अण्णाभाऊ साठे जयंती व मनोज जरांगे पाटील वाढदिवसानिमित्त मूकबधिर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप ढाणकीतील मधुकरराव नाईक निवासी मूकबधिर विद्यालयात सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम; शिक्षण आणि समाजसेवेचा अनोखा संगम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे तसेच मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज मधुकरराव नाईक निवासी मूकबधिर विद्यालय, ढाणकी येथे सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी उपस्थितांनी प्रार्थना केली. यानंतर मूकबधिर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, वह्या, पेन व खाऊचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि समाधानाने कार्यक्रमाला भावनिक स्वरूप प्राप्त झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरोजताई देशमुख होत्या. यावेळी दिनेश पाटील रावते, विजयभाऊ हडपकर (नगरसेवक, उमरखेड), स्वप्नील पाटील कनवाळे, ठाकरे काका, विशाल नरवाडे, चांदराव सुरोशे, धोपटे भाऊ, सुनील पाटील, कदम सर, पवार सर, शुभम माने तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक रावते सर, सहशिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. सामाजिक संदेश संविधानाने प्रत्येक बालकाला समान शिक्षणाचा आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी समाजाने पुढाकार घेणे ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून संवेदनशील लोकशाहीचे लक्षण आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात समता, बंधुता आणि सेवाभाव अधिक दृढ होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. "गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे हीच खरी समाजसेवा," असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

- उमरखेड़ s.t. महामंडल आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आमदार किसनराव वानखेड़े साहब के हाथों उदघाटन उमरखेड़ st महामंडल आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आमदार किसनराव वानखेड़े साहब और पालक मंत्री संजय राठोड़ कि कोशिशों से नितिन भाऊ भूतड़ा के सहकार्य से उमरखेड़ आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आगार प्रमुख प्रमोदिनी किनाके मैडम कि कार्य कुशलता से आज उमरखेड़ आगार बना महाराष्ट्र में 1 नंबर1
- हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 103.9 मिमी पाऊस, जिल्ह्यात 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 103.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हिंगोली तालुक्यात सर्वात जास्त 145 मि.मी. पाऊस झाला आहे. तर वसमत तालुक्यात सर्वात कमी ७०.४ मि.मी. पाऊस पडला आहे. जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 145 (508.2), कळमनुरी 104.3 (451.2), वसमत 70.4 (338.4), औंढा नागनाथ 110.8 (401.7) आणि सेनगाव तालुक्यात 89.8 (335.6) मि. मी. पाऊस पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे. हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2026 ते 31 जुलै, 2026 पर्यंत सरासरी 408.3 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 51.3 अशी आहे. हिंगोली जिल्ह्यातील 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हिंगोली तालुक्यातील सर्व 7 मंडळे, कळमनुरी तालुक्यातील सर्व 6 मंडळे, वसमत तालुक्यातील 4 मंडळे, औंढा नागनाथ तालुक्यातील सर्व 4 मंडळे आणि सेनगाव तालुक्यातील सर्व 6 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील विविध भागांत झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, तसेच नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.1
- महिलांवरील अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांविरोधात कठोर कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने आज नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या निषेधार्थ निदर्शने केले आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन सादर केले.1
- पैनगंगा नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. पावसाने खुलले सहस्त्रकुंडचे सौंदर्य! पैनगंगा नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. 🏞️ फेसाळ शुभ्र धारा, हिरवाईने नटलेला परिसर, डोंगरांवरील धुके आणि निसर्गाचा अप्रतिम आविष्कार पाहण्यासाठी किनवट, हिमायतनगर, उमरखेड, नांदेड, यवतमाळ तसेच तेलंगणातून पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. ⚠️ सूचना: धबधब्याचा प्रवाह सध्या अतिवेगवान आहे. सेल्फीच्या नादात धोकादायक ठिकाणी जाऊ नका, नदीपात्रात उतरू नका आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. 📍 सहस्त्रकुंड धबधबा – पावसाळ्यातील निसर्गाचा अद्भुत नजारा! #Sahastrakund #SahastrakundWaterfall #PaingangaRiver #Himayatnagar #Kinwat Nanded Yavatmal Marathwada Vidarbha Telangana Monsoon Nature Tourism Travel Rain Waterfall Maharashtra ALMBharat NNLMarathi1
- माननीय जिल्हाधिकारी वाशिम यांनी कर्जमाफी बद्दल शेतकऱ्यांना दिली माहिती माननीय जिल्हाधिकारी वाशिम यांनी कर्जमाफी बद्दल शेतकऱ्यांना दिली माहिती1
