logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

दुष्काळ जाहीर करा, नाहीतर २८ पासून आमरण उपोषण!” जळगाव जामोद च्या शेतकऱ्यांचा प्रशासनाला निर्वाणीचा इशारा; दुष्काळ जाहीर करा, नाहीतर २८ पासून आमरण उपोषण!” जळगाव जामोद च्या शेतकऱ्यांचा प्रशासनाला निर्वाणीचा इशारा; जळगाव जामोद(प्रतिनिधी): अल्प व अनियमित पावसामुळे खरीप हंगाम अक्षरशः संकटात सापडला असून, पिकांची वाढ खुंटल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.या पार्श्वभूमीवर संपूर्ण जळगाव जामोद तालुका तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करावा, या मागणीसाठी निंभोरा बु. व खेर्डा खुर्द येथील शेतकऱ्यांनी मंगळवार, १५ सप्टेंबर रोजी तहसीलदारांना निवेदन दिले.प्रशासनाने मागण्यांची तातडीने दखल घेऊन कार्यवाही न केल्यास २८ सप्टेंबर २०२६ पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.त्यामुळे प्रशासनासमोर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.यावेळी शेतकऱ्यांनी जळगाव जामोद तालुका तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करून प्रस्ताव शासनाकडे पाठवावा.खरीप पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी.दुष्काळी सवलती व विविध शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांना द्यावा.पाणीटंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याची समस्या लक्षात घेऊन चारा व पाण्याची तातडीने व्यवस्था करावी.सन २०२५-२६ चा पीक विमा विनाविलंब शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा अशा मागण्या केल्या आहेत.या निवेदनाची प्रत बुलढाणा जिल्हाधिकारी तसेच जळगाव जामोदचे उपविभागीय अधिकारी यांनाही देण्यात आली आहे. अस्मानी संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असताना प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.निवेदन देतेवेळी अमोल बहादरे, ज्ञानेश्वर खंडारे, पांडुरंग उगले, रमेश देशमुख, आनंद सुरळकर, आनंद बुंदे, नारायण खंडारे, विठ्ठल दिघडे, विलास डवंगे, अनंता कोंडे, प्रज्वल देशमुख, ज्ञानेश्वर अंभोरे, गजानन बुंदे, दशरथ उगले, भीमराव वानखडे, सागर सपकाळ यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते.

5 hrs ago
user_अनिल भगत पत्रकार
अनिल भगत पत्रकार
जळगाव (जामोद), बुलढाणा, महाराष्ट्र•
5 hrs ago

दुष्काळ जाहीर करा, नाहीतर २८ पासून आमरण उपोषण!” जळगाव जामोद च्या शेतकऱ्यांचा प्रशासनाला निर्वाणीचा इशारा; दुष्काळ जाहीर करा, नाहीतर २८ पासून आमरण उपोषण!” जळगाव जामोद च्या शेतकऱ्यांचा प्रशासनाला निर्वाणीचा इशारा; जळगाव जामोद(प्रतिनिधी): अल्प व अनियमित पावसामुळे खरीप हंगाम अक्षरशः संकटात सापडला असून, पिकांची वाढ खुंटल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.या पार्श्वभूमीवर संपूर्ण जळगाव जामोद तालुका तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करावा, या मागणीसाठी निंभोरा बु. व खेर्डा खुर्द येथील शेतकऱ्यांनी मंगळवार, १५ सप्टेंबर रोजी तहसीलदारांना निवेदन दिले.प्रशासनाने मागण्यांची तातडीने दखल घेऊन कार्यवाही न केल्यास २८ सप्टेंबर २०२६ पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.त्यामुळे प्रशासनासमोर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.यावेळी शेतकऱ्यांनी जळगाव जामोद तालुका तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करून प्रस्ताव शासनाकडे पाठवावा.खरीप पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी.दुष्काळी सवलती व विविध शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांना द्यावा.पाणीटंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याची समस्या लक्षात घेऊन चारा व पाण्याची तातडीने व्यवस्था करावी.सन २०२५-२६ चा पीक विमा विनाविलंब शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा अशा मागण्या केल्या आहेत.या निवेदनाची प्रत बुलढाणा जिल्हाधिकारी तसेच जळगाव जामोदचे उपविभागीय अधिकारी यांनाही देण्यात आली आहे. अस्मानी संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असताना प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.निवेदन देतेवेळी अमोल बहादरे, ज्ञानेश्वर खंडारे, पांडुरंग उगले, रमेश देशमुख, आनंद सुरळकर, आनंद बुंदे, नारायण खंडारे, विठ्ठल दिघडे, विलास डवंगे, अनंता कोंडे, प्रज्वल देशमुख, ज्ञानेश्वर अंभोरे, गजानन बुंदे, दशरथ उगले, भीमराव वानखडे, सागर सपकाळ यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • *प्रभाग क्र १० हिरवेगार करण्याचा संकल्प!* ----------- नगरसेवक दिलीप बोचे यांच्या पुढाकाराने ट्री-गार्डसह वृक्षारोपण; नागरिकांनी स्वीकारली संगोपनाची जबाबदारी -------------- *प्रभाग क्र १० हिरवेगार करण्याचा संकल्प!