छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; १,४८२ नागरिकांना विविध योजनांचा लाभ जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानांतर्गत अक्कलकोट तालुक्यात ३१ जुलै २०२६ रोजी आयोजित शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या शिबिरामधून विविध महसूल व शासकीय योजनांचा लाभ एकूण १,४८२ लाभार्थ्यांना देण्यात आल्याची माहिती तहसीलदार विनायक मगर यांनी दिली आहेत. याशिबिरात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, जिवंत सातबारा मोहीम, घरकुल योजना, तुकडेबंदी कायद्याअंतर्गत कार्यवाही, शेतजमिनींच्या नोंदणी शुल्क माफीसह विविध राज्य व केंद्र शासनाच्या योजनांबाबत नागरिकांना मार्गदर्शन व लाभ देण्यात आला. उपलब्ध माहितीनुसार, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत ७०, जिवंत सातबारा मोहिमेत ६०, घरकुल योजनेत ५०, नोंदणी शुल्क माफीचा लाभ २०, तर राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ ६००, केंद्र शासनाच्या योजनांचा ५०, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या योजनांचा ६५ आणि इतर विविध लाभ ५४१ नागरिकांना देण्यात आले. महसूल विभागाच्या या विशेष अभियानामुळे नागरिकांची प्रलंबित कामे मार्गी लागण्यास मदत झाली असून, शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; १,४८२ नागरिकांना विविध योजनांचा लाभ जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानांतर्गत अक्कलकोट तालुक्यात ३१ जुलै २०२६ रोजी आयोजित शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या शिबिरामधून विविध महसूल व शासकीय योजनांचा लाभ एकूण १,४८२ लाभार्थ्यांना देण्यात आल्याची माहिती तहसीलदार विनायक मगर यांनी दिली आहेत. याशिबिरात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, जिवंत सातबारा मोहीम, घरकुल योजना, तुकडेबंदी कायद्याअंतर्गत कार्यवाही, शेतजमिनींच्या नोंदणी शुल्क माफीसह विविध राज्य व केंद्र शासनाच्या
योजनांबाबत नागरिकांना मार्गदर्शन व लाभ देण्यात आला. उपलब्ध माहितीनुसार, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत ७०, जिवंत सातबारा मोहिमेत ६०, घरकुल योजनेत ५०, नोंदणी शुल्क माफीचा लाभ २०, तर राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ ६००, केंद्र शासनाच्या योजनांचा ५०, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या योजनांचा ६५ आणि इतर विविध लाभ ५४१ नागरिकांना देण्यात आले. महसूल विभागाच्या या विशेष अभियानामुळे नागरिकांची प्रलंबित कामे मार्गी लागण्यास मदत झाली असून, शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
- भारतीय शेतकरी कामगार पक्ष 79व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा2
- सिना-कोळेगाव धरणात अजूनही समाधानकारक पाणीसाठा नाही; जिवंत साठा उणेच! सिना-कोळेगाव धरणात अजूनही समाधानकारक पाणीसाठा नाही; जिवंत साठा उणेच!1
- बीड शहरातील मोकाट जनावरांचा हैदोस; अपघातात धम्मानंद वाघमारे गंभीर जखमी नियोजनशून्य नगरपालिकेच्या कारभाराचे आणखी एक उदाहरण दलित पॅंथर स्टाईल आंदोलन करणार मोकाट जनावरे नगरपालिकेच्या आवारात आणून सोडणार बीड शहरातील मोकाट जनावरांचा हैदोस; अपघातात धम्मानंद वाघमारे गंभीर जखमी नियोजनशून्य नगरपालिकेच्या कारभाराचे आणखी एक उदाहरण बीड | प्रतिनिधी बीड शहरातील मुख्य रस्त्यांवर वाढलेल्या मोकाट जनावरांच्या समस्येमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, शनिवारी पहाटे झालेल्या अपघातात धम्मानंद वाघमारे हे गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे नगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धम्मानंद वाघमारे हे शनिवारी पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास बीड बसस्थानकासमोरून साठे चौकाकडे मोटारसायकलवरून जात होते. त्यावेळी मुख्य रस्त्यावर अनेक मोकाट गायी बसलेल्या होत्या. याचवेळी परिसरातील स्ट्रीट लाईट बंद असल्याने रस्त्यावर पुरेसा प्रकाश नव्हता. अंधारामुळे रस्त्यावर बसलेली जनावरे त्यांना दिसली नाहीत आणि त्यांच्या मोटारसायकलची एका गायीला जोरदार धडक बसली. या अपघातात धम्मानंद वाघमारे हे मोटारसायकलवरून खाली फेकले गेले. त्यांचा पाय दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाला असून त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून, डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करावी लागण्याची शक्यता व्यक्त केली आहे. बीड शहरातील मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरांचा वाढता वावर, बंद असलेले पथदिवे आणि संबंधित यंत्रणेकडून होत असलेले दुर्लक्ष यामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही या समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, मोकाट जनावरे हटविणे, पथदिवे नियमित सुरू ठेवणे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.3
- तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल; बीबी नेमतुल्लाह दर्गा जमिनीचा कोणीही व्यवहार करू नये वारसांचा इशारा तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल; बीबी नेमतुल्लाह दर्गा जमिनीचा कोणीही व्यवहार करू नये वारसांचा इशारा1
- वाटेत येऊ द्या कितीही काटे एकच आदर्श ठेवा अण्णाभाऊ साठे! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई येथे आवरून महाराष्ट्र जो काही प्रगती पथावर आहे या पाठीमागे एकच प्रेरणा ते म्हणजे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आहे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या वर कविता सांगितले1
- भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या 79 व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना हार्दिक शुभेच्छा1
- लेखन प्रेरणा दिन म्हणून यावर्षीपासून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती संपूर्ण महाराष्ट्रात साजरी करण्यास सुरुवात — माणिक वाघमारे राज्य सरकारकडून माणिक वाघमारे यांच्या मागणीची दखल लेखन प्रेरणा दिन म्हणून यावर्षीपासून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती संपूर्ण महाराष्ट्रात साजरी करण्यास सुरुवात — माणिक वाघमारे राज्य सरकारकडून माणिक वाघमारे यांच्या मागणीची दखल बीड प्रतिनिधी : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त यावर्षीपासून १ ऑगस्ट हा दिवस "लेखन प्रेरणा दिन" म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाचे विविध साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातून स्वागत करण्यात येत आहे. याप्रसंगी अरुण खेमाडे, दत्ताभाऊ सौंदरमल, दीपक तांगडे, मीनाक्षी देवकते, कमल लांडगे, भूषण वाघमारे, सम्यक सरवदे यानी सत्कार केला. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना ज्येष्ठ साहित्यप्रेमी माणिक वाघमारे यांनी सांगितले की, अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून व शाहिरीतून वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाच्या वेदनांना शब्द दिले. त्यांच्या साहित्याने सामाजिक परिवर्तनाची दिशा दिली असून नव्या पिढीतील लेखकांना प्रेरणा मिळावी, यासाठी "लेखन प्रेरणा दिन" ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे. ते पुढे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे केवळ वाचनापुरते मर्यादित नसून ते समाजपरिवर्तनाचा जाहीरनामा आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी आणि तरुणांमध्ये लेखनाची आवड निर्माण करण्यासाठी राज्यभर विविध साहित्यिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणे ही स्वागतार्ह बाब आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीला "लेखन प्रेरणा दिन" म्हणून मिळालेली ही नवी ओळख त्यांच्या साहित्यकार्याला आणि सामाजिक योगदानाला अभिवादन करणारी असून, नव्या पिढीला लेखन व सामाजिक बांधिलकीची प्रेरणा देणारी ठरेल, असा विश्वास माणिक वाघमारे यांनी व्यक्त केला.4
- वसई विरार महानगरपालिका आयुक्ताच्या मौन भूमीकीमुळे अतिक्रमणला आला हुत वसई-विरार महानगरपालिका : आयुक्तांच्या मौन भूमिकेमुळे 'त्रिमूर्ती' दीपक सावंत, निलेश म्हात्रे आणि मनोज घरत यांचे प्रभाग 'जी' मध्ये वर्चस्व? अनधिकृत बांधकामांना पुन्हा ऊत, असा आरोप वसई-विरार महानगरपालिकेच्या प्रभाग 'जी' मध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचा आरोप नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि तक्रारदारांकडून सातत्याने केला जात आहे. अनेक तक्रारी, पुरावे आणि वारंवार पाठपुरावा करूनही अपेक्षित कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.तक्रारदारांचा आरोप आहे की अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत, निलेश म्हात्रे आणि मनोज घरत* यांच्या कार्यपद्धतीमुळे अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाई प्रभावीपणे होत नाही. त्यामुळे भूमाफियांना अप्रत्यक्ष संरक्षण मिळत असल्याची भावना नागरिकांमध्ये वाढत आहे. या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसून, संबंधित अधिकाऱ्यांनीही याबाबत सार्वजनिक स्पष्टीकरण दिलेले नाही. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्तांची भूमिका चर्चेचा विषय ठरत आहे. नागरिकांमध्ये असा प्रश्न विचारला जात आहे की, प्रशासनाचे मौन हे केवळ विलंबामुळे आहे की अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाईबाबत ठोस निर्णयाचा अभाव आहे?जर कायद्याचे राज्य टिकवायचे असेल, तर कोणताही दबाव, प्रभाव किंवा हस्तक्षेप न मानता अनधिकृत बांधकामांवर तातडीने आणि निष्पक्ष कारवाई होणे आवश्यक आहे.1
- चाकूर येथील माय मंगल कार्यालय समोरील रोडवरील खड्ड्यात पिकपचा भीषण अपघात, 4 ते 5 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती. चाकूर येथील माय मंगल कार्यालय समोरील रोडवरील खड्ड्यात पिकपचा भीषण अपघात, 4 ते 5 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026. लातूरहून चाकूरकडे येणारी विद्युत वाहन जर्मनची तार वाहतूक करणारी पिकअप आज शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026 रोजी तालुका चाकूर येथील माझी माय मंगल कार्यालयासमोर रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी सिमेंट रस्त्याच्या शेवटी असलेल्या खड्ड्याचा अंदाज पडलेल्या पावसामुळे न कळल्याने या रोडवरील खड्ड्यात वाहनाने जोरदार धक्का घेतल्याने ही पिकप गाडी जोराने पलटी झाली. या अपघाताच्या प्राथमिक माहितीनुसार या अपघातात 4 ते 5 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, ॲम्बुलन्स व प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. या भीषण अपघातातील जखमींना मदत व उपचारासाठी दवाखान्यात हलविण्याचे काम सुरू आहे. शिवसेना युवासेना तालुकाप्रमुख नागेश कोंबडे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.1