- ऑल इंडिया तन्जीम-ए-इन्साफचे 'घंटा वाजवा' आंदोलन संपन्न मुखेड- जन्म-मृत्यूच्या प्रमाण पत्राअभावी महिला, वयोवृद्ध व्यक्ती तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना शैक्षणिक व शासकिय कामांमध्ये अडथळा येत असल्यामुळे जन्म-मृत्यूच्या प्रमाणपत्राची अत्यंत आवश्यकता असून सदर प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालयाकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आज मुखेड तहसिलच्या विरोधमध्ये शुक्रवार दि.३१ जुलै २०२६ रोजी ऑल इंडिया तन्जीम-ए-इंसाफचे तालुकाध्यक्ष हसनोद्दीन शेख उर्फ बबलू मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली मुखेड तहसिल कार्यालयासमोर हलगीच्या तालावर घंटा वाजवून आंदोलन करण्यात आले असून तहसिल कार्यालयाच्या वतीने आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्विकारून सकारात्मक आश्वासन देण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रीय आपसंख्यांक परिषदेचे महेताब शेख, शेतकरी कामगार पक्षाचे भाई असद बल्खी, ग्राहक पंचायतचे जयभीम सोनकांबळे, पत्रकार संजय कांबळे व तसेच युवा कार्यकर्ते, शोहेब सय्यद, जिलानी शेख, इसाक मनियार, गौसपठाण, खदीर शेख यांच्यासह जन्म-मृत्यू प्रमाण पत्राबाबत आदेशाची मागणी करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.2
- वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे मंगरूळपीर शहरालगतच्या मानोली रोडवरील सोनखास शेतशिवारात वीटभट्टीजवळ असलेल्या सुमारे ४० फूट खोल कोरड्या विहिरीत पडलेल्या एका ३५ वर्षीय महिलेला मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या जवानांनी जीवाची पर्वा न करता सुखरूप बाहेर काढले. २९ जुलै रोजी दुपारी घडलेल्या या घटनेत बचाव पथकाने दाखविलेल्या धाडसामुळे महिलेला जीवनदान मिळाले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सपना राठोड (वय अंदाजे ३५ वर्षे, रा. पंचशील नगर, मंगरूळपीर) या २९ जुलै रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास मंगरूळपीर शहरालगत मानोली रोडवरील सोनखास शेतशिवारात वीटभट्टीजवळ असलेल्या विहिरीत पडल्या. विहीर खोल आणि कोरडी असल्याने परिस्थिती गंभीर होती. घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना मिळताच घटनास्थळी गर्दी झाली. या घटनेची माहिती मंगरूळपीर पोलीस ठाण्याला देण्यात आली. माहिती मिळताच ठाणेदार किशोर शेळके यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांच्याशी संपर्क साधला आणि तातडीने बचाव पथकाला घटनास्थळी पाचारण केले. पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या सहकाऱ्यांना बचावासाठी रवाना केले. गोपाल गिरे, गोपाल जयस्वाल आणि दत्ता मानेकर हे आवश्यक शोध व बचाव साहित्य घेऊन तातडीने घटनास्थळी पोहोचले. पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असता संबंधित विहीर सुमारे ४० फूट खोल आणि पूर्णपणे कोरडी असल्याचे दिसून आले. विहिरीच्या तळाशी महिला पडलेली असल्याचे निदर्शनास आल्यानंतर बचाव पथकाने तात्काळ रेस्क्यू ऑपरेशनची तयारी सुरू केली. जवान गोपाल गिरे यांनी पथक प्रमुख दीपक सदाफळे यांना फोनवरून घटनास्थळावरील परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर संपूर्ण बचाव मोहिमेचे नियोजन करण्यात आले. विहिरीची खोली आणि परिस्थिती लक्षात घेऊन अत्यंत सावधगिरीने ऑपरेशन राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. वायर रोपच्या सहाय्याने जवान उतरला विहिरीत क्षणाचाही विलंब न करता जवान गोपाल गिरे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वायर रोपच्या सहाय्याने सुमारे ४० फूट खोल विहिरीत प्रवेश केला. विहिरीच्या तळाशी पोहोचल्यानंतर त्यांनी महिलेला धीर दिला. बचावादरम्यान कोणतीही दुखापत होऊ नये म्हणून महिलेला सुरक्षेसाठी हेल्मेट घालण्यात आले. त्यानंतर खाट आणि आवश्यक बचाव साहित्याच्या सहाय्याने महिलेला सुरक्षितपणे वर आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. अत्यंत काळजीपूर्वक आणि समन्वयाने राबविण्यात आलेल्या या रेस्क्यू ऑपरेशननंतर दुपारी सुमारे पाच वाजताच्या सुमारास महिलेला विहिरीतून जिवंत व सुखरूप बाहेर काढण्यात पथकाला यश आले. त्यानंतर महिलेला पुढील कार्यवाहीसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. बचाव पथकाच्या साहसाचे नागरिकांकडून कौतुक या बचाव मोहिमेदरम्यान मंगरूळपीर पोलीस ठाण्याचे ठाणेदार किशोर शेळके, पोलीस कर्मचारी प्रमोद थोरवे, धनंजय पवार यांच्यासह गावातील नागरिक आणि महिलेचे नातेवाईक घटनास्थळी उपस्थित होते. महिला सुखरूप बाहेर आल्यानंतर उपस्थितांनी सुटकेचा निःश्वास सोडला. वेळेचे महत्त्व ओळखून पोलिसांनी दाखविलेली तत्परता आणि मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या जवानांनी जीव धोक्यात घालून केलेल्या धाडसी बचावकार्यामुळे एका महिलेचे प्राण वाचले. जवान गोपाल गिरे, गोपाल जयस्वाल आणि दत्ता मानेकर यांनी दाखविलेल्या साहसाचे स्थानिक नागरिकांनी विशेष कौतुक केले. पथक प्रमुख दीपक सदाफळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या धाडसी रेस्क्यू ऑपरेशनमुळे महिलेला जीवनदान मिळाले असून, संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या तत्पर आणि साहसी कार्याची परिसरात प्रशंसा होत आहे.4