logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे मंगरूळपीर शहरालगतच्या मानोली रोडवरील सोनखास शेतशिवारात वीटभट्टीजवळ असलेल्या सुमारे ४० फूट खोल कोरड्या विहिरीत पडलेल्या एका ३५ वर्षीय महिलेला मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या जवानांनी जीवाची पर्वा न करता सुखरूप बाहेर काढले. २९ जुलै रोजी दुपारी घडलेल्या या घटनेत बचाव पथकाने दाखविलेल्या धाडसामुळे महिलेला जीवनदान मिळाले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सपना राठोड (वय अंदाजे ३५ वर्षे, रा. पंचशील नगर, मंगरूळपीर) या २९ जुलै रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास मंगरूळपीर शहरालगत मानोली रोडवरील सोनखास शेतशिवारात वीटभट्टीजवळ असलेल्या विहिरीत पडल्या. विहीर खोल आणि कोरडी असल्याने परिस्थिती गंभीर होती. घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना मिळताच घटनास्थळी गर्दी झाली. या घटनेची माहिती मंगरूळपीर पोलीस ठाण्याला देण्यात आली. माहिती मिळताच ठाणेदार किशोर शेळके यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांच्याशी संपर्क साधला आणि तातडीने बचाव पथकाला घटनास्थळी पाचारण केले. पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या सहकाऱ्यांना बचावासाठी रवाना केले. गोपाल गिरे, गोपाल जयस्वाल आणि दत्ता मानेकर हे आवश्यक शोध व बचाव साहित्य घेऊन तातडीने घटनास्थळी पोहोचले. पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असता संबंधित विहीर सुमारे ४० फूट खोल आणि पूर्णपणे कोरडी असल्याचे दिसून आले. विहिरीच्या तळाशी महिला पडलेली असल्याचे निदर्शनास आल्यानंतर बचाव पथकाने तात्काळ रेस्क्यू ऑपरेशनची तयारी सुरू केली. जवान गोपाल गिरे यांनी पथक प्रमुख दीपक सदाफळे यांना फोनवरून घटनास्थळावरील परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर संपूर्ण बचाव मोहिमेचे नियोजन करण्यात आले. विहिरीची खोली आणि परिस्थिती लक्षात घेऊन अत्यंत सावधगिरीने ऑपरेशन राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. वायर रोपच्या सहाय्याने जवान उतरला विहिरीत क्षणाचाही विलंब न करता जवान गोपाल गिरे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वायर रोपच्या सहाय्याने सुमारे ४० फूट खोल विहिरीत प्रवेश केला. विहिरीच्या तळाशी पोहोचल्यानंतर त्यांनी महिलेला धीर दिला. बचावादरम्यान कोणतीही दुखापत होऊ नये म्हणून महिलेला सुरक्षेसाठी हेल्मेट घालण्यात आले. त्यानंतर खाट आणि आवश्यक बचाव साहित्याच्या सहाय्याने महिलेला सुरक्षितपणे वर आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. अत्यंत काळजीपूर्वक आणि समन्वयाने राबविण्यात आलेल्या या रेस्क्यू ऑपरेशननंतर दुपारी सुमारे पाच वाजताच्या सुमारास महिलेला विहिरीतून जिवंत व सुखरूप बाहेर काढण्यात पथकाला यश आले. त्यानंतर महिलेला पुढील कार्यवाहीसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. बचाव पथकाच्या साहसाचे नागरिकांकडून कौतुक या बचाव मोहिमेदरम्यान मंगरूळपीर पोलीस ठाण्याचे ठाणेदार किशोर शेळके, पोलीस कर्मचारी प्रमोद थोरवे, धनंजय पवार यांच्यासह गावातील नागरिक आणि महिलेचे नातेवाईक घटनास्थळी उपस्थित होते. महिला सुखरूप बाहेर आल्यानंतर उपस्थितांनी सुटकेचा निःश्वास सोडला. वेळेचे महत्त्व ओळखून पोलिसांनी दाखविलेली तत्परता आणि मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या जवानांनी जीव धोक्यात घालून केलेल्या धाडसी बचावकार्यामुळे एका महिलेचे प्राण वाचले. जवान गोपाल गिरे, गोपाल जयस्वाल आणि दत्ता मानेकर यांनी दाखविलेल्या साहसाचे स्थानिक नागरिकांनी विशेष कौतुक केले. पथक प्रमुख दीपक सदाफळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या धाडसी रेस्क्यू ऑपरेशनमुळे महिलेला जीवनदान मिळाले असून, संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या तत्पर आणि साहसी कार्याची परिसरात प्रशंसा होत आहे.

