नांदेड रोडवर चालत्या कारवर वडाचे झाड कोसळले; चालक सुखरूप, कारचे मोठे नुकसान. नांदेड रोडवर चालत्या कारवर वडाचे झाड कोसळले; चालक सुखरूप, कारचे मोठे नुकसान. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर 2026. नांदेड रोडवरील कृपासदन शाळा परिसरात बुधवार दिनांक 16 सप्टेंबर 2026 रोजी एक मोठी दुर्घटना टळली. रस्त्यावरून जात असलेल्या एका चालत्या कारवर अचानक रस्त्याच्या कडेला असलेले जुने वडाचे झाड कोसळले. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असले, तरी सुदैवाने कारचालक यातून सुखरूप बचावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड रोडवरील कृपासदन परिसराकडून एक कार (क्रमांक एमएच 02 इझेड 2579) शहराच्या दिशेने जात होती. कार कृपासदन शाळेजवळ आली असता, अचानक रस्त्याच्या बाजूला असलेले एक भलेमोठे वडाचे झाड चालत्या कारच्या पुढील भागावर कोसळले. झाड पडल्याचा जोरदार आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी प्रसंगावधान राखून कारमध्ये अडकलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढले. झाड थेट कारच्या बोनेटवर व टपाच्या समोरील भागावर पडल्याने कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. वाहतूक विस्कळीत. मुख्य रस्त्यावरच झाड कोसळल्यामुळे नांदेड रोडवरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच महापालिका प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी पोहोचून रस्ता साफ करण्याचे काम सुरू केले. क्रेन आणि कटरच्या साहाय्याने झाडाच्या फांद्या बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. जुनी झाडे हटवण्याची मागणी या परिसरात रस्त्याच्या कडेला असलेली अनेक झाडे अत्यंत जुनी व धोकादायक झाली आहेत. प्रशासनाने अशा धोकादायक झाडांची त्वरित पाहणी करून ती हटवावीत, जेणेकरून भविष्यात अशा घटना पुनरावृत्त होणार नाहीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी व वाहनधारकांनी केली आहे.
नांदेड रोडवर चालत्या कारवर वडाचे झाड कोसळले; चालक सुखरूप, कारचे मोठे नुकसान. नांदेड रोडवर चालत्या कारवर वडाचे झाड कोसळले; चालक सुखरूप, कारचे मोठे नुकसान. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर 2026. नांदेड रोडवरील कृपासदन शाळा परिसरात बुधवार दिनांक 16 सप्टेंबर 2026 रोजी एक मोठी दुर्घटना टळली. रस्त्यावरून जात असलेल्या एका चालत्या कारवर अचानक रस्त्याच्या कडेला असलेले जुने
वडाचे झाड कोसळले. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असले, तरी सुदैवाने कारचालक यातून सुखरूप बचावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड रोडवरील कृपासदन परिसराकडून एक कार (क्रमांक एमएच 02 इझेड 2579) शहराच्या दिशेने जात होती. कार कृपासदन शाळेजवळ आली असता, अचानक रस्त्याच्या बाजूला असलेले एक भलेमोठे वडाचे झाड चालत्या कारच्या पुढील भागावर कोसळले. झाड पडल्याचा जोरदार आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी
तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी प्रसंगावधान राखून कारमध्ये अडकलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढले. झाड थेट कारच्या बोनेटवर व टपाच्या समोरील भागावर पडल्याने कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. वाहतूक विस्कळीत. मुख्य रस्त्यावरच झाड कोसळल्यामुळे नांदेड रोडवरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच महापालिका प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी पोहोचून रस्ता
साफ करण्याचे काम सुरू केले. क्रेन आणि कटरच्या साहाय्याने झाडाच्या फांद्या बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. जुनी झाडे हटवण्याची मागणी या परिसरात रस्त्याच्या कडेला असलेली अनेक झाडे अत्यंत जुनी व धोकादायक झाली आहेत. प्रशासनाने अशा धोकादायक झाडांची त्वरित पाहणी करून ती हटवावीत, जेणेकरून भविष्यात अशा घटना पुनरावृत्त होणार नाहीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी व वाहनधारकांनी केली आहे.
