सावित्रीबाईंच्या कार्यामुळेच महिला आज सर्वोच्च स्थानी: माजी खासदार समीर भुजबळ येवला, दि. १० मार्च: प्रतिनिधी सचिन वखारे येवला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त माजी खासदार समीर भुजबळ यांनी त्यांना विनम्र अभिवादन केले. येवला येथील महात्मा फुले नाट्यगृह आणि संपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांनी सावित्रीबाईंच्या पुतळ्यास व प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी बोलताना समीर भुजबळ म्हणाले की, "सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाची आणि समतेची ज्योत पेटवून महिलांना समाजात मानाचे स्थान मिळवून दिले. त्यांच्या अथक संघर्षामुळेच आज महिला राष्ट्रपती पदापासून ते विविध क्षेत्रांतील सर्वोच्च पदांपर्यंत पोहोचल्या आहेत. महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यात सावित्रीबाईंचे योगदान अतुलनीय आहे." या कार्यक्रमाला नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, उपनगराध्यक्ष पुष्पा गायकवाड, शहराध्यक्ष दत्ता निकम, जिल्हाध्यक्ष मोहन शेलार यांच्यासह विविध नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावित्रीबाईंच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
सावित्रीबाईंच्या कार्यामुळेच महिला आज सर्वोच्च स्थानी: माजी खासदार समीर भुजबळ येवला, दि. १० मार्च: प्रतिनिधी सचिन वखारे येवला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त माजी खासदार समीर भुजबळ यांनी त्यांना विनम्र अभिवादन केले.
येवला येथील महात्मा फुले नाट्यगृह आणि संपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांनी सावित्रीबाईंच्या पुतळ्यास व प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी बोलताना समीर भुजबळ म्हणाले की, "सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाची आणि समतेची ज्योत पेटवून महिलांना
समाजात मानाचे स्थान मिळवून दिले. त्यांच्या अथक संघर्षामुळेच आज महिला राष्ट्रपती पदापासून ते विविध क्षेत्रांतील सर्वोच्च पदांपर्यंत पोहोचल्या आहेत. महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यात सावित्रीबाईंचे योगदान अतुलनीय आहे." या कार्यक्रमाला नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी,
उपनगराध्यक्ष पुष्पा गायकवाड, शहराध्यक्ष दत्ता निकम, जिल्हाध्यक्ष मोहन शेलार यांच्यासह विविध नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावित्रीबाईंच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
- तालुक्यातील अंगुलगाव येथे पीरसाईबाबा यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या 'खासदार समीर भुजबळ क्रिकेट करंडक २०२६' चा शुभारंभ अत्यंत दिमाखात आणि उत्साही वातावरणात पार पडला. अचानक भयानक क्रिकेट क्लब आणि आयोजक येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती देविदास निकम यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मान्यवर दिलीप अण्णा खैरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषदेच्या आदर्श विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या लेझीम पथकाने झाली. ढोल-ताशांच्या गजरात आणि शिस्तबद्ध सादरीकरणाने उपस्थित क्रीडाप्रेमींची मने जिंकली. "ग्रामीण भागातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि गावातील क्रीडा संस्कृती अधिक प्रगल्भ व्हावी," असा विश्वास आयोजक देविदास निकम यांनी यावेळी व्यक्त केला. ही स्पर्धा मिशन हॉस्पिटल जवळील 'अचानक भयानक' मैदानावर खेळवली जात असून, यात येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील नामवंत संघ सहभागी झाले आहेत. उपस्थित मान्यवर: या सोहळ्याला सरपंच बाजीराव जाधव, परमानंद जाधव, पोलीस पाटील समाधान झाल्टे, उपसरपंच महेंद्र झाल्टे, भारमचे सरपंच प्रवीण गांजे, काशिनाथ साबळे, सोपान जगझाप, कारभारी आगवन, कृष्णा जानराव, प्रवीण गायकवाड, भाऊसाहेब धनवटे, विनोद ठोंबरे,राहुल चिंचोले यांसह अंगुलगावचे ग्रामस्थ व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढील काही दिवस या मैदानात चुरशीचे सामने रंगणार असून, क्रिकेटप्रेमींनी या स्पर्धेला मोठी गर्दी केली आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- Post by 🏛️ सत्यमेव जयते 🏛️1
- अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान देवळाली मतदारसंघातून जाणाऱ्या प्रस्तावित ६० मीटर बाह्य वळण मार्ग (रिंग रोड) प्रकल्पामुळे प्रभावित २२ गावांतील शेतकऱ्यांचा प्रश्न आ. सरोज अहिरे यांनी लक्षवेधीद्वारे सभागृहात मांडला. जमीन अधिग्रहणाच्या दरात मोठी तफावत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी असून ती दूर करून शासनाने विशेष मोबदला पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच पूर्णपणे भूमीहीन होणाऱ्या शेतकरी कुटुंबांना प्रकल्पग्रस्तांचे दाखले देण्याचीही मागणी त्यांनी केली.1
- राहुरीत पोलिसांवर काही तरुणांनी चा हल्ला हल्ला करणारे तीन तरुण पोलिसांनी अटक करून भर बाजारपेठेमध्ये त्यांची धिंड काढले आहे1
- श्री विष्णु महायज्ञ एवं श्रीमद् भागवत कथा का पहला दिन, कथावाचक महंत श्री राघव दास जी महाराज1
- खुलताबाद-पळसवाडी जवळ धावत्या एसटी बसला आग; ४८ प्रवाशांचा थरार, सर्वजण बचावले1
- सिल्लोड पंचायत समिती सभापती उपसभापती निवडीवरून सुनील मिरकर नाराज असल्याचे दिसून आले त्यांनी लगेच फेसबुकवर एक पोस्ट व्हायरल केली व आपली नाराजी व्यक्त करत म्हटले आहे की...1
- मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कूल, अंदरसूल येथे सावित्रीबाई फुले यांना पुण्यतिथी निमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्रिन्सिपल अल्ताफ खान हे होते. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला व सहकार महर्षी स्व.गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.या नंतर शिक्षिका अर्चना एंडाईत यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चारित्र्यावर प्रकाश टाकला.शेवटी अध्यक्षीय भाषणात प्रिन्सिपल अल्ताफ खान यांनी सांगितले की क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. तसेच महिलांना शिक्षणाचे मार्ग दाखवले. सदर कार्यक्रमास शिक्षक अमोल आहेर, अजहर खतीब, दीपक खैरनार, गणेश सोनवणे, सचिन घोडके, अजीम पटेल, नीलिमा देशमुख, सुनीता वडे, शोभा निकम, प्रिया भागवत, पूनम घोंगाणे, श्रावणी खेरुड सह सर्व शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका माधुरी माळी यांनी केले तर आभार शिक्षिका शर्मिला पवार यांनी मानले.1