1 hr ago
user_न्युज मराठी 24x7 वाशिम
न्युज मराठी 24x7 वाशिम
Local News Reporter मंगरूळपीर, वाशिम, महाराष्ट्र•
1 hr ago
4b2ebf13-c44a-4ea3-a19a-c52703ea5e99

वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे मंगरूळपीर शहरालगतच्या मानोली रोडवरील सोनखास शेतशिवारात वीटभट्टीजवळ असलेल्या सुमारे ४० फूट खोल कोरड्या विहिरीत पडलेल्या एका ३५ वर्षीय महिलेला मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या जवानांनी जीवाची पर्वा न करता सुखरूप बाहेर काढले. २९ जुलै रोजी दुपारी घडलेल्या या घटनेत बचाव पथकाने दाखविलेल्या धाडसामुळे महिलेला जीवनदान मिळाले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सपना राठोड (वय अंदाजे ३५ वर्षे, रा. पंचशील नगर, मंगरूळपीर) या २९ जुलै रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास मंगरूळपीर शहरालगत मानोली रोडवरील सोनखास शेतशिवारात वीटभट्टीजवळ असलेल्या विहिरीत पडल्या. विहीर खोल आणि कोरडी असल्याने परिस्थिती गंभीर होती. घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना मिळताच घटनास्थळी गर्दी झाली. या घटनेची माहिती मंगरूळपीर पोलीस ठाण्याला

81796228-7686-46cb-8b86-d199cb4a994c

देण्यात आली. माहिती मिळताच ठाणेदार किशोर शेळके यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांच्याशी संपर्क साधला आणि तातडीने बचाव पथकाला घटनास्थळी पाचारण केले. पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या सहकाऱ्यांना बचावासाठी रवाना केले. गोपाल गिरे, गोपाल जयस्वाल आणि दत्ता मानेकर हे आवश्यक शोध व बचाव साहित्य घेऊन तातडीने घटनास्थळी पोहोचले. पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असता संबंधित विहीर सुमारे ४० फूट खोल आणि पूर्णपणे कोरडी असल्याचे दिसून आले. विहिरीच्या तळाशी महिला पडलेली असल्याचे निदर्शनास आल्यानंतर बचाव पथकाने तात्काळ रेस्क्यू ऑपरेशनची तयारी सुरू केली. जवान गोपाल गिरे यांनी पथक प्रमुख दीपक सदाफळे यांना फोनवरून घटनास्थळावरील

5a6171bb-59ba-42c0-9915-881dd8267d96

परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर संपूर्ण बचाव मोहिमेचे नियोजन करण्यात आले. विहिरीची खोली आणि परिस्थिती लक्षात घेऊन अत्यंत सावधगिरीने ऑपरेशन राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. वायर रोपच्या सहाय्याने जवान उतरला विहिरीत क्षणाचाही विलंब न करता जवान गोपाल गिरे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वायर रोपच्या सहाय्याने सुमारे ४० फूट खोल विहिरीत प्रवेश केला. विहिरीच्या तळाशी पोहोचल्यानंतर त्यांनी महिलेला धीर दिला. बचावादरम्यान कोणतीही दुखापत होऊ नये म्हणून महिलेला सुरक्षेसाठी हेल्मेट घालण्यात आले. त्यानंतर खाट आणि आवश्यक बचाव साहित्याच्या सहाय्याने महिलेला सुरक्षितपणे वर आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. अत्यंत काळजीपूर्वक आणि समन्वयाने राबविण्यात आलेल्या या रेस्क्यू ऑपरेशननंतर दुपारी सुमारे पाच वाजताच्या सुमारास महिलेला विहिरीतून जिवंत व सुखरूप बाहेर काढण्यात पथकाला यश आले. त्यानंतर महिलेला

पुढील कार्यवाहीसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. बचाव पथकाच्या साहसाचे नागरिकांकडून कौतुक या बचाव मोहिमेदरम्यान मंगरूळपीर पोलीस ठाण्याचे ठाणेदार किशोर शेळके, पोलीस कर्मचारी प्रमोद थोरवे, धनंजय पवार यांच्यासह गावातील नागरिक आणि महिलेचे नातेवाईक घटनास्थळी उपस्थित होते. महिला सुखरूप बाहेर आल्यानंतर उपस्थितांनी सुटकेचा निःश्वास सोडला. वेळेचे महत्त्व ओळखून पोलिसांनी दाखविलेली तत्परता आणि मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या जवानांनी जीव धोक्यात घालून केलेल्या धाडसी बचावकार्यामुळे एका महिलेचे प्राण वाचले. जवान गोपाल गिरे, गोपाल जयस्वाल आणि दत्ता मानेकर यांनी दाखविलेल्या साहसाचे स्थानिक नागरिकांनी विशेष कौतुक केले. पथक प्रमुख दीपक सदाफळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या धाडसी रेस्क्यू ऑपरेशनमुळे महिलेला जीवनदान मिळाले असून, संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या तत्पर आणि साहसी कार्याची परिसरात प्रशंसा होत आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • माननीय जिल्हाधिकारी वाशिम यांनी कर्जमाफी बद्दल शेतकऱ्यांना दिली माहिती माननीय जिल्हाधिकारी वाशिम यांनी कर्जमाफी बद्दल शेतकऱ्यांना दिली माहिती
