जिद्दीच्या वारशातून लातूर जिल्ह्याचा विकास साधूया-पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले* • महाराष्ट्र राज्य स्थापना दिनी लातूर येथे राष्ट्रध्वज वंदन समारंभ उत्साहात लातूर, दि. ०१ : भूकंपाच्या संकटाने हादरलेल्या लातूर जिल्ह्याने अत्यंत जिद्दीने स्वतःला पुन्हा उभे केले आणि आपली क्षमता सिद्ध केली. तोच जिद्दीचा वारसा पुढे नेत, आपण राज्याच्या विकास प्रक्रियेत लातूरचे नाव अग्रभागी नेऊया आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधूया, असे आवाहन पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज येथे केले. महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त बाभळगाव रोडवरील पोलीस मुख्यालय प्रांगणात मुख्य शासकीय राष्ट्रध्वज वंदन समारंभात पालकमंत्री श्री. भोसले बोलत होते. या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा उषाताई पाटील, प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त मानसी मीना यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी यावेळी सर्व जिल्हावासीयांना महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करून आणि महापुरुषांच्या विचारांचे स्मरण करून पालकमंत्री श्री. भोसले म्हणाले, महाराष्ट्राने गेल्या ६६ वर्षांत तंत्रज्ञान, उद्योग आणि शेती क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. देशाला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नात महाराष्ट्र आघाडीवर राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्ह्याचा विकास वेगाने होत असल्याचे त्यांनी सांगितले. शेती विकास आणि जलसंधारणासाठी जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान २.०, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. मनरेगा आणि भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून गतवर्षी ७३० हेक्टरवर फळबाग लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात मागील वर्षी पूर, अतिवृष्टीने शेतपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ९२८ कोटी २८ लाख रुपयांची मदत वितरीत करण्यात आली आहे, असे पालकमंत्री श्री. भोसले यावेळी म्हणाले. प्रलंबित जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागला असून या रुग्णालयाचे नुकतेच भूमिपूजन झाले आहे. लवकरच याठिकाणी ५०० खाटांचे सुसज्ज जिल्हा रुग्णालय उभे राहील. त्यामुळे आरोग्य सेवा अधिक बळकट होणार आहे. तसेच मुख्यमंत्री सहायता निधी आणि आयुष्मान भारत- महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून गरजू रुग्णांवर कोट्यवधी रुपयांचे मोफत उपचार करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळविण्याची प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाईन व अधिक गतिमान झाल्याने रुग्णांना मदत होणार असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी नमूद केले. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जिल्ह्यात आतापर्यंत ७ हजार किलोमीटर रस्त्यांची कामे झाली आहेत. लातूर शहरासाठी ६० किलोमीटरचा रिंग रोड मंजूर असून, त्यासाठी ४८ किलोमीटर भूसंपादन पूर्ण झाले आहे. या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळावा, यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. आशियाई विकास बँकेच्या मदतीने जिल्ह्यात ८६ किलोमीटर रस्त्यांची कामे सुरू आहेत. अर्थसंकल्पात १४७ कोटी रुपयांची नवीन कामे मंजूर झाली आहेत, असे पालकमंत्री श्री. भोसले म्हणाले. येणारा काळ हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा आहे. भूकंपानंतर लातूरला पुन्हा उभे करणाऱ्या या मातीतील मुलांनी नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा. लातूरचा विद्यार्थी नोकरी मागणारा नव्हे, तर नोकरी देणारा बनला पाहिजे, हेच आपले स्वप्न असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. *पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन* सध्या उन्हाळा अधिक तीव्र आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि कामगार बांधवांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. जिल्ह्यातील पाणी टंचाईसाठी २० कोटी ९६ लाख रुपयांचा आराखडा मंजूर केला आहे. सध्या २ टँकर सुरु असून २५ विहीरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यंदा एल- निनोमुळे कमी पाऊस अपेक्षित आहे, त्यामुळे खरीप हंगामासाठी विशेष तयारी केली जात आहे. पाणी टंचाईचे संभाव्य संकट लक्षात घेवून नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. पालकमंत्री श्री. भोसले यांनी यावेळी पोलीस परेडचे निरीक्षण केले. उपविभागीय अधिकारी अरविंद रायबोले यांनी पोलीस परेडचे नेतृत्व केले. पोलीस पथकांसह गृहरक्षक दल, राष्ट्रीय छात्र सेना, पोलीस बॅण्ड पथक, श्वान पथक, वज्र वाहन, बॉम्ब शोधक पथक, जलद प्रतिसाद पथक, रुग्णवाहिका यांच्यासह विविध शासकीय विभागांचे चित्ररथ या पथसंचलनात सहभागी झाले होते. यावेळी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, शहीद जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता आणि वीरपिता यांची पालकमंत्री श्री. भोसले यांनी भेट घेऊन त्यांचा सत्कार केला आणि महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच जिल्हा युवा पुरस्कार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, टॅलेंट सर्च परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना यावेळी प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव फड यांनी केले.