* ----------- नगरसेवक दिलीप बोचे यांच्या पुढाकाराने ट्री-गार्डसह वृक्षारोपण; नागरिकांनी स्वीकारली संगोपनाची जबाबदारी -------------- ​अकोट तालुका प्रतिनिधी.... श्री संत वासुदेव महाराजांच्या पावन वास्तव्याने पुनीत झालेल्या संत वासुदेव नगर परिसरासह संपुर्ण प्रभाग १० मध्ये पर्यावरण संवर्धनाचा दृढ संकल्प करीत वृक्षारोपण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. संपूर्ण परिसर हिरवागार व पर्यावरणपूरक बनवण्याच्या उद्देशाने ट्री-गार्डसह वृक्षांची लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे, रोपलेल्या प्रत्येक वृक्षाचे जतन व संगोपन करण्याची जबाबदारी स्थानिक नगरवासीयांनी स्वतःहून स्वीकारली आहे. ​हा उपक्रम प्रभाग क्रमांक १० चे नगरसेवक दिलीप बोचे व सौ. विजयाताई बोचे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ज्येष्ठ नेते नानासाहेब हिंगणकर, अकोट शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनगरे, वृक्षमित्र प्राचार्य गजानन चोपडे आणि मुकुंदराव गावंडे आदी मान्यवरांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. *​'स्व. विश्वासराव चोपडे स्मृती वृक्ष' उपक्रम'* प्राचार्य गजाननराव चोपडे यांनी त्यांचे वडील स्वर्गीय विश्वासराव चोपडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ १०० पर्यावरणपूरक झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पांतर्गत त्यांनी स्वतः ट्री-गार्डसह मोठ्या वृक्षांची रोपे उपलब्ध करून दिली. त्यांच्या या सामाजिक व पर्यावरणीय योगदानाचे सर्वत्र कौतुक होत आहे. *​मान्यवरांची उपस्थिती* या प्रेरणादायी सोहळ्याला सुरेश कराळे, नंदकिशोर हिंगणकर, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष राममूर्ती वालसिंगे,नारायणराव अनासाने, पत्रकार विजय शिंदे सहपत्नीक, विनायकराव सपकाळ, प्रदीप ओळंबे, विजय वानखडे, अमोल बोरकर, दीपक पाटील, मनोहर रेचे, विलासराव चोरे, डॉ. लाड,माधव अनासाने, ऍड विपुल भिसे, भिकू गटकळ, अजय मोरे, प्रफुल्ल थोरात,शुभम जाधव, विक्रम सावंत, नागोराव कुलट,राजकुमार सिकजी मंगेश हिंगणकर,ऍड राठी, चोपडे साहेब,ऍड वल्लभ जोत,रमेश तासतोडे,विलास जाधव, नारायण मंडले, संजय गाडगे, यांच्यासह प्रभाग क्र १० परिसरातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी दिलिप बोचे यांनी सर्वांचे आभार मानलेत.
    4
    *प्रभाग क्र १० हिरवेगार करण्याचा संकल्प!*
-----------
नगरसेवक दिलीप बोचे यांच्या पुढाकाराने ट्री-गार्डसह वृक्षारोपण; नागरिकांनी स्वीकारली संगोपनाची जबाबदारी
--------------
*प्रभाग क्र १० हिरवेगार करण्याचा संकल्प!*
-----------
नगरसेवक दिलीप बोचे यांच्या पुढाकाराने ट्री-गार्डसह वृक्षारोपण; नागरिकांनी स्वीकारली संगोपनाची जबाबदारी
--------------
​अकोट तालुका प्रतिनिधी....
श्री संत वासुदेव महाराजांच्या पावन वास्तव्याने पुनीत झालेल्या संत वासुदेव नगर परिसरासह संपुर्ण प्रभाग १० मध्ये पर्यावरण संवर्धनाचा दृढ संकल्प करीत वृक्षारोपण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. 
संपूर्ण परिसर हिरवागार व पर्यावरणपूरक बनवण्याच्या उद्देशाने ट्री-गार्डसह वृक्षांची लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे, रोपलेल्या प्रत्येक वृक्षाचे जतन व संगोपन करण्याची जबाबदारी स्थानिक नगरवासीयांनी स्वतःहून स्वीकारली आहे.
​हा उपक्रम प्रभाग क्रमांक १० चे नगरसेवक दिलीप बोचे व सौ. विजयाताई बोचे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ज्येष्ठ नेते नानासाहेब हिंगणकर, अकोट शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार  किशोर  जुनगरे, वृक्षमित्र प्राचार्य गजानन चोपडे आणि मुकुंदराव गावंडे आदी मान्यवरांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
*​'स्व. विश्वासराव चोपडे स्मृती वृक्ष' उपक्रम'*
प्राचार्य गजाननराव चोपडे यांनी त्यांचे वडील स्वर्गीय विश्वासराव चोपडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ १०० पर्यावरणपूरक झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पांतर्गत त्यांनी स्वतः ट्री-गार्डसह मोठ्या वृक्षांची रोपे उपलब्ध करून दिली. त्यांच्या या सामाजिक व पर्यावरणीय योगदानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
*​मान्यवरांची उपस्थिती*
या प्रेरणादायी सोहळ्याला सुरेश कराळे, नंदकिशोर हिंगणकर, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष राममूर्ती वालसिंगे,नारायणराव अनासाने, पत्रकार विजय शिंदे सहपत्नीक, विनायकराव सपकाळ, प्रदीप ओळंबे, विजय वानखडे, अमोल बोरकर, दीपक पाटील, मनोहर रेचे, विलासराव चोरे, डॉ. लाड,माधव अनासाने,  ऍड विपुल भिसे, भिकू गटकळ, अजय मोरे, प्रफुल्ल थोरात,शुभम जाधव, विक्रम सावंत, नागोराव कुलट,राजकुमार सिकजी मंगेश हिंगणकर,ऍड राठी, चोपडे साहेब,ऍड वल्लभ जोत,रमेश तासतोडे,विलास जाधव, नारायण मंडले, संजय गाडगे, यांच्यासह प्रभाग क्र १० परिसरातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी दिलिप बोचे यांनी सर्वांचे आभार मानलेत.
