logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

कायदा माणसासाठी की माणूस कायद्यासाठी? गणेशपुर स्मशानभूमीसाठी पालकमंत्र्यांकडे वनजमिनीची मागणी! तांत्रिक अडचणी बाजूला ठेवून १ हेक्टर जागा हस्तांतरीत करण्याचे साकडे सेनगाव/विश्वनाथ देशमुख "जिवंतपणी तर संघर्ष पाचवीला पुजलेला असतोच,पण मृत्यूनंतरही सन्मानाने अंतिम संस्कार मिळण्यासाठी कायदेशीर लढाई लढावी लागत असेल, तर 'कायदा माणसासाठी की माणूस कायद्यासाठी?'असा संतप्त सवाल विचारण्याची वेळ आली आहे."हीच विदारक आणि वेदनादायी परिस्थिती सध्या सेनगाव तालुक्यातील मौजे गणेशपूर येथील ग्रामस्थ अनुभवत आहेत.गावात हक्काची स्मशानभूमी नसल्याने अंत्यसंस्कार करताना होणारे ग्रामस्थांचे प्रचंड हाल थांबवण्यासाठी आज दि.१७ सप्टेंबर गुरुवार रोजी गणेशपूरच्या गावकऱ्यांनी हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री.नरहरी झिरवाळ साहेब यांची सेनगाव येथे भेट घेतली.तांत्रिक अडचणी बाजूला ठेवून गट क्रमांक ७२ मधील १ हेक्टर वन विभागाची जमीन स्मशानभूमीसाठी त्वरित मंजूर करून हस्तांतरित करण्यात यावी,या मागणीचे निवेदन यावेळी पालकमंत्र्यांना देण्यात आले. गणेशपूर गावामध्ये गोपाळ,आंध,आदिवासी, हट्टकर (धनगर) आणि मातंग समाज यांसारख्या विविध बहुजन आणि वंचित घटकांतील नागरिक पिढ्यानपिढ्या अत्यंत गुण्यागोविंदाने आणि एकजुटीने राहत आहेत.गावात सर्व काही सुरळीत असले,तरी एखाद्या नागरिकाचा मृत्यू झाल्यास संपूर्ण गावावर दुःखासोबतच अंतिम संस्काराची मोठी चिंता पसरते.निवेदनात गावकऱ्यांनी प्रशासकीय यंत्रणेचे डोळे उघडणारा एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे.संबंधित गट क्र. ७२ मधील ही जमीन वन विभागाकडे हस्तांतरित होण्यापूर्वीपासूनच (म्हणजेच पिढ्यानपिढ्या) ग्रामस्थ याच जागेवर अंत्यसंस्कार करत आले आहेत.मात्र,आता वन विभागाच्या तांत्रिक नियमांमुळे आणि लालफितीच्या कारभारामुळे या जागेवर अधिकृत स्मशानभूमी शेड किंवा इतर सोयी-सुविधा निर्माण करता येत नाहीत.पावसाळ्यात उघड्यावर अंत्यविधी करताना मृतदेहांची होणारी विटंबना पाहून गावकऱ्यांचा प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि वन विभागाच्या उदासीनतेमुळे हा प्रश्न वर्षानुवर्षे रेंगाळत पडला आहे.त्यामुळे ग्रामस्थांची ही अनेक वर्षांची बिकट आणि संवेदनशील समस्या लक्षात घेऊन पालकमंत्र्यांनी स्वतः यामध्ये मध्यस्थी करावी आणि विभागीय पातळीवरील सर्व तांत्रिक अडचणी बाजूला सारून ही १ हेक्टर जागा स्मशानभूमीकरिता मंजूर करण्याचे आदेश द्यावेत,अशी आग्रही मागणी पालकमंत्री महोदयांकडे करण्यात आली.निवेदन देतेवेळी गणेशपूरकरांची मोठी एकजूट पाहायला मिळाली.यामध्ये गावाचे सरपंच प्रल्हाद मुरमुरे,गोपाळ समाजहित महासंघाचे राज्य सचिव शेकुराव वाणी,गोपाळ समाजहित महासंघाचे हिंगोली जिल्हा अध्यक्ष कुंडलिक कुऱ्हे,डॉ.सुनील वाणी,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कानबा गायकवाड,युवा नेते दीपक वाणी यांच्यासह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.विभागीय आणि जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधून घेणाऱ्या या संवेदनशील प्रश्नावर आता हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ काय पावले उचलतात आणि गणेशपूरच्या नागरिकांना मृत्यूनंतरचा हक्काचा सन्मान कधी मिळवून देतात,याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

4 hrs ago
user_Vishwanath Deshmukh
Vishwanath Deshmukh
सेनगाव, हिंगोली, महाराष्ट्र•
4 hrs ago
cd3af17c-af46-49f6-9088-74cbc5bd0b01

