मान्यवर साहित्यिकांच्या उपस्थितीत प्रसिद्ध लेखिका पल्लवी-माने यांचं पुस्तक प्रकाशन ठाणे : प्रसिद्ध लेखिका पल्लवी-माने शिंदे यांच्या नीलकांचन या ललित लेख संग्रहाचं कल्याण येथील मान्यवरांच्या हस्ते दिमाखात प्रकाशन करण्यात आलं. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी ललितसंग्रहातील लेखांचं कौतुक करत हा ललितसंग्रह संग्राह्य ठेवावा असा आहे असं मनोगत व्यक्त केलं.या पुस्तकात छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या मानवी भावनांवर आधारित आहेत. अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या लेखिका पल्लवी शिंदे-माने यांच्या ‘नीलकांचन’ या ललित लेख संग्रहाचं रविवारी कल्याणच्या बालक मंदिर शाळेच्या सभागृहात प्रकाशन पार पडलं. या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने करण्यात आली. या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष अजय कांडर यांनी ‘नीलकांचन’च्या निर्मिती प्रक्रियेचा प्रवास उलगडून दाखवत पुस्तकामागची भूमिका स्पष्ट केली. प्रमुख पाहुण्या डॉ. निर्मोही फडके यांनी संपूर्ण पुस्तकाचा रसाळ आढावा घेतला. पल्लवी शिंदे-माने यांच्या लेखनातील सौंदर्य आणि त्यांची विलक्षण लेखन प्रतिभा कशा प्रकारे वाचकप्रिय ठरेल, याचे सविस्तर विश्लेषण निर्मोही फडके यांनी केले. याप्रसंगी अभिनेते आणि कलाशिक्षक पांडुरंग भारती यांनी लेखिकेच्या लेखणीचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक विजय शिंदे यांनीही लेखिकेच्या साहित्याचा आणि त्यांच्या एकूण कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. रुपाली शेंडगे यांच्या प्रभावी सूत्रसंचालनाने या सोहळ्याला एक वेगळीच उंची प्राप्त करून दिली. शिंदे-माने परिवाराच्या साक्षीने पार पडलेल्या या सोहळ्याला मित्रपरिवार आणि साहित्यप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. यावेळी अंकिता काटकर यांनी सर्वांचे आभार मानले.
मान्यवर साहित्यिकांच्या उपस्थितीत प्रसिद्ध लेखिका पल्लवी-माने यांचं पुस्तक प्रकाशन ठाणे : प्रसिद्ध लेखिका पल्लवी-माने शिंदे यांच्या नीलकांचन या ललित लेख संग्रहाचं कल्याण येथील मान्यवरांच्या हस्ते दिमाखात प्रकाशन करण्यात आलं. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी ललितसंग्रहातील लेखांचं कौतुक करत हा ललितसंग्रह संग्राह्य ठेवावा असा आहे असं मनोगत व्यक्त केलं.या पुस्तकात छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या मानवी भावनांवर आधारित आहेत. अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या लेखिका पल्लवी शिंदे-माने यांच्या ‘नीलकांचन’ या ललित लेख संग्रहाचं रविवारी कल्याणच्या बालक मंदिर शाळेच्या सभागृहात प्रकाशन पार पडलं. या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने करण्यात आली. या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष अजय कांडर यांनी ‘नीलकांचन’च्या निर्मिती प्रक्रियेचा प्रवास उलगडून दाखवत पुस्तकामागची भूमिका स्पष्ट केली. प्रमुख पाहुण्या डॉ. निर्मोही फडके यांनी संपूर्ण पुस्तकाचा रसाळ आढावा घेतला. पल्लवी शिंदे-माने यांच्या लेखनातील सौंदर्य आणि त्यांची विलक्षण लेखन प्रतिभा कशा प्रकारे वाचकप्रिय ठरेल, याचे सविस्तर विश्लेषण निर्मोही फडके यांनी केले. याप्रसंगी अभिनेते आणि कलाशिक्षक पांडुरंग भारती यांनी लेखिकेच्या लेखणीचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक विजय शिंदे यांनीही लेखिकेच्या साहित्याचा आणि त्यांच्या एकूण कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. रुपाली शेंडगे यांच्या प्रभावी सूत्रसंचालनाने या सोहळ्याला एक वेगळीच उंची प्राप्त करून दिली. शिंदे-माने परिवाराच्या साक्षीने पार पडलेल्या या सोहळ्याला मित्रपरिवार आणि साहित्यप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. यावेळी अंकिता काटकर यांनी सर्वांचे आभार मानले.