    1
    माननीय जिल्हाधिकारी वाशिम यांनी कर्जमाफी बद्दल शेतकऱ्यांना दिली माहिती
माननीय जिल्हाधिकारी वाशिम यांनी कर्जमाफी बद्दल शेतकऱ्यांना दिली माहिती
    user_सारनाथ अवचार
    सारनाथ अवचार
    पत्रकार मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • बार्शीटाकली में वर्षों से बंद सार्वजनिक शौचालय, नागरिकों ने नगर पंचायत से की तत्काल शुरू करने की मांग बार्शीटाकली शहर में सार्वजनिक सुविधा के नाम पर साप्ताहिक बाज़ार परिसर में बना शौचालय वर्षों से बंद पड़े होने के कारण नागरिकों को भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। इस गंभीर समस्या को लेकर नगर पंचायत के मुख्याधिकारी को एक लिखित आवेदन सौंपकर तत्काल शौचालय शुरू करने की मांग की गई है। आवेदन में कहा गया है कि शहर के प्रमुख स्थान पर स्थित सार्वजनिक शौचालय करीब 3 वर्षों से बंद है। इसके कारण महिलाओं, बुजुर्गों, यात्रियों और बाजार आने वाले लोगों को काफी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। नागरिकों ने मांग की है कि बंद पड़े शौचालय की तत्काल मरम्मत कर उसे आम जनता के लिए शुरू किया जाए। अब नागरिकों की नजर इस बात पर है कि टिकी है कि नगर पंचायत इस मांग पर कितनी जल्दी कार्रवाई करती है। यदि समय रहते समस्या का समाधान नहीं हुआ तो नागरिकों ने आंदोलन का रास्ता अपनाने की चेतावनी भी दी है।
    1
    बार्शीटाकली में वर्षों से बंद सार्वजनिक शौचालय, नागरिकों ने नगर पंचायत से की तत्काल शुरू करने की मांग
बार्शीटाकली शहर में सार्वजनिक सुविधा के नाम पर साप्ताहिक बाज़ार परिसर में  बना शौचालय वर्षों से बंद पड़े होने के कारण नागरिकों को भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। इस गंभीर समस्या को लेकर नगर पंचायत के मुख्याधिकारी को एक लिखित आवेदन सौंपकर तत्काल शौचालय शुरू करने की मांग की गई है। आवेदन में कहा गया है कि शहर के प्रमुख स्थान पर स्थित सार्वजनिक शौचालय करीब 3 वर्षों से बंद है। इसके कारण महिलाओं, बुजुर्गों, यात्रियों और बाजार आने वाले लोगों को काफी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। नागरिकों ने मांग की है कि बंद पड़े शौचालय की तत्काल मरम्मत कर उसे आम जनता के लिए शुरू किया जाए।
अब नागरिकों की नजर इस बात पर है कि टिकी है कि नगर पंचायत इस मांग पर कितनी जल्दी कार्रवाई करती है।
यदि समय रहते समस्या का समाधान नहीं हुआ तो नागरिकों ने आंदोलन का रास्ता अपनाने की चेतावनी भी दी है।
    user_गुफरान शेख
    गुफरान शेख
    Local News Reporter बार्शीटाकळी, अकोला, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 103.9 मिमी पाऊस, जिल्ह्यात 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी  103.9  मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हिंगोली तालुक्यात सर्वात जास्त 145 मि.मी. पाऊस झाला आहे. तर वसमत तालुक्यात सर्वात कमी ७०.४ मि.मी. पाऊस पडला आहे.  जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 145 (508.2), कळमनुरी 104.3 (451.2),  वसमत 70.4 (338.4), औंढा नागनाथ 110.8 (401.7) आणि सेनगाव तालुक्यात 89.8 (335.6) मि. मी. पाऊस  पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे. हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2026 ते 31 जुलै, 2026  पर्यंत सरासरी  408.3 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 51.3 अशी आहे.  हिंगोली जिल्ह्यातील 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हिंगोली तालुक्यातील सर्व 7 मंडळे, कळमनुरी तालुक्यातील सर्व 6 मंडळे, वसमत तालुक्यातील 4 मंडळे, औंढा नागनाथ तालुक्यातील सर्व 4 मंडळे आणि सेनगाव तालुक्यातील सर्व 6 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील विविध भागांत झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, तसेच नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