    user_राजकुमार वानखडे राज
    राजकुमार वानखडे राज
    News Anchor अकोट, अकोला, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • बुलढाण्यात महायुतीत मोठा स्फोट: खोटा गुन्हा दाखल झाल्याचा आरोप करत संजय गायकवाड आक्रमक; म्हणाले, "गरज पडल्यास मंत्रालयासमोर उपोषणाला बसणार!"
    1
    बुलढाण्यात महायुतीत मोठा स्फोट: खोटा गुन्हा दाखल झाल्याचा आरोप करत संजय गायकवाड आक्रमक; म्हणाले, "गरज पडल्यास मंत्रालयासमोर उपोषणाला बसणार!"
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • माना फाट्यावर प्लास्टिकच्या दाण्यांनी भरलेल्या ट्रकला भीषण आग! | एसी केबिनमध्ये शॉर्टसर्किट मूर्तिजापूर तालुक्यातील माना फाटा येथे प्लास्टिकच्या दाण्यांनी भरलेल्या ट्रकला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी, १५ सप्टेंबर रोजी सकाळी घडली. गुजरातमधील दहेज येथून प्लास्टिकचे दाणे घेऊन कलकत्त्याच्या दिशेने जाणाऱ्या NL 01 AJ 4266 क्रमांकाच्या ट्रकच्या एसी केबिनमध्ये शॉर्टसर्किट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले. माना पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या घटनेत ट्रकच्या एसी केबिनचे मोठे नुकसान झाले असून प्लास्टिकच्या दाण्यांचेही नुकसान झाले आहे. सुदैवाने चालकासह कोणालाही दुखापत झाली नाही आणि मोठा अनर्थ टळला. 📍 घटनास्थळ: माना फाटा, मूर्तिजापूर तालुका, अकोला 🚛 ट्रक: NL 01 AJ 4266 🔥 प्राथमिक कारण: एसी केबिनमधील शॉर्टसर्किट इंडिया न्यूज आर सेवन | भारताची आवाज उपसंपादक मोहम्मद रिज़वान सिद्दिकी, मूर्तिजापूर बातमी आवडल्यास Like, Share आणि Subscribe करा.
    1
    माना फाट्यावर प्लास्टिकच्या दाण्यांनी भरलेल्या ट्रकला भीषण आग! | एसी केबिनमध्ये शॉर्टसर्किट
मूर्तिजापूर तालुक्यातील माना फाटा येथे प्लास्टिकच्या दाण्यांनी भरलेल्या ट्रकला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी, १५ सप्टेंबर रोजी सकाळी घडली.
गुजरातमधील दहेज येथून प्लास्टिकचे दाणे घेऊन कलकत्त्याच्या दिशेने जाणाऱ्या NL 01 AJ 4266 क्रमांकाच्या ट्रकच्या एसी केबिनमध्ये शॉर्टसर्किट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले.
माना पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या घटनेत ट्रकच्या एसी केबिनचे मोठे नुकसान झाले असून प्लास्टिकच्या दाण्यांचेही नुकसान झाले आहे.
सुदैवाने चालकासह कोणालाही दुखापत झाली नाही आणि मोठा अनर्थ टळला.
📍 घटनास्थळ: माना फाटा, मूर्तिजापूर तालुका, अकोला
🚛 ट्रक: NL 01 AJ 4266
🔥 प्राथमिक कारण: एसी केबिनमधील शॉर्टसर्किट
इंडिया न्यूज आर सेवन | भारताची आवाज
उपसंपादक मोहम्मद रिज़वान सिद्दिकी, मूर्तिजापूर
बातमी आवडल्यास Like, Share आणि Subscribe करा.
    user_MOHAMMED RIZWAN RAHEMAN
    MOHAMMED RIZWAN RAHEMAN
    Construction Contractor मूर्तिजापूर, अकोला, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • चाँद के पास चमक रहा था एक बेहद तेज़ रोशनी वाला “तारा” लेकिन असली राज़ जानकर आप भी हैरान रह जाएंगे...
    1
    चाँद के पास चमक रहा था एक बेहद तेज़ रोशनी वाला “तारा” लेकिन असली राज़ जानकर आप भी हैरान रह जाएंगे...