- लवकर पोहोचावे आणि वेळ वाचावा या अनुशंगाने विमानाने प्रवास करणं सोयीचं म्हणून लोक हा प्रवास करणं पसंत करतात. मात्र हाच विमान प्रवास जीवावर बेततो की काय ही अशी भीती प्रवाशांना होती. ४ तासांचा थरार प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. तुम्ही विमानात बसला आहात आणि अचानक वैमानिक सांगतो की विमानात तांत्रिक बिघाड झाला. विमान खाली उतरू शकत नाही. तासनतास आकाशातच घिरट्या घालत आहे. ऐकूनच प्रवाशांचा अंगावर काटा आला. विमानात गोंधळाचं वातावरण होतं. Fly91 एअरलाईन्सच्या प्रवाशांनी विमानातच आरडाओरडा सुरू केला. काहींना तर अक्षरश: रडू कोसळलं. तब्बल ४ तास हे विमान आकाशात फिरत होतं आणि आत बसलेले प्रवासी जीवाच्या आकांताने रडत होते. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुपारी ३ वाजता Fly91 च्या IC3401 या विमानाने हुबळीसाठी उड्डाण केलं. सर्व काही सुरळीत होतं, संध्याकाळी ४:३० वाजता विमान लँड होणार होतं. पण लँडिंगच्या काही मिनिटं आधीच विमानात बिघाड झाला. विमान कंट्रोल बाहेर जातंय असं वैमानिकाला वाटलं आणि त्यामुशे त्याने लॅण्डिंग रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि एक दोन नाही तर 4 तास विमान आकाशात फिरत होतं. विमान खाली उतरवता येत नव्हतं आणि इंधनही संपवायचं होतं. यामुळे तब्बल ४ तास हे विमान मुंडगोड, दावणगेरे आणि शिवमोग्गा या भागांत आकाशातच घिरट्या घालत राहिलं. विमानातील इंधन कमी करून सुरक्षित लँडिंगसाठी वैमानिक प्रयत्न करत होते. खूप मोठी रिस्क होती पण त्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय समोर नव्हता. विमानातील भीषण परिस्थिती दाखवणारे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता काही खरं नाही असं वाटत असल्यामुळे प्रवासी चांगलेच घाबरले होते. काही प्रवासी ढसाढसा रडत होते, काही जण एकमेकांना मिठी मारून धीर देत होते, तर काही जण डोळे मिटून देवाचा धावा करत होते. ४ तासांचा हा काळ प्रवाशांसाठी एखाद्या भयानक स्वप्नापेक्षा कमी नव्हता. आम्ही सुखरूप खाली उतरू की नाही? हा एकच प्रश्न सगळ्यांना सतावत होता. राहून राहून देवाचा धावा करत होते. सुखरुप लॅण्डिंगसाठी प्रार्थना करत होते. अखेर वैमानिकांनी मोठ्या शिताफीने विमान बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे वळवलं. तिथे संध्याकाळी ७:३० वाजता विमानाचं सुरक्षित लँडिंग झालं. धावपट्टीवर विमान टेकताच प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला. काहींनी तर जमिनीला स्पर्श करताच ढसाढसा रडायला सुरुवात केली. एकीकडे प्रवाशांचा जीव टांगणीला लागलेला असताना, एअरलाईन्सने आम्हाला कोणतीही माहिती दिली नाही, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. संवाद नसणे आणि माहिती लपवणे यामुळे प्रवाशांच्या कुटुंबीयांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळाला. विमानात काय तांत्रिक बिघाड झाला याचा तपास केला जात आहे. याशिवाय वैमानिकांची देखील चौकशी केली जाणार आहे. वैमानिकाने कौशल्य दाखवून सुरक्षित लॅण्डिंग केलं. मात्र एक चुकीचा निर्णय प्रवाशांच्या जीवावर बेतू शकला असता. त्यामुळे वैमानिकाचं कौतुक होत आहे. पण हे नेमकं कशामुळे घडलं, यामागे कारण काय होतं याचा तपास केला जात आहे.1