    1
    हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 103.9 मिमी पाऊस, जिल्ह्यात 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद

जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी  103.9  मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हिंगोली तालुक्यात सर्वात जास्त 145 मि.मी. पाऊस झाला आहे. तर वसमत तालुक्यात सर्वात कमी ७०.४ मि.मी. पाऊस पडला आहे. 
जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 145 (508.2), कळमनुरी 104.3 (451.2),  वसमत 70.4 (338.4), औंढा नागनाथ 110.8 (401.7) आणि सेनगाव तालुक्यात 89.8 (335.6) मि. मी. पाऊस  पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे.
हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2026 ते 31 जुलै, 2026  पर्यंत सरासरी  408.3 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 51.3 अशी आहे. 
हिंगोली जिल्ह्यातील 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हिंगोली तालुक्यातील सर्व 7 मंडळे, कळमनुरी तालुक्यातील सर्व 6 मंडळे, वसमत तालुक्यातील 4 मंडळे, औंढा नागनाथ तालुक्यातील सर्व 4 मंडळे आणि सेनगाव तालुक्यातील सर्व 6 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील विविध भागांत झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, तसेच नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
    user_Shankar mulgir
    Shankar mulgir
    Reporter कळमनुरी, हिंगोली, महाराष्ट्र•
    1 day ago
  • शिक्षण व्यवस्थेवरील भ्रष्टाचार आणि गैरव्यवस्थेविरोधात काँग्रेस खासदारांचे संसदेच्या परिसरात आंदोलन खासदार बळवंत वानखेडे चे उपस्थित
    1
    शिक्षण व्यवस्थेवरील भ्रष्टाचार आणि गैरव्यवस्थेविरोधात काँग्रेस खासदारांचे संसदेच्या परिसरात आंदोलन खासदार बळवंत वानखेडे चे उपस्थित
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • सेवापूर्ती सोहळा उत्साहात नगरपरिषद शेगाव चे "वरिष्ठ लिपिक" श्री अशोकराव नंदाने यांचा सत्कार *सेवापूर्ती सोहळा उत्साहात* *नगरपरिषद शेगाव चे "वरिष्ठ* *लिपिक" श्री अशोकराव नंदाने यांचा सत्कार* नगरपरिषद शेगाव येथे वरिष्ठलिपिक म्हणून सलग ३५ वर्षे प्रामाणिक व निष्ठापूर्वक सेवा बजावल्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या मा. श्री अशोकराव मोतीरामजी नंदाने यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा नगरपरिषद क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ अर्पण करून श्री अशोकराव नंदाने यांना निरोगी, आनंदी व दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या प्रदीर्घ सेवाकाळात केलेल्या प्रामाणिक कार्याचा गौरव उपस्थित मान्यवरांनी केला. याच प्रसंगी भोई समाज शेगाव शहर यांच्या वतीने श्री अशोकराव नंदाने यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. समाजाप्रती त्यांचे योगदान व सेवाभावाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून पुढील आयुष्य सुख, समृद्धी व उत्तम आरोग्याने भरलेले जावो, अशा सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपरिषद शेगाव येथील नगराध्यक्ष मा.श्री प्रकाशभाऊ शेगोकार हे होते कार्यक्रमास, भोई समाज कर्मचारी संघटनेचे शहराध्यक्ष श्री गजाननजी ढोके, श्री हरिदासजी नंदाने भोई समाज चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक, समाजसेवक श्री भास्करराव नंदाने, समाजसेविका सौ. नर्मदाताई बावणे, समाजसेवक श्री देविदासजी कुसुंबे, समाजसेवक श्री रामरावजी बावणे, श्री रवींद्र पाटील,श्रीकांत लोंळे, श्री धनराज आटोळे, तसेच भाजपा शेगाव शहर मच्छीमार सेलचे संयोजक, भाजपा शेगाव शहर सोशल मीडिया प्रमुख व भोई समाज चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्री उमेश सुरेशराव राजगुरे , श्री अविनाश नंदाने, नगरपरिषद कार्यालय येथील कर्मचारी नानारावजी इंगळे , राहुल सुरवाडे, सुरेश घुले, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी श्री अशोकराव मोतीरामजी नंदाने यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या.
