जळगावात खळबळ. पाळधी ते तरसोद बाह्यवळण महामार्ग खचला; वाहतूक बंद, दिल्लीहून पथक येणार शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या पाळधी ते तरसोद बाह्यवळण राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे पितळ पहिल्याच पावसाळ्यात उघडे पडले आहे शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या उड्डाणपुलालगत महामार्ग दोन्ही बाजूंनी दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणात खचल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, संभाव्य मोठी दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तत्काळ या मार्गावरील सर्व वाहतूक बंद केली असून, वाहनांना पर्यायी मार्गाने वळविण्यात आले आहे. गुरुवारी रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसानंतर शुक्रवारी दुपारच्या सुमारास महामार्गावरील मध्य रेल्वे उड्डाणपुलाजवळील भरावाचा भाग अचानक खचल्याचे निदर्शनास आले. काही मिनिटांतच रस्त्याला मोठ्या भेगा पडू लागल्या. दोन्ही बाजूंना माती सरकल्याने रस्त्याचा पाया कमकुवत झाल्याचे स्पष्ट दिसून आले. माहिती मिळताच पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे स्थानिक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. महामार्गाच्या भरावाची स्थिती धोकादायक असल्याने कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणून तातडीने वाहतूक बंद करण्यात आली. पोलिसांनी दोन्ही टोकांना बॅरिकेड्स लावून मार्ग रोखून धरला. अवजड वाहने, मालवाहू ट्रक तसेच इतर वाहनांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनीही त्यास दुजोरा दिला. वाहतुकीवर मोठा परिणाम पाळधी ते तरसोद बाह्यवळण मार्ग हा जळगाव शहरातील वाहतुकीचा महत्त्वाचा पर्याय मानला जातो. धुळे, भुसावळच्या दिशेने जाणारी अनेक जड वाहने या मार्गाचा वापर करतात. हा मार्ग बंद झाल्यामुळे वाहनांना शहरातून किंवा इतर पर्यायी मार्गांनी जावे लागत असून अनेक ठिकाणी वाहतुकीचा ताण वाढला आहे. काही ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. या घटनेची गंभीर दखल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतली आहे. महामार्ग खचण्यामागील नेमके कारण शोधण्यासाठी दिल्ली येथून वरिष्ठ अभियंते आणि तज्ज्ञांचे विशेष पथक शनिवारी जळगावात दाखल होणार आहे. हे पथक घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी करून तांत्रिक अहवाल तयार करणार असून त्यानंतर कायमस्वरूपी दुरुस्तीच्या कामाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह कोट्यवधी रुपयांचा खर्च करून नुकत्याच पूर्ण करण्यात आलेल्या बाह्यवळण महामार्गावर पहिल्याच पावसाळ्यात अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भरावाची मजबुती, जलनिस्सारण व्यवस्था, मातीचे योग्य दाबीकरण आणि बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याच्या दर्जाबाबत आता संशय व्यक्त केला जात आहे. वाहन चालकांनी संबंधित कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप केला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. एवढ्या मोठ्या खर्चानंतरही रस्ता काही महिन्यांतच खचणे ही गंभीर बाब असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. तात्पुरती दुरुस्ती; धोका कायम घटनास्थळी तातडीने भेगा बुजविण्याचे आणि खचलेल्या भागात मुरूम व दगड टाकून भराव करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र ही केवळ तात्पुरती उपाययोजना असल्याचे अभियंते सांगत आहेत. रस्त्याचा पाया कमकुवत झाल्याची शक्यता असल्याने संपूर्ण तांत्रिक तपासणी पूर्ण होईपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाणार नाही. या प्रकारानंतर महामार्गाच्या संपूर्ण बांधकामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. कामाच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता तपासणी झाली होती का, संबंधित अधिकाऱ्यांनी कामाची योग्य पाहणी केली होती का आणि निकृष्ट कामाला जबाबदार कोण, याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विविध सामाजिक संघटना, नागरिक आणि वाहनचालकांनी केली आहे.

