बदनापूर महाविद्यालयातील सुरेश जाधव (उजवा कोपरारक्षक) व अल्केश चव्हाण (उजवा मध्यरक्षक) यांची कब्बडी स्पर्धेसाठी निवड बदनापूर, दि. १८ (प्रतिनिधी): निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील कबड्डी खेळाडूंनी आपल्या सातत्यपूर्ण व दमदार कामगिरीच्या जोरावर राष्ट्रीय पातळीवर झेप घेतली आहे. महाविद्यालयातील सुरेश जाधव (उजवा कोपरारक्षक) व अल्केश चव्हाण (उजवा मध्यरक्षक) यांची २३ ते २७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान गुजरात येथे होणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या निवडीमुळे संस्थेत आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही खेळाडू मागील काही वर्षांपासून विविध आंतरमहाविद्यालयीन, विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सातत्याने उत्कृष्ट खेळ करत आहेत. त्यांच्या चपळाई, रणनीती व संघभावनेमुळे त्यांनी संघाला अनेक वेळा विजय मिळवून दिला आहे. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत यापूर्वीच त्यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संघात निवड झाली होती. विद्यापीठ स्तरावरही त्यांनी प्रभावी खेळ सादर करून आपली छाप पाडली आहे. या यशामागे महाविद्यालयातील क्रीडा विभागाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक तथा ट्रस्टचे विश्वस्त डॉ. एस. एस. शेख, क्रीडा विभागप्रमुख तथा संस्थेच्या विश्वस्त डॉ. नाजमा खान व डॉ. हरूण कुरेशी यांनी खेळाडूंना नियमित सराव, तांत्रिक प्रशिक्षण व मानसिक बळ देत त्यांची जिद्द अधिक दृढ केली. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन राष्ट्रीय स्तरावर झेप घेणे शक्य झाले आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल संस्थेचे संस्थापक डॉ. दत्ताभाऊ पाथ्रीकर, सचिव डॉ. एम. डी. पाथ्रीकर, अध्यक्ष डॉ. देवेश दत्ताभाऊ पाथ्रीकर यांनी दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सदरिल संघास डॉ. माणिक राठोड यांनी विशेष प्रशिक्षण दिले तसेच संस्थेचे सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांनीही त्यांचे कौतुक करून भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरही यश मिळवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. या यशामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा परंपरेत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे. आगामी राष्ट्रीय स्पर्धेतही हे दोन्ही खेळाडू आपल्या कौशल्याच्या बळावर उत्कृष्ट कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

- मुंबई की एक्ट्रेस प्रिया बक्शी को 14 फरवरी 2026 की रात बांद्रा में एक ऑटो ड्राइवर के हाथों डरावने पल का सामना करना पड़ा। ड्राइवर ने कथित तौर पर अनजान रास्ता पकड़ लिया और प्रिया ने वीडियो बनाकर अपनी घबराहट जाहिर की। उन्होंने सुरक्षा को लेकर सवाल उठाए और नॉर्थ इंडियन होने पर भेदभाव का आरोप लगाया।1
- *जालना* हिजाब घालून काही परीक्षार्थी विद्यार्थिनी परीक्षा केंद्रावर आल्याने गोंदळ... जालना शहरातील परीक्षा केंद्रावरील प्रकार.. समाज व धर्म पाहून विद्यार्थ्यांवर दबाव तंत्र वापरू नका.. एमआयएम पदाधिकाऱ्याचा बारावी परीक्षा केंद्रावरील शिक्षकांना व जिल्हाधिकाऱ्यांना विनंती..1
- बच्चा चोरीची घटना CCTV कैमऱ्यात कैद1
- मंठा येथे संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने तारीख 17, फेब्रुवारी वार मंगळवार रोजी छत्रपती संभाजी राजे चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकशी भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी नृत्य पथकाच्या माध्यमातून बंजारा समाजाच्या गौरवशाली गीतावर नृत्य सादर करण्यात आले.1
- मुले चोरणारी टोळी डोंगरगाव मध्ये, सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव येथे मुले चोरणारे टोळीचा परदापाष करण्यात आला आहे, डोंगरगाव गावामध्ये दोन दिवसापासून मुले चोरणारी टोळीची अफावा वाऱ्यासारखी पसरत होती अशातच एका संशयित महिलांना गावकऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले.1
- शिवभक्त सचिन फटाले यांनी शिवभक्तांना शिवजयंती बद्दल केले आव्हान1
- अंबड–घनसावंगी मार्गावर ऊसाचे ट्रॅक्टर पलटी; जिनिंगसमोर उस सांडल्याने वाहतूक ठप्प.. घनसावंगी ते अंबड मुख्य रस्त्यावर सूतगिरणीच्या पुढे जिनिंग जवळ उसाने भरलेला ट्रॅक्टर पलटी झाल्याची घटना आज १८ फेब्रुवारी बुधवारी सायंकाळी घडली. या अपघातामुळे संपूर्ण रस्ता काही काळासाठी पूर्णपणे बंद झाला असून दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या1
- जालन्यात कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये नवीन भ्रष्टाचार चे उघड वाहन प्रवेशासाठी बिना पावती प्रवेशद्वार वर पैसे वसुलन्यत येते1