जिद्दीच्या वारशातून लातूर जिल्ह्याचा विकास साधूया-पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले* • महाराष्ट्र राज्य स्थापना दिनी लातूर येथे राष्ट्रध्वज वंदन समारंभ उत्साहात लातूर, दि. ०१ : भूकंपाच्या संकटाने हादरलेल्या लातूर जिल्ह्याने अत्यंत जिद्दीने स्वतःला पुन्हा उभे केले आणि आपली क्षमता सिद्ध केली. तोच जिद्दीचा वारसा पुढे नेत, आपण राज्याच्या विकास प्रक्रियेत लातूरचे नाव अग्रभागी नेऊया आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधूया, असे आवाहन पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज येथे केले. महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त बाभळगाव रोडवरील पोलीस मुख्यालय प्रांगणात मुख्य शासकीय राष्ट्रध्वज वंदन समारंभात पालकमंत्री श्री. भोसले बोलत होते. या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा उषाताई पाटील, प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त मानसी मीना यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी यावेळी सर्व जिल्हावासीयांना महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करून आणि महापुरुषांच्या विचारांचे स्मरण करून पालकमंत्री श्री. भोसले म्हणाले, महाराष्ट्राने
गेल्या ६६ वर्षांत तंत्रज्ञान, उद्योग आणि शेती क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. देशाला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नात महाराष्ट्र आघाडीवर राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्ह्याचा विकास वेगाने होत असल्याचे त्यांनी सांगितले. शेती विकास आणि जलसंधारणासाठी जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान २.०, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. मनरेगा आणि भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून गतवर्षी ७३० हेक्टरवर फळबाग लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात मागील वर्षी पूर, अतिवृष्टीने शेतपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ९२८ कोटी २८ लाख रुपयांची मदत वितरीत करण्यात आली आहे, असे पालकमंत्री श्री. भोसले यावेळी म्हणाले. प्रलंबित जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागला असून या रुग्णालयाचे नुकतेच भूमिपूजन झाले आहे. लवकरच याठिकाणी ५०० खाटांचे सुसज्ज जिल्हा रुग्णालय उभे राहील. त्यामुळे आरोग्य सेवा अधिक बळकट होणार आहे. तसेच मुख्यमंत्री सहायता निधी आणि आयुष्मान भारत- महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून गरजू रुग्णांवर कोट्यवधी रुपयांचे मोफत उपचार
करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळविण्याची प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाईन व अधिक गतिमान झाल्याने रुग्णांना मदत होणार असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी नमूद केले. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जिल्ह्यात आतापर्यंत ७ हजार किलोमीटर रस्त्यांची कामे झाली आहेत. लातूर शहरासाठी ६० किलोमीटरचा रिंग रोड मंजूर असून, त्यासाठी ४८ किलोमीटर भूसंपादन पूर्ण झाले आहे. या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळावा, यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. आशियाई विकास बँकेच्या मदतीने जिल्ह्यात ८६ किलोमीटर रस्त्यांची कामे सुरू आहेत. अर्थसंकल्पात १४७ कोटी रुपयांची नवीन कामे मंजूर झाली आहेत, असे पालकमंत्री श्री. भोसले म्हणाले. येणारा काळ हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा आहे. भूकंपानंतर लातूरला पुन्हा उभे करणाऱ्या या मातीतील मुलांनी नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा. लातूरचा विद्यार्थी नोकरी मागणारा नव्हे, तर नोकरी देणारा बनला पाहिजे, हेच आपले स्वप्न असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. *पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन* सध्या उन्हाळा अधिक तीव्र आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि कामगार बांधवांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. जिल्ह्यातील पाणी टंचाईसाठी २० कोटी ९६ लाख रुपयांचा आराखडा मंजूर केला आहे.
सध्या २ टँकर सुरु असून २५ विहीरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यंदा एल- निनोमुळे कमी पाऊस अपेक्षित आहे, त्यामुळे खरीप हंगामासाठी विशेष तयारी केली जात आहे. पाणी टंचाईचे संभाव्य संकट लक्षात घेवून नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. पालकमंत्री श्री. भोसले यांनी यावेळी पोलीस परेडचे निरीक्षण केले. उपविभागीय अधिकारी अरविंद रायबोले यांनी पोलीस परेडचे नेतृत्व केले. पोलीस पथकांसह गृहरक्षक दल, राष्ट्रीय छात्र सेना, पोलीस बॅण्ड पथक, श्वान पथक, वज्र वाहन, बॉम्ब शोधक पथक, जलद प्रतिसाद पथक, रुग्णवाहिका यांच्यासह विविध शासकीय विभागांचे चित्ररथ या पथसंचलनात सहभागी झाले होते. यावेळी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, शहीद जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता आणि वीरपिता यांची पालकमंत्री श्री. भोसले यांनी भेट घेऊन त्यांचा सत्कार केला आणि महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच जिल्हा युवा पुरस्कार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, टॅलेंट सर्च परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना यावेळी प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव फड यांनी केले.