    user_सच के साथ ब्रेकिंग न्यूज24
    सच के साथ ब्रेकिंग न्यूज24
    Media company जळगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • कारची काचा फोडून चोरलेले सहा लाख रुपये केले जप्त*....... * कारची काचा फोडून चोरलेले सहा लाख रुपये केले जप्त* -------------------------- -:बदनापूर पोलिसांची कारवाई बदनापूर शहरातील SBI बँकेतून दिनांक 04/09/2026 रोजी फिर्यादी - नामे विष्णु कुंडलीकराव कोल्हे रा. धोपटेश्वर ता. बदनापूर जि. जालना यांनी 10 लाख रुपये काढून आपल्या कारमध्ये घेऊन जात असताना त्यावर चोरट्यांनी पाळत ठेवून फिर्यादीच्या कारचा पाठलाग करून धोपटेश्वर शिवरातील धोपटेश्वर ते देवगाव रोडवर आपली कार उभी करून शेतात जाऊन परत आले असता कारच्या मागील दरवाजाचे काच तुटलेले दिसले असता गाडीतील रक्कम दिसेनाशी झाली. त्यानंतर फिर्यादी विष्णु कुंडलीकराव कोल्हे वय 49 वर्ष रा. धोपटेश्वर ता. बदनापूर जि. जालना हे पोलिस स्टेशन बदनापूर येथे येऊन रिपोर्ट दिल्यावरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एम. टी. सुरवसे, पोलिस निरीक्षक बदनापूर यांनी तत्काळ सूत्र हाती घेऊन २ टीम तयार करून गुन्ह्याच्या तपासामध्ये CCTV फुटेज चेक केले तसेच तांत्रिक तपास केला असता एक मोटार सायकल वर दोन चोरट्यांनी कारचा पाठलाग करून कारची काच फोडून पैसे चोरून नेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सदर आरोपी हे 1) गुंजी चालराजु जबराज 2) गुड्डेटी विनोत प्रभुदास दोन्ही रा. कपरला टिपा. ता. बिटरगुंटा जि. नेल्लोर राज्य आंध्रप्रदेश येथील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे, या आरोपीस अटक करणे कामी तपास पथक यांना आंध्र प्रदेश येथे रवाना करून आरोपी चा शोध घेतला असता मिळून आला नाही, परंतु त्याच्या राहत्या घरातून चोरीस गेलेले 6 लाख रुपये जप्त करण्यास तपास पथक यांना यश प्राप्त झाले आहे. बाकी आरोपी व उर्वरीत रक्कम यांचा शोध घेणे कामी पथक रवाना करण्यात आले आहेत. सदरची कारवाई मा. श्री. तेघबिर सिंह संधु साहेब, पोलीस अधीक्षक जालना, मा. विक्रम साळी साहेब, अपर पोलीस अधीक्षक साहेब जालना, मा. अनंत कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब, जालना यांचे मार्गदर्शनाखाली १) एम. टी. सुरवसे, पोलिस स्टेशन पोलीस ठाणे बदनापूर, २) पोउपनि एस. आर.कुकलारे, ३) पोहेकॉ/671 ए.एस.दासर, ४) पोको/227 भडंगे, ५) पोको/342 पी. के. गोलवाल, ६) पोको/1699 एस. जे. तडवी यांनी केली आहे.
    1
    कारची काचा फोडून चोरलेले सहा लाख रुपये केले जप्त*.......
* कारची काचा फोडून चोरलेले सहा लाख रुपये केले जप्त* 
--------------------------
-:बदनापूर पोलिसांची कारवाई
बदनापूर शहरातील SBI बँकेतून दिनांक 04/09/2026 रोजी फिर्यादी - नामे विष्णु कुंडलीकराव कोल्हे रा. धोपटेश्वर ता. बदनापूर जि. जालना यांनी 10 लाख रुपये काढून आपल्या कारमध्ये घेऊन जात असताना त्यावर चोरट्यांनी पाळत ठेवून फिर्यादीच्या कारचा  पाठलाग करून  धोपटेश्वर शिवरातील धोपटेश्वर ते देवगाव रोडवर आपली कार उभी करून शेतात जाऊन परत आले असता कारच्या मागील दरवाजाचे काच तुटलेले दिसले असता गाडीतील रक्कम दिसेनाशी झाली. त्यानंतर फिर्यादी विष्णु कुंडलीकराव कोल्हे वय 49 वर्ष रा. धोपटेश्वर ता. बदनापूर जि. जालना हे पोलिस स्टेशन बदनापूर येथे येऊन रिपोर्ट दिल्यावरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एम. टी. सुरवसे, पोलिस निरीक्षक बदनापूर यांनी तत्काळ सूत्र हाती घेऊन २ टीम तयार करून गुन्ह्याच्या तपासामध्ये CCTV फुटेज चेक केले तसेच तांत्रिक तपास केला असता एक मोटार सायकल वर दोन चोरट्यांनी कारचा पाठलाग करून कारची काच फोडून पैसे चोरून नेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सदर आरोपी हे 
1) गुंजी चालराजु जबराज 
2) गुड्डेटी विनोत प्रभुदास दोन्ही रा. कपरला टिपा. ता. बिटरगुंटा  जि. नेल्लोर राज्य आंध्रप्रदेश येथील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे, या आरोपीस अटक करणे कामी तपास पथक यांना आंध्र प्रदेश येथे रवाना करून आरोपी चा शोध घेतला असता मिळून आला नाही,  परंतु त्याच्या राहत्या घरातून चोरीस गेलेले 6 लाख रुपये जप्त करण्यास तपास पथक यांना यश प्राप्त झाले आहे. बाकी आरोपी व उर्वरीत रक्कम यांचा शोध घेणे कामी पथक रवाना करण्यात आले आहेत. 
