Shuru
Apke Nagar Ki App…
ST आरक्षणासाठी धनगर समाजाचा एल्गार; महामोर्चास परभणीत जनसागर उसळला ST आरक्षणासाठी धनगर समाजाचा एल्गार; महामोर्चास परभणीत जनसागर उसळला
Sayad Jamil
ST आरक्षणासाठी धनगर समाजाचा एल्गार; महामोर्चास परभणीत जनसागर उसळला ST आरक्षणासाठी धनगर समाजाचा एल्गार; महामोर्चास परभणीत जनसागर उसळला
More news from महाराष्ट्र and nearby areas
- धनगर समाजाच्या निर्णायक महामोर्चा महा मेळाव्यास थोड्याच वेळात शनिवारबाजार परिसरातून सुरुवात होईल;परभणी येथे निर्णायक महामोर्चास जनसागर उसळला धनगर समाजाच्या निर्णायक महामोर्चा महा मेळाव्यास थोड्याच वेळात शनिवारबाजार परिसरातून सुरुवात होईल;परभणी येथे निर्णायक महामोर्चास जनसागर उसळला सोनपेठ (दर्शन) :- परभणी धनगर समाजाच्या निर्णायक महामोर्चा महा मेळाव्यास थोड्याच वेळात शनिवारबाजार परिसरातून सुरुवात होईल. परभणी जिल्ह्यासह परिसरातील जिल्ह्यातूनही धनगर समाजबांधव या महामेळाव्याप्रसंगी एकवटला आहे.1
- पहाटे ३ वाजता पाटोद्यात बाप-लेकाची भेट;संघर्ष योध्दा मनोजदादा जरांगे पाटील आणि त्यांच्या वडिलांमधील भावनिक क्षण! सेनगाव/विश्वनाथ देशमुख मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी अहोरात्र महाराष्ट्र पिंजून काढणारे मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे वडील रावसाहेब जरांगे यांच्यातील भेटीचा एक अत्यंत भावूक क्षण बीडमधील पाटोदा नगरीत पाहायला मिळाला. मध्यरात्र उलटून गेल्यानंतर पहाटे ठीक तीन वाजता झालेल्या या दोन मिनिटांच्या भेटीने उपस्थितांचे डोळे पाणावले. मराठा आरक्षणाच्या संवाद दौऱ्यादरम्यान मनोज जरांगे पाटील यांचे पाटोदा येथे मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास आगमन झाले. एवढ्या उशिराही त्यांना ऐकण्यासाठी हजारो बांधवांनी मोठी गर्दी केली होती. रात्री अडीच वाजेपर्यंत सभा आटोपल्यानंतर,पहाटे तीनच्या सुमारास मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी त्यांचे वडील स्वतः त्या ठिकाणी पोहोचले. दिवस-रात्र समाजाच्या हक्कासाठी प्रकृतीची पर्वा न करता लढणाऱ्या मुलाला समोर पाहून वडिलांचे डोळे भरून आले.तर वडिलांना समोर पाहताच मनोज जरांगे यांच्या चेहऱ्यावरही कमालीचे भाव दाटून आले.या दोन-तीन मिनिटांच्या संक्षिप्त भेटीत दोघांमध्ये फारसे शब्द बोलले गेले नाहीत;पण बापाने मुलाच्या पाठीवर टाकलेली मायेची थाप आणि दोघांच्या डोळ्यांतील मूक संवाद शब्दांच्या पलीकडचा होता. लाखो बांधवांसाठी लढणाऱ्या नेत्याला पहाटेच्या शांततेत मिळालेली ही पित्याची साथ सध्या सर्वत्र चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरत आहे.1
- पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी केली सेनगाव परिसरात नुकसानग्रस्त भागाची पाहणी सेनगाव तालुक्यातील नागा सिनगी येथील रहिवासी असलेले शेतकरी नेते मारोती गीते यांच्या मागण्याची अखेर शासनाच्या वतीने दखल घेण्यात आली असून हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकरी नेते मारोती गिते यांच्या सेनगाव परिसरात असलेल्या शेतातील नुकसानग्रस्त भागाची पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी पाहणी केली. यावेळी तात्काळ शेतकऱ्यांना 100% पीक विमा व सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 1 लाख रुपये आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी नेते मारोती गीते यांनी निवेदनाद्वारे पालकमंत्र्यांकडे केली आहे. यावेळी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पालकमंत्री नरहरी झिरवळ हे आजेगाव कडून सेनगावच्या दिशेने जात असताना मारोती गीते यांनी सेनगाव परिसरातील आपल्या शेतात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याची विनंती पालकमंत्र्यांना केली. यावेळी पालकमंत्र्यांनी त्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली यावेळी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकरी नेते मारोती गीते यांच्या कार्याचे कौतुक देखील पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी केले. हिंगोली जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील सोयाबीन सह पिके धोक्यात सापडुन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून पावसाअभावी पिके वाळून जात आहेत. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी निवेदनाद्वारे शेतकरी नेते मारोती गीते यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती अखेर त्यांच्या मागणीला यश आले असून पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी आज शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला आहे.1