    4
    सेवापूर्ती सोहळा उत्साहात
नगरपरिषद शेगाव चे "वरिष्ठ लिपिक" श्री अशोकराव नंदाने यांचा सत्कार
*सेवापूर्ती सोहळा उत्साहात*
*नगरपरिषद शेगाव चे "वरिष्ठ* *लिपिक" श्री अशोकराव नंदाने यांचा सत्कार*
नगरपरिषद शेगाव येथे वरिष्ठलिपिक म्हणून सलग ३५ वर्षे प्रामाणिक व निष्ठापूर्वक सेवा बजावल्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या मा. श्री अशोकराव मोतीरामजी नंदाने यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा नगरपरिषद क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले  सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
यावेळी नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ अर्पण करून श्री अशोकराव नंदाने यांना निरोगी, आनंदी व दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या प्रदीर्घ सेवाकाळात केलेल्या प्रामाणिक कार्याचा गौरव उपस्थित मान्यवरांनी केला.
याच प्रसंगी भोई समाज शेगाव शहर यांच्या वतीने श्री अशोकराव नंदाने यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. समाजाप्रती त्यांचे योगदान व सेवाभावाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून पुढील आयुष्य सुख, समृद्धी व उत्तम आरोग्याने भरलेले जावो, अशा सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपरिषद शेगाव येथील नगराध्यक्ष मा.श्री प्रकाशभाऊ शेगोकार हे होते
कार्यक्रमास, भोई समाज कर्मचारी संघटनेचे शहराध्यक्ष श्री गजाननजी ढोके, श्री हरिदासजी नंदाने भोई समाज चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक, समाजसेवक श्री भास्करराव नंदाने, समाजसेविका सौ. नर्मदाताई बावणे, समाजसेवक श्री देविदासजी कुसुंबे, समाजसेवक श्री रामरावजी बावणे, श्री रवींद्र पाटील,श्रीकांत लोंळे, श्री धनराज आटोळे, तसेच भाजपा शेगाव शहर मच्छीमार सेलचे संयोजक, भाजपा शेगाव शहर सोशल मीडिया प्रमुख व भोई समाज चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्री उमेश सुरेशराव राजगुरे , श्री अविनाश नंदाने, नगरपरिषद कार्यालय येथील कर्मचारी नानारावजी इंगळे , राहुल सुरवाडे, सुरेश घुले, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी श्री अशोकराव मोतीरामजी नंदाने यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या.
