स्वामी समर्थ मंदिर कॉरिडॉरला गती; ₹५०० कोटींचा विकास आराखडा तातडीने सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिर कॉरिडॉर प्रकल्पाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी सुमारे ₹५०० कोटींचा विकास आराखडा (डीपीआर) तयार करून तो तातडीने शासनाकडे सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. श्री स्वामी समर्थ मंदिर कॉरिडॉर प्रकल्पासाठी म्हाडा या संस्थेची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, प्रकल्पाचे नियोजन, आवश्यक पायाभूत सुविधा आणि विविध विकासकामांचा सविस्तर आढावा बैठकीत घेण्यात आला. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे मंदिर परिसराचे सुशोभीकरण, भाविकांसाठी आधुनिक व सुसज्ज सुविधा, वाहतूक व पार्किंग व्यवस्था, पायी चालणाऱ्या भाविकांसाठी सुरक्षित मार्ग, स्वच्छता, निवास आणि इतर मूलभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होणार आहे. त्यामुळे देश-विदेशातून अक्कलकोटमध्ये येणाऱ्या लाखो भाविकांना अधिक सुरक्षित, सुलभ आणि समाधानकारक दर्शनाचा अनुभव मिळणार आहे. अक्कलकोटला जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल समस्त अक्कलकोटकरांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती भेट देऊन आभार व्यक्त करण्यात आले. बैठकीस राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर, आमदार श्वेता महाले, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अतिरिक्त मुख्य सचिव असिमकुमार गुप्ता, म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जैस्वाल, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन लाल सलाम1
- मुख्यमंत्री *मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित (दादा) पवार* यांच्या जयंतीनिमित्त महसूल व वनविभाग (तहसील कार्यालय, सांगोला) यांच्या वतीने आयोजित *“छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर”* 📍 पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन (टाऊन हॉल), सांगोला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री *मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित (दादा) पवार* यांच्या जयंतीनिमित्त महसूल व वनविभाग (तहसील कार्यालय, सांगोला) यांच्या वतीने आयोजित *“छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर”* अभियानास सभापती शिक्षण व आरोग्य जिल्हा परिषद सोलापूर व मा.जिल्हाध्यक्ष सोलापूर ग्रामीण *मा.श्री चेतनसिंह केदार सावंत* उपस्थित होते. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लोककल्याणकारी विचारांनी प्रेरित या शिबिराच्या माध्यमातून सांगोला तालुक्यातील नागरिकांच्या महसूल व शासकीय कामांशी संबंधित विविध समस्या, अडचणी आणि प्रलंबित प्रकरणे एकाच छताखाली जलदगतीने मार्गी लावण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. तसेच अनेक पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय दाखले व शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा प्रत्यक्ष लाभ प्रदान करण्यात आला. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान प्रशासन उपलब्ध करून देण्यासाठी तसेच *“शासन आपल्या दारी”* ही संकल्पना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी आमदर श्री बाबासाहेब देशमुख, नगरसेविका सुजाताताई केदार-सावंत, नगरसेविका तनुजाताई एरंडे, नगरसेविका शोभाताई फुले, नगरसेविका वैशालीताई झपके, नगरसेविका आशाताई यावलकर, नगरसेविका सिमाताई सरगर,सोमनाथ मोटे, प्रांतधिकारी माळी साहेब, तहसीलदार बाळूताई भागवत, गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी साहेब, कृषी अधिकारी जाधव मॅडम, मुख्याधिकारी सुधीर गवळी साहेब इ आदी मान्यवर उपस्थित होते. KHABARDAR NEWS ✨ आवाज जनतेचा ✨ ━━━━━━━━━━━━━━━ 🟥 बातमी │ जाहिरात │ मुलाखतीसाठी 🟨 संपर्क: दत्तात्रय पवार 📞 मो:80079136681
- मनसेकडून परंडा पोलीस स्टेशनच्या दोन नवपदोन्नत हवालदारांचा जाहीर सत्कार! परंडा पोलीस स्टेशनमधील कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी रमेश नारायण शिरसागर आणि शिवानंद भीमाशंकर स्वामी यांची पोलीस नाईक पदावरून पोलीस हवालदार पदावर पदोन्नती झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.1
- मानवी शरीर तस्करी संदर्भामध्ये जनजागृती करण्यासाठी पोलिसांनी विद्यार्थी सुसंवाद संकल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक कामुल तांबे यांनी प्रत्यक्ष राबवायला सुरुवात केली आहे त्या संदर्भात त्यांचे म्हणणे...1
- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन; बहुजन समाजाची उत्स्फूर्त उपस्थिती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन; बहुजन समाजाची उत्स्फूर्त उपस्थिती बीड | प्रतिनिधी : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज (दि. १ ऑगस्ट २०२६) सकाळी १० वाजता बीड शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला विविध समाजघटकांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बीडचे जिल्हाधिकारी मा. विवेकजी जॉन्शन यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला अभिवादन केले. तसेच बीडचे आमदार मा. संदीप भैया क्षीरसागर, युवा नेते कल्याणजी डोंगरे, जिल्हाध्यक्ष वीर, अखिल भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष ससाणे, अनिल डोळस, एम. एस. धनवे यांच्यासह अनेक मान्यवरांनी अण्णाभाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. कार्यक्रमास नगरसेवक भारत अण्णा कांबळे, संपादक नितीन मुजमुले, बळीराम चांदणे, विनोद हातागळे, अजिंक्य चांदणे, राजू माहुवाले यांच्यासह बौद्ध समाज, मातंग समाज आणि इतर बहुजन समाजातील अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक विचार आणि परिवर्तनवादी कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला. संपूर्ण परिसर घोषणांनी आणि अण्णाभाऊंच्या विचारांच्या जयघोषाने दुमदुमून गेला. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.3
- भारतीय शेतकरी कामगार पक्ष 79व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा2
- छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; १,४८२ नागरिकांना विविध योजनांचा लाभ जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानांतर्गत अक्कलकोट तालुक्यात ३१ जुलै २०२६ रोजी आयोजित शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या शिबिरामधून विविध महसूल व शासकीय योजनांचा लाभ एकूण १,४८२ लाभार्थ्यांना देण्यात आल्याची माहिती तहसीलदार विनायक मगर यांनी दिली आहेत. याशिबिरात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, जिवंत सातबारा मोहीम, घरकुल योजना, तुकडेबंदी कायद्याअंतर्गत कार्यवाही, शेतजमिनींच्या नोंदणी शुल्क माफीसह विविध राज्य व केंद्र शासनाच्या योजनांबाबत नागरिकांना मार्गदर्शन व लाभ देण्यात आला. उपलब्ध माहितीनुसार, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत ७०, जिवंत सातबारा मोहिमेत ६०, घरकुल योजनेत ५०, नोंदणी शुल्क माफीचा लाभ २०, तर राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ ६००, केंद्र शासनाच्या योजनांचा ५०, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या योजनांचा ६५ आणि इतर विविध लाभ ५४१ नागरिकांना देण्यात आले. महसूल विभागाच्या या विशेष अभियानामुळे नागरिकांची प्रलंबित कामे मार्गी लागण्यास मदत झाली असून, शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.2