितीत भव्य प्रभातफेरी संत नगरीतून काढण्यात आली. प्रभातफेरीदरम्यान सर्वत्र “गण गण गणात बोते” आणि “श्री संत गजानन महाराज की जय” या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले. टाळ-मृदंगाचा निनाद, भगव्या पताका, अश्व आणि पालखीचे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. श्रींच्या नामस्मरणाने संपूर्ण शेगाव नगरीत आध्यात्मिक आणि चैतन्यमय वातावरण निर्माण झाले. श्री संत गजानन महाराजांच्या चरणी कोटी कोटी नमन करून, श्री महाराज सर्व भक्तांवर सदैव कृपादृष्टी ठेवोत, सर्वांना सुख, शांती, आरोग्य व समृद्धी लाभो, अशी भक्तिभावाने प्रार्थना करण्यात आली.4
- महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या :- संभाजी ब्रिगेड सद्ध्याच्या परिस्थितीत पावसाने पाठ फिरवल्याने मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील खरीप हंगाम गंभीर संकटात सापडला असून, तातडीच्या उपाययोजना करणे अत्यावश्यक झाले आहे. सध्या मराठवाड्यासह विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातील शेतीची परिस्थिती अत्यंत भयावह असून कोरडा दुष्काळसदृश बनली आहे. तरी मुख्यमंत्री यांनी वरील विभागातील परिस्थितीचा आढावा घेऊन कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करून त्याची त्वरित अंमलबजावणी करावी, शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अनेक शेतकऱ्यांनी खरीप पेरणीसाठी बँका, विविध पतपुरवठा संस्था तसेच खासगी सावकारांकडून कर्ज घेतले आहे. मात्र, पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावरच पाऊस न झाल्याने या शेतकऱ्यांसमोर कर्ज फेडण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, कोरडा दुष्काळ जाहीर करून सवलती लागू कराव्यात : विशेषतः बुलढाणा जिल्हा जो कोरडा दुष्काळ यादीतून वगळला आहे तो तातडीने कोरडा दुष्काळ म्हणून घोषित करावा.सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करावा. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सर्व शासकीय सवलती द्या, तातडीची आर्थिक खरीप पिकांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी आर्थिक मदत, आगामी रब्बी हंगामाचे नियोजन, बियाणे उपलब्धता, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था यावर तातडीने निर्णय घ्या,शेतीच्या नुकसानीकडे लक्ष देताना कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क व स्पर्धा परीक्षा शुल्क पूर्णतः माफ करून दिलासा द्या, पावसाअभावी तलाव, विहिरी आणि इतर जलस्रोतांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे पुढील काळात पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. यासाठी टँकरने पाणीपुरवठा आणि चारा छावण्या यांचे पूर्वनियोजन करणे आवश्यक आहे. मंत्रिमंडळाची विशेष बैठक घेऊन, मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊन मदतीचे विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी आमची आग्रही मागणी आहे. तरी आपण वरील विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय द्यावा व शेतकरी सुरक्षित ठेवावा या महत्त्वपूर्ण मुद्द्यांचे निवेदन आज नांदूर तहसील मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.हे निवेदन संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष ॲड.मनोज आखरे यांच्या आदेशानुसार व प्रदेश संघटक शिवश्री योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनात व बुलढाणा जिल्हाध्यक्ष अमर रमेश पाटील यांच्या नेतृत्वात देण्यात आले. यावेळी जिल्हा मार्गदर्शक विनोद वनारे,शेतकरी नेते अरविंद बाठे,जिल्हा कार्याध्यक्ष सचिन बाठे,तालुका उपाध्यक्ष सचिन गणगे,वाहतूक आघाडी तालुकाध्यक्ष अमोल भगत,विशाल इंगळे,विनायक वडोदे,रोहन मनस्कार,सुनील अंभोरे,प्रतीक धांडे,संतोष पारस्कार,ज्ञानेश्वर मनस्कार,अंबादास मनस्कार,बाळू डाबेराव,सुनील बाठे,श्रीकृष्ण गायेल,पत्रकार अमोल करुटले व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.2