- 🟥 GBK NEWS | ब्रेकिंग न्यूज 📍 सुरत (गुजरात) रविवारी सकाळी उधना रेल्वे स्थानक येथे प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये चढण्यासाठी प्रवाशांनी रांगा तोडत स्टेशन परिसरात धाव घेतली. 🚆 सकाळी ११:१५ वाजता सुटणाऱ्या उधना–हसनपूर (बिहार) या गाडीसाठी सुमारे ११ वाजता मोठ्या प्रमाणात प्रवासी एकत्र जमले होते. गर्दी इतकी वाढली की अनेक महिला व लहान मुले घाबरून गोंधळलेल्या अवस्थेत दिसून आली. 😢 या गोंधळादरम्यान एका तरुणाचा “आता परत नाही येणार, मित्रा… नाही येणार…” असा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामुळे परिस्थितीची गंभीरता अधिक अधोरेखित झाली आहे. ⚠️ प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, रेल्वे प्रशासनाच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. #बातमी #MarathiNews #BreakingNews #Surat #Railway #GBKNEWS1
- नमाज़ के फायदे बताना बना विवाद, नमिता थापर ने दिया करारा जवाब ! Breaking Bytes1
- मुंब्रा टीएमसी स्टेडियम के बंद स्विमिंग पूल को दोबारा से बनाया जाएगा जनता के लिए।#mumbra #viralvideo1
- Post by Labour addaa.1
- भाईंदर के नेहरू नगर में ‘धर्मांतरण’ की अफवाह पर बवाल—कुछ लोगों ने घर में घुसकर महिलाओं से मारपीट की। कवरेज कर रहे पत्रकार केतन बारिया पर भी हमला।1
- नमाज़ वाले विज्ञापन पर घिरीं Namita Thapar, सोशल मीडिया पर बढ़ा विवाद न्यूज़: बिजनेस लीडर और Shark Tank India की जज Namita Thapar एक विज्ञापन को लेकर विवादों में आ गई हैं। रिपोर्ट्स के मुताबिक, यह ऐड नमाज़ के फायदों से जुड़ा था, जो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो गया। इसके बाद कई लोगों ने इस विज्ञापन को अलग-अलग तरीके से समझा और उनके खिलाफ नकारात्मक टिप्पणियां और ट्रोलिंग शुरू हो गई। कुछ यूज़र्स ने आपत्तिजनक भाषा का भी इस्तेमाल किया, जिससे यह मुद्दा करीब 3 हफ्तों तक सोशल मीडिया पर चर्चा में बना रहा। विवाद बढ़ने के बाद नमिता थापर ने एक वीडियो संदेश जारी किया, जिसमें उन्होंने कहा, “silence is not a virtue” और अगर किसी के साथ अपमान या अन्याय होता है तो उसके खिलाफ आवाज़ उठानी चाहिए। उन्होंने यह भी कहा कि वह पहले से ही ट्रोलिंग का सामना करती रही हैं, लेकिन उनका फोकस जागरूकता और सम्मान पर है। इस पूरे मामले में जहां कुछ लोगों ने उनका समर्थन किया और इसे मानवता के नजरिए से देखने की बात कही, वहीं कुछ ने धार्मिक दृष्टिकोण से आपत्ति जताई। #NamitaThapar #SharkTankIndia #Controversy #Namaz #SocialMedia #ViralNews #IndiaNews1
- ठाणे:शहापूर तालुक्यातील आधार नोंदणी, जन्म-मृत्यू नोंदणी, वन हक्क दावे आणि तीव्र पाणी टंचाई यांसारख्या गंभीर समस्या मार्गी लावण्यासाठी प्रशासन आता पूर्णपणे सक्रिय झाले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, श्रमजीवी संघटना आणि विविध शासकीय विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची संयुक्त समन्वय बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत महसूल, ग्रामविकास, वन आणि आदिवासी विकास विभागाचे