More news from Hingoli and nearby areas
  • सरकारच्या नियोजित शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात बाधित शेतकऱ्यांचा रोष वाढत चालल सरकारच्या नियोजित शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात बाधित शेतकऱ्यांचा रोष वाढत चालला आहे, आज राज्याचे कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवळ यांचा ध्वजारोहण कार्यक्रमाचा मार्ग रोखून धरत आंदोलन केले,शेतकरी महिला आणि आंदोलक इतके आक्रमक झाले की पोलिसांचे बॅरिकेट फेकून देण्यात आले पोलिसांशी झटापट झाली
    2
    सरकारच्या नियोजित शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात बाधित शेतकऱ्यांचा रोष वाढत चालल
सरकारच्या नियोजित शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात बाधित शेतकऱ्यांचा रोष वाढत चालला आहे, आज राज्याचे कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवळ यांचा ध्वजारोहण कार्यक्रमाचा मार्ग रोखून धरत आंदोलन केले,शेतकरी महिला आणि आंदोलक इतके आक्रमक झाले की पोलिसांचे बॅरिकेट फेकून देण्यात आले पोलिसांशी झटापट झाली
    user_दिपक हैबतराव चोरमले
    दिपक हैबतराव चोरमले
    Local Politician Aundha (Nagnath), Hingoli•
    3 hrs ago
  • धानोरा (जहाँगीर) येथे ७९ व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या ७९ व्या दिनानिमित्त धानोरा (जहाँगीर) ता.कळमनुरी जि.हिंगोली येथील ग्रामपंचायत कार्यालयात तंटामुक्ती अध्यक्ष प्रफुल्ल पाईकराव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तसेच ॲड.रवि शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी,भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, शहीद-ए-आजम भगतसिंग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच तेथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गावचे चेअरमन बंडू कोरडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपसरपंच टोपाजी पोटे, सहशिक्षक भुरके,मगरे, यांच्या सह बाबुराव मस्के,मोतीराम मोरे, मुंजाजी बर्गे,सुभाष सरडे,निस्सारखॉं पठाण,भीमराव पाईकराव,विश्वनाथ जाधव, साहेबराव डोंगरे,कैलास सापनार, रमेश ढबाले,दिनकर पाईकराव,प्रदीप बरडे, सुभाष सापनार,मारोती कोरडे,नामदेव शिंदे ,प्रकाश भुजंगळे, सुहास मस्के,सलीम पठाण,कृष्णा पोटे,गौतम ढबाले, प्रमोद पाईकराव,फैजान पठाण, आकाश पाईकराव,प्रमोद डोंगरे, संदीप पाईकराव,समाधान पाईकराव,शुभम मुळे,हर्षद पाईकराव,अंगणवाडी कर्मचारी फमीदा बेगम,सौ.शोभा चिरमाडे, सौ.नाजुका डोंगरे,रोजगार सेवक सुनील पाईकराव, ग्रामपंचायत सेवक संभा पोटे,संतोष चिरमाडे यांच्यासह ग्रामस्थ तसेच विद्यार्थीची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .
    1
    धानोरा (जहाँगीर) येथे ७९ व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त  ध्वजारोहण
मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या ७९ व्या दिनानिमित्त धानोरा (जहाँगीर) ता.कळमनुरी जि.हिंगोली येथील ग्रामपंचायत कार्यालयात तंटामुक्ती अध्यक्ष प्रफुल्ल पाईकराव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तसेच ॲड.रवि शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी,भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, शहीद-ए-आजम भगतसिंग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 
तसेच तेथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गावचे चेअरमन बंडू कोरडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 
यावेळी उपसरपंच टोपाजी पोटे, सहशिक्षक भुरके,मगरे, यांच्या सह बाबुराव मस्के,मोतीराम मोरे, मुंजाजी बर्गे,सुभाष सरडे,निस्सारखॉं पठाण,भीमराव पाईकराव,विश्वनाथ जाधव, साहेबराव डोंगरे,कैलास सापनार, रमेश ढबाले,दिनकर पाईकराव,प्रदीप बरडे, सुभाष सापनार,मारोती कोरडे,नामदेव शिंदे ,प्रकाश भुजंगळे, सुहास मस्के,सलीम पठाण,कृष्णा पोटे,गौतम ढबाले, प्रमोद पाईकराव,फैजान पठाण, आकाश पाईकराव,प्रमोद डोंगरे, संदीप पाईकराव,समाधान पाईकराव,शुभम मुळे,हर्षद पाईकराव,अंगणवाडी कर्मचारी फमीदा बेगम,सौ.शोभा चिरमाडे, सौ.नाजुका डोंगरे,रोजगार सेवक सुनील पाईकराव, ग्रामपंचायत सेवक संभा पोटे,संतोष चिरमाडे यांच्यासह ग्रामस्थ तसेच  विद्यार्थीची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .
    user_Shankar mulgir
    Shankar mulgir
