logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

कारची काचा फोडून चोरलेले सहा लाख रुपये केले जप्त*....... * कारची काचा फोडून चोरलेले सहा लाख रुपये केले जप्त* -------------------------- -:बदनापूर पोलिसांची कारवाई बदनापूर शहरातील SBI बँकेतून दिनांक 04/09/2026 रोजी फिर्यादी - नामे विष्णु कुंडलीकराव कोल्हे रा. धोपटेश्वर ता. बदनापूर जि. जालना यांनी 10 लाख रुपये काढून आपल्या कारमध्ये घेऊन जात असताना त्यावर चोरट्यांनी पाळत ठेवून फिर्यादीच्या कारचा पाठलाग करून धोपटेश्वर शिवरातील धोपटेश्वर ते देवगाव रोडवर आपली कार उभी करून शेतात जाऊन परत आले असता कारच्या मागील दरवाजाचे काच तुटलेले दिसले असता गाडीतील रक्कम दिसेनाशी झाली. त्यानंतर फिर्यादी विष्णु कुंडलीकराव कोल्हे वय 49 वर्ष रा. धोपटेश्वर ता. बदनापूर जि. जालना हे पोलिस स्टेशन बदनापूर येथे येऊन रिपोर्ट दिल्यावरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एम. टी. सुरवसे, पोलिस निरीक्षक बदनापूर यांनी तत्काळ सूत्र हाती घेऊन २ टीम तयार करून गुन्ह्याच्या तपासामध्ये CCTV फुटेज चेक केले तसेच तांत्रिक तपास केला असता एक मोटार सायकल वर दोन चोरट्यांनी कारचा पाठलाग करून कारची काच फोडून पैसे चोरून नेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सदर आरोपी हे 1) गुंजी चालराजु जबराज 2) गुड्डेटी विनोत प्रभुदास दोन्ही रा. कपरला टिपा. ता. बिटरगुंटा जि. नेल्लोर राज्य आंध्रप्रदेश येथील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे, या आरोपीस अटक करणे कामी तपास पथक यांना आंध्र प्रदेश येथे रवाना करून आरोपी चा शोध घेतला असता मिळून आला नाही, परंतु त्याच्या राहत्या घरातून चोरीस गेलेले 6 लाख रुपये जप्त करण्यास तपास पथक यांना यश प्राप्त झाले आहे. बाकी आरोपी व उर्वरीत रक्कम यांचा शोध घेणे कामी पथक रवाना करण्यात आले आहेत. सदरची कारवाई मा. श्री. तेघबिर सिंह संधु साहेब, पोलीस अधीक्षक जालना, मा. विक्रम साळी साहेब, अपर पोलीस अधीक्षक साहेब जालना, मा. अनंत कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब, जालना यांचे मार्गदर्शनाखाली १) एम. टी. सुरवसे, पोलिस स्टेशन पोलीस ठाणे बदनापूर, २) पोउपनि एस. आर.कुकलारे, ३) पोहेकॉ/671 ए.एस.दासर, ४) पोको/227 भडंगे, ५) पोको/342 पी. के. गोलवाल, ६) पोको/1699 एस. जे. तडवी यांनी केली आहे.

9 hrs ago
user_RahimKhan Pathan
RahimKhan Pathan
Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • जळगांव पाचोरा में पत्रकार पर हमले का आरोप | निष्पक्ष जांच की मांग
    1
    जळगांव पाचोरा में पत्रकार पर हमले का आरोप | निष्पक्ष जांच की मांग
    user_सच के साथ ब्रेकिंग न्यूज24
    सच के साथ ब्रेकिंग न्यूज24
    Media company जळगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • धरणगांव येथील चारा बाजार परिसरातील पाण्याची पाईपलाईन फुटल्याने पिण्याचे पाणी रस्त्यावर वाया जात आहे. नगरपालिकेने याच्यावर दखल घेऊन संबंधित पाईपलाईन दुरुस्ती करावी अशी चारा बाजार येथील परिसरातील नागरिकांची मागणी होत आहे
    1
    धरणगांव येथील चारा बाजार परिसरातील पाण्याची पाईपलाईन फुटल्याने पिण्याचे पाणी रस्त्यावर वाया जात आहे.
नगरपालिकेने याच्यावर दखल घेऊन संबंधित पाईपलाईन दुरुस्ती करावी अशी चारा बाजार येथील परिसरातील नागरिकांची मागणी होत आहे
    user_Kiran Mali
    Kiran Mali
    Local News Reporter धरणगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • बुलढाण्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकरी आक्रमक; लोणारमध्ये वाजवले 'डफडे', ३० सप्टेंबरपर्यंत निर्णय न झाल्यास सिंदखेडराजा येथे बैलजोड्यांसह चक्काजामचा इशारा!
    1
    बुलढाण्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकरी आक्रमक; लोणारमध्ये वाजवले 'डफडे', ३० सप्टेंबरपर्यंत निर्णय न झाल्यास सिंदखेडराजा येथे बैलजोड्यांसह चक्काजामचा इशारा!
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • ​प्रशासकीय दिरंगाईचा फटका! नवीन शाळेचा रस्ता मोकळा करण्यासाठी बोळेगाववासीयांचा एल्गार!
    1
    ​प्रशासकीय दिरंगाईचा फटका! नवीन शाळेचा रस्ता मोकळा करण्यासाठी बोळेगाववासीयांचा एल्गार!
    user_लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • एस टी बस चा NCMC कार्ड कसा रिचार्ज करायचा बघा, सोप्या भाषेत,
    1
    एस टी बस चा NCMC कार्ड कसा रिचार्ज करायचा बघा, सोप्या भाषेत,
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • गणपती खरेदीसाठी आलेल्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश जवाहरनगर पोलिसांची कारवाई; तीन महिला आरोपींना अटक, ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त गणपती खरेदीसाठी आलेल्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश जवाहरनगर पोलिसांची कारवाई; तीन महिला आरोपींना अटक, ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त छत्रपती संभाजीनगर : गणपती बाप्पाच्या मूर्ती व पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी गजानन महाराज मंदिर परिसरात आलेल्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या तीन महिला आरोपींना जवाहरनगर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून चोरी केलेली दोन सोन्याची मंगळसूत्रे, असा एकूण ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ सप्टेंबर रोजी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास शिवनेरी कॉलनी, विजयनगर परिसरातील मंगल पोपटवाड चव्हाण या महिला गणपतीची मूर्ती व पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी गजानन महाराज मंदिर परिसरात आल्या होत्या. यावेळी गर्दीचा फायदा घेत दोन अनोळखी महिलांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरी केले. याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदारांच्या मदतीने संशयित महिलांची माहिती मिळवली. त्यानुसार पूजा राहुल पवार (वय २१), सुनीता दिलीप काळे (वय ३५) आणि मुस्कान राघव पवार (वय ३५), सर्व रा. ह.मु. सलाबतपूर, ता. नेवासा, जि. अहमदनगर, यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी चौकशी केली असता आरोपी महिलांनी गजानन महाराज मंदिर परिसरातून मंगळसूत्र चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून दोन सोन्याची मंगळसूत्रे जप्त करण्यात आली आहेत. आरोपींविरुद्ध जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४०८/२०२६, कलम ३०३ (२), ३ (५) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त परिसमंडळ-२ रत्नाकर नवले, सहायक पोलीस आयुक्त उमामहेश्वर नाथ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार मारोती गोरे, कपिल खिल्लारे, राजेंद्र शिंदे, महिला पोलीस अंमलदार प्रियांका शिरसाठ, पूनम साळवे व पूजा लेनके यांनी केली. गणेशोत्सवाच्या काळात गर्दीचा फायदा घेत महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
    4
    गणपती खरेदीसाठी आलेल्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