    user_उमेश राजगुरे
    उमेश राजगुरे
    Fruit & Vegetable Wholesaler शेगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे मंगरूळपीर शहरालगतच्या मानोली रोडवरील सोनखास शेतशिवारात वीटभट्टीजवळ असलेल्या सुमारे ४० फूट खोल कोरड्या विहिरीत पडलेल्या एका ३५ वर्षीय महिलेला मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या जवानांनी जीवाची पर्वा न करता सुखरूप बाहेर काढले. २९ जुलै रोजी दुपारी घडलेल्या या घटनेत बचाव पथकाने दाखविलेल्या धाडसामुळे महिलेला जीवनदान मिळाले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सपना राठोड (वय अंदाजे ३५ वर्षे, रा. पंचशील नगर, मंगरूळपीर) या २९ जुलै रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास मंगरूळपीर शहरालगत मानोली रोडवरील सोनखास शेतशिवारात वीटभट्टीजवळ असलेल्या विहिरीत पडल्या. विहीर खोल आणि कोरडी असल्याने परिस्थिती गंभीर होती. घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना मिळताच घटनास्थळी गर्दी झाली. या घटनेची माहिती मंगरूळपीर पोलीस ठाण्याला देण्यात आली. माहिती मिळताच ठाणेदार किशोर शेळके यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांच्याशी संपर्क साधला आणि तातडीने बचाव पथकाला घटनास्थळी पाचारण केले. पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या सहकाऱ्यांना बचावासाठी रवाना केले. गोपाल गिरे, गोपाल जयस्वाल आणि दत्ता मानेकर हे आवश्यक शोध व बचाव साहित्य घेऊन तातडीने घटनास्थळी पोहोचले. पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असता संबंधित विहीर सुमारे ४० फूट खोल आणि पूर्णपणे कोरडी असल्याचे दिसून आले. विहिरीच्या तळाशी महिला पडलेली असल्याचे निदर्शनास आल्यानंतर बचाव पथकाने तात्काळ रेस्क्यू ऑपरेशनची तयारी सुरू केली. जवान गोपाल गिरे यांनी पथक प्रमुख दीपक सदाफळे यांना फोनवरून घटनास्थळावरील परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर संपूर्ण बचाव मोहिमेचे नियोजन करण्यात आले. विहिरीची खोली आणि परिस्थिती लक्षात घेऊन अत्यंत सावधगिरीने ऑपरेशन राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. वायर रोपच्या सहाय्याने जवान उतरला विहिरीत क्षणाचाही विलंब न करता जवान गोपाल गिरे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वायर रोपच्या सहाय्याने सुमारे ४० फूट खोल विहिरीत प्रवेश केला. विहिरीच्या तळाशी पोहोचल्यानंतर त्यांनी महिलेला धीर दिला. बचावादरम्यान कोणतीही दुखापत होऊ नये म्हणून महिलेला सुरक्षेसाठी हेल्मेट घालण्यात आले. त्यानंतर खाट आणि आवश्यक बचाव साहित्याच्या सहाय्याने महिलेला सुरक्षितपणे वर आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. अत्यंत काळजीपूर्वक आणि समन्वयाने राबविण्यात आलेल्या या रेस्क्यू ऑपरेशननंतर दुपारी सुमारे पाच वाजताच्या सुमारास महिलेला विहिरीतून जिवंत व सुखरूप बाहेर काढण्यात पथकाला यश आले. त्यानंतर महिलेला पुढील कार्यवाहीसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. बचाव पथकाच्या साहसाचे नागरिकांकडून कौतुक या बचाव मोहिमेदरम्यान मंगरूळपीर पोलीस ठाण्याचे ठाणेदार किशोर शेळके, पोलीस कर्मचारी प्रमोद थोरवे, धनंजय पवार यांच्यासह गावातील नागरिक आणि महिलेचे नातेवाईक घटनास्थळी उपस्थित होते. महिला सुखरूप बाहेर आल्यानंतर उपस्थितांनी सुटकेचा निःश्वास सोडला. वेळेचे महत्त्व ओळखून पोलिसांनी दाखविलेली तत्परता आणि मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या जवानांनी जीव धोक्यात घालून केलेल्या धाडसी बचावकार्यामुळे एका महिलेचे प्राण वाचले. जवान गोपाल गिरे, गोपाल जयस्वाल आणि दत्ता मानेकर यांनी दाखविलेल्या साहसाचे स्थानिक नागरिकांनी विशेष कौतुक केले. पथक प्रमुख दीपक सदाफळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या धाडसी रेस्क्यू ऑपरेशनमुळे महिलेला जीवनदान मिळाले असून, संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या तत्पर आणि साहसी कार्याची परिसरात प्रशंसा होत आहे.