    Reporter कळमनुरी, हिंगोली, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा गौरव; आर. डी. देशमुख(अण्णा) यांच्या स्मृती अंकाचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते प्रकाशन स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा गौरव; आर. डी. देशमुख(अण्णा) यांच्या स्मृती अंकाचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते प्रकाशन
    1
    स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा गौरव; आर. डी. देशमुख(अण्णा) यांच्या स्मृती अंकाचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते प्रकाशन
स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा गौरव; आर. डी. देशमुख(अण्णा) यांच्या स्मृती अंकाचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते प्रकाशन
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    3 hrs ago
  • सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च, श्री गणेश चतुर्थीच्या धर्तीवर कायदा व सुवेव्यवस्था आभाधित ठेवण्यासाठी पुन्हा सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च संपन्न सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च, श्री गणेश चतुर्थीच्या धर्तीवर कायदा व सुवेव्यवस्था आभाधित ठेवण्यासाठी पुन्हा सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च संपन्न सोनपेठ (दर्शन) :- सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च, श्री गणेश चतुर्थीच्या धर्तीवर कायदा व सुवेव्यवस्था आभाधित ठेवण्यासाठी पुन्हा सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च संपन्न
    1
    सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च, श्री गणेश चतुर्थीच्या धर्तीवर कायदा व सुवेव्यवस्था आभाधित ठेवण्यासाठी पुन्हा सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च संपन्न
सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च, श्री गणेश चतुर्थीच्या धर्तीवर कायदा व सुवेव्यवस्था आभाधित ठेवण्यासाठी पुन्हा सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च संपन्न
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च, श्री गणेश चतुर्थीच्या धर्तीवर कायदा व सुवेव्यवस्था आभाधित ठेवण्यासाठी पुन्हा सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च संपन्न
    user_साप्ताहिक सोनपेठ दर्शन
    साप्ताहिक सोनपेठ दर्शन
    Paper Distributor सोनपेठ, परभणी, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • नियमित व्यायामामुळे स्नायू सक्रिय राहतात आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यास मदत होते.
    1
    नियमित व्यायामामुळे स्नायू सक्रिय राहतात आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यास मदत होते.
    user_Sambhaji Fit Wellness Studio
    Sambhaji Fit Wellness Studio
    Fitness Trainer जाफ्राबाद, जालना, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • अल्लामा इक्बाल शाळेतील कथित गैरप्रकारांविरोधात जिल्हा परिषदेसमोर इम्रान खान यांचे आमरण उपोषण!.. शिक्षक भरतीतील कथित गैरप्रकारांची चौकशी करा; शिक्षण विभागाच्या दिरंगाईविरोधात संताप; अल्लामा इक्बाल शाळेच्या चौकशीसाठी उपोषण!.. अल्लामा इक्बाल शाळेतील कथित गैरप्रकारांविरोधात जिल्हा परिषदेसमोर इम्रान खान यांचे आमरण उपोषण!.. शिक्षक भरतीतील कथित गैरप्रकारांची चौकशी करा; शिक्षण विभागाच्या दिरंगाईविरोधात संताप; अल्लामा इक्बाल शाळेच्या चौकशीसाठी उपोषण!.. तीन नोटिसा, तरीही चौकशीचा अहवाल नाही! अल्लामा इक्बाल शाळेच्या प्रकरणात जिल्हा परिषदेसमोर उपोषण.. शिक्षण अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर नगरसेवक इमरान अमानुल्ला खान यांचे उपोषण स्थगित.. जालना : जुना जालना येथील अल्लामा इक्बाल उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळेतील कथित शिक्षक भरतीतील गैरप्रकार तसेच मुख्याध्यापक व व्यवस्थापनाच्या कथित गैरकारभाराची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, या मागणीसाठी जमियत उल मुस्लिमीन एज्युकेशन सोसायटीचे सदस्य इम्रान खान अमानुल्ला खान यांनी जालना जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या प्रकरणी यापूर्वी 19 ऑगस्ट 2025 रोजी शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक), जिल्हा परिषद जालना यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली होती. शाळेतील शिक्षकांची कथित बेकायदेशीर भरती तसेच इतर प्रशासकीय अनियमिततेबाबत पुरावे व माहितीही सादर केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
    1
    अल्लामा इक्बाल शाळेतील कथित गैरप्रकारांविरोधात जिल्हा परिषदेसमोर इम्रान खान यांचे आमरण उपोषण!..