सदरची कारवाई 
मा. श्री. तेघबिर सिंह संधु साहेब, पोलीस अधीक्षक जालना, 
मा. विक्रम साळी साहेब, अपर पोलीस अधीक्षक साहेब जालना, मा. अनंत कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब, जालना यांचे मार्गदर्शनाखाली
१) एम. टी. सुरवसे, पोलिस स्टेशन पोलीस ठाणे बदनापूर, 
२) पोउपनि एस. आर.कुकलारे, ३) पोहेकॉ/671 ए.एस.दासर, 
४) पोको/227 भडंगे, 
५) पोको/342 पी. के. गोलवाल, ६) पोको/1699 एस. जे. तडवी यांनी केली आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • भोकरदन शहरात शहीद स्मारक उभारणीचा मार्ग मोकळा सर्वसाधारण सभेत एकमताने ठराव मंजूर नगरसेवक रणवीर सिंग देशमुख यांनी मांडला ठराव माजी सैनिकांच्या मागणीला मिळाला न्याय भोकरदन इसरारखान पठाण भोकरदन नगर परिषदेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत तालुक्यातील शहीद जवानांच्या स्मृतीला उजाळा देणारा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. माजी सैनिकांच्या मागणीला मान देऊन भोकरदन शहरात ‘शहीद स्मारक’ उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा ठराव सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला. हा महत्त्वपूर्ण ठराव नगरसेवक रणवीर सिंग देशमुख यांनी सभागृहात मांडला. सभेदरम्यान हातात ठरावाची प्रत घेऊन उभे राहत रणवीर सिंग देशमुख यांनी भावनिक आवाहन केले. ते म्हणाले, आपल्या देशाकरता जे जवान शहीद होतात... त्या शहिदांकरता आपल्या तालुक्यात कुठंही स्मारक नाही. नगरपालिकेच्या ठिकाणी पैसा आहे, तर तो आपल्या काळात आपण सर्वांनी हात वर करून हा ठराव मंजूर करावा. रणवीरसिंग देशमुख यांनी मांडलेल्या या ठरावाला उपस्थित सर्व सन्माननीय नगरसेवकांनी तत्काळ पाठिंबा दर्शवला. नगराध्यक्षा सौ. समरीन नाज बेग वसीम मिर्झा आणि उपनगराध्यक्षा सौ. सुरेखाताई जाधव यांनी ठरावाला संमती देत हा निर्णय एकमताने पारित केला. या ठरावाचे अनुमोदक म्हणून कदीर बापू यांचे नाव जाहीर करण्यात आले. ठराव मंजूर झाल्यानंतर बोलताना नगरसेवक रणवीर सिंग देशमुख म्हणाले, आज भोकरदन नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये मी तालुक्यातील सर्व माजी सैनिकांच्या विनंतीला मान देऊन भोकरदन शहरात शहीद स्मारक व्हावे याकरिता या सभेत जागा मागणीचा ठराव मांडला. उपस्थित सर्व सदस्य, नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा यांनी सर्व संमतीने ठराव मंजूर केला. अनुमोदक म्हणून कदीर बापू सह सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि आभार. सभेच्या व्हिडिओमध्ये दिसते की, नगरसेवक रणवीर सिंग देशमुख कागदपत्र हातात घेऊन ठरावाचे वाचन करत आहेत. सभागृहात नगरसेवक पांढऱ्या वेशात बसलेले असून, अधिकारी वर्ग समोर टेबलवर उपस्थित आहे. ठराव मांडल्यानंतर सर्व सदस्यांनी हात वर करून एकमताने संमती दर्शवली हा ठराव मंजूर झाल्याने आता नगर परिषद प्रशासनाकडून शहीद स्मारकासाठी योग्य जागेची निवड, आराखडा व निधी मंजुरीची प्रक्रिया सुरू होणार आहे. भोकरदन तालुक्यातून देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानांच्या स्मृती जतन करण्यासाठी हे स्मारक प्रेरणास्थान ठरेल, असा विश्वास माजी सैनिक संघटना व नागरिकांनी व्यक्त केला आहे. तालुक्यात आतापर्यंत शहीद जवानांसाठी स्वतंत्र स्मारक नसल्याची खंत अनेक वर्षांपासून व्यक्त केली जात होती. नगरसेवक रणवीर सिंग देशमुख यांनी उचललेल्या या पावलामुळे शहीद कुटुंबीयांच्या भावनांचा सन्मान झाला असून, येणाऱ्या पिढीला देशभक्तीची प्रेरणा मिळणार आहे. स्मारकाच्या कामास लवकरच सुरुवात होईल, अशी माहिती नगर परिषद सूत्रांनी दिली.
    1
    भोकरदन शहरात शहीद स्मारक उभारणीचा मार्ग मोकळा सर्वसाधारण सभेत एकमताने ठराव मंजूर

नगरसेवक रणवीर सिंग देशमुख यांनी मांडला ठराव माजी सैनिकांच्या मागणीला मिळाला न्याय
भोकरदन  इसरारखान पठाण
भोकरदन नगर परिषदेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत तालुक्यातील शहीद जवानांच्या स्मृतीला उजाळा देणारा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. माजी सैनिकांच्या मागणीला मान देऊन भोकरदन शहरात ‘शहीद स्मारक’ उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा ठराव सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला.
हा महत्त्वपूर्ण ठराव नगरसेवक रणवीर सिंग देशमुख यांनी सभागृहात मांडला.
सभेदरम्यान हातात ठरावाची प्रत घेऊन उभे राहत रणवीर सिंग देशमुख यांनी भावनिक आवाहन केले. ते म्हणाले, आपल्या देशाकरता जे जवान शहीद होतात... त्या शहिदांकरता आपल्या तालुक्यात कुठंही स्मारक नाही. नगरपालिकेच्या ठिकाणी पैसा आहे, तर तो आपल्या काळात आपण सर्वांनी हात वर करून हा ठराव मंजूर करावा.