जवाहरनगर पोलिसांची कारवाई; तीन महिला आरोपींना अटक, ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त
गणपती खरेदीसाठी आलेल्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
जवाहरनगर पोलिसांची कारवाई; तीन महिला आरोपींना अटक, ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त
छत्रपती संभाजीनगर : गणपती बाप्पाच्या मूर्ती व पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी गजानन महाराज मंदिर परिसरात आलेल्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या तीन महिला आरोपींना जवाहरनगर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून चोरी केलेली दोन सोन्याची मंगळसूत्रे, असा एकूण ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ सप्टेंबर रोजी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास शिवनेरी कॉलनी, विजयनगर परिसरातील मंगल पोपटवाड चव्हाण या महिला गणपतीची मूर्ती व पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी गजानन महाराज मंदिर परिसरात आल्या होत्या. यावेळी गर्दीचा फायदा घेत दोन अनोळखी महिलांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरी केले. याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदारांच्या मदतीने संशयित महिलांची माहिती मिळवली. त्यानुसार पूजा राहुल पवार (वय २१), सुनीता दिलीप काळे (वय ३५) आणि मुस्कान राघव पवार (वय ३५), सर्व रा. ह.मु. सलाबतपूर, ता. नेवासा, जि. अहमदनगर, यांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी चौकशी केली असता आरोपी महिलांनी गजानन महाराज मंदिर परिसरातून मंगळसूत्र चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून दोन सोन्याची मंगळसूत्रे जप्त करण्यात आली आहेत. आरोपींविरुद्ध जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४०८/२०२६, कलम ३०३ (२), ३ (५) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त परिसमंडळ-२ रत्नाकर नवले, सहायक पोलीस आयुक्त उमामहेश्वर नाथ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार मारोती गोरे, कपिल खिल्लारे, राजेंद्र शिंदे, महिला पोलीस अंमलदार प्रियांका शिरसाठ, पूनम साळवे व पूजा लेनके यांनी केली.
गणेशोत्सवाच्या काळात गर्दीचा फायदा घेत महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
    user_रविंद्र सुरडकर गुरव
    रविंद्र सुरडकर गुरव
    Aurangabad, Pune•
    7 hrs ago
  • बुलढाण्यात महायुतीत मोठा स्फोट: खोटा गुन्हा दाखल झाल्याचा आरोप करत संजय गायकवाड आक्रमक; म्हणाले, "गरज पडल्यास मंत्रालयासमोर उपोषणाला बसणार!"
    1
    बुलढाण्यात महायुतीत मोठा स्फोट: खोटा गुन्हा दाखल झाल्याचा आरोप करत संजय गायकवाड आक्रमक; म्हणाले, "गरज पडल्यास मंत्रालयासमोर उपोषणाला बसणार!"
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • ​जायकवाडी व मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर विविध प्रमुख मागण्यांसाठी नागरिक आणि आंदोलक एकवटले
    1
    ​जायकवाडी व मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर विविध प्रमुख मागण्यांसाठी नागरिक आणि आंदोलक एकवटले
    user_लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • जरांगे पाटील मुंबईला रवाना होत असताना परिवारासोबतचा भाऊक करणारा क्षण,
    1
    जरांगे पाटील मुंबईला रवाना होत असताना परिवारासोबतचा भाऊक करणारा क्षण,
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.