शिक्षक भरतीतील कथित गैरप्रकारांची चौकशी करा; शिक्षण विभागाच्या दिरंगाईविरोधात संताप; अल्लामा इक्बाल शाळेच्या चौकशीसाठी उपोषण!..

तीन नोटिसा, तरीही चौकशीचा अहवाल नाही! अल्लामा इक्बाल शाळेच्या प्रकरणात जिल्हा परिषदेसमोर उपोषण..
शिक्षण अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर नगरसेवक इमरान अमानुल्ला खान यांचे उपोषण स्थगित..
जालना : जुना जालना येथील अल्लामा इक्बाल उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळेतील कथित शिक्षक भरतीतील गैरप्रकार तसेच मुख्याध्यापक व व्यवस्थापनाच्या कथित गैरकारभाराची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, या मागणीसाठी जमियत उल मुस्लिमीन एज्युकेशन सोसायटीचे सदस्य इम्रान खान अमानुल्ला खान यांनी जालना जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
या प्रकरणी यापूर्वी 19 ऑगस्ट 2025 रोजी शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक), जिल्हा परिषद जालना यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली होती. शाळेतील शिक्षकांची कथित बेकायदेशीर भरती तसेच इतर प्रशासकीय अनियमिततेबाबत पुरावे व माहितीही सादर केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • ST आरक्षणासाठी धनगर समाजाचा एल्गार; महामोर्चास परभणीत जनसागर उसळला ST आरक्षणासाठी धनगर समाजाचा एल्गार; महामोर्चास परभणीत जनसागर उसळला
    1
    ST आरक्षणासाठी धनगर समाजाचा एल्गार; महामोर्चास परभणीत जनसागर उसळला
ST आरक्षणासाठी धनगर समाजाचा एल्गार; महामोर्चास परभणीत जनसागर उसळला
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    8 hrs ago
  • धनगर समाजाच्या निर्णायक महामोर्चा महा मेळाव्यास थोड्याच वेळात शनिवारबाजार परिसरातून सुरुवात होईल;परभणी येथे निर्णायक महामोर्चास जनसागर उसळला धनगर समाजाच्या निर्णायक महामोर्चा महा मेळाव्यास थोड्याच वेळात शनिवारबाजार परिसरातून सुरुवात होईल;परभणी येथे निर्णायक महामोर्चास जनसागर उसळला सोनपेठ (दर्शन) :- परभणी धनगर समाजाच्या निर्णायक महामोर्चा महा मेळाव्यास थोड्याच वेळात शनिवारबाजार परिसरातून सुरुवात होईल. परभणी जिल्ह्यासह परिसरातील जिल्ह्यातूनही धनगर समाजबांधव या महामेळाव्याप्रसंगी एकवटला आहे.
    1
    धनगर समाजाच्या निर्णायक महामोर्चा महा मेळाव्यास थोड्याच वेळात शनिवारबाजार परिसरातून सुरुवात होईल;परभणी येथे निर्णायक महामोर्चास जनसागर उसळला
धनगर समाजाच्या निर्णायक महामोर्चा महा मेळाव्यास थोड्याच वेळात शनिवारबाजार परिसरातून सुरुवात होईल;परभणी येथे निर्णायक महामोर्चास जनसागर उसळला
सोनपेठ (दर्शन) :-
परभणी धनगर समाजाच्या निर्णायक महामोर्चा महा मेळाव्यास थोड्याच वेळात शनिवारबाजार परिसरातून सुरुवात होईल. परभणी जिल्ह्यासह परिसरातील जिल्ह्यातूनही धनगर समाजबांधव या महामेळाव्याप्रसंगी एकवटला आहे.
    user_साप्ताहिक सोनपेठ दर्शन
    साप्ताहिक सोनपेठ दर्शन
    Paper Distributor सोनपेठ, परभणी, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • जालन्यात 78 व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी काढली प्रभात फेरी... देशभक्तीपर जोरदार घोषणांनी परिसर दुमदुमला...जालन्यात 78 व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी काढली प्रभात फेरी... जालन्यात 78 व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी काढली प्रभात फेरी... देशभक्तीपर जोरदार घोषणांनी परिसर दुमदुमला... जालना जिल्हाभरात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा मोठा उत्साह... आज दिनांक 17 गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात 78 व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढलीय. यावेळी लेझिम सादर करत विद्यार्थ्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
    1
    जालन्यात 78 व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी काढली प्रभात फेरी...

देशभक्तीपर जोरदार घोषणांनी परिसर दुमदुमला...जालन्यात 78 व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी काढली प्रभात फेरी...

जालन्यात 78 व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी काढली प्रभात फेरी...
देशभक्तीपर जोरदार घोषणांनी परिसर दुमदुमला...
जालना जिल्हाभरात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा मोठा उत्साह...
आज दिनांक 17 गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात 78 व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढलीय. यावेळी लेझिम सादर करत विद्यार्थ्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.