प्रतिनिधी, तसेच ग्रामस्तरावरील अधिकारी व श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील आदिवासींच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून प्रशासनातर्फे एक कालबद्ध कृती आराखडा जाहीर करण्यात आला. या बैठकीत प्रामुख्याने आधारकार्ड नोंदणीवर विशेष भर देण्यात आला. शहापूर हा आदिवासीबहुल तालुका असल्याने, येथील आदिम कातकरी समाजातील अनेक नागरिकांकडे अद्याप आधार कार्ड नसल्याचे समोर आले आहे. यावर उपाय म्हणून तातडीने 'आधार कॅम्प' लावण्याचे नियोजन करण्यात आले असून, मे महिन्यापर्यंत सर्व पात्र व्यक्तींचे आधार अर्ज भरून घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जेणेकरून कोणताही नागरिक शासकीय योजनांपासून वंचित राहणार नाही. वन हक्क दाव्यांच्या संदर्भातही बैठकीत कडक पवित्रा घेण्यात आला. तालुक्यातील साधारण २५० दावे ग्रामपंचायत आणि महसूल स्तरावर, तर ७०० हून अधिक दावे वनविभागाकडे प्रलंबित आहेत. या सर्व प्रकरणांची पुढील १५ दिवसांत सखोल पडताळणी करून ती मंजुरीसाठी उपविभागीय समितीकडे सादर करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. तालुक्यातील भीषण पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा परिषदेमार्फत 'वॉटर स्कॅर्सिटी मॅपिंग' करून टँकर पुरवठा आणि नादुरुस्त नळ पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्याचे ठरविण्यात आले आहे. कोणत्याही पाड्याला उन्हाळ्यात पाणी टंचाई भासणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना ग्रामविकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. यावेळी शहापूरचे गटविकास अधिकारी बाबुराव राठोड यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, "शहापूर तालुक्यातील आदिवासी बांधवांचे आधार कार्ड, वन हक्क दावे आणि पाणी टंचाई यांसारखे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. आम्ही सर्व विभागांची संयुक्त बैठक घेऊन ठोस कृती आराखडा तयार केला असून मे महिन्यापर्यंत आधार नोंदणी पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. कामात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक प्रशासकीय कारवाई केली जाईल." या बैठकीला तहसीलदार परमेश्वर कासुले, गट विकास अधिकारी बाबुराव राठोड, सहाय्यक प्रकल्प अधिकारी (ITDP) महेश कवडे, वनपरिक्षेत्रपाल लक्ष्मण चिखले, विस्तार अधिकारी एन. एच. पाटील, विलास जाधव, बी. आर. वाघचौरे, दिनेश घोलप, यशवंत धोत्रे आणि जी. के. ठिकामे आणि सर्व ग्रामपंचायतचे ग्रामसेवक उपस्थित होते. श्रमजीवी संघटनेच्या वतीने राज्य संघटक सचिव सीता घाटाळ, जिल्हा सरचिटणीस दशरथ भालके, तालुका अध्यक्ष माळू हुमणे, निरीक्षक लक्ष्मण चौधरी, सचिव प्रकाश खोडका, उपाध्यक्ष रुपेश आहिरे, विशाल मुकणे, दर्शना आगिवले, संघटक कैलास मुकणे, महिला प्रमुख लक्ष्मी वाघ, महिला सचिव कल्पना वाघ, कार्यालय सचिव कमलाकर शिंदे आणि माजी कातकरी प्रमुख संजय मुकणे यांनी उपस्थित राहून आदिवासींच्या समस्या मांडल्या. प्रशासनाच्या या सकारात्मक भूमिकेमुळे तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांना आता गती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.1