- नांदेड रोडवर चालत्या कारवर वडाचे झाड कोसळले; चालक सुखरूप, कारचे मोठे नुकसान. नांदेड रोडवर चालत्या कारवर वडाचे झाड कोसळले; चालक सुखरूप, कारचे मोठे नुकसान. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर 2026. नांदेड रोडवरील कृपासदन शाळा परिसरात बुधवार दिनांक 16 सप्टेंबर 2026 रोजी एक मोठी दुर्घटना टळली. रस्त्यावरून जात असलेल्या एका चालत्या कारवर अचानक रस्त्याच्या कडेला असलेले जुने वडाचे झाड कोसळले. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असले, तरी सुदैवाने कारचालक यातून सुखरूप बचावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड रोडवरील कृपासदन परिसराकडून एक कार (क्रमांक एमएच 02 इझेड 2579) शहराच्या दिशेने जात होती. कार कृपासदन शाळेजवळ आली असता, अचानक रस्त्याच्या बाजूला असलेले एक भलेमोठे वडाचे झाड चालत्या कारच्या पुढील भागावर कोसळले. झाड पडल्याचा जोरदार आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी प्रसंगावधान राखून कारमध्ये अडकलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढले. झाड थेट कारच्या बोनेटवर व टपाच्या समोरील भागावर पडल्याने कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. वाहतूक विस्कळीत. मुख्य रस्त्यावरच झाड कोसळल्यामुळे नांदेड रोडवरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच महापालिका प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी पोहोचून रस्ता साफ करण्याचे काम सुरू केले. क्रेन आणि कटरच्या साहाय्याने झाडाच्या फांद्या बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. जुनी झाडे हटवण्याची मागणी या परिसरात रस्त्याच्या कडेला असलेली अनेक झाडे अत्यंत जुनी व धोकादायक झाली आहेत. प्रशासनाने अशा धोकादायक झाडांची त्वरित पाहणी करून ती हटवावीत, जेणेकरून भविष्यात अशा घटना पुनरावृत्त होणार नाहीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी व वाहनधारकांनी केली आहे.4
- दिव्यांग व्यक्ती तपासणीची होत आहे गैरसोय.!! तपासणीसाठी उपकरणे,विशेषतज्ञ लातूरला मग तपासणी देखावे येथे कशाला?? निलंगा उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग व्यक्तींची होत आहे गैरसोय..!! तपासणी टीम चे वेळ निश्चित नाही!! महिन्यातून दोन दिवस निलंगा तालुक्यातील दिव्यांगाना तपासाला यायला सुद्धा विशेषतज्ञाना वेळ नाही?1
- एल. आर. के. इंग्लिश स्कूलमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात; जिल्हास्तरीय खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार एल. आर. के. इंग्लिश स्कूलमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात; जिल्हास्तरीय खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार सोनपेठ (दर्शन) :- सोनपेठ येथील एल. आर. के. इंग्लिश स्कूलमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित सोहळ्यात सोनपेठचे नगरसेवक मा.अब्दुल रहेमान सौदागर यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण अत्यंत सन्मानपूर्वक संपन्न झाले. त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.याच कार्यक्रमाचे औचित्य साधून तालुकास्तरीय बुद्धीबळ आणि कॅरम स्पर्धेत अव्वल स्थान मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेले खेळाडू जान्हवी अशोक रोडे, निनाद गोविंद वाकणकर, दिप उद्धव भोसले, अलफिया अतिक सय्यद, अर्शिया फारूक सय्यद, श्रेयस सतीश काटे, सार्थक संजय फपाळ, अनन्या रामेश्वर गव्हाणे.या सर्व विजेत्यांचे हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा नगराध्यक्ष मा.परमेश्वर भैय्या कदम, कोषाध्यक्ष मा. रामेश्वर कदम, उपाध्यक्षा सौ.ज्योतीताई कदम, संपादक किरण रमेश स्वामी व मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन विशेष स्वागत व कौतुक करण्यात आले.या सोहळ्याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या सौ.पल्लवी यादव, प्राचार्य श्री. प्रशांत कांबळे, किड्स विभागाच्या प्राचार्या सौ.अनिता कंदे यांच्यासह सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.3
- ST आरक्षणासाठी परभणीत महामोर्चाची हाक; धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – सुरेश भुमरे ST आरक्षणासाठी परभणीत महामोर्चाची हाक; धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – सुरेश भुमरे1
- शेतकऱ्यांची व्यथा मुलाने साडी नेसून म्हशीचे दूध काढण्याचा केला प्रयत्न आई वडील काही कामानिमित्त गावी गेले असता म्हैस दूध देत नाही हे पाहून. मुलांनी रोज आई दूध कशी काढते. याचा विचार करून साडी नेसून काढण्याचा प्रयत्न केला .पण तो फेल झाला .ही व्यथा जरी हसण्यासारखी असली तरी याच्यातून शेतकऱ्याची व्यथा नक्की करते1
- पीक नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार - पालकमंत्री नरहरी झिरवाळ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्र्यांनी केली पीक पाहणी हिंगोली :जिल्ह्यात मागील 20 ते 25 दिवसांपासून पावसाचा प्रदीर्घ खंड पडल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला असून, सोयाबीन, कापूस व तूर पिकांवर ओलावा ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे पिकांच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. पिकांच्या नुकसानीसाठी शासन स्तरावर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा विशेष सहाय्य मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले. सेनगाव तालुक्यातील मन्नास पिंपरी येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी सोयाबीन पिकाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलीस अधिक्षक श्रेणीक लोढा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, तहसीलदार सखाराम मांडवगडे गटविकास अधिकारी सुरेश कांबळे, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. सेनगाव तालुक्यात सोयाबीन पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. सध्या सोयाबीन पीक शेंगा लागणे