- 🚨 MD ड्रग्ज जप्त! २ आरोपी जेरबंद ३ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत जळगाव जिल्हा पोलीस दलाने अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात आणखी एक मोठी आणि धडक कारवाई करत ६२.०७ ग्रॅम मेफेड्रॉन अर्थात एमडी हा घातक अंमली पदार्थ जप्त केला आहे. या कारवाईत ३ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दोन आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. "नशामुक्त भारत" अभियानाअंतर्गत जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक आणि सेवन रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. त्याच मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी राहुल गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वखार महामंडळ परिसरात एका व्यक्तीकडे मोठ्या प्रमाणात एमडी अंमली पदार्थ आहे. या माहितीच्या आधारे ३१ जुलै २०२६ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने सापळा रचला. संशयास्पद हालचाली करणाऱ्या इम्रान खान हयात खान, वय ३६, रा. फातेमा नगर, जळगाव याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून ६२.०७ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी २ लाख ८८ हजार रुपये किमतीचा एमडी अंमली पदार्थ, २० हजार रुपयांचा मोबाईल फोन आणि ५० हजार रुपयांची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल असा एकूण ३ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तपासादरम्यान या अंमली पदार्थाचा पुरवठा रफीक उर्फ गोल्डन, रा. मालेगाव, जिल्हा नाशिक याने केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे दोन्ही आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क), २२(क), २९ तसेच भारतीय न्याय संहिता कलम ३(५) अंतर्गत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहेत. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा, एमआयडीसी पोलीस आणि फॉरेन्सिक पथकाने संयुक्तरित्या यशस्वीपणे पार पाडली. जळगाव जिल्हा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक किंवा साठ्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा डायल ११२ वर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असे आश्वासन पोलीस प्रशासनाने दिले आहे.1
- संसद परिसर में विपक्षी सांसदों ने राम मंदिर चढ़ावा मामले को लेकर प्रतीकात्मक विरोध प्रदर्शन किया।1
- Post by लोखंडे संभाजी नगर पत्रकार1
- नशिराबाद जवळील बोगद्यात पाणी... नागरिक आक्रमक टोलवसुली बंद! जळगाव शहरापासून नशिराबादजवळील पोलीस ठाणे फाट्यावरील सर्व्हिस रोडच्या बोगद्याखाली गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करून टोलवसुली सुरूच ठेवण्यात आल्याने संतप्त नागरिक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी नशिराबाद टोल नाका गाठत काही काळासाठी टोलवसुली बंद पाडली. आंदोलनादरम्यान अनेक वाहनांना टोल न भरता पुढे सोडण्यात आले. बोगद्यातील पाणी तातडीने काढून सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था होईपर्यंत टोलवसुली बंद ठेवावी, अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली. टोल कंपनी नियमित शुल्क आकारते, मात्र पावसाळ्यातील समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला. काही काळ टोल नाक्यावर तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, "प्रथम सुरक्षित रस्ता आणि नंतर टोल" अशी भूमिका नागरिकांनी स्पष्ट करत हायवे प्रशासनाला इशारा दिला.1
- ममुराबाद येथील श्री गुरु गोरक्षनाथ गोशाळेसह परिसर जलमय; गोशाळेत पाणी शिरल्याने चारा भिजला, उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांनाही मोठा फटका ममुराबाद (प्रतिनिधी): सततच्या पावसामुळे ममुराबाद येथील श्री कृष्णावतारी गुरु गोरक्षनाथ गोशाळा परिसरात चारही बाजूंनी पाणी साचले असून गोशाळेतही पाणी शिरले आहे. त्यामुळे गोशाळेत साठवून ठेवलेला जनावरांचा चारा भिजून खराब झाला असून जनावरांच्या देखभालीसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. भाविक व गोसेवकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासन, सरपंच व सदस्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याचप्रमाणे गावातील उर्दू शाळा व पटेल वाडा परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला असून परिसरात डासांचे प्रमाण वाढल्याने साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे. ग्रामस्थांनी गोशाळा, उर्दू शाळा व परिसरातील साचलेल्या पाण्याचा तातडीने निचरा करून स्वच्छतेची उपाययोजना करावी, तसेच कायमस्वरूपी निचरा व्यवस्था उभारावी, अशी मागणी ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.3