प्रतिकूल परिस्थितीवर मात करा साक्षी लबडे ची उल्लेखनीय कामगिरी **प्रतिकूल परिस्थितीवर मात करत साक्षी लबडेची उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरी वाशिम :* कोंडाळा झामरे या छोट्याशा गावातून सुरू झालेला साक्षी लबडेचा प्रवास आज जिद्द आणि मेहनतीचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. साध्या शेतकरी कुटुंबात वाढलेल्या साक्षीने लहानपणापासूनच अनेक अडचणींचा सामना करत शिक्षणाची वाट निवडली. घरातील जबाबदाऱ्या, आर्थिक मर्यादा आणि मर्यादित साधनं या सगळ्यांवर मात करत तिने आपले ध्येय डोळ्यासमोर ठेवले. अभ्यासात सातत्य ठेवत साक्षीने समाजकार्य क्षेत्राची निवड केली. बीएसडब्ल्यू शिक्षण घेत असतानाच तिने मुंबईतील टाटा सामाजिक विज्ञान संस्थान (TISS) मध्ये प्रवेश घेण्याचा निर्धार केला. महाविद्यालयीन शिक्षण, बार्टीचा अभ्यासक्रम आणि कौशल्य विकास वर्ग यांचा समतोल साधत तिने दिवस-रात्र परिश्रम घेतले. अखेर तिच्या या प्रयत्नांना यश मिळाले आणि तिला TISS मध्ये प्रवेश मिळाला. मुंबईत शिक्षण सुरू झाल्यानंतरही तिचा संघर्ष कायम राहिला. आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी तिने शिष्यवृत्ती मिळवण्याचा ध्यास घेतला आणि सातत्यपूर्ण प्रयत्नातून व्हीएसएम शिष्यवृत्ती प्राप्त केली. भाषेची अडचण आणि नव्या वातावरणातील आव्हाने असूनही तिने अभ्यासात उत्कृष्ट कामगिरी टिकवून ठेवली. श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय, वाशिम येथून BSW पूर्ण केल्यानंतर साक्षीने टीआयएसएसमधून *एम.ए. समाजकार्य (महिला केंद्रित अभ्यास)* ही पदव्युत्तर पदवी यशस्वीरीत्या पूर्ण केली. विशेष म्हणजे, सरनाईक महाविद्यालयातून TISS पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणारी ती पहिली विद्यार्थिनी ठरली आहे. शैक्षणिक प्रवासादरम्यान तिने वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण भागात जाऊन अनुसूचित जाती व जमातीतील महिलांच्या नेतृत्वाचा सखोल अभ्यास केला. तिच्या या कामातून सामाजिक प्रश्नांविषयीची समज आणि बांधिलकी स्पष्टपणे दिसून येते. याच काळात तिची अभिजीत सेन ग्रामीण इंटर्नशिप २०२४ साठी निवड झाली. तसेच टीआयएसएसच्या समाजकार्य शाळेतर्फे दिला जाणारा *क्षेत्रीय कार्यातील उत्कृष्ट विद्यार्थी (समाजकार्य पदव्युत्तर)* हा मानाचा पुरस्कार आणि *एनटीपीसी सुवर्णपदक* प्रदान करण्यात आले. साक्षीचा हा प्रवास केवळ वैयक्तिक यशापुरता मर्यादित नसून, तो ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विशेषतः मुलींसाठी प्रेरणादायी आहे. प्रतिकूल परिस्थितीतही सातत्य, परिश्रम आणि स्पष्ट ध्येय असेल, तर यश नक्की मिळते, हे तिने सिद्ध करून दाखवले आहे. या यशाचे श्रेय साक्षी तिचे आईवडील, प्रा. मंगेश भुताडे, एकलव्य इंडिया फाउंडेशन (EIF) आणि TISS मधील तिच्या शिक्षकांना व या मार्गात सोबत असणार्यांना देते. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल कुटुंबीयांसह सर्व स्तरांतून तिचे अभिनंदन करण्यात येत असून, तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

- Post by Santosh Dhakulkar1
- Post by Amravati News Update1
- Post by Sagar Shinde1
- मूर्तिजापूर: विज्ञानाच्या युगात आजही समाजाला अंधश्रद्धेचा विळखा असल्याचे एक संतापजनक उदाहरण अकोला जिल्ह्यातील निंभा (ता. मूर्तिजापूर) येथे समोर आले आहे. एका भोंदू बाबाने उपचाराच्या नावाखाली लहान मुलांच्या जीवाशी खेळ मांडल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला असून, या प्रकारामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. निंभा गावातील मधु महाराज आणि चेतन महाराज यांच्याकडून हा अघोरी प्रकार सुरू असल्याचे बोलले जात आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक भोंदू बाबा चक्क एका लहान बाळाला आपल्या दातांनी धरून हवेत फिरवताना दिसत आहे. उपचाराच्या नावाखाली सुरू असलेला हा अघोरी प्रकार अत्यंत जीवघेणा असून, यामुळे त्या चिमुरड्याचा जीव धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली होती. कायद्याचा भंग या संदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 'जादू-टोणा विरोधी कायदा' अस्तित्वात आहे. अशा प्रकारे अंधश्रद्धेचा प्रसार करणे आणि अघोरी प्रथांचे पालन करणे हा या कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे. तसेच, ज्या व्यक्तीकडे अधिकृत वैद्यकीय पदवी किंवा परवाना नाही, अशी व्यक्ती उपचार करत असेल तर तो ड्रग्ज अँड मॅजिक रेमिडीज ॲक्ट' अंतर्गतही गुन्हा ठरतो. नागरिकांमध्ये संताप निंभा गावातील या प्रकाराचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. "आजच्या काळातही अशा प्रकारे लहान मुलांच्या जिवाशी खेळ खेळला जाणे दुर्दैवी आहे," अशी भावना व्यक्त होत आहे. या प्रकरणी पोलीस प्रशासन आणि संबंधित विभाग काय कारवाई करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अशा भोंदू बाबांपासून सावध राहण्याचे आवाहनही सुज्ञ नागरिकांकडून केले जात आहे.1
- Post by Varsha fuse mundgoun grampanchayat image4
- Post by Sachin kadukar1
- Post by Shaikh irfan Shaikh isa1
- Post by Varsha fuse mundgoun grampanchayat image1