व दाणे भरणे या उत्पादनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अवस्थेत आहे. मात्र, या कालावधीत पावसाचा खंड पडल्याने पिकांमध्ये तीव्र ओलावा ताण निर्माण झाला आहे. प्रत्यक्ष पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी सोयाबीन पिकाची वाढ खुंटलेली, पाने फिकट पडलेली, पिके कोमेजलेली तसेच काही ठिकाणी पाने करपण्याच्या स्थितीत असल्याचे निदर्शनास आले. पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी सेनगाव तालुक्यातील शेषेराव मोतीराम मोरे, शेख जाफर शेख दाउद, शेख मुजीब, शेख वाजीद शेख कौसर आणि सुभाष दत्तराम पारिस्कर या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पीक परिस्थिती व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. “शेतकऱ्यांनी खचून न जाता धीर धरावा. शासन त्यांच्या पाठीशी आहे,” असे सांगत पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. जिल्ह्यातील प्रदीर्घ पावसाच्या खंडामुळे निर्माण झालेल्या पीक परिस्थितीचा संपूर्ण अहवाल शासनास सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे यांना दिल्या.1
- आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावरील घाण पाण्याच्या मुद्द्यावर आंदोलन; आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर धम्मानंद वाघमारे पोलिसांच्या ताब्यात आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावरील घाण पाण्याच्या मुद्द्यावर आंदोलन; आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर धम्मानंद वाघमारे पोलिसांच्या ताब्यात बीड | प्रतिनिधी बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावर नालीचे दूषित पाणी सोडल्याच्या कथित घटनेप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे दलित पँथरचे बीड जिल्हाध्यक्ष धम्मानंद वाघमारे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू होते. प्रशासनाकडून मागण्यांवर कारवाई न झाल्यास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमोर १७ सप्टेंबर रोजी आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा वाघमारे यांनी निवेदनातून दिला होता. १४ एप्रिल २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बीड शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणूक मार्गावर नालीचे दूषित व घाण पाणी सोडण्यात आल्याचा आरोप धम्मानंद वाघमारे यांनी केला आहे. या प्रकारामुळे आंबेडकर अनुयायांच्या भावना दुखावल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणी बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, उपनगराध्यक्ष, स्वच्छता सभापती आणि बांधकाम सभापती यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे. तक्रार करून सुमारे सहा महिने उलटूनही संबंधितांवर कायदेशीर कारवाई झालेली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी घाण पाणी सोडण्यास जबाबदार असलेल्या अधिकारी व लोकप्रतिनिधींवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रॉसिटी अॅक्ट) गुन्हा दाखल करावा, तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींचे राजीनामे घेण्यात यावेत, अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे. प्रशासनाने १६ सप्टेंबरपर्यंत कारवाई न केल्यास १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमोर आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू असताना पोलिसांनी धम्मानंद वाघमारे यांना ताब्यात घेतले. दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची अधिकृत चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे. पोलिसांनी वाघमारे यांना कोणत्या कारणास्तव ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध होणे अपेक्षित आहे.1
- लातूरमध्ये परळीच्या तरुणाचा भररस्त्यात चाकू भोसकून खून; परळीतील नगरसेवकासह तिघे फरार. लातूरमध्ये परळीच्या तरुणाचा भररस्त्यात चाकू भोसकून खून; परळीतील नगरसेवकासह तिघे फरार. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर 2026. हॉटेलमध्ये जेवणादरम्यान झालेल्या वादातून मित्रानेच मित्राच्या छातीत सुरा खुपसून खून केल्याची धक्कादायक घटना लातूर शहरातील उस्मानपुरा/इस्लामपुरा भागातील हॉटेल उमेरासमोर घडली. बाबा अली शेख (वय ३८, रा. परळी) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी परळीतील नगरसेवक खालेद शेख याच्यासह तीन मित्रांवर संशय असून, घटनेनंतर सर्व आरोपी पसार झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परळी येथून बाबा अली शेख, नगरसेवक खालेद शेख, अल्फाज पठाण आणि उमेर हे चौघे जण लातूरला आले होते. बसवेश्वर कॉलेज ते खोरीगल्ली रस्त्यावरील हॉटेल उमेरा येथे दिनांक 16 सप्टेंबर 2026 रोजी बुधवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास जेवत असताना त्यांच्यात तीव्र वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर चौघेही हॉटेलबाहेर रस्त्यावर आले. तेथे तिघांनी मिळून बाबा अली यांच्या छातीत तीक्ष्ण चाकू खुपसला. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. नियोजनबद्ध कटाचा संशय. बाबा अली शेख आणि आरोपींमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जुना वाद होता. त्यामुळेच नियोजनबद्ध कट रचून खून करण्याच्या हेतूने त्याला परळीहून लातुरात आणले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पालकमंत्री शहरात असतानाच थरार. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहणासाठी लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले हे शहरात मुक्कामी होते. हा खुनाचा थरार घडला, नेमक्या त्याच वेळी पालकमंत्री घटनास्थळापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावरील एका गणेश मंडळात आरती करत होते. शहरात कडक पोलीस बंदोबस्त असतानाही भररस्त्यात घडलेल्या या हत्याकांडामुळे लातूर व परळी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस सध्या फरार आरोपींचा तीव्र शोध घेत आहेत.1