- रिसोड तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; हेक्टरी १ लाखांची मदत द्या! रिसोड, ता. 17 : पावसाने दडी मारल्याने रिसोड तालुक्यातील खरीप हंगामातील पिकांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. अनेक भागांत सोयाबीनसह इतर पिके पाण्याअभावी सुकून करपली असून, शेतकऱ्यांच्या हातातून यंदाचा हंगाम अक्षरशः निसटण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे रिसोड तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी किमान १ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला पावसाने चांगली हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने पिकांना निर्णायक अवस्थेत पाण्याचा ताण बसला. शेतातील सोयाबीनची पाने पिवळी पडून झाडे सुकू लागली आहेत. काही ठिकाणी पिकांची वाढ खुंटली असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. बियाणे, खत, मशागत, मजुरी आणि औषधांवर मोठा खर्च करूनही हातात काहीच उरणार नाही, अशी चिंता शेतकरी व्यक्त करीत आहेत. आधीच वाढलेला उत्पादन खर्च, बाजारातील अनिश्चित दर आणि आता पावसाच्या दडीमुळे शेतकरी आर्थिक संकटाच्या कचाट्यात सापडला आहे.2
- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त तहसील कार्यालयात वृक्षारोपण उपक्रम उत्साहात (मुखेड :- प्रतिनिधी) मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त आज दि. १७ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालय परिसरात वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. तुषार राठोड हे उपस्थित होते. यावेळी तहसीलदार अभयराय नंजुडे, पुरवठा अधिकारी, नायब तहसीलदार यांच्यासह तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन करून ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर तहसील कार्यालयाच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार डॉ. तुषार राठोड म्हणाले की, "मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. त्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून आपण पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला पाहिजे. एक झाड लावणे हीच खरी आदरांजली ठरेल." तहसीलदार अभयराय नंजुडे यांनी देखील उपस्थितांना वृक्ष संवर्धन करण्याचे आवाहन केले. हा उपक्रम अतिशय उत्साहात आणि पर्यावरणपूरक संदेश देत पार पडला. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त तहसील कार्यालयात वृक्षारोपण उपक्रम उत्साहात (मुखेड :- प्रतिनिधी) मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त आज दि. १७ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालय परिसरात वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. तुषार राठोड हे उपस्थित होते. यावेळी तहसीलदार अभयराय नंजुडे, पुरवठा अधिकारी, नायब तहसीलदार यांच्यासह तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन करून ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर तहसील कार्यालयाच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार डॉ. तुषार राठोड म्हणाले की, "मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. त्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून आपण पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला पाहिजे. एक झाड लावणे हीच खरी आदरांजली ठरेल." तहसीलदार अभयराय नंजुडे यांनी देखील उपस्थितांना वृक्ष संवर्धन करण्याचे आवाहन केले. हा उपक्रम अतिशय उत्साहात आणि पर्यावरणपूरक संदेश देत पार पडला.3