    4
    वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे
मंगरूळपीर शहरालगतच्या मानोली रोडवरील सोनखास शेतशिवारात वीटभट्टीजवळ असलेल्या सुमारे ४० फूट खोल कोरड्या विहिरीत पडलेल्या एका ३५ वर्षीय महिलेला मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या जवानांनी जीवाची पर्वा न करता सुखरूप बाहेर काढले. २९ जुलै रोजी दुपारी घडलेल्या या घटनेत बचाव पथकाने दाखविलेल्या धाडसामुळे महिलेला जीवनदान मिळाले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सपना राठोड (वय अंदाजे ३५ वर्षे, रा. पंचशील नगर, मंगरूळपीर) या २९ जुलै रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास मंगरूळपीर शहरालगत मानोली रोडवरील सोनखास शेतशिवारात वीटभट्टीजवळ असलेल्या विहिरीत पडल्या. विहीर खोल आणि कोरडी असल्याने परिस्थिती गंभीर होती. घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना मिळताच घटनास्थळी गर्दी झाली. या घटनेची माहिती मंगरूळपीर पोलीस ठाण्याला देण्यात आली. माहिती मिळताच ठाणेदार किशोर शेळके यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांच्याशी संपर्क साधला आणि तातडीने बचाव पथकाला घटनास्थळी पाचारण केले.
पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या सहकाऱ्यांना बचावासाठी रवाना केले. गोपाल गिरे, गोपाल जयस्वाल आणि दत्ता मानेकर हे आवश्यक शोध व बचाव साहित्य घेऊन तातडीने घटनास्थळी पोहोचले. पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असता संबंधित विहीर सुमारे ४० फूट खोल आणि पूर्णपणे कोरडी असल्याचे दिसून आले. विहिरीच्या तळाशी महिला पडलेली असल्याचे निदर्शनास आल्यानंतर बचाव पथकाने तात्काळ रेस्क्यू ऑपरेशनची तयारी सुरू केली. जवान गोपाल गिरे यांनी पथक प्रमुख दीपक सदाफळे यांना फोनवरून घटनास्थळावरील परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर संपूर्ण बचाव मोहिमेचे नियोजन करण्यात आले. विहिरीची खोली आणि परिस्थिती लक्षात घेऊन अत्यंत सावधगिरीने ऑपरेशन राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. वायर रोपच्या सहाय्याने जवान उतरला विहिरीत क्षणाचाही विलंब न करता जवान गोपाल गिरे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वायर रोपच्या सहाय्याने सुमारे ४० फूट खोल विहिरीत प्रवेश केला. विहिरीच्या तळाशी पोहोचल्यानंतर त्यांनी महिलेला धीर दिला. बचावादरम्यान कोणतीही दुखापत होऊ नये म्हणून महिलेला सुरक्षेसाठी हेल्मेट घालण्यात आले. त्यानंतर खाट आणि आवश्यक बचाव साहित्याच्या सहाय्याने महिलेला सुरक्षितपणे वर आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. अत्यंत काळजीपूर्वक आणि समन्वयाने राबविण्यात आलेल्या या रेस्क्यू ऑपरेशननंतर दुपारी सुमारे पाच वाजताच्या सुमारास महिलेला विहिरीतून जिवंत व सुखरूप बाहेर काढण्यात पथकाला यश आले. त्यानंतर महिलेला पुढील कार्यवाहीसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
बचाव पथकाच्या साहसाचे नागरिकांकडून कौतुक
या बचाव मोहिमेदरम्यान मंगरूळपीर पोलीस ठाण्याचे ठाणेदार किशोर शेळके, पोलीस कर्मचारी प्रमोद थोरवे, धनंजय पवार यांच्यासह गावातील नागरिक आणि महिलेचे नातेवाईक घटनास्थळी उपस्थित होते. महिला सुखरूप बाहेर आल्यानंतर उपस्थितांनी सुटकेचा निःश्वास सोडला. वेळेचे महत्त्व ओळखून पोलिसांनी दाखविलेली तत्परता आणि मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या जवानांनी जीव धोक्यात घालून केलेल्या धाडसी बचावकार्यामुळे एका महिलेचे प्राण वाचले. जवान गोपाल गिरे, गोपाल जयस्वाल आणि दत्ता मानेकर यांनी दाखविलेल्या साहसाचे स्थानिक नागरिकांनी विशेष कौतुक केले. पथक प्रमुख दीपक सदाफळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या धाडसी रेस्क्यू ऑपरेशनमुळे महिलेला जीवनदान मिळाले असून, संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या तत्पर आणि साहसी कार्याची परिसरात प्रशंसा होत आहे.
    user_न्युज मराठी 24x7 वाशिम
    न्युज मराठी 24x7 वाशिम
    Local News Reporter मंगरूळपीर, वाशिम, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.