रणवीरसिंग देशमुख यांनी मांडलेल्या या ठरावाला उपस्थित सर्व सन्माननीय नगरसेवकांनी तत्काळ पाठिंबा दर्शवला. नगराध्यक्षा सौ. समरीन नाज बेग वसीम मिर्झा आणि उपनगराध्यक्षा सौ. सुरेखाताई जाधव यांनी ठरावाला संमती देत हा निर्णय एकमताने पारित केला.
या ठरावाचे अनुमोदक म्हणून कदीर बापू यांचे नाव जाहीर करण्यात आले.
ठराव मंजूर झाल्यानंतर बोलताना नगरसेवक रणवीर सिंग देशमुख म्हणाले, आज भोकरदन नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये मी तालुक्यातील सर्व माजी सैनिकांच्या विनंतीला मान देऊन भोकरदन शहरात शहीद स्मारक व्हावे याकरिता या सभेत जागा मागणीचा ठराव मांडला. उपस्थित सर्व सदस्य, नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा यांनी सर्व संमतीने ठराव मंजूर केला. अनुमोदक म्हणून कदीर बापू सह सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि आभार.
सभेच्या व्हिडिओमध्ये दिसते की, नगरसेवक रणवीर सिंग देशमुख कागदपत्र हातात घेऊन ठरावाचे वाचन करत आहेत. सभागृहात नगरसेवक पांढऱ्या वेशात बसलेले असून, अधिकारी वर्ग समोर टेबलवर उपस्थित आहे. ठराव मांडल्यानंतर सर्व सदस्यांनी हात वर करून एकमताने संमती दर्शवली
हा ठराव मंजूर झाल्याने आता नगर परिषद प्रशासनाकडून शहीद स्मारकासाठी योग्य जागेची निवड, आराखडा व निधी मंजुरीची प्रक्रिया सुरू होणार आहे. 
भोकरदन तालुक्यातून देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानांच्या स्मृती जतन करण्यासाठी हे स्मारक प्रेरणास्थान ठरेल, असा विश्वास माजी सैनिक संघटना व नागरिकांनी व्यक्त केला आहे.
तालुक्यात आतापर्यंत शहीद जवानांसाठी स्वतंत्र स्मारक नसल्याची खंत अनेक वर्षांपासून व्यक्त केली जात होती. नगरसेवक रणवीर सिंग देशमुख यांनी उचललेल्या या पावलामुळे शहीद कुटुंबीयांच्या भावनांचा सन्मान झाला असून, येणाऱ्या पिढीला देशभक्तीची प्रेरणा मिळणार आहे. स्मारकाच्या कामास लवकरच सुरुवात होईल, अशी माहिती नगर परिषद सूत्रांनी दिली.
    user_इसरारखान पठाण
    इसरारखान पठाण
    Local News Reporter भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • स्मार्ट मिटर लावण्याचा आग्रह करत असाल तर स्मार्ट रोहित्रही द्या व शेतकऱ्यांना दिवसा 8 तास अखंड विज पुरवठा  द्या -दिलीपकुमार सानंदा खामगाव : खामगाव विधानसभा मतदार संघामध्ये गेल्या 40 ते 45 दिवसांपासुन पाऊस नव्हता अश्या वेळेस शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह हा हंगामी पिकांवर अवलंबुन आहे.त्या माध्यमातून पाण्याची सुविधा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या.पावसाळयाचे दिवस असतांना सुध्दा फक्त एक-दोन दिवस तोही कमी प्रमाणात पाऊस पडला. रोहित्र जळाल्यानंतर नियम असा आहे की, 24 तासाच्या आत ते रोहित्र दिले पाहिजे. वेळेवर रोहित्र मिळाले नाही, व वरुण राजाही बरसला नाही अश्या परिस्थितीमध्ये काही ठिकाणी विहिरींना पाणी असुन सुध्दा रोहित्र जळाल्यामुळे त्यांना पाणी देता येत नव्हतं,महावितरणचे अधिकारी-कर्मचारी हेे फोन उचलत नव्हते.फोन उचलले तर उडवा-उडवीचे उत्तरे देत होते.  महावितरणच्या कारभाराबदद्ल शेतकरी बांधवांमध्ये तीव्र संताप होता. म्हणून दि.15 सप्टेंबर 2026 रोजी खामगाव येथील कार्यकारी अभियंता यांच्या दालनात कास्तकार बांधवांना घेवुन त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी  अभियंत्यांना जाब विचारला. ज्या ठिकाणचे रोहित्र जळाले त्या ठिकाणी शक्यतो 24 तासाच्या आत रोहित्र दिले जातील, सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या प्रमाणे स्मार्ट मिटर लावण्याचा त्यांचा आग्रह असतो, त्या विषयी मोठया प्रमाणात तक्रारी आहेत.खामगाव मतदार संघातील रोहित्रांची अत्यंत दयनीय परिस्थिती आहे त्या जळुन  केव्हाही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.स्मार्ट मिटरचा तुमचा आग्रह आहे तेव्हा त्याच प्रमाणे स्मार्ट रोहित्र  खामगाव विधानसभा मतदार संघात बसवावे व दिवसामध्ये 8 तास सलग विज शेतकरी बांधवांना द्यावी.