- डॉ. अनिलकुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंडच्या वतीने ट्रस्टचे अध्यक्ष अश्वजितभैय्या गायकवाड यांच्या पुढाकाराने आज 30 एप्रिल रोजी इंजिनिअर विश्वजित अनिलकुमार गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हेर तालुका उदगीर येथे स्तुत्य उपक्रम राबविला. गावातील निराधार अंध राम सूर्यवंशी यांच्याकडे उदरनिर्वाहाचे कुठलेही साधन नाही. रस्त्याच्या कडेला प्रांतविधिला जाताना कित्येकदा गाडयांना धडकून तो जखमी झाला. जेवण वेळेवर मिळत नसल्याने उपासमार त्याच्यावर आली होती. आज सेवाकुंडचे अध्यक्ष अश्वजित भैय्या यांनी रामला सुलभ शोचालय बांधून दिले आणि त्याच्या दोन वेळच्या जेवणाची कायमस्वरूपी व्यवस्था केली. आज खऱ्या अर्थाने विश्वजित भैय्याचा वाढदिवस लहान भावाने समाजाला खूप मोलाचा संदेश देऊन साजरा केला. अश्वजित भैय्या आपल्या हातून असेच कार्य घडो आणि सेवाकुंड यशोशिखराला जाओ! हीच ईश्वरचरणी प्रार्थना!1
- लातूरच्या चित्रपटगृहात राजा शिवाजी प्रदर्शित. रितेश देशमुख दिग्दर्शनात राजा शिवाजी चित्रपटाला प्रेक्षकांची मोठी गर्दी. सुरू ॲप इन मराठी न्यूज. शुक्रवार दिनांक एक मे 2026. लातूर शहरात आज महाराष्ट्र दिनी 1 मे 2026 रोजी राजा शिवाजी चित्रपट रितेश देशमुख दिग्दर्शित प्रदर्शित झाला रितेश देशमुख यांच्या जन्म ठिकाणी त्यांनी पहिला शो प्रेक्षकांच्या साक्षीने पाहिला प्रेक्षकांच्या गर्दीने रितेश देशमुख यांचे मने जिंकली. आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने रितेश देशमुख यांनी महाराष्ट्राला अनमोल भेट दिली. राजा शिवाजी या चित्रपटात शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी महाराज यांचा दडलेला इतिहास पुढे आणला यामुळे शिवप्रेमींच्या वतीने आभार मानण्यात आले. यावेळी रितेश देशमुख यांनी बोलताना प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहायला खूप प्रतिसाद दिला त्याबद्दल प्रेक्षकांचे आभार मानले.1
- Post by बाळकृष्ण प्रकाश कदम1
- Post by MAHARAJ TRAVELS NILANGA1
- Post by नागनाथ ससाने1
- Post by रुद्रशिव1
- Post by Jafar tarodekar1
- महाराणा प्रताप नगरचा स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत कायापालट सुरू -आमदार अमित देशमुख, तौफिक सय्यद यांची शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी नियुक्ती. ₹१.६० कोटींच्या 16 विविध विकासकामांचा शुभारंभ. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. शुक्रवार दिनांक 01 एप्रिल 2026. लातूर शहरालगतच्या नव्या वस्त्या व गावांना शहरासारख्याच दर्जेदार सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने महाराणा प्रताप नगर ग्रामपंचायत अंतर्गत येथे ₹१ कोटी ६० लाखांच्या विकासकामांना गती मिळाली आहे. आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले, तर खासदार डॉ. शिवाजी काळगे यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार निधीतून एकत्रितपणे विविध मूलभूत सुविधा उभारण्याचा निर्णय घेतला असून, एकाच गावात अनेक कामे केल्यास त्यांचा दर्जा सुधारतो आणि नागरिकांना दीर्घकालीन लाभ मिळतो, असे देशमुख यांनी सांगितले. हद्दवाढीतील तांत्रिक अडचणींमुळे ‘झालर क्षेत्रा’तील नागरिकांना सुविधा मिळण्यात अडथळे येतात, ही समस्या लक्षात घेऊन पाणीपुरवठा, रस्ते, सिटीबस सेवा आणि इतर सोयी प्राधान्याने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या भागासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, भविष्यात महानगरपालिकेच्या हद्दीत समावेश करून या परिसराचा चेहरा-मोहरा बदलण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. स्थानिक कार्यकर्त्यांच्या सूचनेनुसार १६ विविध कामांना मंजुरी देण्यात आली असून काही कामे खासदार निधीतूनही राबवली जाणार आहेत. कार्यक्रमाला विविध पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी तौफिक सय्यद यांची शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.1