- अकोली जहागीर शेतशिवारात बिबट्याची दहशत; शेतकरी, शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण कुत्र्याची शिकार; दोन-तीन दिवसांपूर्वी रुईखेड शितशिवारात गायीचीही शिकार केल्याची घटना! अकोली जहागीर शेतशिवारात बिबट्याची दहशत; शेतकरी, शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण कुत्र्याची शिकार; दोन-तीन दिवसांपूर्वी रुईखेड शितशिवारात गायीचीही शिकार केल्याची घटना! अकोट तालुका प्रतिनिधी... अकोट तालुक्यातील अकोली जहागीर परिसरातील शेतशिवारात बिबट्याचा वावर असल्याने शेतकरी व शेतमजूर वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिबट्याने आकोली जहांगीर शेतशिवारात एका कुत्र्याची शिकार केली असून, दोन-तीन दिवसांपूर्वी रुईखेड शेतशिविरात एका गायीचीही शिकार सुद्धा केल्याची घटना घडल्याचे येथील नागरीकांन कडुन सांगण्यात येत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शेतात काम करण्यासाठी जाणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांमध्ये चिंतेचे व भिंतीचे वातावरण आहे. बिबट्याचा वावर वाढल्याने भविष्यात मनुष्य किंवा पाळीव प्राण्यांवर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वन विभागाने तातडीने या परिसराची पाहणी करून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी व नागरिकांकडून जोर धरत आहे.2
- शेतकऱ्यांच्या ‘क्रांतिकारी राजा’चे बुलढाण्यात दणक्यात आगमन; शेतकऱ्यांच्या ‘क्रांतिकारी राजा’चे बुलढाण्यात दणक्यात आगमन;1
- दुष्काळ जाहीर करा, नाहीतर २८ पासून आमरण उपोषण!” जळगाव जामोद च्या शेतकऱ्यांचा प्रशासनाला निर्वाणीचा इशारा; दुष्काळ जाहीर करा, नाहीतर २८ पासून आमरण उपोषण!” जळगाव जामोद च्या शेतकऱ्यांचा प्रशासनाला निर्वाणीचा इशारा; जळगाव जामोद(प्रतिनिधी): अल्प व अनियमित पावसामुळे खरीप हंगाम अक्षरशः संकटात सापडला असून, पिकांची वाढ खुंटल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.या पार्श्वभूमीवर संपूर्ण जळगाव जामोद तालुका तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करावा, या मागणीसाठी निंभोरा बु. व खेर्डा खुर्द येथील शेतकऱ्यांनी मंगळवार, १५ सप्टेंबर रोजी तहसीलदारांना निवेदन दिले.प्रशासनाने मागण्यांची तातडीने दखल घेऊन कार्यवाही न केल्यास २८ सप्टेंबर २०२६ पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.त्यामुळे प्रशासनासमोर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.यावेळी शेतकऱ्यांनी जळगाव जामोद तालुका तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करून प्रस्ताव शासनाकडे पाठवावा.खरीप पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी.दुष्काळी सवलती व विविध शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांना द्यावा.पाणीटंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याची समस्या लक्षात घेऊन चारा व पाण्याची तातडीने व्यवस्था करावी.सन २०२५-२६ चा पीक विमा विनाविलंब शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा अशा मागण्या केल्या आहेत.या निवेदनाची प्रत बुलढाणा जिल्हाधिकारी तसेच जळगाव जामोदचे उपविभागीय अधिकारी यांनाही देण्यात आली आहे. अस्मानी संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असताना प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.निवेदन देतेवेळी अमोल बहादरे, ज्ञानेश्वर खंडारे, पांडुरंग उगले, रमेश देशमुख, आनंद सुरळकर, आनंद बुंदे, नारायण खंडारे, विठ्ठल दिघडे, विलास डवंगे, अनंता कोंडे, प्रज्वल देशमुख, ज्ञानेश्वर अंभोरे, गजानन बुंदे, दशरथ उगले, भीमराव वानखडे, सागर सपकाळ यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते.1
- पिकं करपली, डीपी बंद! कुरुममध्ये महावितरणविरोधात शेतकऱ्यांचा संताप; आंदोलनाचा इशारा मूर्तिजापूर तालुक्यातील कुरुम परिसरात महावितरणच्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा संतापाचा उद्रेक झाला आहे. पावसाचा ३५ ते ४० दिवसांचा खंड, करपण्याच्या मार्गावर असलेली सोयाबीन, मूग, उडीदची पिके आणि बंद डीपीमुळे सिंचनाचा खोळंबा यामुळे शेतकऱ्यांनी कुरुम महावितरण कार्यालयावर घेराव घातला. भारतीय किसान संघाचे विदर्भ प्रांत उपाध्यक्ष राहुल पुरुषोत्तम राठी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी बंद डीपी तातडीने सुरू करण्याची, तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची आणि अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. मागण्या मान्य न झाल्यास कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. पिकं वाचवायची की महावितरणच्या दारात हेलपाटे मारायचे? असा सवाल संतप्त शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. 📺 इंडिया न्यूज R7 — भारताची आवाज1