अन्यथा बळीराजासाठी तीव्र आंदोलन करणार असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता सखाराम थानवी यांना दिला. यावेळेस त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंजाबरावदादा देशमुख, खामगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने, शहर उपाध्यक्ष नरहरी टिकार गुरुजी, खामगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मनोज वानखडे, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष बिलाल खाँ पठान, कृ.उ.बा.स.संचालक विलाससिंग इंगळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बबलु राठोड, सर्कल प्रमुख जयराम मुंडाले, एजाज देशमुख, श्याम गायगोळ, गणेश पाटील, रोहित राजपुत,गजानन जाधव,समीर शेख,माजी सरपंच विलास इंगळे आदी उपस्थित होते. पुढे बोलतांना माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा म्हणाले की, रोहित्रावर लावलेले बॉक्समधील कटआऊट, केबल उघडया स्थितीत असुन ते जिर्ण व धोकादायक स्थितीत आहे.त्यामुळे त्या रोहित्रांची तात्काळ दुरुस्ती  करण्यात यावी.  महावितरण अंतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जी कामे सुरु आहे,राजकीय पाठबळ असलेले अनेक कंत्राटदार आहे  ते अरेरावी करुन त्या माध्यमातून निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्यांची व त्याला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची खैर  नाही, आपण चांगल्या प्रकारची कामे करा असा इशारा देखील याप्रसंगी सानंदांनी दिला. आता गणेशोत्सव आहे गणेशोत्सवामध्ये विद्युत खंडीत होता काम नये.शेतकऱ्यांना दिवसा 8 तास लाईन देता यावी यासह अनेक विषयांवर चर्चा झाली.ज्यांना सिंगल फेजवरुन मिटर आहे परंतू त्यांना नियमानुसार विज पुरवठा होत नाही अश्यांना दिवस-रात्र विज पुरवठा देण्यात यावा.शेती पंपासाठी थ्री फेज विजपुरवठा सुरळीत ठेवावी.अनेक कुटुंब शेतात राहतात परंतु रात्रीच्या वेळेस वीज पुरवठा खंडित राहत असल्यामुळे साप,विंचू तसेच अन्य प्राण्यांपासून शेतकरी बांधव व त्यांच्या कुटुंबियांना धोका संभवतो व त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.नैसर्गिक परिस्थितीमुळे अडचणीचा सामना करावा लागत असल्यामुळे आपण चांगल्या प्रकारची कामे करावी,बळीराजा हा देशाचा पोशिंदा आहे,बळीराजावर जर अन्याय झाला तर मी सत्तेमध्ये असलो तरी  आपला कारभार सुधारला नाही व भ्रष्टाचार करणाऱ्या कंत्राटदारांनां पाठीशी घातले तर लोकप्रिय पालकमंत्री  मकरंद आबा पाटील व संबंधीत मंत्री महोदयांकडे याबाबत तक्रार करणार तसेच या ठिकाणी मोठया प्रमाणावर शेतकरी बांधवांना घेवुन आंदोलन करेल व त्याची सर्वस्वी जबाबदारी महावितरण व संबंधीत अधिकारी व कर्मचारी  यांच्यावर राहील असेही यावेळी सानंदांनी सांगितले. यावेळी तानाजी चव्हाण,राजेंद्र जाधव,सुधाकर जाधव,गणेश इंगळे, प्रदिप इंगळे, पुरुषोत्तम भोसले, शेषराव भोसले, शेख साबीर शेख लाल,बाळु वाघमारे, अर्जुन गुजर,अरविंद अंभोरे,मयुर सातव,कुणाल राजपुत,प्रणव बिल्लारे, तुकाराम वाघमारे,सतीष सोळंके,योगेश बिल्लारे,संकेत गवई,संदिप दाभाडे,रामेश्वर अंभोरे, अभिषेक हिवरखेडे, अक्षय बदरखे यासह असंख्य शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.
    4
    स्मार्ट मिटर लावण्याचा आग्रह करत असाल तर स्मार्ट रोहित्रही द्या व शेतकऱ्यांना दिवसा 8 तास अखंड विज पुरवठा  द्या -दिलीपकुमार सानंदा


खामगाव :  खामगाव विधानसभा मतदार संघामध्ये गेल्या 40 ते 45 दिवसांपासुन पाऊस नव्हता अश्या वेळेस शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह हा हंगामी पिकांवर अवलंबुन आहे.त्या माध्यमातून पाण्याची सुविधा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या.पावसाळयाचे दिवस असतांना सुध्दा फक्त एक-दोन दिवस तोही कमी प्रमाणात पाऊस पडला. रोहित्र जळाल्यानंतर नियम असा आहे की, 24 तासाच्या आत ते रोहित्र दिले पाहिजे. वेळेवर रोहित्र मिळाले नाही, व वरुण राजाही बरसला नाही अश्या परिस्थितीमध्ये काही ठिकाणी विहिरींना पाणी असुन सुध्दा रोहित्र जळाल्यामुळे त्यांना पाणी देता येत नव्हतं,महावितरणचे अधिकारी-कर्मचारी हेे फोन उचलत नव्हते.फोन उचलले तर उडवा-उडवीचे उत्तरे देत होते.  महावितरणच्या कारभाराबदद्ल शेतकरी बांधवांमध्ये तीव्र संताप होता. म्हणून दि.15 सप्टेंबर 2026 रोजी खामगाव येथील कार्यकारी अभियंता यांच्या दालनात कास्तकार बांधवांना घेवुन त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी  अभियंत्यांना जाब विचारला.