- “ही शेवटची भेट असू शकते… पण हार मानायची नाही!”; जरांगे पाटील मुंबईकडे निघताना कुटुंबीयांच्या डोळ्यांत अश्रू “ही शेवटची भेट असू शकते… पण हार मानायची नाही!”; जरांगे पाटील मुंबईकडे निघताना कुटुंबीयांच्या डोळ्यांत अश्रू “या बहिणीच्या डोळ्यांतील अश्रू सरकारला दिसत नाहीत का?”; पत्नी सौमित्रा यांची भावनिक साद अंतरवाली सराटी | ओमप्रकाश उढाण मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील आज मंगळवारी मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मात्र मुंबईकडे निघण्यापूर्वी कुटुंबीयांची घेतलेली भेट अत्यंत भावनिक ठरली. जरांगे पाटील यांना निरोप देण्यासाठी त्यांचे कुटुंबीय रस्त्यावर आले होते. या भेटीच्या वेळी कुटुंबातील प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू तरळले आणि स्वतः जरांगे पाटील यांनाही अश्रू अनावर झाले. कालच्या पत्रकार परिषदेतही जरांगे पाटील भावूक झाले होते. “ही माझी शेवटची भेट असू शकते; पण हार मानायची नाही. जातवान लढा, समाजाची हार होऊ देऊ नका,” असे आवाहन त्यांनी समाजाला केले होते. त्यांच्या या शब्दांची छाया आज कुटुंबीयांच्या निरोपाच्या क्षणीही स्पष्टपणे जाणवली. जरांगे पाटील यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत, “मेला पण शरण नाही गेला, असा संदेश समाजात गेला पाहिजे. छातीवर गोळ्या घेतल्या, पळून नाही गेला, असे वाटले पाहिजे,” अशी भावना व्यक्त केली. तसेच, “जोपर्यंत मी जगेन, तोपर्यंत झुंज देतो. माझ्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून गावागावात शांतता फेऱ्या काढा,” असे आवाहनही त्यांनी केले. आपल्या संघर्षाची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी, “दगा-फटका कधी कुणासोबत होईल सांगता येत नाही. संकट कितीही आले आणि शत्रू कितीही मोठा असला तरी मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे,” असे ठामपणे सांगितले. पत्नी सौमित्रा यांची अमृता फडणवीस यांना भावनिक साद दरम्यान, मनोज जरांगे पाटील आणि अमृता फडणवीस यांच्यात गेल्या काही दिवसांपासून बहीण-भाऊ या नात्याचा उल्लेख होत असताना आता जरांगे पाटील यांच्या पत्नी सौमित्रा यांनीही भावनिक साद घातली आहे. “पाटलाच्या कुटुंबीयांची अवस्था पाहूनही सरकारला पाझर फुटत नसेल, तर महाराष्ट्रातील माय-बहिणींना ‘लाडकी बहीण’ म्हणण्याचा सरकारला अधिकार नाही. सरकारला या बहिणीच्या डोळ्यांतील अश्रू दिसत नाहीत का?” असा भावनिक सवाल या निमित्ताने उपस्थित करण्यात आला. मुंबईकडे रवाना होताना पतीला निरोप देताना पत्नीच्या डोळ्यांत तरळलेले अश्रू आणि कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर दिसणारी चिंता पाहून उपस्थितांचेही मन हेलावून गेले. संघर्षाच्या वाटेवर निघालेल्या एका पतीला, वडिलांना आणि कुटुंबप्रमुखाला निरोप देतानाचा हा क्षण अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणणारा ठरला. एका बाजूला आरक्षणासाठीचा संघर्ष आणि दुसऱ्या बाजूला कुटुंबीयांच्या डोळ्यांत दाटलेले अश्रू… जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे रवाना होण्याचा हा क्षण आंदोलनाच्या इतिहासातील अत्यंत भावनिक क्षण ठरला आहे. “वापस आलो नाही, तर समाजाला दोष देऊ नका…”; कुटुंबीयांशी भावनिक संवाद साधत जरांगे पाटलांची मुंबईकडे कुच.. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज, १५ सप्टेंबर रोजी मुंबईच्या दिशेने कुच केली. मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी त्यांनी कुटुंबीयांशी भावनिक संवाद साधला. यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, “वापस आलो नाही, तर समाजाला दोष देऊ नका. लेकरांना कुणाच्या दारात जाऊ देऊ नका. गरज पडली तर रान विकून मुलीचं लग्न करा…” त्यांच्या या भावनिक शब्दांमुळे उपस्थित वातावरण गंभीर झाले.3
- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न परभणी जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबध्द - पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर संभाव्य दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्यशासन तत्पर सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवणार मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न परभणी जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबध्द - पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर संभाव्य दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्यशासन तत्पर सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवणार सोनपेठ (दर्शन) : - मराठवाडा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून मिळालेले स्वातंत्र्य आणि लोकशाही मुल्यांची जपवणूक करत परभणी जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाला गती देण्यासाठी शासन कटीबध्द आहे, असे प्रतिपादन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमप्रसंगी केले. जिल्हयात पर्जन्यमानात घट झाली असली, तरी शेतकऱ्यांनी संभाव्य टंचाईच्या परिस्थितीला घाबरु नये. शेतकऱ्यांच्या प्रत्येक अडचणीत शासन खंबीरपणे पाठीशी असून आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्यात येतील, असा दिलासाही पालकमंत्री यांनी दिला. तसेच सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून तळगाळातील लोकांपर्यंत शासनाच्या योजना व सेवा निश्चितपण पोहोचविल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. परभणी येथील सी. राजगोपालचारी उद्यानात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर सय्यद इक्बाल, जिल्हा परिषद अध्यक्षा लता वाकळे, खासदार संजय जाधव, उपमहापौर गणेश देशमुख, जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर, अपर जिल्हाधिकारी शोभादेवी जाधव, अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, स्वातंत्र्य सैनिक यांच्यासह वीरपत्नी, वीर माता-पिता, विद्यार्थी, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. यावेळी पोलीस पथकाने शोक धून वाजवून हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली. पालकमंत्री म्हणाल्या की, मराठवाडा मुक्तीसंग्राम हा केवळ संस्थानाच्या विलिनीकरणाचा नव्हे तर, प्रादेशिक अखंडता, स्वातंत्र्य व सामाजिक हक्कासाठीचा लढा होता. स्वातंत्र्यसैनिकांच्या या त्यागाची जाणीव ठेवून मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वांनी योगदान देणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकिर्दीला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आजपासून महिनाभर जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. ‘सेवा परमोधर्म’ या भावनेतून शासनाच्या विविध योजना व सेवांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविणे, जनसहभाग वाढविणे आणि विविध क्षेत्रातील विकासकामांची माहिती या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोचविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पालकमंत्री पुढे म्हणाल्या की, राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ योजनेंतर्गत परभणी जिल्ह्यातील ५२ हजार ५८३ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये आतापर्यंत ४०८ कोटी रुपये जमा केले आहेत. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्येही लवकरच रक्कम जमा होणार आहे. योजनेतील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात येत असून, पात्र शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. चालू खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ५ लाख २३ हजार शेतकऱ्यांनी ३ लाख ६१ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके विमा काढून संरिक्षत केली आहेत. तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत जिल्ह्यातील १७३ गावांची निवड करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत १ हजार २९८ लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर ५६ लाख रुपयांचे अनुदान जमा केले आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत असून, शेतकऱ्यांनी त्यांचा लाभ घेऊन शेती अधिक सक्षम व समृद्ध करावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. ‘सेवा संकल्प अभियान’ हे शासनाच्या योजना व सेवा नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच शेतकरी, युवक, महिला, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विकासाच्या संधी अधिक सुलभ करण्याचे माध्यम ठरणार आहे. नागरिकांनी अभियानातील विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर यांनी केले. ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत आजपासून जिल्ह्यात ‘क्षयरोगमुक्त परभणी जिल्हा व नेत्र तपासणी अभियान’ राबविण्यात येणार आहे. तसेच श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आरोग्य सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. गणेश मंडळांनी या सामाजिक उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा तसेच नागरिकांनीही आयोजित आरोग्य शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. परभणी ग्रोथ हबच्या माध्यमातून नुकतीच जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद पार पडली. परभणीच्या उद्योग विकासासाठी सोळाशे कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीचे प्रस्ताव दाखल केले असून, सुमारे 162 उद्योग घटकांनी सामंजस्य करार केले आहेत. या गुंतवणुकीच्या माध्यमातून 15 हजारांपेक्षा अधिक रोजगारनिर्मिती होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे ही गुंतवणूक जिल्ह्यातील युवकांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणार असल्याचे पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले. परभणी जिल्ह्यातील चालुक्य व यादवकालीन मंदिरे, बारवा, साईबाबा व संत जनाबाई यांची जन्मस्थळे असून, सेाबतच जांभूळबेटसारखी नैसर्गिक पर्यटनस्थळे आहेत. या पर्यटनस्थळांना देशपातळीवर प्रसिद्धी देण्यासाठी विमानतळे तसेच महत्त्वाच्या ठिकाणी दर्शनीय भागात याबाबतची माहिती देण्यात येणार आहे. तसेच पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक युवकांना गाईड म्हणून रोजगार, तसेच न्याहारी, निवास, स्थानिक उत्पादने आणि कृषी पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. आरोग्य, ऊर्जा, महिला व बालविकास, शिक्षण, कौशल्य विकास, उद्योजकता व रोजगार या क्षेत्रात जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणासाठी विविध कामे प्रगतीपथावर आहेत. जिल्हा रुग्णालयातील नवीन कॅथलॅब लवकरच सुरु होईल तर गंगाखेड व सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये प्रत्येकी 10 खाटांचे नवीन आयसीयू कार्यान्वित झाले आहेत. जिंतूर व बोरी येथील ग्रामीण रुग्णालयांतील प्रसूती कक्षांचे अद्यावतीकरण आणि सेलू येथील नवीन स्त्री रुग्णालय, मानवत ग्रामीण रुग्णालयाचे 50 खाटांमध्ये श्रेणीवर्धनही लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभा’अंतर्गत दि. 29 रोजी परभणी जिल्ह्यात 13 रोजगार मेळावे घेण्यात येणार असून, यामध्ये युवक-युवतींना विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले. ध्वजारोहणाच्या मुख्य कार्यक्रमानंतर पालकमंत्री मेघना साकोरे -बोर्डीकर यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, शहीद जवान यांच्या वीरमाता, वीरपत्नी, त्यांचे वारस आणि उपस्थित नागरिकांची भेट घेऊन मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक बडगुजर यांनी केले.1
- पावसाने फिरवली पाठ;सेनगावच्या शेतकऱ्याचे सुकळी खुर्द शिवारातील ४ एकर सोयाबीन जळून खाक,महसुल विभाग पंचनाम्यासाठी कधी पाऊल उचलणार? सेनगाव/विश्वनाथ देशमुख निसर्गाच्या लहरीपणाचा आणि पावसाच्या खंडामुळे खरीप हंगामातील पिके डोळ्यादेखत करपून जाण्याच्या घटना वाढल्या आहेत.सेनगाव येथील एका शेतकऱ्याचे उभे पीक पाऊस न पडल्याने जळून खाक झाले आहे.पावसाने ऐन गरजेच्या वेळी पाठ फिरवल्यामुळे सेनगाव येथील रहिवासी असलेले शेतकरी लक्ष्मण रामराव देशमुख यांच्या सुकळी खुर्द शिवारातील तब्बल चार एकर क्षेत्रातील सोयाबीनचे पीक पूर्णपणे वाळून नष्ट झाले आहे.शेती सुकळी शिवारात असली तरी देशमुख हे सेनगाव शहरात राहून तिथूनच शेतीचा संपूर्ण कारभार पाहत होते.