ज्या ठिकाणचे रोहित्र जळाले त्या ठिकाणी शक्यतो 24 तासाच्या आत रोहित्र दिले जातील, सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या प्रमाणे स्मार्ट मिटर लावण्याचा त्यांचा आग्रह असतो, त्या विषयी मोठया प्रमाणात तक्रारी आहेत.खामगाव मतदार संघातील रोहित्रांची अत्यंत दयनीय परिस्थिती आहे त्या जळुन  केव्हाही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.स्मार्ट मिटरचा तुमचा आग्रह आहे तेव्हा त्याच प्रमाणे स्मार्ट रोहित्र  खामगाव विधानसभा मतदार संघात बसवावे व दिवसामध्ये 8 तास सलग विज शेतकरी बांधवांना द्यावी.अन्यथा बळीराजासाठी तीव्र आंदोलन करणार असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता सखाराम थानवी यांना दिला.
यावेळेस त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंजाबरावदादा देशमुख, खामगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने, शहर उपाध्यक्ष नरहरी टिकार गुरुजी, खामगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मनोज वानखडे, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष बिलाल खाँ पठान, कृ.उ.बा.स.संचालक विलाससिंग इंगळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बबलु राठोड, सर्कल प्रमुख जयराम मुंडाले, एजाज देशमुख, श्याम गायगोळ, गणेश पाटील, रोहित राजपुत,गजानन जाधव,समीर शेख,माजी सरपंच विलास इंगळे आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा म्हणाले की, रोहित्रावर लावलेले बॉक्समधील कटआऊट, केबल उघडया स्थितीत असुन ते जिर्ण व धोकादायक स्थितीत आहे.त्यामुळे त्या रोहित्रांची तात्काळ दुरुस्ती  करण्यात यावी.  महावितरण अंतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जी कामे सुरु आहे,राजकीय पाठबळ असलेले अनेक कंत्राटदार आहे  ते अरेरावी करुन त्या माध्यमातून निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्यांची व त्याला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची खैर  नाही, आपण चांगल्या प्रकारची कामे करा असा इशारा देखील याप्रसंगी सानंदांनी दिला.
आता गणेशोत्सव आहे गणेशोत्सवामध्ये विद्युत खंडीत होता काम नये.शेतकऱ्यांना दिवसा 8 तास लाईन देता यावी यासह अनेक विषयांवर चर्चा झाली.ज्यांना सिंगल फेजवरुन मिटर आहे परंतू त्यांना नियमानुसार विज पुरवठा होत नाही अश्यांना दिवस-रात्र विज पुरवठा देण्यात यावा.शेती पंपासाठी थ्री फेज विजपुरवठा सुरळीत ठेवावी.अनेक कुटुंब शेतात राहतात परंतु रात्रीच्या वेळेस वीज पुरवठा खंडित राहत असल्यामुळे साप,विंचू तसेच अन्य प्राण्यांपासून शेतकरी बांधव व त्यांच्या कुटुंबियांना धोका संभवतो व त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.नैसर्गिक परिस्थितीमुळे अडचणीचा सामना करावा लागत असल्यामुळे आपण चांगल्या प्रकारची कामे करावी,बळीराजा हा देशाचा पोशिंदा आहे,बळीराजावर जर अन्याय झाला तर मी सत्तेमध्ये असलो तरी  आपला कारभार सुधारला नाही व भ्रष्टाचार करणाऱ्या कंत्राटदारांनां पाठीशी घातले तर लोकप्रिय पालकमंत्री  मकरंद आबा पाटील व संबंधीत मंत्री महोदयांकडे याबाबत तक्रार करणार तसेच या ठिकाणी मोठया प्रमाणावर शेतकरी बांधवांना घेवुन आंदोलन करेल व त्याची सर्वस्वी जबाबदारी महावितरण व संबंधीत अधिकारी व कर्मचारी  यांच्यावर राहील असेही यावेळी सानंदांनी सांगितले.
यावेळी तानाजी चव्हाण,राजेंद्र जाधव,सुधाकर जाधव,गणेश इंगळे, प्रदिप इंगळे, पुरुषोत्तम भोसले, शेषराव भोसले, शेख साबीर शेख लाल,बाळु वाघमारे, अर्जुन गुजर,अरविंद अंभोरे,मयुर सातव,कुणाल राजपुत,प्रणव बिल्लारे, तुकाराम वाघमारे,सतीष सोळंके,योगेश बिल्लारे,संकेत गवई,संदिप दाभाडे,रामेश्वर अंभोरे, अभिषेक हिवरखेडे, अक्षय बदरखे यासह असंख्य शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • जळगांव पाचोरा में पत्रकार पर हमले का आरोप | निष्पक्ष जांच की मांग
    1
    जळगांव पाचोरा में पत्रकार पर हमले का आरोप | निष्पक्ष जांच की मांग
    user_सच के साथ ब्रेकिंग न्यूज24
    सच के साथ ब्रेकिंग न्यूज24
    Media company जळगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • मनोज पाटील जरांगे मुंबईकडे रवाना मराठा सेवक सुभाष पाटील वनारसे यांची प्रतिक्रिया मनोज पाटील जरांगे मुंबईकडे रवाना मराठा सेवक सुभाष पाटील वनारसे. यांची प्रतिक्रिया
    1
    मनोज पाटील जरांगे मुंबईकडे रवाना मराठा सेवक सुभाष पाटील वनारसे यांची प्रतिक्रिया
मनोज पाटील जरांगे मुंबईकडे रवाना मराठा सेवक सुभाष पाटील वनारसे. यांची प्रतिक्रिया
    user_बबन धसाळ
    बबन धसाळ
    Farmer भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.