या कोरड्या दुष्काळामुळे देशमुख यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून,त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे.मात्र,या गंभीर परिस्थितीनंतरही प्रशासनाकडून कोणतीही हालचाल न झाल्याने 'महसूल विभाग पंचनाम्यासाठी कधी पाऊल उचलणार?'असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. चालू खरीप हंगामाच्या सुरुवातीला बऱ्यापैकी पाऊस झाल्याने शेतकरी लक्ष्मण देशमुख यांनी मोठ्या आशेने सुकळी खुर्द शिवारातील आपल्या गट क्रमांक १०९ मधील चार एकर शेतात सोयाबीनची पेरणी केली होती.बियाणे,खते,कोळपणी आणि खुरपणीसाठी हजारो रुपयांचे कर्ज काढून त्यांनी पिकाला पोटच्या पोरासारखे सांभाळले.पीक जोमात असतानाच अचानक पावसाने दीर्घकाळ दडी मारली.कडक ऊन आणि पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे अखेर हे उभे पीक करपून गेले.या दुर्दैवी घटनेमुळे सेनगाव आणि सुकळी खुर्द परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.आधीच संकटात असलेल्या बळीराजाला आता शासनाच्या आधाराची अत्यंत गरज आहे.पिकाचे नुकसान होऊन दिवस उलटत चालले तरी महसूल विभाग किंवा कृषीऐ विभागाचा एकही अधिकारी सुकळी शिवाराकडे फिरकलेला नाही.त्यामुळे महसूल आणि कृषी विभागाने या गंभीर नुकसानीची दखल घेऊन तातडीने संयुक्त पंचनामा करावा आणि पीडित शेतकरी लक्ष्मण रामराव देशमुख यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी विशेष सरकारी मदत व पीक विमा मंजूर करावा,अशी जोरदार मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. "कर्ज काढून पोटाच्या पोरासारखं सोयाबीन सांभाळलं,पण पावसाने दगा दिला अन डोळ्यादेखत सोन्यासारखं रान जळून कोळसा झालं! चार एकरात आता फक्त काळ्या काड्या उरल्यात.हे उध्वस्त रान पाहताना काळजाचा तुकडा तुटल्यागत वेदना होत आहेत.कर्ज कसं फेडू आणि लेकरांना काय खायला घालू? पीक जळून राख झाली तरी अधिकारी अजून बांधावर आले नाहीत.सरकारने तातडीने मदत दिली नाही,तर आमच्यावर फाशी घेण्याशिवाय पर्याय उरणार नाही!" — लक्ष्मण रामराव देशमुख (पीडित शेतकरी,सेनगाव)1
- नांदेड रोडवर चालत्या कारवर वडाचे झाड कोसळले; चालक सुखरूप, कारचे मोठे नुकसान. नांदेड रोडवर चालत्या कारवर वडाचे झाड कोसळले; चालक सुखरूप, कारचे मोठे नुकसान. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर 2026. नांदेड रोडवरील कृपासदन शाळा परिसरात बुधवार दिनांक 16 सप्टेंबर 2026 रोजी एक मोठी दुर्घटना टळली. रस्त्यावरून जात असलेल्या एका चालत्या कारवर अचानक रस्त्याच्या कडेला असलेले जुने वडाचे झाड कोसळले. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असले, तरी सुदैवाने कारचालक यातून सुखरूप बचावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड रोडवरील कृपासदन परिसराकडून एक कार (क्रमांक एमएच 02 इझेड 2579) शहराच्या दिशेने जात होती. कार कृपासदन शाळेजवळ आली असता, अचानक रस्त्याच्या बाजूला असलेले एक भलेमोठे वडाचे झाड चालत्या कारच्या पुढील भागावर कोसळले. झाड पडल्याचा जोरदार आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी प्रसंगावधान राखून कारमध्ये अडकलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढले. झाड थेट कारच्या बोनेटवर व टपाच्या समोरील भागावर पडल्याने कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. वाहतूक विस्कळीत. मुख्य रस्त्यावरच झाड कोसळल्यामुळे नांदेड रोडवरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच महापालिका प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी पोहोचून रस्ता साफ करण्याचे काम सुरू केले. क्रेन आणि कटरच्या साहाय्याने झाडाच्या फांद्या बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. जुनी झाडे हटवण्याची मागणी या परिसरात रस्त्याच्या कडेला असलेली अनेक झाडे अत्यंत जुनी व धोकादायक झाली आहेत. प्रशासनाने अशा धोकादायक झाडांची त्वरित पाहणी करून ती हटवावीत, जेणेकरून भविष्यात अशा घटना पुनरावृत्त होणार नाहीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी व वाहनधारकांनी केली आहे.4